chittorgarh fort information in marathi चित्तोडगढ किल्ला माहिती, भारतामध्ये अनेक मोठमोठे किल्ले आहेत आणि चीत्तोडगड किल्ला देखील यामधील एक किल्ला आहे आणि म्हणून आज आपण या लेखामध्ये चित्तोडगढ किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. चित्तोडगढ हा किल्ला भारतातील राजस्थान या राज्यामध्ये वसलेला आहे आणि या किल्ल्याची निर्मिती चित्रांगदा मोरी यांनी केली होती आणि या किल्ल्याची निर्मिती हि ७ व्या शतकामधील असून या किल्ल्याची सुधारण विविध मौर्य शासकांनी केली होती.
चित्तोडगढ या किल्ल्याचा एकूण परिसर हा ७०० एकर आहे आणि हा किल्ला भारतातील सर्वात मोठा किल्ला मनाला जातो. ७०० एकर परिसरामध्ये पसलेल्या या किल्ल्याच्या घेर हा १२ ते १३ किलो मीटर आहे आणि या किल्ल्याला प्रवेशद्वाराचे संरक्षण करणारे एकूण सात दरवाजे आहेत आणि या किल्ल्याला एक भव्य मुख्य दरवाजा आहे त्याचे नाव राम दरवाजा असे आहेत.
या किल्ल्यामध्ये आपल्याला राजवाडे, मंदिरे, स्मारके अश्याप्रकारच्या एकूण ६५ वास्तू पहायला मिळतात तर या किल्ल्याच्या शेजारी असणारा जलकुंभ देखील मोहक दृष्ये निर्माण करतो.
चित्तोडगढ किल्ला माहिती – Chittorgarh Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | चित्तोडगढ किल्ला |
ठिकाण | भारतातील राजस्थान राज्यातील उदयपुर या शहरापासून काही अंतरावर हा किल्ला वसला आहे. |
निर्मिती | ७ व्या शतकामध्ये |
संस्थापक | चित्रांगदा मोरी (मौर्य शासक) |
प्रकार | टेकडी किल्ला |
क्षेत्रफळ | ७०० एकर |
चित्तोडगढ किल्ल्याविषयी माहिती – information about chittorgarh fort in marathi
चित्तोडगढ हा किला भारतातील राजस्थान राज्यामध्ये वसलेला आहे आणि हा किल्ला राजस्थानमधील उदयपुर या मुख्य शहरापासून ११२ किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याचा घेर हा १२ ते १३ किलो मीटर असून हा किल्ला ७०० एकर परिसरामध्ये आहे आणि हा किल्ला १८० मीटर उंचीच्या टेकडीवर वसलेला आहे.
चित्तोडगढ हा किल्ला शूर राजपुतांच्या अभिमानाची आणि शौर्याची कहाणी सांगणारा एक ऐतिहासिक प्राचीन किल्ला आहे. चित्तोडगढ हा किल्ला ७ व्या शतकातील असून या किल्ल्याची निर्मिती चित्रांगदा मोरी यांनी केली जो मौर्य वंशाचा शासक होता आणि नंतर या किल्ल्याची सुधारण अनेक मौर्य वंश शासकांच्यामार्फत झाली.
चित्तोडगढ किल्ल्याचा इतिहास – chittorgarh fort history in marathi
चित्तोडगढ हा किल्ला भारतातील सर्वात मोठा किल्ला मनाला जातो आणि या किल्ल्याच्या निर्मितीविषयी किंवा किल्ल्याच्या माहितीविषयी कोणतेही ठोस पुरावे जरी नसले तरी काही इतिहासकारांच्यामते हा किल्ला मौर्य वंशाचा शासक चित्रांगदा मोरी याने स्थापन केला आणि आणि या ठिकाणी किल्ल्याच्या शेजारी एक जलकुंभ आपल्याला पहायला मिळतो आणि हा जलकुंभ महाभारतातील महान भीम यांनी निर्माण केले आहे असे म्हटले जाते.
या किल्ल्यावर सुरुवातीला मौर्य वंशांचे वर्चस्व होते असे दिसून येते त्यानंतर या किल्ल्यावर गुहीला घराण्याचा बाप्पा रावल याने हल्ला करून हा किल्ला आपल्याल ताब्यात घेतला होता आणि त्याने हा किल्ला ७३० च्या सुमारास आपल्या ताब्यात घेतला होता.
इ. स १३०३ मध्ये चित्तोडगढ या किल्ल्यावर अल्लाऊद्दीन खिलजीने या किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याचे सर्व प्रयत्न हे अपयशी ठरले. त्याचबरोबर या किल्ल्यावर १९३५ मध्ये गुजरातचा बहादूर शहा आणि नंतर १५६८ मध्ये या किल्ल्यावर मुघल सम्राट अकबराने या किल्ल्यावर आक्रमण केले होते परंतु राजपुतांनी मरेपर्यंत हा किल्ला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी लढले होते.
चित्तोडगढ किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे – what to see in fort
चित्तोडगढ हा किल्ला भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे आणि या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे ७०० एकर आहे आणि या किल्ल्यामध्ये आपल्याला अनेक ऐतिहासिक बांधकामे जसे कि मंदिरे, राजवाडे आणि स्मारके पहायला मिळतात.
- दरवाजे : या किल्ल्याला एकूण सात दरवाजे आहेत ते म्हणजे गणेश पोळ, पडण पोळ, भैरो पोळ, हनुमान पोळ, लक्ष्मण पोळ, राम पोळ आणि जोरला पोळ. राम पोळ हा या किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे आणि बाकीचे सहा दरवाजे मुख्य दरवाज्याचे संरक्षण करण्यासाठी बांधले आहेत.
- राजवाडे : या किल्ल्यामध्ये अनेक शासकांनी राजवाडे देखील बांधले आहेत आणि ते आज देखील पर्यटकांच्यासाठी पाहायला मिळतात. या ठिकाणी राणा कुंभा पॅलेस, रतन सिंग पॅलेस, फतेह प्रकाश पॅलेस, पद्मिनी पॅलेस इत्यादी.
- मंदिरे : या ठिकाणी आपल्याला जैन मंदिर, कुंभ श्याम मंदिर, मीरा मंदिर आणि कालिकामाता मंदिर पाहायला मिळते आणि हि मंदिरे किल्ल्यावरील ऐतिहासिक मंदिरे आहेत.
- जलकुंभ : या किल्ल्याच्या शेजारी असणारा जलकुंभ देखील मोहक दृष्ये निर्माण करतो आणि हा जलकुंभ महाभारतातील महान भीम यांनी निर्माण केले आहे असे म्हटले जाते.
- इतर ठिकाणे : गायमुख जलाशय, विजयस्तंभ, कीर्तिस्तंभ, बुरुज इत्यादी इतर ठिकाणे देखील पहायला मिळतात.
चित्तोडगढ किल्ल्याविषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts
- चित्तोडगढ हा किल्ला भारतातील सर्वात मोठा किल्ला तर आहेच परंतु हा किल्ला आशिया खंडातील देखील सर्वात मोठा किल्ला आहे.
- चित्तोडगढ या किल्ल्याला सहा दरवाजे आहेत आणि हे दरवाजे आणि हे दरवाजे मुख्य दरवाज्याचे संरक्षण करण्यासाठी बांधले आहेत आणि सात दरवाज्यांची नावे म्हणजे गणेश पोळ, पडण पोळ, भैरो पोळ, हनुमान पोळ, लक्ष्मण पोळ आणि जोरला पोळ अशी दरवाजे आहेत आणि हे सहा दरवाजे किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याचे रक्षण करतात आणि या मुख्य दरवाज्याचे नाम राम दरवाजा आहे आणि हा किल्ल्याचा सातवा दरवाजा आहे. अश्या प्रकारे या किल्ल्याला एकूण सात दरवाजे आहेत.
- चित्तोडगढ हा किल्ला जर आकाशातून पाहिला तर हा किल्ला माश्यासारख्या आकाराचा दिसतो आणि ह्या किल्ल्याचा घेर हा १३ किलो मीटर आहे.
- किल्ल्यामध्ये आपल्याला राजवाडे, मंदिरे, स्मारके अश्याप्रकारच्या एकूण ६५ वास्तू पहायला मिळतात
- चित्तोडगढ हा किल्ला युनेस्को कडून जागतिक वारसा मिळालेले ठिकाण आहे.
- किर्तीस्थंभ हे बघेरवाल जैन यांनी १२ व्या शतकामध्ये जैन तीर्थकर आदिनाथ यांच्या स्मरणार्थ बांधले आहे.
- ज्या ठिकाणी चित्तोडगढ हा किल्ला उभा आहे त्या किल्ल्याचे प्राचीन नाव चित्रकुट असे होते.
- चित्तोडगढ हा किल्ला भारतातील राजस्थान राज्यातील चित्तोड या शहरामध्ये आहे.
आम्ही दिलेल्या chittorgarh fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चित्तोडगढ किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chittorgarh fort rajasthan information in marathi या chittorgarh fort history in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about chittorgarh fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chittorgarh fort information in marathi language novel Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट