butterfly fish information in marathi फुलपाखरू मासे माहिती, आपल्या जगामध्ये अनेक समुद्र, नद्या आणि अनेक पाण्याचे साठे आहेत आणि या पाण्यामध्ये असंख्य असे माश्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि आज आपण या लेखामध्ये अश्याच एका माश्याच्या प्रकाराविषयी माहिती पाहणार आहोत. बटरफ्लाय फिश (butterfly fish) ज्याला मराठीमध्ये फुलपाखरू मासे म्हणून ओळखले जाते आणि हा एक उष्णकटिबंधीय सागरी माशांचा एक समूह आहे आणि या प्रकारच्या माश्यांचे १२५ ते १२९ पेक्षा अधिक प्रकार आहेत आणि हे मासे chaetodontidae कुटुंबातील आहेत.
या प्रकारचे मासे हे दिसायला खूप सुंदर असतात आणि आणि त्यांचा रंग, नमुने आणि नम्र व्यक्तीमत्वामुळे त्यांना अनेक मत्स्यालयामध्ये देखील आपल्याला पहायला मिळतात. फुलपाखरू मासे हे एंजेलफिशशी संबधित आहेत आणि हे दोन्ही गट मिळून एकत्रितपणे कोरलफिश म्हणून ओळखले जाते.
आणि हे मासे पांढऱ्या, काळ्या, लाल, निळ्या, पिवळ्या आणि केशरी रंगाचे असतात आणि या आकर्षक अश्या रंगांच्यामुळे ते अगदी सुंदर आणि आकर्षक दिसतात आणि त्याचबरोबर फुलपाखराच्या पंखांवर दिसणाऱ्या नमुन्याप्रमाने या माश्यांच्या अनेक प्रजातींच्या पार्श्वभागावर आयस्पॉट आणि डोळ्यांच्यावर गडद पट्ट्या असतात.
फुलपाखरू मासे माहिती – Butterfly Fish Information in Marathi
फुलपाखरू मासे कुठे आढळतात – habitat
फुलपाखरू मासे हे भारतामध्ये, अटलांटिक, पॅसिफिक महासागरामध्ये आढळतात. शक्यतो chaetodontidae कुटुंबातील फुलपाखरू मासे हे गोड्या पाण्यातील मासे असतात.
फुलपाखरू माश्यांच्या विषयी माहिती आणि वर्णन – description
फुलपाखरू मासे किंवा ज्यांना इंग्रजीमध्ये बटरफ्लाय फिश म्हणून ओळखले जाते असे मासे chaetodontidae कुटुंबातील कुटुंबातील लहान आकाराचे मासे असतात आणि हे मासे वेगवेगळ्या रंगांच्यामध्ये (लाल, काळ्या आणि निळ्या) अश्या वेगवेगळ्या रंगामध्ये येतात.
त्यामुळे हे मासे अजूनच सुंदर दिसतात. फुलपाखरू माश्यांना शेपटीचे पंख असलेले अखंड पृष्ठीय पंख असतात जे गोलाकार किंवा छाटलेले असू शकतात आणि पाठीवर पृष्ठीयपंखांमध्ये कधी कधी तीक्ष्ण मनके असतात जे संभाव्य भक्षकांच्याकडून त्यांचे रक्षण करतात.
फुलपाखरू मासे हे एंजेलफिशशी संबधित आहेत आणि या प्रकारचा दोघांचा गट हा एक कोरल फिश म्हणून ओळखला जातो. हे मासे वर सांगितल्या प्रमाणे लहान आकाराचे असतात आणि या माश्यांची लांबी १२ ते २२ सेंटीमीटर इतकी असते.
आणि या प्रजातींच्यामध्ये काही मासे थोडे आकाराने लहान आणि काही मासे थोडे मोठे असतात आणि या मध्ये सर्वात मोठी प्रजाती म्हणजे रेषा असलेले फुलपाखरू मासा. या माश्यांच्या प्रजातीमध्ये नर आणि मादी हा फरक ओळखणे अवघड असते कारण ते दोन्ही मासे एकसारखे दिसतात.
फुलपाखरू माश्यांचे वेगवेगळे प्रकार – types
फुलपाखरू माश्यांच्या एकूण १२५ ते १२९ पेक्षा जास्त प्रजाती आहेत आणि त्यामधील काही खाली आपण पाहणार आहोत.
ब्लॅकनोज्ड बटरफ्लाय फिश
या प्रकारच्या फुलपाखरू माश्यांच्या प्रजाती ह्या पॅसिफिक महासागरामध्ये आढळतात आणि या प्रकारच्या माश्यांचा चेहरा हा पांढऱ्या रंगाचा असतो आणि संपूर्ण शरीर हे पिवल्या रंगाचे असते पंखाभोवती आणि चेहऱ्याच्या काही भागांच्याभोवती काळ्या खुणा असतात.
कॉपरबँड बटरफ्लाय फिश
या प्रकारच्या माश्यांना कोरलफिश किंवा चोचीचे फुलपाखरू मासे म्हणून ओळखले जाते आणि या माश्यांच्या अंगावर लांब पट्टे असतात या प्रकारची प्रजाती हि हिंदी आणि पॅसिफिक महासागरामध्ये आढळतात.
फोरस्पॉट बटरफ्लाय फिश
या प्रकारच्या माश्यांच्यामध्ये खालच्या बाजूला पिवळा, काळा पृष्ठीय पंख आणि त्याच्या दोन्हीही बाजूंना पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात.
ऑरीगा बटरफ्लाय फिश
ऑरीगा बटरफ्लाय फिश या प्रकारच्या माश्यांना थ्रेडफिन बटरफ्लाय मासे म्हणून देखील ओळखले जाते आणि या प्रजातीमध्ये पांढरा, काळा आणि पिवळ्या रंगाचे मासे आढळतात. या प्रकारचे मासे हे इंडो पॅसिफिक महासागरामध्ये आढळतात.
ब्लूस्ट्रीप बटरफ्लाय फिश
ब्लूस्ट्रीप बटरफ्लाय फिश या प्रकारची प्रजाती हि हवाईन बेटांच्या सभोवतालच्या पाण्यामध्ये आढळते आणि उथळ पाण्याच्या खडकांच्यामध्ये देखील हि प्रजाती सामान्य आहे.
फोरये बटरफ्लाय फिश
या प्रकारची प्रजाती हि अटलांटिक महासागरामध्ये आढळतात आणि त्याचे शरीर हे निळे किंवा पांढऱ्या रंगाचे असते आणि त्यांच्या शरीरावर मध्यभागी काळ्या रंगाचे गडद असे पट्टे असतात.
लेमन बटरफ्लाय फिश
या प्रकारच्या माश्यांना लेमन बटरफ्लाय फिश असे नाव पडण्याच्या कारण हे गडद पिवळ्या रंगाचे असतात आणि त्यावर गडद ठिपके असतात. त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यातून काही रेषा आणि पिवळे पंख असतात आणि याला काही वेळा बाजरी फुलपाखरू मासा देखील म्हणून ओळखले जाते.
फुलपाखरू मासे किंवा बटरफ्लाय फिश यांच्या विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- या प्रकारच्या माश्यांना अनेकदा पाळीव प्राणी म्हणून देखील पाळले जाते आणि या माश्यांना मोठ्या फिश टँकची गरज नसते.
- या प्रकारच्या माश्यांच्यामध्ये फुलपाखराच्या पंखावर दिसणाऱ्या नमुन्यांप्रमाणे नसून अनेकदा डोळ्यांच्यावर ठिपके किंवा पट्ट्या असतात.
- या प्रकारचे मासे हे फिश टँक किंवा अक्वारीयमसाठी प्रसिध्द आहेत.
- या प्रकारच्या माश्यांच्यामध्ये नर आणि मादी या मधील फरक ओळखण्यासाठी अवघड असते कारण ते एक सारखे दिसतात आणि त्यातूनही नर आणि मादी ओळखायचे असल्यास त्यांचे पंख आणि उदार पहिले जाते आणि त्यावरून नर आणि मादी ओळखले जाते.
- या माश्यांच्याकडे फुलपाखराच्या पंखासारखे पंख असतात म्हणून या माश्यांना फुलपाखरू मासा किंवा बटरफ्लाय मासा म्हणून ओळखले जाते.
- हे अनेक प्रकारचे शेवाळ तसेच त्याच्यापेक्षा लहान असणारे मासे, कीटक या प्रकारचे अन्न खातात.
- बटरफ्लाय फिश हा जगातील सर्वात सामान्य प्रवाळ माश्यांच्यापैकी एक आहे.
- आयर्न बटरफ्लाय फिश हि प्रजाती बाजारामध्ये विकली जाते आणि हि प्रजाती बाजारामध्ये महागात विकली जाते.
- या प्रकारच्या तरुण माश्यांना जाड असे कवच असते जे त्यांच्या संरक्षणासाठी असते आणि ते नंतर कमी होत जाते.
आम्ही दिलेल्या butterfly fish information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर फुलपाखरू मासे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या what to say butterfly fish in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about butterfly fish in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट