Christmas Information in Marathi – Natal Information in Marathi ख्रिसमस नाताळ माहिती मराठी जगभरामध्ये तसेच भारतामध्ये देखील वेगवेगळे सण आणि उत्सव अगदी आनंदाने आणि प्रेमाने साजरे केले जातात आणि सण साजरे करण्याचा उद्देश हा असतो कि लोकांनी एकमेकांना भेटावे व आपली सर्व दुख आणि अडचणी विसरून त्या दिवशी एकत्र येऊन सण किंवा उत्सव साजरे करतात. त्यामधील एक आनंदाने साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ख्रिसमस ज्याला भारतामध्ये किंवा इतर देशामध्ये बिग डे किंवा नाताळ या नावाने देखील ओळखले जाते. ख्रिसमस हा उत्सव येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला साजरा केला जातो आणि हा उत्सव ख्रिश्चन लोक साजरा करतात कारण ते येशू ख्रिस्ताला आपला देव मानतात.
या दिवशी ख्रिश्चन लोक आपले प्रार्थना स्थळ म्हणजेच चर्च सजवतात तसेच येशू ख्रिस्ताला प्रार्थना करतात तसेच उत्सवाच्या कारणाने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी लोक एकमेकांना ख्रिसमसशी संबंधित कथा आणि किस्से सांगतात. या उत्सव साजरा करण्यापाठीमागे असे मानले जाते की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या दिवशी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी पृथ्वीवर आला होता.
काही लोकांसाठी ख्रिसमसची तयारी लवकर सुरू होते आणि यामध्ये ख्रिसमसच्या तयारीमध्ये सजावट, खाद्यपदार्थ आणि कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसाठी भेटवस्तू खरेदी यासह अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्याचबरोबर हा सण लहान मुलांच्यासाठी एक उत्साहाचा सण असतो कारण त्यांना उत्तम ख्रिसमस भेटवस्तू मिळतात आणि या पदामध्ये चॉकलेट, कुकीज, केक इत्यादी खाद्य पदार्थांचा समावेश असतो आणि इतर भेटवस्तू देखील असतात.
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – Christmas Information in Marathi
सण | ख्रिसमस/ नाताळ |
तारीख | शनिवार, 25 डिसेंबर, 2021 |
उत्सव | भेटवस्तू देणे, कुटुंब आणि इतर सामाजिक मेळावे, प्रतीकात्मक सजावट, मेजवानी इ |
यांचे निरीक्षण | ख्रिश्चन, अनेक गैर-ख्रिश्चन |
पाळणे | चर्च सेवा |
महत्त्व | येशूच्या जन्माचे स्मरण |
याला देखील म्हणतात | नोएल, जन्म, ख्रिसमस |
भारतात खूप वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक आनंदाने एकत्र राहतात. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे सन असले तरी साजरे मात्र सगळे एकत्रच करतात. अशाच आज एका सनाबद्दल माहिती घेणार आहोत आणि तो म्हणजे ख्रिसमस. सगळ्यांच्या आवडीचा तसेच विशेष करून लहान मुलांना जास्त आवडणारा सन. प्रत्येकाला काहीना काही गिफ्ट देण्याचा आणि संताक्लोज ची वाट बघायला लावणारा दिवस. चला मग ह्याबद्दल थोडी माहिती बघू.
ख्रिसमस – नाताळ
नाताळ हा एक वार्षिक सण आहे जो येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. जो प्रामुख्याने २५ डिसेंबर रोजी जगभरातील कोट्यवधी लोकांद्वारे धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये ख्रिसमसचा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा केला जातो. बहुसंख्य ख्रिस्ती तसेच सांस्कृतिकदृष्ट्या अनेक गैर-ख्रिश्चन द्वारे साजरा केला जातो.
ख्रिसमस म्हणजे काय ?
