नारळाच्या झाडाविषयी माहिती Coconut Tree Information In Marathi

coconut tree information in Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण नारळाच्या झाडा बद्दल माहिती पाहणार आहोत. लहानपणी आपण निसर्ग चित्र काढताना समुद्राच्या कडेला अशी दोन चार नारळाची झाडे coconut tree in Marathi  काढायचो. नारळाच्या झाडाला माडाची झाडं असे ही म्हटले जाते. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागांचा वापर करण्यात येतो त्यामुळे त्याला कल्पतरू असेही म्हटले जाते.

coconut-tree-information-in-marathi
coconut tree in marathi/coconut tree information in marathi

नारळ झाडाची माहिती – coconut tree information in marathi

सदरच्या लेखात आपण नारळ झाडाविषयी माहिती बघणार आहोत यामध्ये आपण नारळाची रचना, प्रकार तसेच नारळाचे पाणी नारळाची पाने  यांचे उपयोग  बघणार आहोत.

नारळाच्या झाडाची रचना आणि स्थान !

साधारणतः नारळाचे झाड हे 30 मीटर उंच असते आणि त्याला पाच ते सहा मीटर लांब फांद्या असतात. अशा फांद्यांना झावळ्या असे म्हणतात . नारळाचे खोड ही इतर झाडांसाठी खडबडीत नसले तरीही थोडा थोडा भाग हा झाडावर चढण्यासाठी उपयोगी असतो.नारळाचे झाड 70 ते 80 फुटापर्यंत वाढून सुद्धा ते अगदीच वाऱ्याच्या दबावात जराही न डगमगता तसेच उभे असते कारण नारळाची मुळे ही आकाराने लहान असून ती खोलवर अगदी घट्ट रुजलेली असतात.  नारळाचे झाड हे ताड कुळातील आहे. जे वृत्त पृथ्वीच्या मध्यातून जाते अशा विषुववृत्त भागात तसेच उष्ण कटिबंधीय भागात आणि समुद्राच्या कडेला नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे नारळाची झाडे ही समुद्रकिनारी असलेल्या भारतातील राज्यांमध्ये म्हणजेच गोवा केरळ तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात व महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात दिसून येतात. जगभरात 70 देशात नारळाची झाडे लावली जातात आणि आपल्याला किमान 60 दशलक्ष टन इतकी नारळांची उत्पन्न जागतिक स्तरावर दरवर्षी मिळते. अशा माडाला महिन्यातून एकदा मोहर येतो आणि या मोहराला लागलेली फळे दहा ते बारा महिन्यातच परिपक्व होतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक महिन्याला नारळांचा एक घड तर मिळतोच.

नारळाच्या जाती/नारळाचे प्रकार

1.नारळाच्या संकरित जाती

  1. टी – डी (केरासंकरा)
  2. टी – डी (चंद्रसंकरा)

2.नारळाच्या ठेंगू जाती

  1. ऑरेंज डार्फ
  2. ग्रीन डार्फ
  3. यलो डार्फ

3.नारळाच्या उंच जाती

  1. वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) –
  2. लक्षद्वीप ऑर्डिनरी
  3. प्रताप
  4. फिलिपिन्स ऑर्डिनरी

नारळाच्या झाडाचे विविध उपयोग – information and uses of coconut tree in marathi

  • नारळाच्या झाडापासून मिळणारे फळ म्हणजेच नारळ हे हिंदू संस्कृती मध्ये खूप पवित्र मानले जाते.
  • हिंदी संस्कृतीमध्ये पुजा ,आरत्या करताना ब्रम्हा-विष्णू-महेश गणपती यांच्यासमोर हे श्रीफळ अर्पण केले जाते.
  • त्याबरोबरच विशिष्ट मंगल  कार्यक्रमांमध्ये नारळाचा वापर शुभ म्हणून केला जातो.

नारळ पाणी फायदे

  • कोवळ्या नारळाला शहाळे असे म्हटले जाते. शहाळ्याचे पाणी हे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. आणि ते थंड ,शक्तिवर्धक आणि खनिज संपन्न असून त्यामध्ये बरीच पोषकतत्वे असतात.
  • नारळाचे पाणी ही गर्भवती स्त्रिया तसेच त्वचा,केस,हृदय यासाठी उपयुक्त असते.
  • नारळाचे पाणी चेहऱ्याला लावले असता आपली त्वचा नितळ आणि तेजस्वी होते.
  • कोरडेपणामुळे त्वचा काळवंडली जाते आणि निस्तेज दिसते अशावेळी जेव्हा नारळाचे पाणी दुधाच्या सायीत मिसळून हळूवार चेहऱ्यावर मसाज केल्याने थोड्या दिवसात पुन्हा आपली त्वचा स्निग्ध युक्त आणि चांगली दिसते.
  • नारळाचे पाणी केसांसाठी ही खूपच उपयोगी असते. उन्हाळ्यामध्ये जेव्हा खूपच गरमीने केसांना ची वाट लागते तसेच पावसाळ्यामध्ये ही वारंवार घेतली न गेल्याने केस निस्तेज होतात आणि त्यांना पुरेसे पोषण मिळत नाही.अशावेळी नारळाचे पाणी जरी अंघोळीपूर्वी केसांना लावले तरी केसांच्या मुळांना अगदी योग्य प्रमाणात पोषण मिळून केस चमकदार आणि मजबूत होतात.
  • त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियांनी नारळाचे पाणी पिल्यास पोटातील बाळाला त्याचा खूप उपयोग होतो. पोटातील बाळाची त्वचा ही टवटवीत आणि रंग हा उजळतो. त्याबरोबरच गर्भवती स्त्रियांची आरोग्यही त्याकाळात निरोगी राहते.
  • शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले जर हृदय चांगले असेल तर आपले आरोग्य चांगले असते त्यामुळे त्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा नारळाचे पाणी हे अमृत आहे. अगदी सकाळी सकाळी नारळाची पाळण्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य हे व्यवस्थित राहते.
  • ज्याप्रमाणे नारळाचे पाणी हा एक नारळापासून मिळणारा उपयुक्त घटक आहे त्याप्रमाणेच नारळापासून नारळाची दूध आणि खोबरे ही मिळते. नारळाचे दूध हे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असते. तसेच खोबर्‍यापासून मिळणारे तेल हे केसांना लावण्यासाठी लावण्यासाठी तसेच खाण्यासाठीही वापरले जाते.
  • नारळाच्या झाडापासून माडी नावाचे पेय ही मिळवले जाते. माडी ही सुरुवातीला अतिशय थंड आणि मधुर असते पण काही वेळ ती तशीच ठेवल्यास त्याचे मद्यात रूपांतर होते. भारतात सर्वत्र बरीच लोक या माडीचे सेवन करतात.

नारळाच्या पानाची माहिती/फायदे – 

  • नारळाच्या फांद्यांचा त्या सुकल्यावर खराटा बनवण्यासाठी उपयोग केला जातो.
  • तसेच खेडेगावात काही भागात नारळाच्या फांद्या चुकण्यापूर्वी घरांच्या छपरांवर टाकून उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो.
  • अशाप्रकारे बहुपयोगी नारळाच्या झाडाला कल्पतरू म्हणणे हे अगदी योग्यच आहे.

नारळाचे बरेच उपयोग पाहिले,पण नारळामुळे जसा मानवाला फायदाच होतो तसंच नारळामुळे काही प्रमाणात धोकाही निर्माण झाल्याचे वाचण्यात येते. हो अगदी बरोबर वाचलात तुम्ही. डोक्यात नारळ फोडून बऱ्याच जणांचा मृत्यू झालेला आहे असे अहवाल आले होते. त्यामुळे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीसाठी आले होते, त्यावेळी ज्या ठिकाणी हा समारंभ होणार होता त्या ठिकाणी असलेल्या सर्व नारळाच्या झाडावरील नारळ आधीच काढून ठेवले होते असे म्हणण्यात येते. पण काही दिवसांनी अशी माहिती समोर आली की ही सर्व अफवा आहे कारण शहरी भागातील लोकांनी शहरी भागात नारळाच्या झाडाचे प्रमाण कमी असल्यामुळे ही अफवा पसरवली होती.

त्यामुळे नारळाचे झाड इतर झाडं प्रमाणे मनुष्य आणि सर्व प्राण्यांना सर्व प्रकारे उपयोगी पडते.

आम्ही दिलेल्या coconut tree information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नारळाचे झाड म्हणजेच माडाचे झाडाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information on coconut tree in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि coconut tree in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर information about coconut tree in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!