coal information in marathi langauge कोळसा माहिती मराठी, कोळसा हा कार्बनपासून बनलेला एक ज्वलनशील घटक आणि आज आपण या लेखामध्ये कोळसा म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये coal म्हणतात या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. कोळसा हा कार्बंपासून बनलेला असून त्याचा रंग काळा किंवा तपकिरी रंगाचा असतो आणि हा नुतनीकरण न करता येणारे एक जीवाश्म इंधन आहे. कोळसा हा एक प्रकारचे इंधन असून हे खूप पूर्वीपासून माहित असलेले आणि वापरत असलेले इंधन आहे.
कोळसा हा एक प्रकारचा कार्बन असला तरी त्यामध्ये इतर घटक असतात जसे कि सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन असतात. कोळसा हा अनेक कामांच्यासाठी जरी खूप उपयोगाचा असला तरी त्याचे अनेक हानिकारक परिणाम देखील होतात.
म्हणजेच कोळश्याच्या काढण्यामुळे आणि वापरण्यामुळे अनेक आजार होऊ शकतात तसेच अकाली मृत्यू देखील होऊ शकतो. खाली आपण कोळसा म्हणजे काय, कोळसा कसा तयार होत, त्याचे प्रकार आणि उपयोग कोणकोणते आहेत ते सविस्तरपणे पाहूया.
कोळसा माहिती मराठी – Coal Information in Marathi Language
कोळसा म्हणजे काय – coal meaning in marathi
कोळसा हे एक जीवाश्म इंधन आहे. जे वनस्पतीचे बदलेले अवशेष आहेत आणि तसेच हे कार्बनपासून तयार झालेले एक ज्वलनशील घटक आहे.
कोळश्याचा इतिहास – coal history in marathi
सर्वात जुन्या कोळश्याचा वापर हा चीन या देशामध्ये झाला होता आणि चीनच्या ईशान्य बाजूस असणाऱ्या फुशून या खाणीतील कोळश्याचा वापर हा एक हजार बीसीच्या वेळी तांबे वितळवण्यासाठी केला होता.
त्यानंतर पुढे कोळश्याचा वापर वाढत गेला आणि अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी कोळसा इंधन म्हणून वापरला जातो आणि कोळश्याचा वापर इंधन म्हणून करण्याची सुरुवात युरोप या देशाने पूर्वी केली होती.
प्राचीन काळामध्ये कोळसा कसा तयार झाला होता ?
कोळसा हे एक प्रकारचे नैसर्गिक स्त्रोत असून हे तयार करता येत नाही आणि हे तयार होण्यासाठी हजारो लाखो वर्ष लागतील. कोळसा हा पृथ्वी ज्यावेळी दलदलीच्या प्रदेशाने किंवा जंगलांनी व्यापली होती त्यावेळी कोळश्याची निर्मिती झाली होती आणि ज्यावेळी जंगलातील झाडे ई इतर अनेक वनस्पती मरण पावल्या.
त्यानंतर जंगलांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दलदल तयर झाली आणि पुढे त्या मरण पावलेले वनस्पतींचे दलदलीमध्ये जाड थर तयार झाले आणि पुढे आणखीन झाडे पडून त्याठिकाणी स्तर तयार झाले आणि या स्तरांमध्ये उष्णता आणि दाबा मुळे रासायनिक आणि भौतिक बदल घडून आले आणि त्या ठिकाणी कार्बन युक्त साठे तयार झाले म्हणजेच त्या ठिकाणी कोळसा तयार झाला आणि हा कोळसा तयार होण्यासाठी खूप वर्षे लागली होती.
कोळश्याचे वापर – coal use in marathi
कोळसा हा एक प्राचीन काळापासून वापरले जाणारे एक नैसर्गिक इंधन आहे. ज्याचा वापर अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी होतो आणि खाली आपण कोळश्याचा वापर पाहणार आहोत.
- कोळश्याचा वापर हा जगभरामध्ये वीज निर्मिती करण्यासाठी केला जातो म्हणजेच कोळसा हा वीज निर्मितीमध्ये ४० ते ४५ टक्के पेक्षा अधिक प्रमाणात केला जातो.
- मोठ्या प्रमाणात उष्णता निर्मितीसाठी देखील कोळश्याचा वापर केला जातो.
- कोळश्याचा वापर रेल्वेचे इंधन जर कोळश्यावर चालणारे असेल तर आणि मोठ मोठ्या कारखान्यातील स्टीम टर्बाइन कोळश्यावर चालत असेल तर त्या ठिकाणी देखील कोळश्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो.
- लोह आणि पोलाद उद्योगांच्यामध्ये देखील कोळश्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो.
- घरामधील काही कामांच्यासाठी देखील कोळश्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो.
कोळश्याविषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- कोळश्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहे आणि हे प्रकार अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी वापरला जातो जसे कि स्टील बनवण्यासाठी एक प्रकारचा कोळसा वापरला जातो ज्यामध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असते आणि इतर घटक कमी असतात.
- जगामध्ये वीज उत्पादन प्रक्रियेमध्ये कोळशाचा वापर हा ४० टक्के या प्रमाणात होतो.
- कोळसा हा मरण पावलेले वनस्पती आणि प्प्राणी यांच्या अवशेषापासून बनतो.
- कोळश्याचे एकूण चार प्रकार आहेत ते म्हणजे लिग्नाइट, बिटूमिनस पिट आणि एन्थ्रासाइट.
- कोळसा हा मुख्यता कार्बन असतो आणि ज्यामध्ये इतर घटकांचे प्रमाण वेगवेगळे असते, प्रामुख्याने सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि नायट्रोजन.
- २०२१ या वर्षी कॅनडा या देशाचे कोळसा उत्पादन हे ४८ दशलक्ष टन इतके झाले होते.
- २०२१ मध्ये जागतिक कोळसा उत्पादन हे ७.७ अब्ज टन असल्याचा अंदाज आहे जो २०२० पासून २९२ दशलक्ष टनांनी वाढला. जगातील कोळसा उत्पादनामध्ये ८० टक्के उत्पादन करणाऱ्या शीर्ष पाच देशांचा वाटा आहे.
- कोळश्याचा वापर हा वेगवेगळ्या कारणांच्यासाठी केला जातो जसे कि वीज निर्मितीसाठी, सिमेंट निर्मितीसाठी आणि स्टील निर्मितीसाठी केला जातो त्याचबरोबर विविध औद्योगिक आणि निवासी अनुप्रयोगांच्यासाठी केला जातो.
- कोळसा तयार होण्यासाठी अंदाजे १ दशलक्ष वर्ष लागतात.
- अमेरिका (युएस) मध्ये वीज निर्मितीसाठी ९० टक्के पेक्षा अधिक कोळसा वापरला जातो.
- ९० हजार पेक्षा जास्त युएस नोकऱ्यांच्यासाठी कोळसा थेट जबाबदार आहे कारण त्यापैकी बरेच कोळसा खाण कामगार आहेत आणि कोळसा आणि कोळसा उद्योगाशी अप्रत्यक्षपणे जोडलेल्या आणखी दशलक्ष नोकऱ्या आहेत.
- कोणत्याही प्रकारचा कोळसा हा जाळण्याच्यापूर्वी चांगल्या प्रकारे कोरडा असणे आवश्यक असते.
- कोळसा खाणींचे दोन प्रकार आहेत आणि ते म्हणजे भूमिगत खाण आणि पृष्ठभाग खाण.
आम्ही दिलेल्या coal information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कोळसा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information of coal in marathi या coal information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि coal stove information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये coal meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट