बऱ्हाणपूर चा इतिहास Burhanpur History in Marathi

burhanpur history in marathi – burhanpur information in marathi बऱ्हाणपूर चा इतिहास. बऱ्हाणपूर हे मध्य प्रदेश राज्यातील एक शहर आहे जेथे शाहजहाँ याची पत्नी मुमताज महल हिचा मृत्यू झाला होता. मुमताज महल आपल्या चौदाव्या संताना ला जन्म देताना त्यांचा मृत्यू झाला. आणि आपल्या पत्नीच्या प्रेमाखातीर शाहजहाँ ने मुमताज महल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ताजमहल बनवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीस हा ताज महाल बऱ्हाणपूर येथेच बांधला जाणार होता परंतु काही कारणास्तव तसे घडले नाही. या ब्लॉग मध्ये आपण बऱ्हाणपूर याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

बऱ्हाणपूर हे शहर ताप्ती नदीच्या उत्तर किनारपट्टीवर स्थित आहे. राष्ट्रकूट राजवटीत बऱ्हाणपूर हे ७५३-९८२ पासून महत्त्वाच शहर होते. खानदेश चे एक प्रख्यात नगर म्हणून बऱ्हाणपूर शहर प्रसिद्ध होतं. बऱ्हाणपूर हे शहर खानदेश ची राजधानी होतं. मध्ययुगीन काळामध्ये बऱ्हाणपूर चा उल्लेख प्रामुख्याने केला गेला आहे. ताप्ती नदीच्या व असिर्गगड किल्ल्यातील खोदकाम केल्यामुळे अनेक नामी देवीच्या मूर्ती व प्रागैतिहासिक काळापासून मंदिर सापडले आहेत.

मध्यप्रदेश मधील मध्यम आकाराचे शहर म्हणून बऱ्हाणपूर ओळखले जाते. तसेच बऱ्हाणपूर हे शहर वस्त्रोद्योगासाठी देखील प्रसिद्ध आहे. बुरानपुर हे शहर मध्य प्रदेश मधील पॉवरलूम उद्योगाचे केंद्र देखील मानलं जातं. पाईप्स व शेती उपकरणे यांचे उत्पादन प्रामुख्याने या शहरांमध्ये केलं जातं. या शहरांमध्ये अनेक कापूस आणि तेलाच्या गिरण्या देखील पाहायला मिळतात. संपूर्ण मध्यप्रदेश मध्ये सर्वात जास्त केळीचे उत्पादन बऱ्हाणपूर या शहरांमध्ये केलं जातं.

वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर वस्त्रोद्योगाचे प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करते.  सुलतान मलिक नसीर खान हा खानदेशच्या फरुकी राजवंश याने एक प्रसिद्ध मध्ययुगीन सुखी संत बुऱहान-उद-दिन यांच्या नावावरून या राज्याला बऱ्हाणपूर असे नाव देण्यात आले. यापुढे खानदेश सलतनतीची राजधानी म्हणून बऱ्हाणपूर ओळखली जाऊ लागली. व्यापार आणि कापड उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून बऱ्हाणपूर उदयास आले.

burhanpur history in marathi
burhanpur history in marathi

बऱ्हाणपूर चा इतिहास – Burhanpur History in Marathi

Burhanpur Information in Marathi

बऱ्हाणपूर या शहराचा इतिहास सांगायचा झाला तर १५३६ मध्ये मोगल सम्राट हुमायूनने गुजरात जिंकलं व त्यानंतर बडोदा, भरूच ते सुरत मार्गे बऱ्हाणपूर आणि असिर्गड ला भेट दिली. राजा अली खान ज्याची आदिल शाह अशी देखील ओळख आहे याला अकबराच्या स्वाधीन होण्यास सांगितलं परंतु १५७७ उन्हाळ्यामध्ये बलाढ्य अकबरशी असमान स्पर्धा टाळण्यासाठी आदिल शाह आपलीने शाह पद सोडून अकबराचे अधिपत्य स्वीकारले. पुढे आदिल शाहने‌ बऱ्हाणपूर येथे अनेक इमारती बांधल्या.

राजा आली खान उर्फ आदिलशाह याचा उत्तराधिकारी बहादूरखान यानी आपले स्वातंत्र्य घोषित केलं व त्याने अकबर आणि त्याचा मुलगा दानियल यांना वंदन करण्यास नकार दिला त्यावेळी अकबर संतप्त झाला आणि त्याने १५९९ मध्ये बऱ्हाणपूर कडे कुच केली आणि ८ एप्रिल १६०० रोजी कोणत्याही विरोधा शिवाय शहर ताब्यात घेतले. १६१७ मध्ये जहांगीर बादशहाने प्रिन्स परविझचा‌ उत्तराधिकारी म्हणून प्रिन्स खुर्रमला दखनचा गव्हर्नर म्हणून नियुक्त करून त्याला शाह ही पदवी दिली.

पुढे खुर्रम ने मोगल सैन्याला शांततापूर्ण विजय मिळवून दिला आणि जहांगीर बादशहा त्याच्यावरती भरपूर खूश होऊन त्याला १२ ऑक्टोंबर १६१७ रोजी शहाजहान ही पदवी दिली. १६२७ मध्ये जहांगीर बादशहा च्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याची गादी शहाजहान याकडे गेली. १६३० मध्ये शहाजहान बऱ्हाणपूर येथे गेला जिथे त्याने दोन वर्षे वास्तव्य केलं आणि शहाजानची प्रिय व आवडती पत्नी मुमताज महल हिचा बऱ्हाणपूर येथे मृत्यू झाला.

बऱ्हाणपूर येथे ताप्ती नदीच्या पलीकडे झैनाबाद च्या बागेत त्यांचा मृतदेह पुरण्यात आला आणि नंतर त्या मृतदेहाचे अवशेष आग्रा येथे पाठवण्यात आले. ६ मार्च १६३२ रोजी शहाजहान याने दख्खनचा व्हाइसरॉय म्हणून महाबतखानची नियुक्ती केली आणि शहाजहान उत्तरेकडे बऱ्हाणपूर सोडून निघून गेला. शाहजहान जितका वेळ बऱ्हाणपूर येथे होता तितक्या वेळा मध्ये त्याने बऱ्हाणपूर मध्ये भरपूर बदल घडवून आणले. त्याच्या वेळेस बऱ्हाणपूर एक अतिशय सुंदर शहर बनलं जे ऐतिहासिक स्मारकांचे एक प्रतीक बनत गेले.

बऱ्हाणपूर एक महत्त्वाची मोबाईल चौकी बनवून गेली आणि शहाजहान बादशहाने बऱ्हाणपूर येथे शाही किलांना मदत केली. बुद्धा नगर मधील एक भव्य राजवाडा म्हणजे शाही किला जो ताप्ती नदीच्या पश्चिमेला वसलेला आहे. किल्लाच्या टेरेसवर दिवाण -ए- आम आणि दिवाण-इ-खास हे बांधण्यात आले होते. आज या किल्ल्याची अवस्था अवशेषांमध्ये आहे. परंतु अजूनही शिल्पाकृती आणि कोरीव काम असलेल्या राजवाडा वरील भाग शिल्लक आहे.

या राजवाडा मध्ये एक हमाम म्हणजे शाहीबाथ बांधण्यात आली होती जी या राजवाड्याचे मुख्य आकर्षण ठरली. ही शाही बाथ विशेष शहाजहान ने त्याची पत्‍नी बेगम मुमताज महल यांच्यासाठी तयार करून घेतली होती जेणेकरून त्यांची पत्नी अल्हाददायक स्नान करू शकतील. पुढे संपूर्ण निमार प्रदेश ज्यामध्ये बऱ्हाणपूर, पूर्व निमार, पश्चिम निमार, बरवानी जिल्ह्यासह संपूर्ण भाग १६ व्या शतकाच्या मध्यापासून ते अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत औरंगजेब बादशहा, पेशवाई, सिंधिया यांच्या शासन अधिपत्याखाली होता.

आणि पुढे होळकर, पवार, पिंडारी इत्यादींनी या भागावर आपले शासन प्रस्थापित केले. परंतु अठराव्या शतकाच्या मध्यापासून हा संपूर्ण प्रदेश व त्याचे व्यवस्थापन ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. १८५७ मध्ये झालेल्या उठावामुळे बऱ्हाणपूर जिल्ह्यावर त्याचा मोठा प्रभाव पडला आणि ज्यामुळे ब्रिटिश राजवटीविरुद्ध देशाला वेठीस धरलं गेलं. १८५७ दंगलीच्या संदर्भात तात्या टोपे निमारच्या प्रदेशातून गेले होते आणि त्यांनी त्या प्रदेशातून बाहेर पडण्यापूर्वी पोलीस स्टेशन व सरकार जाळून टाकले होते.

स्वातंत्र्य चळवळ सुरू झाल्यानंतर असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो चळवळ, इत्यादी चळवळीमुळे व अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत झालेल्या स्वातंत्र्य चळवळी पर्यंत बऱ्हाणपूर जिल्ह्याला या सगळ्या चळवळींचा फार मोठा फटका बसला. बऱ्हाणपूर या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे अर्थातच हे शहर ऐतिहासिक ठिकाण आहे. इतिहासामध्ये फार मोठे महत्त्व प्राप्त केलेलं हे शहर आहे.

आपल्या भारताच्या भव्य इतिहासाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर इतिहासप्रेमी आणि पुरातत्त्व शास्त्रज्ञ यांच्यासाठी बऱ्हाणपूर हे एक उत्तम शहर ठरेल. मध्ययुगीन काळामध्ये आणि विशेषतः मोगल आणि मराठा काळात बऱ्हाणपूर हे शहर अतिशय महत्त्वाचे शहर बनले होते. आणि मुघलांचा इतिहास बऱ्हाणपूर शिवाय अपूर्ण आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणावर या शहराला भेट देतात आणि पर्यटकांची वाढती संख्या बघून या शहरांमध्ये पर्यटकांसाठी अनेक हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू केले आहेत.

येथे येणारे लोक प्रामुख्याने मुघल कालीन वैभवशाली वास्तुकला पाहण्यासाठी आणि त्यांची स्तुती करण्यासाठी येतात परंतु त्या व्यतिरिक्त देखील या शहराला व्यवसायासाठी देखील व्यवसायिक भेट देतात. भारतातील धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण मानले जाणारे हे बऱ्हाणपूर अनेक देशातील लोकांसाठी आकर्षण ठरले आहे. बऱ्हाणपूर हे शहर मुस्लिम आणि शीख यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. बऱ्हाणपूर मधील असिरगड हा एक प्रसिद्ध किल्ला आहे.

हा अभेद्य किल्ला बऱ्हाणपूर पासून उत्तरेला वीस किलोमीटर अंतरावर उत्तर समुद्रसपाटीपासून सुमारे ८५० फूट उंचीवर उभा असलेला किल्ला आहे. मध्यप्रदेश हे सुंदरता व ऐतिहासिक गोष्टींसाठी विश्व प्रसिद्ध आहे. परंतु मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील असिर्गड हा किल्ला रहस्यमय गोष्टींसाठी ओळखला जातो. असं म्हटलं जातं की या किल्ल्यामध्ये एक जलाशय देखील आहे आणि कितीही भीषण गर्मी असली तरीही हा जलाशय कधीच सुकत नाही.

लोकांची अशी मान्यता आहे की महाभारतातील एक प्रमुख पात्र म्हणजेच अश्वत्थामा हे आजही या जलाशयांमध्ये स्नान करतात आणि जवळपास स्थित शिव मंदिर मध्ये पूजा करतात. असिर्गड किल्ल्यामधील हे शिवमंदिर गुप्तेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शिवलिंगावर दररोज सकाळी ताजी फुले आणि गुलाल दिसते आणि लोकांची अशी मान्यता आहे की अश्वत्थामा सर्वात पहिल्यांदा या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी येतात.

मध्यप्रदेश मधील बऱ्हाणपूर हे शहर असंच रहस्यमय गोष्टींनी भरलेले आहे. अगदी प्राचीन काळापासून बऱ्हाणपूर या शहराला ऐतिहासिक वारसा मिळाला आहे इतिहासात घडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार आहे हा बऱ्हाणपूर जिल्हा.

आम्ही दिलेल्या burhanpur history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बऱ्हाणपूर चा इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about burhanpur in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि burhanpur information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!