Rava Cake Recipe in Marathi केक रेसिपी इन मराठी केक म्हंटल कि सर्वांच्या तोंडाला पाणी येतेच आणि केक हा असा पदार्थ आहे जो बहुतेक लोकांना खूप म्हणजे खूप प्रिय असतो आणि काही लोकांना त्याचे जरी नाव ऐकले तरी तो खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. अश्याच केक प्रेमींच्यासाठी आज या लेखामध्ये केकच्या काही रेसिपी पाहणार आहोत. केक कोणाला आवडत नाही, केक हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो आणि सध्या कोणत्याही कार्यक्रमाला केक कट करणे हि एक प्रथा झालेली आहे आपण बहुतेक कार्यक्रमामध्ये पाहतो कि केक कट केला जातो.
त्या कार्यक्रमाचा आनंद वाढवला जातो जसे कि साखरपुडा असो वा उद्घाटन समारंभ असो केक कट केला जातोचा. आपल्याला माहित आहे लहानपणी पासून आपल्या सर्वांचे वाढदिवस साजरे केले जातात आणि वाढदिवसाला केक कट केले जातात, तसेच लग्नाचा वाढदिवसाला केक कट केला जातो किंवा रिसेप्शन पार्टी मध्ये देखील केक कट केला जातो
आणि म्हणून आपल्याला केक घराच्या घरी करायला आले तर आपले काम किती सोपे होईल आणि आपल्याला हवे तेंव्हा आपण केक बनवू शकतो, आपल्याला बेकरीतून केक विकत आणण्याची गरज भासणार नाही. चला तर मग केक वेगवेगळ्या प्रकारे कसा बनवला जातो ते पाहूयात.
केक रेसिपी मराठी मध्ये – Cake Recipe in Marathi
तयारी करण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
केक भाजण्यासाठी लागणारा वेळ | ४५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास |
सोप्या केक रेसिपीज – cake recipe in marathi written
सध्या केक बनवण्याची एवढी स्पर्धा वाढली आहे कि सध्या आपल्याला बेकरीमध्ये किंवा केक हाऊस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक पाहायला मिळतात जसे कि साधा केक, चॉकलेट केक, मॅगो केक, ब्लॅक फॉरेस्ट केक, बटर स्कॉच यासारख्या फ्लेवरचे अनेक केक बनवले जातात त्यामधील काही रेसिपी आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
तयारी करण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
केक भाजण्यासाठी लागणारा वेळ | ४५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास |
साधा केक रेसिपी किंवा अंडे वापरून केला जाणारा केक – basic cake recipe in marathi
आता आपण अंडे वापरून घराच्या घरी ओव्हन ऐवजी कुकरमध्ये केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. चला तर मग पाहुयाल साहित्य आणि कृती.
- २ वाटी मैदा.
- १ वाटी तूप.
- १ वाटी साखर ( बारीक केलेली / पिठी साखर ).
- १ वाटी लोणी.
- २ अंडी.
- १ मोठा कप दुध.
- १/२ चमचा खायचा सोडा.
- १/२ चमचा बेकिंग सोडा.
- १ चमचा वेलची पावडर ( फ्लेवरसाठी ).
- १ छोटी वाटी काजू आणि बेदाणे ( सजावटीसाठी ).
- सर्वप्रथम अंडी घ्या आणि ती फोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा बिटरच्या सहाय्याने एकजीव करून घ्या
- मग त्यामध्ये साखर आणि मैदा घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या आणि आता लोणी घाला आणि चांगले एकजीव करून घ्या किंवा फेटून घ्या.
- आपल्या केकच्या बॅटरची थोडे पातळ होण्यासाठी त्यामध्ये लागेल तेवढे दुध घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या ( केकच्या बॅटर जास्त पातळहि नको आणि जास्त घट्ट हि नको ).
- आता ज्या कुकरमध्ये तुम्ही केक भाजण्यासाठी ठेवणार आहात त्या कुकरची शिट्टी आणि रिंग काढा आणि त्यामध्ये एक वाटी किंवा प्लेट ठेवा.
- त्यानंतर ज्या भांड्यामध्ये केकचे बॅटर घालणार आहात त्या संपूर्ण भांड्याला आतून लोणी लावा आणि त्यावर मैदा भुरभुरा म्हणजे आपला केक भांड्याला चिकटणार नाही.
- आता केकच्या बॅटरमध्ये वेलची पूड आणि साधा सोडा आणि बेकिंग सोडा खाला ते चांगले एकत्र करा आणि लगेचच केक ज्या भांड्यामध्ये भाजणार आहात त्यामध्ये ओता आणि ते भांडे २ ते ३ वेळा टॅप करा त्यामुळे त्या भांड्यामध्ये असणारी हवा निघून जाईल आणि बॅटर भांड्यामध्ये चांगले पसरेल.
- आता कुकर गॅसवर मोठ्या आचेवर गरम करा आणि त्यामध्ये केक बॅटरचे भांडे ठेवा त्यावर काजू आणि बेदाणे टाकून कुकरचे झाकण घालून १० ते १५ मिनिटे केक मोठ्या आचेवर भाजा आणि त्यानंतर २५ ते ३० मिनिटे मंद आचेवर केक भाजा.
- ३० मिनिटांनी झाकण उघडून पहा आपला केक फुगला असेल. त्यामध्ये चाकू घालून बघा चाकुला जर पीठ लागले नाही तर आपला केक बेक झालेला असतो.
- आता थोड्या वेळाने केकचे भांडे कुकर मधून काढून केकच्या कडा सैल करा आणि केक हलक्या हाताने एक प्लेटमध्ये काढा.
- जर तुम्हाला केकला आयसिंग करायचे असल्यास तुम्ही या केकला आयसिंग देखील करू शकता.
एगलेस केक रेसिपी – eggless cake recipe in marathi
असे कित्येक लोक असतात जे शाकाहारी असतात आणि त्यामुळे ते अंडे घातलेला केक खाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी आता आपण अंडे न वापरता केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत आणि या रेसिपी मध्ये देखील आपण केक भाजण्यासाठी कुकरच वापरणार आहोत.
- २ वाटी मैदा.
- १ वाटी लोणी किंवा बटर.
- १ वाटी साखर ( पिठी साखर ).
- मीठ ( चवीनुसार ).
- ३ चमचे बेकिंग सोडा.
- १ वाटी दुध किंवा पाणी किंवा आवश्यकतेनुसार.
- १ चमचा तुमचे आवडते इसेन्स ( व्हॅनीला, मॅगो, बटर स्कॉच, पाइनअॅपल )
- सर्वप्रथम मैदा आणि लोणी चांगले बिटर किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये मध्ये फेटून घ्या आणि त्यामध्ये पिठी साखर, बेकिंग सोडा आणि इसेन्स घालून ते चांगले एकजीव करून घ्या.
- मग त्यामध्ये जसे लागेल तसे दुध किंवा पाणी घालून बॅटर चांगले तयार करून घ्या.
- आता ज्या कुकरमध्ये तुम्ही केक भाजण्यासाठी ठेवणार आहात त्या कुकरची शिट्टी आणि रिंग काढा आणि त्यामध्ये एक वाटी किंवा प्लेट ठेवा.
- त्यानंतर ज्या भांड्यामध्ये केकचे बॅटर घालणार आहात त्या संपूर्ण भांड्याला आतून लोणी लावा आणि त्यावर मैदा भुरभुरा म्हणजे आपला केक भांड्याला चिकटणार नाही.
- आता केकच्या बॅटरमध्ये वेलची पूड आणि साधा सोडा आणि बेकिंग सोडा खाला ते चांगले एकत्र करा आणि लगेचच केक ज्या भांड्यामध्ये भाजणार आहात त्यामध्ये ओता आणि ते भांडे २ ते ३ वेळा टॅप करा त्यामुळे त्या भांड्यामध्ये असणारी हवा निघून जाईल आणि बॅटर भांड्यामध्ये चांगले पसरेल.
- आता कुकर गॅसवर मोठ्या आचेवर गरम करा आणि त्यामध्ये केक बॅटरचे भांडे ठेवा त्यावर काजू आणि बेदाणे टाकून कुकरचे झाकण घालून १० ते १५ मिनिटे केक मोठ्या आचेवर भाजा आणि त्यानंतर २५ ते ३० मिनिटे मंद आचेवर केक भाजा.
- ३० मिनिटांनी झाकण उघडून पहा आपला केक फुगला असेल. त्यामध्ये चाकू घालून बघा चाकुला जर पीठ लागले नाही तर आपला केक बेक झालेला असतो.
- आता थोड्या वेळाने केकचे भांडे कुकर मधून काढून केकच्या कडा सैल करा आणि केक हलक्या हाताने एक प्लेटमध्ये काढा.
- तुमचा एगलेस केक तयार झाला.
चॉकलेट केक हा खास करून लहान मुलांना खूप आवडतो आणि म्हणूनच आता आपण चॉकलेट केक कसा बनवायचा ते पाहू.
- २ वाटी मैदा.
- १ वाटी तूप.
- १ वाटी साखर ( बारीक केलेली / पिठी साखर ).
- १ वाटी लोणी.
- २ अंडी.
- १ मोठा कप दुध.
- १/२ चमचा खायचा सोडा.
- १/२ चमचा बेकिंग सोडा.
- १ चमचा चॉकलेट इसेन्स.
- २ चमचे चॉकलेट सिरप.
- सर्वप्रथम अंडी घ्या आणि ती फोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा बिटरच्या सहाय्याने एकजीव करून घ्या
- मग त्यामध्ये साखर आणि मैदा घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या आणि आता लोणी घाला आणि चांगले एकजीव करून घ्या किंवा फेटून घ्या.
- मग त्यामध्ये बेकिंग सोडा, खायचा सोडा, चॉकलेट इसेन्स आणि चॉकलेट सिरप घाला आणि ते एकजीव करा किंवा बिटरच्या सहाय्याने केकचे बॅटर चांगले फेटून घ्या.
- जर तुम्ही केक कुकरमध्ये भाजणार असाल तर त्यासाठी वरील रेसिपी मध्ये दिलेल्या केक भाजण्याची प्रक्रिया अवलंबली तरी चालेल.
- तुम्ही या केकला आयसिंग देखील करू शकता.
टिप्स ( tips )
- व्हॅनीला, मॅगो, बटर स्कॉच, पाइनअॅपल यासारखे फ्लेवर घालून आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवू शकतो.
- अंडे वापरून केलेल्या केक मध्ये देखील आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे इसेन्स वापरू शकतो.
- जर तुम्हाला केक ओव्हनमध्ये भाजायचा असल्यास तुम्ही ३२५ ते ३५० डिग्रीवर केक भाजू शकता.
आम्ही दिलेल्या cake recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर केक रेसिपी मराठी मध्ये माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या basic cake recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि cake recipes video in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये madhura cake recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट