cryptocurrency meaning in marathi – cryptocurrency information in marathi क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?, आपल्यापैकी अनेकांना माहित नाही कि क्रीप्टोकरन्सी म्हणजे काय आणि हे कश्या प्रकारे काम करते आणि यामध्ये कशी गुंतवणूक करावी याबद्दल सर्व आणि सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत. क्रीप्टो हा चलनाचा प्रकार आहे जो डिजिटल रुपामध्ये असतो आणि आपण क्रीप्टो करन्सीला काही वेळा क्रीप्टो किंवा क्रीप्टो चलन देखील म्हणू शकतो.
क्रीप्टोकरन्सी हि एक डिजिटल पेमेंट प्रणाली आहे जी व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी बँकांवर अवलंबून नसते आणि हा प्रकार व्यवहार सुरक्षित करण्यासाठी क्रीप्टोग्राफी वापरतो आणि ब्लॉकचेन नावाच्या पीअर टू पीअर नेटवर्कद्वारे त्याचे निरीक्षण आणि आयोजन केले जाते. खाली आपण क्रीप्टो करन्सीविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय – Cryptocurrency Meaning in Marathi
क्रिप्टोकरन्सीचा अर्थ – crypto meaning in marathi
क्रीप्टोकरन्सी हि एक डिजिटल पेमेंट प्रणाली आहे जी व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी बँकांवर अवलंबून नसते आणि हि एक पिअर टू पिअर सिस्टम आहे जी कोणालाही पेमेंट पाठवण्यासाठी आणि प्रपात करण्यास सक्षम बनवू शकते. ज्यावेळी तुम्ही एक प्रकारचा क्रीप्टो करन्सी फंड ट्रान्स्फर करता त्यावेळी व्यवहार हा सार्वजनिक लेजरमध्ये नोंदवले जातात आणि डिजिटल वॉलेटमध्ये क्रीप्टोकरन्सी साठवली जाते.
क्रीप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक कशी केली जाते
अनेकांना क्रीप्टोकरन्सी विषयी माहिती असते परंतु त्यांना हे माहित नसते कि त्यामध्ये गुंतवणूक कशी करतात आणि म्हणून खाली आपण क्रीप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक कशी करायची या विषयी माहिती घेणार आहोत.
बिटकॉईन मध्ये गुंतवणूक करण्याकरिता येथे क्लिक करा
प्लॅटफॉर्म निवडणे
आपण ज्यावेळी क्रीप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करतो त्यावेळी आपल्याला प्रथम प्लॅटफॉर्म निवडणे आवश्यक असते आणि यामध्ये ब्रोकर आणि क्रीप्टोकरन्सी एक्सचेंज असे दोन पर्याय असतात. ऑनलाइन ब्रोकर हे आपल्याला आर्थिक मालमत्ता जसे कि स्टॉक, बाँड आणि इटीएफ खरेदी आणि विक्री करण्याचे मार्ग देतात.
हे प्लॅटफॉर्म कमी व्यापार खर्च पण कमी क्रीप्टो वैशिष्ठ्ये ऑफर करतात आणि जर तुम्ही क्रीप्टोकरन्सी एक्सचेंज हा पर्याय निवडला तर ते भिन्न क्रीप्टोकरन्सी, वॉलेट स्टोरेज, व्याजदेणारे खाते पर्याय आणि बरेच काही ऑफर करतात.
खात्यामध्ये जमा करणे
क्रीप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करताना प्लॅटफॉर्मची निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करावा लागतो. ज्यांनी क्रीप्टोकरन्सी एक्सचेंज हा पर्याय निवडला आहे ते डेबिट किंवा क्रेडीट कार्डचा वापर करून चलने जसे कि ब्रिटीश पाऊंड, युएस डॉलर आणि युरो क्रीप्टोकरन्सी खरेदी करण्यास परवानगी देतात.
ऑर्डर देणे
तुम्ही तुमच्या ब्रोकर आणि क्रीप्टोकरन्सी एक्सचेंजच्या वेब किंवा मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे ऑर्डर देवू शकता. तुम्ही क्रीप्टोकरन्सी खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुम्ही खरेदी प्रकार निवडा तसेच ऑर्डर प्रकार निवडा आणि तुम्ही खरेदी करू इच्छिणाऱ्या क्रीप्टोकरन्सीची रक्कम प्रविष्ट करा आणि ऑर्डरची पृष्टी करा.
क्रीप्टोकरन्सीचे फायदे आणि तोटे – advantages and disadvantages
क्रीप्टोकरन्सींचे काही फायदे आणि तोटे आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
फायदे
- सध्याची क्रीप्टोकरन्सी हि सिस्टीम वापरकर्त्यांच्या वॉलेट किंवा खात्याच्या पत्त्यासह येतात जी केवळ सार्वजनिक कि आणि पायारेट किद्वारे प्रवेशयोग्य आहे परंतु खाजगी कि हि फक्त वॉलेटच्या मालकीची असते.
- क्रेडीट किंवा डेबिट कार्ड किंवा बँकासारखा तृतीय पार्टीशिवाय दोन पार्टी मधील निधी हस्तांतरण सोपे होण्यास मदत होते.
- तसेच या द्वारे निधी हस्तांतरण हे कमीत कमी या प्रक्रिया शुल्कामध्ये पूर्ण होते.
तोटे
- क्रीप्टोकरन्सी हि काही ठिकाणी मर्यादित असल्यामुळे हि सर्व ठिकाणी स्वीकारली जात नाही.
- क्रीप्टोकरन्सी हे दहशतवादी वित्तपुरवठा, मनी लॉन्ड्रींग आणि करचोरी या सारख्या बेकायदेशीर क्रीयाकालापांचे अगदी सहजपणे केंद्र बनते.
- तसेच यामध्ये जे देयक असतात ते अपरिवर्तनीय नाहीत.
क्रीप्टोकरन्सीची काही उदाहरणे – examples
बीटकॉइन
बीटकॉइन हे २००९ मधील स्थापित आहे आणि हि प्रथम क्रीप्टोकरन्सी आहे आणि ते आजदेखील सर्वात सामान्य क्रीप्टोकरन्सी म्हणून ओळखले जाते. सातोशी नाकामोटो यांनी हे चलन विकसित केले आहे ज्यांची नेमकी ओळख अज्ञात आहे.
लाईटकॉइन
लाईटकॉइन हे चलन देखील बीटकॉइन सारखेच असते परंतु अधिक व्यवहारांना अनुमती देण्यासाठी जलद देयके आणि प्रक्रियांच्यासह नवीन नवकल्पना विकसित करण्यासाठी अधिक वेगाने प्रक्रिया करते.
इथरीयम
इथरीयम हे बीटकॉइन नंतरचे सर्वात लोकप्रिय क्रीप्टोकरन्सी आहे आणि हे २०१५ मध्ये विकसित झालेले आहे आणि हे स्वताचे क्रीप्टोकरन्सी असलेले ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे ज्याला इथर या नावाने देखील ओळखले जाते.
क्रीप्टोकरन्सी विषयी विशेष तथ्ये – facts
- आपण क्रीप्टोकरन्सीमध्ये इतर मारागांनी देखील गुंतवणूक करू शकता जसे कि कॅश अॅप ( cash app ), वेन्मो ( venmo ), पेपल ( Paypal )या सारख्या पेमेंट सेवांचा समावेश आहे.
- आपण क्रीप्टोकरन्सी हि हॉट वॉलेट स्टोरेज किंवा कोल्ड वॉलेट स्टोरेज मध्ये साठवू शकतो.
- आपण क्रीप्टोकरन्सीच्या मदतीने चैनीच्या वस्तू, विमा, कार या सारख्या वस्तू खरेदी करू शकतो.
- क्रीप्टोकरन्सी हि जितकी चांगली आहे तितकीच धोकादायक देखील आहे कारण क्रीप्टोकरन्सीमध्ये व्यक्तीची फसवणूक होऊ शकते तसेच अनेक घोटाळे देखील होऊ शकतात.
- ब्लॉकचेन नावाच्या पीअर टू पीअर नेटवर्कद्वारे क्रीप्टोकरन्सीचे निरीक्षण आणि आयोजन केले जाते.
- बीटकॉइन हि एक महत्वाची क्रीप्टोकरन्सी आहे आणि हि सर्वप्रथम सुरु झालेली आहे आणि हि २००९ मध्ये सुरु झालेली क्रीप्टोकरन्सी आहे.
आम्ही दिलेल्या cryptocurrency meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cryptocurrency information in marathi या sajjangad fort information in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about cryptocurrency in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये meaning of cryptocurrency in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट