सायकलिंग खेळाची माहिती Cycling Information in Marathi

Cycling Information in Marathi सायकलिंग खेळ, पूर्वीच्या काळी लोक सायकल च वापर वाहतुकीसाठी किंवा करमणूक म्हणून केला जायचा. आजच्या काळात सायकलिंगच्या खेळात व्यावसायिक आणि हौशी शर्यतींचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला आहे आणि या खेळाच्या शर्यती शक्यतो अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये आयोजित केले जातात. सायकलचा (cycle information in marathi language) मनोरंजक वापर युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये व्यापक प्रमाणात आहे. १९ व्या शतकामध्ये सायकलची निर्मिती झाली आणि रॉयल मेलया या ब्रिटीश माणसाने १८८० मध्ये पहिल्यांदा चालवली. सायकलिंग  हा एक खेळाचा प्रकार आहे ज्यासाठी कोणत्याही विशेष कौशल्याची गरज नसते. 

cycling information in marathi
cycling information in marathi

सायकलिंग खेळाची माहिती – Cycling Information in Marathi

सायकलिंग खेळाचा इतिहास – history of cycling 

सायकल चालवण्याची सुरुवात १८ व्या शतकामध्ये झाली आणि रॉयल मेलया या ब्रिटीश माणसाने १८८० मध्ये पहिल्यांदा चालवली त्यानंतर हा खेळ थोड्याच काळामध्ये लोकप्रिय खेळ बनला. १४९३ मध्ये गियाकोमो क्रॅप्रोटीने सायकलचे डिझाईन तयाल केले होते. १७९१ मध्ये फ्रांस या देशाने सायकलचे आणखी एक डिझाईन बनवले. १८६८ मध्ये दास्ताऐवजीकारण केलेली सायकल शायातीमध्ये समाविष्ठ करण्यात आली. अमेरिका देशामध्ये सायकलिंग ची सुरुवात १९ व्या शतकामध्ये झाली आणि या खेळला अमेरिकेमध्ये लोकप्रियता मिळाली. अमेरिकेमध्ये १८८७ मध्ये लुईस सायकलिंग क्लबची स्थापना करण्यात आली पण वाहतुकीच्या इतर साधनांच्या शोधामुळे सायकलचे भविष्य धोक्यामध्ये आले.

ऑलंपिक सायकलिंग खेळ – Olympic Cycling Information in Marathi

सायकलिंग हा खेळ एक मैदानी खेळाचा प्रकार आहे आणि पूर्वी सायालिंग चा वापर फक्त वाहतुकी साठी, व्यायामासाठी किवा मनोरंजनासाठी केला जायचा पण आत्ता सायकल शर्यत ऑलंपिक उन्हाळी खेळामध्ये १८९६ मध्ये समाविष्ठ करण्यात आला आणि महिलांचा सायकल शर्यतीचा ऑलंपिक खेळ १९८४ पासून सुरु झाला.

उन्हाळी ऑलंपिक मधील खेळले जाणारे सायकलिंगचे खेळ

सायकलिंग खेळप्रकार
पुरुषमहिला
रोड सायकलिंग
ट्रॅक सायकलिंग
माउंटन सायकलिंग

ऑलंपिक मध्ये रोड सायकलिंग मध्ये पुरुषाचे २ प्रकारांमध्ये सायकलिंग खेळ खेळवले जातात आणि महिलांचे देखील २ प्रकार खेळवले जातात त्याच बरोबर ट्रॅक सायकलिंग मध्ये महिलांचे ५ आणि पुरुषांचे ५ प्रकार खेळवले जातात आणि माउंटन सायकलिंग हा प्रकार थोडा धोकादायक असल्यामुळे पुरुषांचा एक प्रकार आणि महिलांचा एक प्रकार खेळवला जातो आणि या खेळाचे डिझाईन आधीपासून तयार केलेले असते.

सायकलिंगचे प्रकार – types of cycling 

आपण पाहतोच कि रोज कोणते ना कोणते तरी बदल आपल्या आयुष्यामध्ये, देशामध्ये जगामध्ये घडून येतातच किवा नवनवीन शोध लागत असतात. तसेच बऱ्याच वर्षामध्ये सायकलिंग या खेळाची देखील अनेक रूपे उलघडू लागली. आजच्या जगामध्ये सायकलिंग चे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते म्हणजे रोड सायकलिंग, ट्रॅक सायकलिंग आणि माउंटन सायकलिंग.

  • रोड सायकलिंग ( road cycling ) :

रोड सायालिंग हा एक सर्वात जुना प्रकार आहे आणि सायकल चालवणे या प्रकारापासूनच सुरु झाले. या प्रकारच्या सायालिंग मध्ये खूप लोक भाग घेतात आणि हा सायकलिंग चा प्रकार सर्वात लोकप्रिय आहे. रोड सायकलिंग हा प्रकार वर्ल्ड सर्किटमधील सर्वात महत्वाचा खेळ आहे. रोड सायकलिंग मध्ये काही लोक मनोरंजन म्हणून सायकल चालवतात, काही लोक व्यायामासाठी सायकल चालवतात तसेच प्रवास करण्यासाठी, रेसिंग साठी या प्रकारचा उपयोग केला जातो. टूर डी फ्रांस मधील रोड सायकलिंग हे एक मुख्य आकर्षण आहे.

  • ट्रॅक सायकलिंग ( track cycling ) :

ट्रॅक सायकलिंग लोकांमध्ये रोड सायकलिंग किवा माउंटन सायकलिंग इतका लोकप्रिय नाही. ट्रॅक सायकलिंग हा एक सायकल रेसिंगचा प्रकार आहे जो ट्रॅकवर किवा वेल्ड्रोडम्सवर खेळला जातो. ट्रॅक सायकलिंग या खेळाची पहिली जागतिक चॅन्पियनशिप १८९३ मध्ये झाली. ट्रॅक सायकलिंग करणारे खेळाडू शक्तिशाली अॅथलीट असतात.

  • माउंटन सायकलिंग ( mountain cycling ) :

माउंटन सायकलिंग हा आताच्या काळामध्ये सुरु झालेला एक सायकलिंगचा प्रकार आहे. माउंटन सायकलिंग म्हणजे एखाद्या खडबडीत प्रदेशमध्ये सायकल चालवण्याचा एक खेळ होय. माउंटन सायकलिंग हि अनेक श्रेणीमध्ये विभागलेली आहे. यामध्ये क्रॉस कंट्री, ट्रीप ट्रेल, स्वैर स्वार, उतारा, ४ एक्स आणि मुक्त विहार याचा समावेश होतो.

  • थ्रायलॉन ( triathlon ) :

थ्रायलॉन हा प्रकारामध्ये पूर्ण खेळामध्ये सायकल चालवली जात नाही तर या खेळामध्ये एक भाग असतो त्यामध्येच फक्त सायकल चालवली जाते. या प्रकारच्या खेळामध्ये तीन भाग असतात आणि ते म्हणजे पोहणे, सायकल चालवणे आणि पाळणे आणि हा खेळ अश्याच क्रमाने खेळला जातो.

सायकलिंग खेळाचे नियम ( rules of cycling )

बाईक गिअरिंगचे नियम –

  • शर्यत सुरू करण्यापूर्वी चालकांकडे दुचाकी गीअर तपासणी केली जाते असावी आणि त्याचबरोबर मुख्य आयुक्तांनी त्या चालकांची सायकल यूसीआयने नमूद केलेल्या निकषांची पूर्तता केली पाहिजे.

रेस कोर्सचे नियम –

  • रायडर्सला रेस कोर्सचा नेमका मार्ग माहित असावा जर ही एक ओपन रोड सायकलिंग स्पर्धा असेल आणि शर्यतीच्या काळात कोणत्याही वेळी सायकल चालक शर्यतीच्या मार्गावरून विचलित करू शकत नाही.
  • सहसा ही शर्यत शेवटच्या २०० मीटर पर्यंत वळण आणि वक्रांसह आव्हानात्मक रोड कोर्सवर आयोजित केली जाते.
  • रेस मार्गाचे कोणतेही विचलन झाल्यास रायडर शर्यतीतून काढला जाईल
  • रायडरला शेवटच्या मार्गावर वेगाने प्रगती करण्यास सक्षम करण्यासाठी फिनिश लाइनपासून शेवटचे २०० मीटर कोणतेही वळण आणि वक्र न करता त्रासमुक्त असावा लागतो.

रायडरची स्थिती निश्चित करणे –

  • रोड रेसिंगचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सायकलच्या हँडल बारमधून स्वार त्याच्या हातांचा संपर्क कधीही सोडवू शकत नाही.
  • टक पोझिशनिंग, हँडल बार ठेवताना रायडर्सची अग्रभाग, संपूर्ण शर्यतीमधील मैदानाशी समांतर असणे आवश्यक आहे.
  • शर्यतीच्या वेळी खेळाडूने हँडल बारमधून आपले हात दूर केला तर त्याला मुख्य न्यायाधीश दंड करतात.

राइडरचा वेग –

  • एक वेगवान रेसर त्यांच्या बाईक रस्त्याच्या शर्यती दरम्यान ११० किमी / ताशी चालवू शकतो आणि क्रॉसविंड्स आणि उतरत्या स्थितीत ६० ते ८० किमी प्रति तासाचा वेग कायम ठेवेल.

विनामूल्य लॅप नियम –

  • बंद सर्किट सायकल शर्यतींसाठी आणि ट्रॅक सायकलिंग शर्यतींमध्ये लॅप्सच्या संख्येचा समावेश असतो.
  • स्पर्धकांनी शर्यतीत काही दुर्घटना किंवा अपघात घडला असला तरीही त्यांनी शर्यतीचे अंतर पूर्ण केले पाहिजे.
  • जर रायडरला किरकोळ दुखापत झाली असेल तर तो अद्याप आपल्या क्षमतेनुसार शर्यत घेण्यास पात्र असतो आणि त्या प्रसंगी मुख्य न्यायाधीश स्वार करण्यासाठी एक किंवा दोन विनामूल्य लॅप्स देण्याची घोषणा करतो.
  • काही सायकलिंग शर्यतींमध्ये आयोजक “नो फ्री लॅप” ची शर्यत घेण्यापूर्वी घोषित करतात आणि अपघात झाला असेल तरीही शर्यत पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्वारांना मोफत लॅप्स दिले जात नाहीत.

रेसची समाप्ती –

  • राइडरच्या सायकल जेव्हा शेवटची टोक किवा शेवटची रेषा ओलांडते तेव्हा एखादी चालक आपली सायकल चालवण्याची शर्यत पूर्ण करतो असे म्हणतात.
  • सायकल न्यायाधीश फिनिशिंगच्या आदेशानुसार सायकलस्वारांच्या क्रमवारीची नोंद ठेवतात.

सायकलिंग फायदे – Cycling Benefits in Marathi

सायकलिंग केल्यामुले आपले आरोग्य सुधारते तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास देखील मदत होते. पूर्वी सायकलचा वापर लोक एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी करायचे तसेच टांगा सायकलीने माणसांची वाहतूक केली जायची त्याचबरोबर मालाची वाहतूक केली जायची पण आताच्या काळामध्ये नवनवीन वाहतुकीच्या साधनांच्या शोधामुळे आता सायकलचा वापर थोडा कमी झाला आहे आणि आजची पिढी सायकलीकडे एक व्यामाचा भाग म्हणून बघितले जाते तसेच सायकल रेसिंग वेढहि आजच्या पिढीमध्ये खूप आहे.

आम्ही दिलेल्या cycling information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर सायकलिंग या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about bicycle in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि cycle in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू cycling game information in marathi नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!