दलाई लामा माहिती Dalai Lama Information in Marathi

dalai lama information in marathi दलाई लामा यांची माहिती, आपल्या देशामध्ये अनेक राजकीय आणि धार्मिक नेते होऊन गेले तसेच आहे आणि तसेच दलाई लामा हे तिबेटचे धार्मिक नेते किंवा व्यक्ती आहेत आणि आज आपण या लेखामध्ये दलाई लामा यांच्याविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत. परमपूज्य १४ वे दलाई लामा हे तिबेटचे राज्यप्रमुख तसेच तिबेटी लोकांचे अध्यात्मिक नेते आहेत. दलाई लामा यांचा जन्म ६ जुलै १९३५ मध्ये तिबेटमधील टकस्टर येथील शेतकरी कुटुंबामध्ये झाला आणि त्यांचे खरे नाव तेन्झिन ग्यात्सो असे आहे.

ते नंतर दलाई लामा असे पडले. त्यांना वयाच्या दोन वर्षानंतर दलाई लामा म्हणून घोषित करण्यात आले म्हणजेच त्यांना १९३७ मध्ये त्यांना एक महान बौद्ध अध्यात्मिक नेत्याचा पुनर्जन्म म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यांना १४ वा दलाई लामा म्हणून घोषित करण्यात आले. चला तर खाली आपण दलाई लामा विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

dalai lama information in marathi
dalai lama information in marathi

दलाई लामा यांची माहिती – Dalai Lama Information in Marathi

नावतेन्झिन ग्यात्सो
जन्म६ जुलै १९३५
गावतिबेटमधील टकस्टर
पदवी१४ वे दलाई लामा

दलाई लामा म्हणजे काय – dalai lama meaning in marathi

दलाई लामा हि तिबेटीयन लोकांनी निवडलेल्या सर्वोच्च अध्यात्मिक नेत्याला दिलेली पदवी आहे आणि हि पदवी दिलेल्या व्यक्तीला परमपूज्य म्हणून ओळखले जाते.

लामा परंपरेचा इतिहास – history

तिबेट या देशामध्ये दलाई लामा हि एक प्रकारची परंपरा आहे जी जवळ जवळ १४ व्या शतकापासून सुरु आहे ज्यामध्ये दलाई लामा हे पद स्वीकारणारा व्यक्ती हा त्या ठीकानाचा धार्मिक आणि राजकीय नेता बनतो. दलाई लामा म्हणजे ज्ञानाचा महासागर आणि जो तिबेटचा दलाई लामा बनतो तो खूप हुशार आणि चतुर असतो जेणेकरून तो ज्ञानाचा प्रसार संपूर्ण देशामध्ये करेल.

तिबेटचे लामा जेनडून द्रूप हे होते आणि तिबेटमधील लामा परंपरा हि १३९१ पासून सुरु झाली आहे आणि या कालावधीमध्ये एकूण १३ लामा बनून गेले आणि सध्याचे दलाई लामा हे १४ वे दलाई लामा आहेत आणि ते तिबेटचे राजकीय आणि धार्मिक नेते म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

तिबेटमधील दलाई लामांना दिले जाणारे शिक्षण – education

परमपूज्य यांनी वयाच्या ६ व्या वर्षी मठाच्या शिक्षणाला सुरुवात केली. या शिक्षणामध्ये पाच महत्वाच्या विषयांचा पाच लहान विषयांचा समावेश आहे आणि यामधील महत्वाच्या विषयांच्यामध्ये ललित कला, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि संस्कृत व्याकरण याचा समावेश आहे. आणि यातील लहान पाच विषयांच्यामध्ये ज्योतिष, रचना, कविता आणि नाटक या सारख्या विषयांचा समावेश असतो.

दलाई लामा कोण असतात?

  • दलाई लामा हे तिबेटचे अध्यात्मिक नेते म्हणून ओळखले जातात.
  • चौदाव्या शतकापासून आजपर्यंत एकूण १४ दलाई लामा होऊन गेले आहेत आणि सध्याचे दलाई लामा हे १४ वे दलाई लामा आहेत.
  • दलाई लामा जो बनतो त्याला विविध प्रकारचे छंद असतात आणि त्यामध्ये त्याच्या आवडीमध्ये ध्यान करणे, बागकाम करणे या सारख्या छंदांचा समवेश असू शकतो.
  • दलाई लामा हे तिबेटचे राजकीय नेते आणि शासक म्हणून आपली जबाबदारी पार पडतात.
  • दलाई लामा हे जगभरातील लोकांच्यासाठी प्रेरणादायी व्यक्ती आहेत.

दलाई लामा यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • १९५० मध्ये दलाई लामा यांना तिबेट सरकारचे प्रमुख म्हणून संपूर्ण राजकीय सत्ता पहिली ज्यावेळी चीनकडून तिबेटला धोका होता.
  • परमपूज्य १४ वे दलाई लामा हे तिबेटी लोकांचे अध्यात्मिक नेते आहेत.
  • दलाई लामा हे करुणेच्या बोधसत्वाचे पुनर्जन्म आहेत ज्यांनी लोकांची सेवा करण्यासाठी पुनर्जन्म घेणे निवडले.
  • दलाई लामा यांना बुद्धीचा महासागर म्हणून ओळखले जात होते.
  • सध्याचे दलाई लामा हे पद स्वीकारणारे तेन्झिन ग्यात्सो हे सर्वात दीर्घ काळ पद स्वीकारणारे व्यक्ती आहेत.
  • दलाई लामा यांची संस्था तुलनेने तरुण आहे कारण यापूर्वी तेरा दलाई लामा झाले आहे आणि पहिल्या दोघांनी त्यांच्या पदव्या मरणोत्तर देण्यात आल्या.
  • सध्याचे दलाई लामा यांना विज्ञानात प्रचंड रस होता आणि त्यांना इकोलॉजीबद्दल विशेष आवड आहे आणि त्यांचा असा विश्वास आहे कि ग्रहांच्या संरक्षणासाठी कार्य करणे हे बुद्धांच्या आदर्शाना मूर्त रूप देते.
  • १९९५ मध्ये दलाई लामा यांनी तिबेटमधील एका मुलाचे नाव पूर्वीच्या पंचेन लामांचा पुनर्जन्म म्हणून ठेवले.
  • १४ वे दलाई लामा म्हणजेच सध्याचे दलाई लामा हे ८८ ते ८९ वय वर्षाचे आहेत.
  • दलाई लामा हे अवलोकितेश्वर किंवा चेनरेझिंग, करुणेचे बोधिसत्व आणि तिबेटचे संरक्षक संत यांचे प्रकटीकरण असल्याचे मानले जाते.
  • चीनी राजवटीविरुध्द तिबेटचा उठाव हा अयशस्वी झाल्यानंतर १९५९ मध्ये दलाई लामा हे भारतामधून पळून गेले.
  • पहिले दलाई लामा हे लामा जेनडून द्रूप हे होते आणि त्यांचा कार्यकाळ १३९१ ते १४७४ पर्यंत होता.
  • १९५० मध्ये म्हणजेच वयाच्या १५ व्या वर्षी तेन्झिन ग्यात्सो म्हणजेच तिबेटचे १४ वे दलाई लामा यांनी संपूर्ण राजकीय सत्ता स्वीकारली.
  • १९६३ मध्ये त्यांनी तिबेटसाठी एक मसुदा जारी केला ज्यामध्ये सरकारचे लोकशाहीकरण करण्यासाठी अनेक सुधारणांचा समावेश केला.
  • सप्टेंबर १९८७ मध्ये दलाई लामा यांनी तिबेटसाठी पाच कलमी शांतता योजना चीन सरकारशी समेट करण्यासाठी आणि तेथील अस्थिर परिस्थिती संपवण्यासाठी शांततापूर्ण उपाय म्हणून पहिले पाऊल उचलले होते.

आम्ही दिलेल्या dalai lama information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दलाई लामा यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dalai lama meaning in marathi या dalai lama biography in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about dalai lama in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dalai lama books in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!