चैतन्य महाप्रभु मराठी माहिती Chaitanya Mahaprabhu Information in Marathi

chaitanya mahaprabhu information in marathi चैतन्य महाप्रभु मराठी माहिती, आज आपण या लेखामध्ये १५ व्या शतकातील अध्यात्मिक नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चैतन्य महाप्रभु यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. चैतन्य महाप्रभु यांचा जन्म भारतातील पश्चिम बंगालमधील नवद्वीप या ठिकाणी १८ फेब्रुवारी १४८६ मध्ये झाला होता आणि त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ मिश्रा असे आहे आणि आयीचे नाव साची देवी. चैतन्य महाप्रभु हे जरी अध्यात्मिक नेते असले तरी त्यांच्या अनुयायांनी त्यांना भगवान श्री कृष्णाचा अवतार मानले आहे.

चैतन्या महाप्रभु यांनी एक मंत्र शोधला होता आणि त्या मंत्राला महामंत्र म्हणून ओळखले जात होते आणि तो मंत्र म्हणजे हरे कृष्ण मंत्र आणि तो त्या काळी देखील खूप लोकप्रिय झाला होता आणि आज देखील हा मंत्र खूप लोकप्रिय आहे.

चैतन्य महाप्रभु हे बाल वायामाधेचे एक विद्वान होते आणि त्यांना अगदी लहान वयातच विद्वान म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांच्याविषयी अनेकांचे असे म्हणणे होते कि ते भगवान श्री कृष्ण यांच्यासारख्या वैशिष्ट्यसह जन्माला आले होते. चला तर खाली आपण चैतन्य महाप्रभु यांच्याविषयी आणखीन माहिती घेवूया.

chaitanya mahaprabhu information in marathi
chaitanya mahaprabhu information in marathi

चैतन्य महाप्रभु मराठी माहिती – Chaitanya Mahaprabhu Information in Marathi

नावचैतन्य महाप्रभु
जन्म१८ फेब्रुवारी १४८६
जन्मठिकाणभारतातील पश्चिम बंगालमधील नवद्वीप या ठिकाणी झाला
पालकजगन्नाथ मिश्रा आणि साची देवी
भाऊविश्वरूपा
ओळखभगवान श्री कृष्णाचे अवतार
मृत्यू१४ जून १५३४

चैतन्य महाप्रभु यांचे प्रारंभिक जीवन – early life

चैतन्य महाप्रभु यांचा जन्म भारतातील पश्चिम बंगालमधील नवद्वीप या ठिकाणी १८ फेब्रुवारी १४८६ मध्ये झाला होता आणि त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ मिश्रा असे आहे आणि आईचे नाव साची देवी. चैतन्य महाप्रभु यांना एक दुसरा मोठा भाऊ होता ज्याचे नाव विश्वरूपा असे होते आणि ते लहान होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब हे बांगलादेशातील सिल्हेट मधील श्रीहट्टा या ठिकाणी राहत होते.

अनेकजण असे सांगतात कि हे श्रीकृष्णाच्या कल्पित प्रतिमेशी साम्य दिसत होते आणि ते भगवान श्री कृष्ण यांच्यासारख्या वैशिष्ट्यसह जन्माला आले होते. त्यांनी अगदी लहानपणी पासूनच श्री कृष्णाची स्तुती करण्यास सुरुवात केली आणि मग ते हळूहळू विद्वानांच्याप्रमाणे ज्ञानाचा प्रसार करू लागले.

ज्यावेळी ते १६ वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी स्वताची एक शाळा सुरु केली आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थी येण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यश देखील आले. ते धार्मिक स्तोत्रांचे पठन देखील लहान वयातच केले होते आणि विद्वान म्हणून ओळखले जाणारे केशव काश्मिरी यांना वाद्विवादामध्ये पराजित केले होते.

चैतन्य महाप्रभु यांचे उपदेश

चैतन्य महाप्रभु हे एक विद्वान होते आणि त्यांनी अगदी लहान वयापासूनच भगवान श्री कृष्ण यांची स्तुती करण्यास सुरुवात केली होती आणि त्यांनी श्री कृष्ण यांच्यावरून काही उपदेश देखील केले आहेत आणि ते काय आहेत ते खाली आपण पाहूया.

