रक्तगट मराठी माहिती Blood Group information in marathi

blood group information in marathi रक्तगट मराठी माहिती, आज आपण या लेखामध्ये रक्त गट (Blood Group) या विषयावर माहिती घेणार आहोत तसेच त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत आणि वेगवेगळ्या रक्त गटाचे काय गुणधर्म असतात आणि ते आपल्या शरीरामध्ये कसे काम करतात या सर्व गोष्टींच्या विषयी आज आपण या लेखामध्ये खाली पाहणार आहोत. सामान्यता आठ मुख्य रक्त प्रकार आहेत ते म्हणजे ओ पॉझीटिव्ह ( O+ ), ओ नेगेटिव्ह ( O- ), ए पॉझीटिव्ह ( A+ ), ए नेगेटिव्ह ( A- ), बी पॉझीटिव्ह ( B+ ), बी नेगेटिव्ह ( B- ), एबी पॉझीटिव्ह ( AB+ ), एबी नेगेटिव्ह ( AB- ).

आपल्या शरीरामध्ये ज्या प्रकारची प्रथिने असतात त्यावर आपला रक्तगट हा ठरलेला असतो म्हणजे जर तांबड्या पेशींच्यावर प्रथिने नसतील तर तो रक्तगट हा ओ ( O ) असतो, ए ( A ) आणि बी (B) या दोन प्रकारची प्रथिने असतील तर त्या व्यक्तीचा रक्तगट हा एबी (AB) असतो तसेच प्रथिने ए ( A ) असणाऱ्यांचा रक्त गट हा ए (A) आणि बी (B) प्रथिने प्रकार असणाऱ्या व्यक्तींचा रक्त गट बी (B) असतो.

रक्तगटाचा शोध हा सर्वप्रथम लँड्स्टेनर यांनी लावला. आपले रक्त हे पांढऱ्या रक्तपेशी, लाल लालपेशी आणि प्लेटलेट्सपासून प्लास्मा नावाच्या एका द्रवापासून बनलेले असते. आपला रक्तगट हा आपल्या तांबड्या पेशींच्यावर असणाऱ्या प्रथिनांच्यावर आणि प्रतीजनांच्यावर ठरलेला असतो आणि हे प्रथिने प्लाझ्मामध्ये आढळतात. सर्वसाधारण पाने रक्त गटाचे वर्गीकरण हे मुख्यता दोन प्रकारामध्ये केले आहे ते म्हणजे (ABO) प्रतिजन आणि (RH) आरएच प्रतीजन.

blood group information in marathi
blood group information in marathi

रक्तगट मराठी माहिती – Blood Group information in marathi

आरएच (RH) प्रनालीसह रक्तगट

आरएच पॉझीटिव्हए पॉझीटिव्ह (A+)बी पॉझीटिव्ह (B+)एबी पॉझीटिव्ह (AB+) ओ पॉझीटिव्ह (O+)
आरएच नेगेटिव्हए नेगेटिव्ह (A-)नेगेटिव्ह

(B-)

एबी नेगेटिव्ह

(AB-)

ओ नेगेटिव्ह

(O-)

रक्तातील मुख्य घटक

प्लाझ्मा : प्लाझ्मा रक्तातील एक घटक आहे आणि हा एक पिवळसर रंगाचा एक द्रव असतो ज्या द्रवामध्ये प्रथिने आणि क्षार असतात.

लाल रक्त पेशी : लाल रक्त पेशी ह्या महत्वाची कामगिरी बजावतात म्हणजेच त्या शरीराच्या भोवती ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतात.

प्लेटलेट्स : प्लेटलेट्स हे रक्त गोठण्यास जबाबदार असतात.

रक्त गटाचे प्रकार किती – blood group types in marathi

रक्तगट हे ४ प्रकारामध्ये वर्गीकृत केले आहेत ते म्हणजे ए ( A ), बी ( B ), एबी ( AB ) आणि ओ ( O ). खाली आपण या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

ए (A) रक्तगट : ए रक्तगट असणाऱ्या व्यक्तींच्या लाल पेशींच्या पृष्ठभागावर ए ( A ) प्रतिजन असते आणि प्लाझ्मामध्ये बी अँटीबॉडी असतात.

बी (B) रक्तगट : बी रक्तगटामध्ये लाल पेशींच्या पृष्ठभागावर बी ( B ) प्रतिजन असते आणि प्लाझ्मामध्ये अँटी ए प्रतिपिंड असतात.

एबी (AB) रक्तगट : या रक्तगटामध्ये लाल किंवा तांबड्या रक्तपेशींच्यामध्ये ए आणि बी दोन्ही प्रतिजान असतात पण प्लाझ्मा द्रवामध्ये अँटी ए आणि अँटी बी अँटीबॉडी नसतात. एबी ( AB ) प्रकार असणाऱ्या व्यक्तींना कोणताही रक्तगट चालू शकतो.

ओ (O) : प्लाझ्मा द्रवामध्ये अँटी ए आणि अँटी बी अँटीबॉडीज असतात पण लाल पेशींच्या पृष्ठभागावर ए आणि बी हे दोन्ही प्रतिजान नसतात. ओ ( O ) रक्तगट हा कोणत्याही ( ABO ) रक्तगटाला दिला जावू शकतो.

कोणता रक्तगट कोणत्या रक्तगटाला चालतो

ओ नेगेटिव्ह ( O- ) रक्तगट असलेली व्यक्ती हि जवळपास आपले रक्त कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दान करू शकतो कारण ओ नेगेटिव्ह ( O- ) रक्तामध्ये ए, बी किंवा आरएचडी प्रतीजन नसतात.

आरएच पॉझीटिव्ह ( RH+ ) रक्त असलेली व्यक्ती फक्त आरएच पॉझीटिव्ह ( RH+ ) रक्त असलेल्या व्यक्तिल रक्त दान करू शकते.

आरएच नेगेटिव्ह रक्त असलेली व्यक्ती हि आरएच नेगेटिव्ह आणि आरएच पॉझीटिव्ह असलेल्या व्यक्तीला रक्त देऊ शकते.

रक्तगट विषयी काही महत्वाची माहिती – information about blood in marathi

  • रक्तगटाचे प्रकार कोणकोणते आहेत ?

रक्तगटाचे एकूण आठ प्रकार आहेत ते म्हणजे ओ पॉझीटिव्ह ( O+ ), ओ नेगेटिव्ह ( O- ), ए पॉझीटिव्ह ( A+ ), ए नेगेटिव्ह ( A- ), बी पॉझीटिव्ह ( B+ ), बी नेगेटिव्ह ( B- ), एबी पॉझीटिव्ह ( AB+ ), एबी नेगेटिव्ह ( AB- ).

  • रक्तगटाचा शोध कोणी लावला ?

रक्तगटाचा शोध हा सर्वप्रथम लँड्स्टेनर यांनी लावला.

  • दुर्मिळ रक्त प्रकार किती आहेत ?

३ प्रकारचे रक्तप्रकार हे दुर्मिळ आहेत ते म्हणजे बी नेगेटिव्ह ( B- ) हा रक्त प्रकार एकूण लोकसंख्येच्या दीड टक्के आहेत त्याचबरोबर एबी नेगेटिव्ह ( AB- ) हा रक्तगट एकूण लोकसंखेच्या ०.६ टक्के आहे आणि एबी पॉझीटिव्ह ( AB+ ) हा रक्तगट एकूण लोकसंखेच्या ३.४ टक्के लोकांच्यामध्ये आढळतो.

  • कोणता रक्तगट हा सर्वात सुरक्षित आणि मजबूत रक्तगट आहे ?

ओ नेगेटिव्ह ( O- ) रक्तगट हा कोणालाही दिला जावू शकतो कारण ओ नेगेटिव्ह ( O- ) या रक्त प्रकारामध्ये ए ( A ), बी ( B ) किंवा आरएच ( RH ) प्रतीजन प्रतिपिंडे नसतात.

रक्तगट आणि लोकांची टक्केवारी

ABO रक्तगट लोकांची टक्केवारी
ओ पॉझीटिव्ह (O+)३९ टक्के
ओ नेगेटिव्ह (O-)९ टक्के
ए पॉझीटिव्ह (A+)३० टक्के
ए नेगेटिव्ह (A-)६ टक्के
बी पॉझीटिव्ह (B+)९ टक्के
बी नेगेटिव्ह (B-)२ टक्के
एबी पॉझीटिव्ह (AB+)४ टक्के
एबी नेगेटिव्ह (AB-)१ टक्के

 आम्ही दिलेल्या blood group information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रक्तगट मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about blood in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!