ख्रिसमस हा उत्सव येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला साजरा केला जातो आणि हा उत्सव ख्रिश्चन लोक साजरा करतात कारण ते येशू ख्रिस्ताला आपला देव मानतात. या दिवशी ख्रिश्चन लोक आपले प्रार्थना स्थळ म्हणजेच चर्च सजवतात तसेच येशू ख्रिस्ताला प्रार्थना करतात तसेच उत्सवाच्या कारणाने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.
इतिहास – History of Christmas in Marathi
खूप पूर्वीच्या काळापासून ख्रिसमस हा सण साजरा केला जातो आणि जगामध्ये काही ठिकाणी हा संपूर्ण हंगाम म्हणून साजरा केला जात होता. २४ डिसेंबर पासून ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सुरुवात होते. ख्रिसमस म्हणजे “ख्रिस्त-मास आणि हा साजरा करण्याची सुरुवात अगदी चोथ्या शतकापासून आहे. हा उत्सव ख्रिश्चन लोक साजरा करतात आणि येशू ख्रिस्ताची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.
ख्रिसमस सणाबद्दल माहिती – Information About Christmas in Marathi
हा उत्सव येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला साजरा केला जातो आणि काही लोकांसाठी ख्रिसमसची तयारी लवकर सुरू होते. ख्रिसमस या उत्सवाची सुरुवात हि ख्रिसमसचे ट्री सजवण्यापासून होते कारण ख्रिसमस ट्री हा एक या उत्सवातील महत्वाचा भाग असतो. ख्रिसमस झाड हे वास्तविक किंवा कृत्रिम असते आणि या झाडाला दिवे, कृत्रिम तारे, घंटा, फुले, खेळणी, भेटवस्तू इत्यादींनी सजवले जाते.
त्याचबरोबर या झाडामध्ये लोक त्यांच्या प्रिय लोकांच्यासाठी भेटवस्तू देखील लपवतात. पारंपारिकपणे, भेटवस्तू झाडाखाली किंवा सॉक्समध्ये लपवल्या जातात. तसेच सांताक्लॉज नावाचा संत ख्रिसमसच्या रात्री येतो आणि चांगल्या वागणाऱ्या मुलांसाठी भेटवस्तू लपवतो अशी जुनी समजूत देखील या उत्सवाबद्दल आहे.
या उत्सवाच्या दिवशी लोक सहसा पांढरे किंवा लाल रंगाचे पोशाख घालतात. मुले ख्रिसमस कॅरोल गातात आणि शुभ दिवस साजरा करण्यासाठी विविध स्किट्स देखील सादर करतात. प्रसिद्ध ख्रिसमस कॅरोल्सपैकी एक म्हणजे “जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल वे”.
ख्रिसमसची तयारी कशी केली जाते
ख्रिसमस झाड हे वास्तविक किंवा कृत्रिम असते आणि या झाडाला दिवे, कृत्रिम तारे, घंटा, फुले, खेळणी, भेटवस्तू इत्यादींनी सजवले जाते. त्याचबरोबर या झाडामध्ये लोक त्यांच्या प्रिय लोकांच्यासाठी भेटवस्तू देखील लपवतात. पारंपारिकपणे, भेटवस्तू झाडाखाली किंवा सॉक्समध्ये लपवल्या जातात. त्याचबरोबर लोक एकमेकांना भेटतात आणि भेटवस्तू देतात.
ख्रिसमस मधील सांताक्लॉज
सांताक्लॉजला सहसा जाड, पांढरी दाढी आणि डोक्यावर लाल टोपी आणि लाल रंगाचे कपडे परिधान केलेला व्यक्ती असतो आणि हा ख्रिसमसच्या रात्री येतो आणि चांगल्या वागणाऱ्या मुलांसाठी भेटवस्तू लपवतो अशी जुनी समजूत देखील या उत्सवाबद्दल आहे.
- २५ डिसेंबर हा दिवस त्यांच्या मृत्यूच्या वर्षांनंतर रोमन कॅथोलिक चर्चने त्यांचा वाढदिवस म्हणून निवडला होता.
- ख्रिसमस या शब्दाचा वापर हा १६ व्या शतकामध्ये केला होता आणि एकस मस या शब्दातील एक्स हे ग्रीक भाषेतून आलेले आहे.
- एका पौराणिक कथेनुसार सेंट निकोलस हा एक ख्रिश्चन बिपश होता ज्याने गरीब आणि गरजूंच्यासाठी मदत कारण होता आणि त्याला लहान मुले देखील आवडत होती आणि तो लहान मुलांच्यावर प्रेम करत होता आणि तो लहान मुलांना गुपचूप भेटवस्तू देखील देत होता याच्यावरूनच सांताक्लॉजची कल्पना जागृत झाली आणि उदयास आली.
- ख्रिसमस झाड हे वास्तविक किंवा कृत्रिम असते आणि या झाडाला दिवे, कृत्रिम तारे, घंटा, फुले, खेळणी, भेटवस्तू इत्यादींनी सजवले जाते.
- येशूचा जन्म झाला तेंव्हा आकाशात एक तेजस्वी तारा चमकला त्यावेळी तीन राजे या ताऱ्याच्या मागे गेले आणि ते येशू ख्रिस्ताच्या जन्म स्थानापर्यंत पोहचले. त्या ठिकाणी त्याच्यासोबत सोने, तेल, धूप आणि काही भेटवस्तू होत्या. आणि याच्यावरूनच ख्रिसमस उत्सवामध्ये लहान मुलांना आणि प्रियजनांना भेटवस्तू दिल्या जातात.
- ख्रिसमस या उत्सवाची सुरुवात हि ख्रिसमसचे ट्री सजवण्यापासून होते कारण ख्रिसमस ट्री हा एक या उत्सवातील महत्वाचा भाग असतो.
- ख्रिसमस २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्म मानला जातो. परंतु बायबलमध्ये २५ डिसेंबरचा उल्लेख नाही आणि बहुतेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की त्याचा जन्म वसंत ऋतूमध्ये झाला होता.
- आज अनेक लोकप्रिय ख्रिसमस परंपरांची मुळे सॅटर्नालियामध्ये आढळतात.
- ख्रिसमस ट्री १८३० च्या दशकात अमेरिकेत पोहोचला परंतु १८४६ पर्यंत लोकप्रिय झाला नाही, जेव्हा जर्मनीच्या प्रिन्स अल्बर्टने राणी व्हिक्टोरियाशी लग्न केले तेव्हा ते इंग्लंडमध्ये आणले. दोघांचे ख्रिसमसच्या झाडासमोर रेखाटन करण्यात आले आणि ही परंपरा त्वरित लोकप्रिय झाली.
- सुट्ट्यांमध्ये त्यांच्या घरात “ख्रिसमस ट्री” आणणारे आणि कुकीज आणि दिवे लावून सजवणारे पहिले जर्मन लोक मानले जातात.
- सांताक्लॉजला सहसा जाड, पांढरी दाढी आणि डोक्यावर लाल टोपी आणि लाल रंगाचे कपडे परिधान केलेला व्यक्ती असतो आणि हा ख्रिसमसच्या रात्री येतो आणि चांगल्या वागणाऱ्या मुलांसाठी भेटवस्तू लपवतो असे म्हंटले जाते.
- जरी सांताक्लॉजने पूर्वी निळा आणि पांढरा आणि हिरवा रंग परिधान केला असला तरी, त्याचा पारंपारिक लाल सूट कोका-कोलाच्या १९३० च्या जाहिरातीतून आला होता.
- आज आपल्याकडे असलेला सांताक्लॉजचा देखावा न्यूयॉर्क हिस्टोरिकल सोसायटीच्या १८०४ च्या बैठकीत तयार करण्यात आला होता.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये christmas information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर christmas festival information in marathi म्हणजेच “ख्रिसमस नाताळ माहिती मराठी” christmas in marathi या सणाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या information about christmas festival in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि information about christmas in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट