dhokla recipe in marathi ढोकळा हा एक मऊ-लुसलुशीत, जाळीदार पारंपारिक शाकाहारी पदार्थ आहे. आणि प्रामुख्याने ढोकळा dhokla in marathi हा पदार्थ भारतातील गुजरात प्रांतामधून आला आहे, अस असल तरी सध्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रिय शाकाहारी स्ट्रीट फूड म्हणून ढोकळा हा पदार्थ अगदी सहजरीत्या भेटतो. ढोकळा हा असा पदार्थ आहे कि तो नाश्ता म्हणून पण खावू शकतो, जेवणासोबत पण खाऊ शकतो आणि संध्याकाळी चहा सोबत पण खाऊ शकतो. खमण हा एक ढोकळा चा प्रकार आहे पण हे हरभऱ्यापासून बनवलं जात, आणि ढोकळा पदार्थ तांदूळ आणि उडीद डाळ यांच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनतो.
8 ढोकळ्याची रेसिपी मराठीमध्ये Dhokla Recipe In Marathi
आजकाल वाढदिवसाच्या पार्टीमध्ये, महिला मंडळच्या पार्टीमध्ये आणि कोणत्याही छोट्या मोठ्या पार्टीमध्ये ढोकळा पदार्थ आवर्जून असतो कारण हा बनवायला सोपा आणि पचायला पण सोपा असा पदार्थ आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ढोकळा पदार्थ आवडीचा बनला आहे. हा पदार्थ गुजरात मधून असला तरी आता सर्वत्र अगदी सहज बेकरीमध्ये मिळतो. ढोकळा पदार्थाचे खूप प्रकार आहेत, मला माहित असलेले शक्य तेवढे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करेन.
राज्य | गुजरात |
पर्यायी नाव | ढोकरा |
रंग | पिवळा, पांढरा |
नाश्ता | हो |
जेवण | हो (तोंडी लावण्याचा पदार्थ) |
शाकाहारी | शुद्ध शाकाहारी |
मांसाहारी | नाही |
प्रसंग | मागणीनुसार.. |
12 ढोकळ्याचे काही लोकप्रिय प्रकार खालीलप्रमाणे:
- पांढरा ढोकळा
- खमण ढोकळा
- मुग डाळ ढोकळा
- चीज ढोकळा
- तूर डाळ ढोकळा
- सँडविच ढोकळा
- रवा ढोकळा
- मिश्र डाळींचा ढोकळा
- मटारचा ढोकळा
- गोड ढोकळा
- बेसन ढोकळा
- मुठिया ढोकळा
1.बेसन ढोकळा रेसिपी kukar besan dhokala recipe in marathi
साहित्य:
2 कप बेसन, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा साखर, 1 चमचा लिंबू रस, 1/३ कप दही,2 चमचे आलं पेस्ट, 1 चमचा हळद, १ मोठा चमचा तेल, २ चमचे फ्रूट साल्ट.
फोडणीसाठी साहित्य:
२ मोठे चमचे तेल, १ चमचा मोहरी, १०-१२ कडी पत्त्याची पाने, १ चमचा हिंग, २-३ हिरव्या मिरच्या, १/२ कप नारळाचं पाणी, चवीनुसार मीठ, १ चमचा साखर, १ मोठा चमचा कोथिंबीर.
कृती how to make besan dhokla in marathi
- एका भांडयात हरभरा पीठ, चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस, दही, आल्याची पेस्ट, हळद, आवश्यक असेल इतके पाणी घालून छान गुठळ्या न होता एकत्रित करा.
- दुसऱ्या भांडयात तेल आणि फ्रूट साल्ट एकत्र करा. नंतर हे मिश्रण वरील मिश्रणात घालून छान एकत्रित करा.
वाफवण्याकरिता:
- १ ग्लास पाणी ३-५ लिटर कुकर मध्ये घालुन ४-५ मिनिटे मध्यम आचेवर गरम करा.
- नंतर एक छोटा स्टँड किंवा एक लहान वाटी ठेवा आणि त्यावर ढोकाल्याचे मिश्रण घातलेल्या ग्रीस केलेल्या प्लेट्स ठेवा.
- प्रेशर कुकरचे झाकण बंद करा आणि शिटी काढा.
- मध्यम आचेवर १५ मिनिटांसाठी ठेवा. १५ मिनिटा नंतर झाकण उघडा आणि चाकू घालून तपासून पहा कि ढोकळा शिजला आहे कि नाही. जर ढोकळा शिजला नसेल तर अजून ५ मिनिटांसाठी कुकर चालू करून ठेवा.
फोडणीसाठी:
- एका कढई मध्ये तेल गरम करा, त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडली कि त्यात कडीपत्ता, हिंग आणि हिरव्या मिरच्या घाला.
- नंतर नारळाचं पाणी चवीपुरत मीठ, साखर आणि कोथिंबीर घाला.
- वरील तडका ढोकल्यावर घाला.
2.इनो न घालता ढोकळा dhokala recipe in marathi without eno
इनो न घालता जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी वरील कृती करा फक्त इनो ऐवजी फ्रूट साल्ट घाला.
3.चना डाळ ढोकळा chana dal dhokala recipe in Marathi
चना डाळ ढोकळा बनवण्यासाठी वरील कृती करून पहा. कारण चना डाळीचे मिक्शर म्हणजेच बेसण होय.
4.खमण ढोकळा रेसिपी khaman dhokla recipe in marathi
- खामनी रेसिपि :
एका भांडयात ढोकळ्याचे तुकडे, तीळ, लिंबूचा रस आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. आणि शेव, डाळिंबाचे दाने आणि चाट मसाला टाकून सर्व्ह करा.
5.रवा ढोकळा rava dhokla recipe in marathi
साहित्य:
- १ कप रवा, १ कप दही (१/२ इंच आलं आणि १ हिरवी मिरची घालून मिक्स केलेलं.), इनो १ चमचा, मीठ चवीनुसार, साखर ३-४ चमचे, तेल २ चमचे, मोहरी १/२ चमचा, तीळ १ चमचा, कडीपत्ता १०-१२, हिरव्या मिरच्या २.
कृती how to make rava dhokla in marathi
- बारीक रवा आणि दही (१/२ इंच आलं आणि १ हिरवी मिरची घालून मिक्स केलेलं.) चांगल मिक्स करा.
- वरील मिश्रण दाट वाटत असेल तर आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करून १० मिनिटे रवा फुलण्यासाठी ठेवावे.
- १ ग्लास पाणी एका भांडयामध्ये घालुन ४-५ मिनिटे मध्यम आचेवर गरम करा.
- नंतर एक छोटा स्टँड किंवा एक लहान वाटी ठेवा.
- नंतर रव्याच्या मिश्रणात मीठ चवीनुसार, साखर घालून चांगल मिक्स करा, नंतर फ्रूट साल्ट आणि १ चमचा पाणी घालून मिक्स करा.
- ढोकाल्याचे मिश्रण घातलेल्या ग्रीस केलेल्या प्लेट्स ठेवा. आणि २० मिनिटे ढोकळा शिजू द्या.
- २० मिनिटा नंतर झाकण उघडा आणि चाकू घालून तपासून पहा कि ढोकळा शिजला आहे कि नाही. जर ढोकळा शिजला नसेल तर अजून ५ मिनिटांसाठी चालू करून ठेवा.
- तयार झाल्यावर कंटेनर बाहेर काढा, थोडं थंड होण्यासाठी ठेवा. एकदा थंड झाल्यावर चाकूच्या सहाय्याने बाहेर काढा आणि मग प्लेटवर ठेवा.
फोडणीसाठी:
- एका कढई मध्ये तेल गरम करा, त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडली कि त्यात कडीपत्ता, हिंग आणि हिरव्या मिरच्या आणि तीळ घाला.
- वरील तडका ढोकल्यावर घाला.
- ढोकळाला शेंगदाणा चटणी किंवा नारळाची चटणी किंवा तुमच्या आवडीच्या सॉससोबत सर्व्ह करा.
6.मिक्स डाळ ढोकळा mix dal dhokala recipe in marathi
साहित्य:
- तांदूळ १ कप, चना डाळ १/२ कप, मसूर डाळ १/४ कप, मुग डाळ १/४ कप, उडीद डाळ १/४ कप, पोहे २ मोठे चमचे, आलं-लसूण पेस्ट १ चमचा, हळद १/२ चमचा, मीठ चवीनुसार, तेल, मोहरी, कडीपत्ता, तील, हिंग.
कृती: how to make mix dal dhokla recipe in marathi
- तांदूळ, चना डाळ, मसूर डाळ, मुग डाळ आणि उडीद डाळ चांगले धुवून ४-५ तास भिजत घालावे.
- भिजवलेले वरील साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. आणि बारीक करताना त्यात पोहे (पोह्यामुळे ढोकळा मऊ होतो.), आलं-लसूण पेस्ट, हळद आणि चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण ६-८ तास आंबवून घ्यावं.
- त्यानंतर १ ग्लास पाणी स्टीमर मध्ये घालुन ४-५ मिनिटे मध्यम आचेवर गरम करा.
- नंतर एक छोटा स्टँड किंवा एक लहान वाटी ठेवा आणि त्यावर ढोकाल्याचे मिश्रण घातलेल्या ग्रीस केलेल्या प्लेट्स ठेवा.
- मध्यम आचेवर १५ मिनिटांसाठी ठेवा. १५ मिनिटा नंतर झाकण उघडा आणि चाकू घालून तपासून पहा कि ढोकळा शिजला आहे कि नाही. जर ढोकळा शिजला नसेल तर अजून ५ मिनिटांसाठी परत स्टीमरमध्ये घालून ठेवा.
फोडणीसाठी:
- एका कढई मध्ये तेल गरम करा, त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडली कि त्यात कडीपत्ता, हिंग आणि हिरव्या मिरच्या आणि तीळ घाला.
- वरील तडका ढोकल्यावर घाला. आणि गरम गरम सर्व्ह करा.
7.रवा-बेसन ढोकळा rava besan dhokla recipe in marathi language
साहित्य:
- रवा १ कप, बेसन १ कप, आलं-लसूण पेस्ट १ चमचा, कोथिंबीर १ चमचा, चवीप्रमाणे मीठ, साखर १ चमचा, मोहरी १ चमचा, लाल तिखट १ चमचा, तेल १ चमचा, कडीपत्ता ७-८, ताक २ कप, बेकिंग पावडर १/२ चमचा, तीळ १ चमचा, हिरव्या मिरच्या २, हिंग.
कृती: how to make rava besan dhokla recipe in marathi
- रवा आणि बेसन घेऊन त्यामध्ये ताक मिक्स करून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, आले-लसूण पेस्ट, साखर, लाल तिखट, तेल टाकून सर्व मिश्रण मिक्स करून दहा मिनिटे रवा फुलण्यासाठी ठेवा.
- १ ग्लास पाणी ३-५ लिटर कुकर मध्ये घालुन ४-५ मिनिटे मध्यम आचेवर गरम करा.
- नंतर एक छोटा स्टँड किंवा एक लहान वाटी ठेवा. नंतर त्यामध्ये बेकिंग पावडर घालून नीट मिक्स करून ढोकाल्याचे मिश्रण घातलेल्या ग्रीस केलेल्या प्लेट्स ठेवा.
- प्रेशर कुकरचे झाकण बंद करा आणि शिटी काढा.
- मध्यम आचेवर २० मिनिटांसाठी ठेवा. २० मिनिटा नंतर झाकण उघडा आणि चाकू घालून तपासून पहा कि ढोकळा शिजला आहे कि नाही. जर ढोकळा शिजला नसेल तर अजून ५ मिनिटांसाठी कुकर चालू करून ठेवा.
फोडणीसाठी:
- एका कढई मध्ये तेल गरम करा, त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडली कि त्यात कडीपत्ता, हिंग आणि हिरव्या मिरच्या आणि तीळ घाला.
- वरील तडका ढोकल्यावर घाला. आणि गरम गरम सर्व्ह करा.
8.इनोवाला ढोकळा dhokala recipe in marathi with eno
इनो वापरून ढोकला बनवण्यासाठी वरील कृतीमध्ये बेकिंग पावडर ऐवजी इनो घालावा.
आम्ही दिलेल्या ढोकळा रेसेपी या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर खमंग ढोकळा रेसेपी या बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dhokla recipe in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dhokla in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर how to make dhokla in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट