सीपीआर बद्दल माहिती CPR Information in Marathi

CPR Information in Marathi सीपीआर बद्दल माहिती, सध्या अनेक लोकांना वेगवेगळ्या आरोग्य समस्यांना तसेच अनेक विकारांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामधील एक म्हणजे हृदयविकार कारण जगातील अनेकांना हृद्यविकाराच्या समस्यांना देखील मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे आणि अश्या विकारांच्यावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पध्दती असतात आणि तसेच सीपीआर (CPR) हि देखील त्यामधील एक उपचार पध्दती आहे आणि आज आपण या लेखामध्ये सीपीआर विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

सीपीआर म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन आहे जे एखाद्याला हृदयविकारापासून वाचवण्यासाठी मदत करू शकते. कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (cardiopulmonary resuscitation) हे जेंव्हा एखाद्याचे हृदय रक्त पंप करण्यास सक्षम नसते त्यावेळी त्या संबधित व्यक्तीचे हृदय पुन्हा सुरु करण्यास आणि त्याचे प्राण वाचवण्याचा एक मार्ग आहे आणि हे एक सोपे तंत्र आहे जे कोणीही अगदी सहजपणे शिकू शकते.

सीपीआरचे महत्वाचे कार्य म्हणजे छातीमध्ये दाबाने ज्यामुळे नियमित हृदायचे ठोके परत येईपर्यंत रक्त महत्वाच्या अवयवांच्या मध्ये वाहते. जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यास अर्ध्याहून अधिक लोकांना लगेचच मदत मिळत नाही त्यावेळी तुम्ही कार्डीअॅक अरेस्टमध्ये गेल्यानंतर लगेचच तुम्हाला सीपीआर मिळाल्यास तुमची जगण्याची शक्यता दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकते.

cpr information in marathi
cpr information in marathi

सीपीआर बद्दल माहिती – CPR Information in Marathi

सीपीआर म्हणजे काय – cpr meaning in marathi

कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (cardiopulmonary resuscitation) हे जेंव्हा एखाद्याचे हृदय रक्त पंप करण्यास सक्षम नसते त्यावेळी त्या संबधित व्यक्तीचे हृदय पुन्हा सुरु करण्यास आणि त्याचे प्राण वाचवण्याचा एक मार्ग आहे.

सीपीआर चे पूर्ण स्वरूप – cpr full form in marathi

सीपीआरचे पूर्ण स्वरूप कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (cardiopulmonary resuscitation) असे आहे.

सीपीआर करण्याच्या पायऱ्या किंवा प्रक्रिया – steps

  • जर एखाद्या व्यक्तीला आग, ट्रॅफिक किंवा दगडी बांधकाम यामुळे धोका निर्माण झाल्यास त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे का ते पहा आणि जर ते प्रतिसाद देत नसल्यास ९११ वर फोन करा.
  • मग तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्या पाठीवर झोपवा आणि त्याचा वायुमार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच त्या व्यक्तीला पाठीवर झोपवल्यानंतर त्याच्या छातीजवळ गुढगे टेकवा आणि त्याची हनुवटी उचलून त्याचे डोके थोडेसे मागे टेकवा.
  • मग त्याचे तोंड उघडा आणि अन्न किंवा उलट्या या सारख्या अडथळ्याची तपासणी करा आणि कोणताही अडथळा दूर करण्यास मदत करा त्यामुळे वायुमार्ग उघडा होण्यास मदत होईल.
  • आता तुमचे कान त्या व्यक्तीच्या तोंडाजवळ ठेवा आणि १० सेकंदपेक्षा जास्त काळ ऐका. जर तुम्हाला श्वासोच्छवास ऐकू येत नसेल किंवा तुम्हाला फक्त अधून मधून श्वास ऐकू येत असेल तर तर सीपीआर सुरु ठेवा आणि जर कोणी बेशुध्द असेल परंतु श्वास घेत असेल तर सीपीआर करू नका.
  • सीपीआर हा फक्त श्वास घेणे थांबल्यास आणि श्वास अधूनमधून घेत असल्यास सीपीआर करा.
  • सीपीआर करत असताना छातीला  ३० दाब करावे लागतात आणि हे करत असताना एक हात दुसऱ्या हाताच्या वर ठेवा आणि त्यांना एकत्र करा.
  • हातांची तळ आणि सरळ कोपरासह, छातीच्या मध्यभागी म्हणजेच स्तनाग्रांच्या किंचित खाली जोरदार आणि वेगाने ढकलून द्या आणि कमीत कमी २ इंची खोल दाबा आणि त्या संबधित व्यक्तीची छाती प्रती मिनिट किमान १०० वेळा दाबा. कम्प्रेशनच्या दरम्यान त्या व्यक्तीची छाती पूर्णपणे वर येऊ द्या.
  • आता त्याचे तोंड स्पष्ट असल्याची खात्री करून त्याचे डोके थोडेसे मागे टेकवा आणि त्याची हनुवटी उचला. त्याचे नाक चिमटीने बंध करा आणि तुमचे तोंड त्याच्या तोंडावर पूर्णपणे ठेवा आणि त्यांची छाती वर येण्यासाठी फुंका.
  • जर त्याची छाती पहिल्या श्वासाने उठत नसेल तर त्याचे डोके मागे घ्या आणि त्याला दुसरा श्वास द्या आणि दुसऱ्या श्वासाने देखील त्याची छाती उठली नाही तर व्यक्ती गुदमरत असेल.
  • व्यक्ती श्वास घेण्यास सुरुवात करेपर्यंत किंवा मदत येईपर्यंत छाती दाबणे आणि बचाव श्वासाचे चक्र पुन्हा करा.

सीपीआर विषयी काही विशेष तथ्ये – facts

  • सीपीआर म्हणजेच कार्डीओपल्मोनरी रीसूसिटेशन हे एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराच्या झटक्यापासून जगण्याची शक्यता दुप्पट करू शकते.
  • हृदयविकाराचा झटका हा स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्यामध्ये दुप्पट वारंवार येतो.
  • सीपीआर म्हणजेच कार्डीओपल्मोनरी रीसूसिटेशन चा शोध १९६० मध्ये लागला आणि हि एक हृदयविकारापासून एकाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी केली जाणारी एक प्रक्रिया आहे.
  • सीपीआर हे मेंदू आणि हृदयाचा ऑक्सिजनयुक्त रक्त प्रदान करणे आणि डीफीब्रीलेशनमुळे हृदयाला सामान्य लय येईपर्यंत या अवयवांना जिवंत ठेवते आणि जर व्यक्ती कोसळल्यानंतर सीपीआर ४ मिनिटांच्या आत सुरु झाल आणि १० मिनिटांच्या आत डीफीब्रीलेशन प्रदान केले तर एखाद्या व्यक्तीला जगण्याची ४० टक्के शक्यता असते.
  • सीपीआर म्हणजे कार्डीओपल्मोनरी रीसूसिटेशन आहे जे एखाद्याला हृदयविकारापासून वाचवण्यासाठी मदत करू शकते.
  • ज्या लोकांना हृद्यविकाराचा झटका येतो अश्या लोकांच्या साठी सीपीआर हे अयोग्य आहे कारण सीपीआर हे त्यांचे प्राण वाचवू शकते.
  • कार्डीयाक अरेस्ट हे अनेकदा घरी होतात अश्यावेळी जर त्यावर सीपीआर ४ मिनिटांच्या आत सुरु झाल्यास त्यांचे प्राण वाचण्याचे ४० टक्के शक्यता असते.
  • कोणत्याही व्यक्तीला सीपीआर करण्यासाठी तुम्हाला औपचारिक प्रशिक्षणाची गरज नाही परंतु ते कसे योग्य प्रकारे करायचे या विषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

आम्ही दिलेल्या cpr information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सीपीआर बद्दल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cpr meaning in marathi या cpr full form in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about CPR in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये resuscitation meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!