खजूर फळाची माहिती Dates Information in Marathi

dates information in marathi – dates fruit information in marathi खजूर फळाची माहिती, भारतामध्ये खूप पूर्वीच्या काळापासून अनेक वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती आणि आयुर्वेदिक फळांचे उत्पादन करते किंवा अनेक उपचारांच्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा आणि फळांचा वापर करते आणि खजूर देखील भारतामध्ये पिकवली जाणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे ज्याला इंग्रजीमध्ये डेट्स (dates) म्हणतात आणि या वनस्पतीचे आणि या फळाचे अनेक आरोग्य फायदे असतात.

त्यामुळे या वनस्पतीला खूप महत्व आहे आणि आज आपण या लेखामध्ये खजूर विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. खजूर हे एक प्रकारचे फळ आहे ज्याला आपण एक आयुर्वेदिक फळ म्हणून ओळखू शकतो आणि हे गोड आणि अनेक पोषक तत्वांनी भरलेले असून हे बोराच्या आकाराचे गडद तपकिरी रंगाचे असते.

आणि हे पूर्णता परिपक्व झाल्यानंतर हे फळ गडद चॉकलेटी रंगाचे बनते. खजूर हे असे आरोग्यदायी फळ आहे ज्यामध्ये अनेक पोषक घटक आहेत.

ज्याचे अनेक आरोग्य फायदे मिळतात जसे कि हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते तसेच हाडे मजबूत होतात आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी अनेक असे अनेक फायदे मिळवण्यासाठी या फळाची मदत होते.

dates information in marathi
dates information in marathi

खजूर फळाची माहिती – Dates Information in Marathi

खजूर म्हणजे काय – dates fruit meaning in marathi

खजूर हे एक प्रकारचे पोषक घटकांनी परिपूर्ण असे कोरडे किंवा सुके फळ आहे जे तपकिरी रंगाचे असते आणि त्याला गोड चव असते आणि या फळाला इंग्रजीमध्ये डेट्स (dates) या नावाने ओळखले जाते.

खजूर फळामधील पोषक घटक – nutritions

खजूर हे एक आयुर्वेदिक फळ मानले जाते आणि या फळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक घटक असतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

पोषक घटकप्रमाण
प्रथिने१.८१ ग्रॅम
कर्बोदके७४.९७ ग्रॅम
आहारातील फायबर६.७ ग्रॅम
पोटॅशियम६९६ मीग्रॅ
मॅग्नेशियम (मिग्रॅ)०.२९६
लोह०.९० मिग्रॅ
आहारातील फायबर६.७ ग्रॅम
व्हीटॅमीन बी ६०.२४६ मिग्रॅ

खजूर खाण्याचे फायदे – dates benefits in marathi

खजूर हे फळ आरोग्यदायी आणि पोषक घटकांनी समृध्द असे फळ आहे आणि या फळाचे अनेक असे आरोग्य फायदे आहेत ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

  • खजूर या फळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबरचे प्रमाण असते त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.
  • या फळाच्या नियमित सेवनामुळे पचनसंस्थेचे कार्य चांगले होण्यास मदत होते.
  • खजूर या फळामध्ये अँटीऑक्सिडंट चे प्रमाण देखील जास्त असते त्यामुळे हे फळ नियमितपणे खाणाऱ्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला कोणत्याही रोगापासून बचाव होण्यास मदत होते.
  • खजूर ह्या फळामध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे घटक असतात आणि या पोषक घटकांच्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळतात तसेच या घटकांच्यामुळे हाडांची सुधारणा होण्यास मदत होते तसेच हाडे मजबूत देखील बनतात.
  • अनेकांना केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते, त्यावेळी ते संबधित व्यक्ती अनेक उपाय करून बघतात परंतु काहींना यश मिळते पण काहींना मिळत नाही पण जर तुम्हाला केस गळती थांबवायची असेल तर तुम्ही खजुराचे सेवन योग्य प्रमाणत सेवन केले तर त्यामुळे केस गळतीची समस्या दूर ठेवण्यासाठी मदत होते.
  • या फळामध्ये व्हीटॅमीन देखील असतात त्यामुळे आपली त्वचा सुधारण्यास देखील मदत होते.
  • खजूर हे फळ अनेक वेगवेगळ्या समस्यांच्यासाठी आरोग्यदायी आहे आणि तसेच हे फळ हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील मदत करते.
  • काही लोकांना अनेक उपाय करून देखील त्यांचे वजन वाढत नाही अश्या लोकांनी त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये खजूर फळाचे सेवन केल्यास त्यांचे वजन वाढण्यास मदत होऊ शकते.
  • खजुराच्या नियमित सेवनामुळे शरीरातील उर्जा पातळी वाढवण्यासाठी मदत होते.
  • त्याचबरोबर खजूर हे फळ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत करू शकते.

खजूर फळाविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • खजूर हे एक प्रकारचे सुके फळ आहे प्रथम तपकिरी रंगाचे असते आणि नंतर ते पिकल्यानंतर ते गडद चॉकलेटी रंगाचे असते.
  • हे फळ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वजन वाढणे, अंगाला खाज सुटणे या सारख्या समस्या उद्भवतात त्यामुळे हे फळ दिवसातून २ ते ३ वेळा खाणे उत्तम ठरेल.
  • खजूर हे फळ इरीटेबल बोवेल सिंड्रोम आणि मधुमेह असलेल्या लोकांनी खावू नये.
  • खजूर या फळाच्या गरामध्ये ६० ते ६५ टक्के साखरेचे प्रमाण असते.
  • इराक या देशामध्ये खजूर या फळाची लागवड हि आठ हजार वर्षापूर्वीपासून केली जात होती.
  • खजुराचे २०० हून अधिक प्रकार आहेत.
  • त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असताना अनेक खजूरच्या जातींच्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो कारण त्यांच्या फळातील साखर आहारातील फायबरमध्ये जास्त असते.
  • खजुरांच्या झाडांच्यापासून सर्वोत्तम दर्जाची फळे मिळवण्यासाठी कमीत कमी १०० दिवस उष्णता आणि पाणी देण्याची गरज असते.

खजूर फळाचे प्रकार – types

  • हयानी : हयानी हा एक खजूर या फळाचा प्रकार आहे आणि हा या फळाचा प्रकार इजिप्त मध्ये मोठ्या प्रमाणात पिकवला जातो आणि हे फळ साधारण लाल ते गडद काळ्या रंगाचे असते.
  • मेडजुल : मेडजुल हे फळ आकाराने मोठे आणि स्वादिष्ट असते आणि ते चवीला टॉफीसारखे लागते. मेडजुल हा खजूर फळाचा मूळ प्रकार हा मोरोक्को या देशामधून आला आहे.
  • डेरी : डेरी हा देखील एक खजुराचा प्रकार आहे आणि हे फळ आकाराने लांब, सडपातळ आणि रंगामध्ये काळ्या रंगाचे असते.
  • इतेमा : इतेमा हे फळ आयताकृती आकाराचे आणि आकाराने मोठे असते आणि हे चवीला गोड असते. इतेमा या खजूर फळाचा उगम हा अल्जेरिया या देशामध्ये झाला आहे.
  • डेग्लेट नूर : डेग्लेट नूर हे ट्युनिशिया आणि अल्जेरिया मधील मूळ फळ आहे. डेग्लेट नूर हे फळ जात गोड नसते आणि हे अर्ध कोरडे असते आणि हे फळ शक्यतो स्वयंपाकामध्ये वापरले जाते.

आम्ही दिलेल्या dates information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर खजूर फळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dates fruit information in marathi या date tree information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि dates benefits in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये date palm tree information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!