मानवी मेंदू माहिती Brain Information in Marathi

Human Brain Information in Marathi – Mendu in Marathi मानवी मेंदू माहिती मेंदू हा एक मानवी शरीरातील अवयव आहे ज्यामुळेच आपण सर्व प्रकिया करतो जसे कि विचार, स्मृती, भावना, श्वासोच्छ्वास, स्पर्श, दृष्टी, तापमान, भूक आणि आपल्या शरीराचे नियमन करणारी प्रत्येक प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या सामर्थ्य मेंदू या अवयवामध्ये असते. आज या लेखा मध्ये मेंदू म्हणजे काय आणि तो कसा काम करतो याबद्दल माहिती घेणार आहोत. मेंदू हा मानवी शरीरातील एक महत्वाचा भाग आहे जी आपल्या चेसंस्थेतील एक इंद्रिय आहे. मेंदू हा मऊ असल्यामुळे मेंदूच्या भोवती मेंदूचे संरक्षण करण्यासाठी एक कठीण कवठी देखील असते.

त्यामुळे कोणत्याही हानी पासून आपल्या मेंदूचे संरक्षण होण्यास मदत होते. आपला मेंदू आपल्याला नोरोगी आणि चांगला ठेवणे गरजेचे असते त्यामुळे आपण जगातील सर्व गोष्टी समजावून घेवू शकतो तसेच सर्व गोष्टींचा अभ्यास करू शकतो. मेंदू हा शरीरातील सर्वात महत्वाचा आणि जटील अवयव असून या शरीराच्या महत्वाच्या अवयवामध्ये १०० अब्जाहून अधिक चेतनापेशी असतात आणि त्यामुळे सिनॅप्स नावाच्या ट्रिलियन कनेक्शनमध्ये संवाद साधतात.

human brain information in marathi
human brain information in marathi

मानवी मेंदू माहिती – Brain Information in Marathi

मेंदू म्हणजे काय ? 

मेंदू हा हा एक मानवी शरीरातील महत्वाचा अवयव आहे जो आपल्या शरीरामध्ये मज्जासंस्थेचे केंद्र म्हणून कामगिरी बजावण्यास सक्रीय असतो. हे एक चेसंस्थेतील एक इंद्रिय आहे. मेंदू हा मऊ असल्यामुळे मेंदूच्या भोवती मेंदूचे संरक्षण करण्यासाठी एक कठीण कवठी देखील असते त्यामुळे कोणत्याही हानी पासून आपल्या मेंदूचे संरक्षण होण्यास मदत होते.

मेंदू हा एक जटिल अवयव आहे जो विचार, स्मृती, भावना, श्वासोच्छ्वास, स्पर्श, दृष्टी, तापमान, भूक आणि आपल्या शरीराचे नियमन करणारी प्रत्येक प्रक्रिया नियंत्रित करतो.

मेंदू कसा असतो ?

मेंदू हा हा एक मानवी शरीरातील महत्वाचा अवयव आहे जो आपल्या शरीरामध्ये मज्जासंस्थेचे केंद्र म्हणून कामगिरी बजावण्यास सक्रीय असतो. मेंदूमध्ये ६० टक्के चरबी आणि उर्वरित ४० टक्के पाणी,  प्रथिने, कर्बोदकांमधे आणि क्षारांचे मिश्रण असते. या शरीराच्या महत्वाच्या अवयवामध्ये १०० अब्जाहून अधिक चेतानापेशी असतात आणि त्यामुळे सिनॅप्स नावाच्या ट्रिलियन कनेक्शनमध्ये संवाद साधतात.

मेंदूचे वेगवेगळे भाग – Parts of Brain in Marathi

  • कॉर्टेक्स
  • ब्रेन स्टेम
  • बेसल गँगलिया
  • सेरेबेलम

कॉर्टेक्स 

कॉर्टेक्स हा एक मेंदूचा असणारा भाग आहे जो मेंदूच्या बाह्य भागावर असतो आणि या भागामध्ये विचार आणि स्वैच्छिक हालचाली होत असतात.

ब्रेन स्टेम 

ब्रेन स्टेम हा भाग श्वास आणि झोप यासारखी अनेक मुलभूत कार्ये या ठिकाणी नियंत्रित केली जातात आणि हा भाग पाठीचा कणा आणि बाकीच्या मेंदूच्या दरम्यान असतो.

सेरेबेलम 

सेरेबेलम हा भाग मेंदूच्या खालच्या बाजूला असतो आणि तो मेंदूच्या पाठीमागच्या बाजूला असतो. या भागामुळे मेंदूचे समन्वय आणि संतुलन राखले जाते.

बेसल गँगलिया 

बेसल गँगलिया म्हणजे मेंदूच्या मध्यभागी असलेल्या संरचनांचा समूह जो मेंदूच्या इतर अनेक भागांमध्ये संदेशांचे समन्वय करण्याचे काम करते.

मेंदूचे लोब्स 

प्रत्येक मेंदूच्या गोलार्धात चार विभाग असतात ज्याला लोब म्हणतात त्यामध्ये फ्रंटल, पॅरिएटल, टेम्पोरल आणि ओसीपीटल हे चार लोब्स असतात.

  • फ्रंटल लोब : फ्रंटल लोब हा मेंदूचा सर्वात मोठा लोब आहे जो डोक्याच्या समोर स्थित असतो. या लोबचे काम निर्णय घेणे आणि व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये या सारख्या प्रक्रिया होत असतात.
  • ओसीपिटल लोब : ओसीपीटल लोब हा मेंदूचा मागील भाग आहे जो दृष्टीशी संबंधित कार्य करतो.
  • पॅरिएटल लोब : पॅरिएटल लोब एखाद्या व्यक्तीला वस्तू ओळखण्यास आणि स्थानिक संबंध समजण्यास मदत करते त्याचबरोबर पॅरिएटल लोब शरीरातील वेदना आणि स्पर्शाच्या भावना देखील समजण्यास मदत करते. पॅरिएटल लोब मेंदूचा मध्य भागी असणारा भाग आहे.
  • टेम्पोरल लोब : मेंदूच्या बाजूला असणारा भाग जो अल्पकालीन स्मृती, भाषण, संगीत ताल आणि काही प्रमाणात वास या सारख्या प्रक्रिया ओळखण्यासाठी काम करत असतो.

मेंदू विषयी काही महत्वाची माहिती 

मेंदू का महत्त्वाचा आहे ?

मेंदू हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे कारण आपल्या मध्ये होणारी कृती आणि प्रक्रियांचे नियंत्रण हे फक्त मेंदूच करू शकतो त्याचबरोबर विचार करणे, समजून घेणे किंवा अनुभवण्याच्या भावना ह्या आपल्याला मेंदूमुळेच जाणवतात किंवा ह्या भावना मेंदू मधून येत असतात.

मेंदू इंद्रियांचे कार्य

विचार, स्मृती, भावना, स्पर्श, दृष्टी, श्वासोच्छ्वास, तापमान, भूक आणि आपल्या शरीराचे नियमन करणारी प्रत्येक प्रक्रिया नियंत्रित करणे हि मेंदूची कार्ये आहेत.

मेंदूचा कोणता भाग भावनांवर नियंत्रण ठेवतो ?

लिंबिक प्रणाली मेंदूच्या आत स्थित परस्पर जोडलेल्या रचनांचा एक समूह आहे. हा मेंदूचा एक भाग आहे जो वर्तन आणि भावनिक प्रतिसादांसाठी जबाबदार आहे.

मेंदूचा सर्वात महत्वाचा भाग कोणता ?

ब्रेन स्टेम हा भाग संपूर्ण मेंदू आणि मज्जासंस्थेचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. हे मेरुदंडाशी जोडलेले आहे आणि शरीराच्या सर्व भागांना संदेश पाठवण्याचे काम करते.

मेंदूचे वजन किती असते ?

प्रौढ मेंदूचे वजन सुमारे ३ पौंड असते.

मेंदू विषयी काही अनोखी तथ्ये 

  • तुमचा मेंदू तुमच्या शरीरातील २० टक्के ऑक्सिजन आणि रक्ताचा वापर करतो.
  • अल्कोहोल तुमच्या मेंदूवर अशा प्रकारे परिणाम करते ज्यामुळे अस्पष्ट दृष्टी, अस्पष्ट बोलणे, अस्थिर चालणे या सारख्या प्रक्रिया होतात.
  • प्रौढ मेंदूचे वजन सुमारे ३ पौंड असते.
  • हे तुम्हाला माहित आहे का कि आपण जस जसे मोठे होतो तस तसे आपल्या मेंदूचा आकार लहान होतो.
  • मानवी मेंदूमध्ये बहुतेक शंभर अब्ज न्यूरॉन्स असतात.
  • मेंदूमध्ये ६० टक्के चरबी आणि उर्वरित ४० टक्के पाणी, प्रथिने, कर्बोदकांमधे आणि क्षारांचे मिश्रण असते.
  • हिप्पोकॅम्पस हा एक मेंदूमधील भाग आहे ज्याला मेमरी सेंटर म्हंटले जाते.
  • लिंबिक प्रणाली वर्तन आणि भावनिक प्रतिसादांसाठी जबाबदार आहे.

आम्ही दिलेल्या brain information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मानवी मेंदू माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information of brain in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि human brain information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये parts of brain in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!