माझा आवडता सण दिवाळी निबंध Diwali Essay In Marathi

diwali essay in marathi भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. दिवाळी हा सण अत्यंत आनंद देणारा सण आहे. म्हणून भारतातच नाही तर  इतर देशात सुद्धा प्रसिद्ध आहे. diwali nibandh in marathi दिवाळी पेक्षा दीपावली हा शब्द या सणासाठी जास्त शोभून दिसतो. दीपावली म्हणजे सणांच्या ओळी. हा सण इतर सना पेक्षा वेगळा आहे त्याचे हेच कारण होय. या सणात आकाशातले तारे जमिनीवर येतात अशी कविकल्पना आहे. शरद ऋतूच्या मध्यभागी येणारा हा दीपोत्सव काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो.

diwali-essay-in-marathi
diwali nibandh in marathi/diwali essay in marathi

दिवाळी सण निबंध diwali essay in marathi

diwali nibandh marathi दिवाळी म्हणजे पणत्यांची आरास, दिव्यांचा उत्साह, रोषणाई, फराळ, धमाल, रांगोळी, कंदील, फटाके, मजा-मस्ती, सुट्ट्या आणि बरंच काही दिवाळी म्हटलं की सगळ्यांची लगबग सुरू होते. साफसफाई, कपड्यांची खरेदी, नवीन वस्तू, सोन्याची खरेदी, मिठाई फराळाची तयारी बाप रे! किती सारी तयारी. किती काम! पण काही असो प्रकाश आणि आसमंत उजळून टाकणारा सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो.

प्रत्येक वर्षाची दिवाळी नव्याने आनंद, उत्साह आणि भरभराट घेऊन येते. दिवाळीची मज्जा काही औरच असते. दिवाळी पहाट अभ्यंगस्नान आणि उटण्याचा सुगंध, रंगात रंगलेली रांगोळी, जगमगता कंदील, मातीचे दिवे आणि वेगवेगळे स्टिकर्स, करंजा, चिवडा, चकली वा काय भारी सण आहे. हा वर्षातून एकदा येतो आणि नवीन उमेद देतो.

अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिवा मांगल्याचे प्रतीक मानला जातो. प्रकाशाने अंधारावर प्राप्त केलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी करतात. दिव्याच्या प्रकाशाने जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो.थंडीची चाहूल लागताच अश्विन महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दीपावली हा सण येतो. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या शुभ दिवसांनी दीपावलीचा उत्सव साजरा केला जातो.

दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी

घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करून सजविले जाते. या दिवशी घरातील पैशांची पूजा केली जाते. नुसते पैसेच नाही तर लक्ष्मी बरोबर  ज्ञानरूपी  सरस्वतीचे देखील पूजन केले जाते. म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी लोक घरासमोर कंदील लावतात. आकाश कंदील यामुळे घराला एक वेगळीच शोभा येते . वर्षभरात केले जात नाही तेवढे तिखट-गोड पदार्थ या दिवशी केले जातात. दिवाळीच्या दिवशी घरासमोर पणत्या लावून अंधाराला दूर केले जाते.

नवा दिवस

नवे वर्ष

नवी आशा

नवा हर्ष

नवे विचार

नवी कल्पना

नवे पाऊल

नवी चेतना

मनापासून ही एक इच्छा

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

असे म्हणत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीला रांगोळी काढून स्वागत केले जाते.रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. हा दिवस अतिशय शुभ असल्याने या दिवशी स्त्रिया सोने व चांदीचे भांडी खरेदी करतात. हा दिवस धन्वंतरी चा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवाळीचा सण आपल्याला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात अडी ताण असेल तर त्याला फटाके सारखे उडवून लावा आणि आयुष्याची नव्याने सुरू करा.

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी.

त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुर्योदया अगोदर अंघोळ करून तयार होण्याची परंपरा आहे. पुरातन काळात सांगण्यात येते की असुरांचा राजा नरकासुर नेपाळच्या दक्षिण प्रांतात राज्य करत होता. एका युद्धात त्याने इंद्रावण विजय प्राप्त केला आणि देवांची माता अदिती तिचे सुंदर कर्ण कुंडल हिसकावून घेतले आणि देवांच्या 16000 कन्यांना कैदेत ठेवले. म्हणून श्रीकृष्णाने नरक चतुर्दशी या दिवशी या दानवाचा वध केला आणि त्या सोळा हजार कन्याची सुटका केली. त्या कन्यांनी तेल मर्दन  करून स्नान केले.

दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन.

या दिवशी अमावस्या असते. असे असूनही हा दिवस शुभ मानला जातो. कारण या दिवशी संत आणि महात्मे यांनी समाधी घेऊन आपल्या देहाचा त्याग केला होता. आज दिवशी प्रभू राम सीता आणि लक्ष्मण 14 वर्षे वनवास भोगून अयोध्येत परत आले होते.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा.

हा दिवस वर्षप्रतिपदा म्हणून जाणला जातो. यादिवशी इडापिडा टाळो बळीराजाचे राज्य येऊ असे म्हणून बळीराजाची पूजा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन दिवा लावतो. हा दिवस नववर्षाची सुरुवात आहे असे म्हणून व्यापारी मंडळी आपल्या व्यवसायाची पूजा करतात. या दिवशी घरामध्ये पाडवा घालतात.

पत्नी आपल्या नवऱ्याला उटणे लावून अभ्यंगस्नान घालते अन नंतर पाटावरती रांगोळी काढून पत्नी आपल्या नवऱ्याला ओवाळते. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी नवरीच्या माहेरी साजरी केली जाते. याला दिवाळी सण म्हणतात. यादिवशी जावयाला आहेर केला जातो. नवरा बायकोला सुंदर अशी भेटवस्तू देतो. असेही म्हणण्यात येते की या दिवशी इंद्र देवाच्या कृपेने गोकुळात अतिवृष्टी झाली होती म्हणून श्रीकृष्णाने प्रजेच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.

दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज

दिवाळी कविता मराठी

आली आली दिवाळी

बहीण भावाला ओवाळी

साजरी करूया भाऊबीज

एकत्रित येऊन आपल्या घरी

भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. भाऊ आपल्या बहिणीला सुंदर अशी भेट वस्तू  देतो. लग्न झालेल्या मुली या दिवशी आपल्या लाडक्या भावासाठी माहेरी येतात. असे पाच दिवस आनंदात साजरे केले जातात. कामानिमित्त बाहेर गेलेले लोक घरी परत जातात आणि आनंदाने दिवाळी कुटुंबासोबत साजरी करतात. दिवाळी, फटाके,रांगोळी, पणत्या या गोष्टी येतात पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ला.

लहान मुलं एकत्र जमून किल्ला बनवता. आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले यांना फार पूर्वीपासून मोलाचे महत्त्व आहे. किल्ले बनवण्याची परंपरा आपल्या पूर्वजांनी आपला अभिमानास्पद इतिहास पुढच्या पिढीने आत्मसात करावा याकरता निर्माण केला गेला आहे. लहान मुलं एकत्र येऊन दगड,विटा,माती गोळा करतात आणि आपल्या मनातील गडाला हवा तसा आकार देतात.

त्यावर मातीचे बनवलेले पुतळे मावळे म्हणून ठेवतात. माती पासून बनवलेले प्राणी ठेवतात आणि किल्ल्याची सजावट करतात. यादरम्यान स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्पर्धेतून मुलांमधील आकलन शक्ती प्रदर्शित होत असते. अनेक सार्वजनिक मंडळे संस्था इतकेच नव्हे तर राजकीय पक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांच्या या गुणांना वाव देत आहे. फटाके लावणे, फराळ करणे,रांगोळी काढणे,  किल्ले बनवणे,  खरेदी करणे, एकमेकांना शुभेच्छा देणे एवढ्या सगळ्या दिवाळीचे पाच दिवस कसे निघून जातात समजतच नाही. दिवाळीच्या सणासाठी हे पाच दिवस सुद्धा कमीच आहे.

आम्ही दिलेल्या diwali essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता सण दिवाळी निबंध अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nibandh on diwali in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि diwali nibandh marathi madhe माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण diwali nibandh in marathi या लेखाचा वापर diwali essay in marathi for class 5 6 8 असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!