  • त्यांनी भगवान श्री कृष्ण यांच्याविषयी असे म्हटले होते कि भगवान श्री कृष्ण यांच्याकडे सर्व शक्ती आहेत म्हणजेच हे जग किंवा विश्व चालवण्यासाठी ज्या शक्ती आवश्यक आहेत त्या सर्व शक्ती श्री कृष्ण यांच्याकडे आहे.
  • आत्मा हा परमेश्वरापेक्षा वेगळा आणि समान आहे म्हणजेच आत्मा आणि भौतिक जग हे जरी भिन्न असले तरी परमेश्वर आणि परमात्मा हे एकसारखेच आहेत.
  • भगवान श्री कृष्ण हे सर्व गोष्टींचे उगमस्थान आहेत म्हणजेच यामध्ये सांगितले आहे कि शेवटी सर्व अध्यात्मिक आनंद आणि भावनांचा आनंद घेतात.
  • तसेच त्यांनी असा उपदेश केला कि कृष्ण हे परम सत्य आहे म्हणजेच श्री कृष्ण हे सर्वोच्च आहे.
  • आत्मा शुध्द भक्ती करतो म्हणजेच यामध्ये महाप्रभूंनी भक्ती योगाचा पुरस्कार केला आहे आणि शुध्द भक्ती हि मुक्ती मिळवण्याचा मार्ग आहे.  
  • आत्मा हा परमेश्वराचा एक भाग आहे.

भक्ती प्रसार प्रवास (भारत)

चैतन्य महाराज हे भक्तीचा प्रसार करत होते आणि हे प्रसार करत असताना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते आणि त्यांनी भक्तीचा प्रसार करण्यासाठी भारतामध्ये देखील प्रवास केला. ते लहानपणीपासूनच भगवान श्री कृष्ण यांची स्तुती करत होते आणि त्यांनी भक्तीचा प्रसार करण्यासाठी भारतातील वृंदावन या ठिकाणी भेट दिली.

आणि श्री कृष्णांच्या संबधित ठिकाणांना भेट देऊन ते सात मादिरांच्या सोबत सर्व ठिकाणे शोधण्यास यशस्वी झाले आणि त्या ठिकाणांना आज देखील अनेक वैष्णव भेट देतात. नंतर ते ओरिसा मधील चैतन्य पुरी या ठिकाणी स्थायिक झाले.

चैतन्य महाप्रभु यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • चैतन्य महाप्रभु यांना दोन जोडीदार होत्या त्या म्हणजे विष्णुप्रिया देवी आणि लक्ष्मीप्रिया देवी.
  • त्यांनी गया या ठिकाणी असणारे माधवेंद्र पुरी यांचे शिष्य ईश्वरा पुरी यांच्याकडून पहिली दीक्षा स्वीकारली.
  • चैतन्य महाप्रभु यांचा जन्म भारतातील पश्चिम बंगालमधील नवद्वीप या ठिकाणी १८ फेब्रुवारी १४८६ मध्ये झाला होता.
  • चैतन्य महाप्रभु यांना हरे कृष्ण मंत्र शोधल्याचे श्रेय जाते.
  • महाप्रभु यांचा मृत्यू वयाच्या ४८ व्या वर्षी झाला आहे आणि यांचा मृत्यू ओरिसा मधील चैतन्य पुरी या ठिकाणी झाला आहे आणि यांचे अनेक अनुयायी असे म्हणतात कि ते जादुईपणे गायब झाले होते तर काहीजन असे म्हणतात हि ओडिशा या ठिकाणी असणाऱ्या तोटा गोपीनाथ मंदिरामध्ये ते मृत्यू पावले होते.
  • त्यांच्या अनेक अनुयायांचा असा समज आहे कि ते श्री कृष्णाचा अवतार होते आणि श्रीकृष्णाच्या कल्पित प्रतिमेशी साम्य दिसत होते आणि ते भगवान श्री कृष्ण यांच्यासारख्या वैशिष्ट्यसह जन्माला आले होते.
  • ईश्वरा पुरी ही चैतन्य महाप्रभु यांचे गुरु होते.
  • ज्यावेळी चैतन्य महाप्रभु यांच्या वडिलांचा म्हणजेच जगन्नाथ मिश्रा यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांनी वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी धार्मिक कार्यक्रम करण्याचे ठरवले आणि त्यांनी गया ह्या प्राचीन शहराला भेट दिली आणि त्यावेळी त्यांची भेट ईश्वरा पुरी यांच्याशी झाली.
  • त्यांनी वयाच्या फक्त १६ व्या वर्षी स्वताची शाळा सुरु केली आणि त्यामध्ये विद्यार्थी देखील आकर्षित झाले आणि या शाळेमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात झाली.

आम्ही दिलेल्या chaitanya mahaprabhu information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चैतन्य महाप्रभु मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chaitanya mahaprabhu in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about chaitanya mahaprabhu in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sant chaitanya mahaprabhu information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!