doctor information in marathi निराशेमध्ये हि आशेचा एक किरण दाखवणारे आणि अशक्य आहे ते शक्य करून दाखवणारे असे हे डॉक्टर ज्यांना आपण पृथ्वीवरील देव मानतो. या अशाच महान डॉक्टरांबद्दल आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. doctor in marathi language अभियंता आणि प्राध्यापकाप्रमाणेच डॉक्टरांना हि समाजात महत्वाचे स्थान आहे तसेच समाजात डॉक्टरांकडे आदराने बघितले जाते कारण ते आपल्या सर्वांच्या प्रकृतीचे संरक्षण करतात. डॉक्टर हे रोगाचे निदान करतान आणि त्यावर योग्य ते उपचार करतात.
जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपण डॉक्टरांच्याकडे जातो अगदी ताप असो किवा गंभीर आजार आणि डॉक्टर त्या आजाराचे निदान करून त्यावर योग्य ते विचार करतात.
डॉक्टर म्हणजे काय – Doctor Information in Marathi
डॉक्टर हि एक अशी व्यक्ती आहे जी आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. रुग्णाशी संवाद साधने, वैद्यकीय समस्यांचे निदान करून त्यावर योग्य आणि यशस्वीरीत्या उपचार करण्याचे डॉक्टरांचे काम आहे.
डॉक्टरांचे कार्ये – duties of doctors
- रुग्णांना काय झाले आहे त्याची लक्षणे काय आहेत हे सर्व रुग्णांना विचाराने आणि ते काय सांगतात ते काळजीपूर्वक ऐकणे.
- मग त्या आजाराचे मूळ शोधून काढण्यासाठी त्यावर निदान करणे.
- त्यानंतर त्यावर योग्य तो उपचार करणे आणि मग औषधे लिहून देवून उपचार हि चालू ठेवणे जोपर्यंत आजार कमी होत नाही.
- रुग्णांची शक्य तितकी उत्तम काळजी घेण्यासाठी सहाय्यक डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट आणि ईएमटी या सर्वांशी जळवून काम करणे.
डॉक्टरांचे प्रकार – types of doctor
आपण आपल्या घरामध्ये जर कोणाची तब्येत बरी नसेल किवा आजारी असतील तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टर कडे जातो व ते फॅमिली डॉक्टर आपल्या रोगाचे निदान करून जर त्यांच्या कडून त्या रोगाचे निदान होत नसेल तर ते दुसऱ्या डॉक्टरला दाखवण्याचा सल्ला देतात. जर आपल्याला आधीपासूनच माहित असेल कि कोणता आजार झाला तर कोणत्या डॉक्टरला आपण दाखवू शकतो आणि आपल्याला लगेच त्यावर अंमल हि करता येते. खाली काही डॉक्टरांचे प्रकार आणि ते कोणत्या आजारांवर उपचार करतात ते दिले आहे.
जनरल सर्जन्स – general surgeon
जनरल सर्जन्स ला मराठीमध्ये शल्यचिकित्सक म्हणतात. जनरल सर्जन्स हे आपल्या शरीराच्या सर्व भागाचे निदान करू शकतात आणि त्यावर योग्य ते उपचार करू शकतात. हे डॉक्टर ट्युमर, अपेंडिक्स आणि हर्निया या प्रकारच्या रोगांवर उपचार करतात. तसेच कर्करोग आणि रक्तवाहिन्यासंबधी शस्त्रक्रिया करण्याची विशेषता या प्रकारच्या डॉक्टरांकडे असते. जनरल सर्जन होण्यासाठी डॉक्टर ऑफ मेडीसीन (M.D), बॅचलर ऑफ मेडीसीन, बॅचलर ऑफ सर्जरी (M.B.B.S) किवा डॉक्टर ऑफ ऑसटेवोपाथिक मेडीसीन (D.O) या प्रकारचे शिक्षण घ्यावे लागते.
पिडियाट्रिशियन – pediatrician
पिडियाट्रिशियन म्हणजे बाल चिकित्सक. पिडियाट्रिशियन हे डॉक्टर लहान बाळांचे तसेच किशोरवयाच्या मुलांचा उपचार करतात. हे डॉक्टर लहान बाळांचा तसेच १२ ते २१ वर्षाच्या लहान मुलांचा आणि मुलींचा उपचार करतात. या प्रकारचे डॉक्टर जन्मजात रोगावर, बालपणातील कर्करोगावर, संसर्गजन्य रोग किवा लहान मुलांच्या मानसिक विकारावर उपचार करतात. पिडियाट्रिशियन होण्यासाठी MBBS किवा MD या मधील कोणतीतरी एक पदवी असलेले डॉक्टर पिडियाट्रिशियन होवू शकतात.
डर्मेटोलॉजिस्ट – dermatologist
डर्मेटोलॉजिस्ट म्हणजे त्वचा डॉक्टर ज्यांना आपण स्कीन डॉक्टर असेही म्हणतो. या प्रकारचे डॉक्टर आपल्या त्वचेच्या , नखांच्या किवा केसांच्या समस्ये वर उपचार करतात. किवा त्वचेवर कसलेतरी डाग उटले असतील किवा स्कीन अॅलर्जी असेल तर त्यावरही या प्रकारचे डॉक्टर उपचार करतात.
कार्डीओलॉजिस्ट – cardiologist
कार्डीओलॉजिस्ट (heart specialist) डॉक्टरांना मराठीमध्ये हृदय रोग तज्ञ म्हणटले जाते. या प्रकारचे डॉक्टर हृदय आणि त्यांच्या रक्तवाहिन्यांच्या उपचारावर लक्ष केंद्रित करतात ज्यामध्ये हृदय व रक्तवाहिन्या संबधी रोग आणि ऑपरेटिव्ह काळजी घेतली जाते. हे डॉक्टर रक्त दाब (blood pressure) हार्ट अट्याक (heart attack) या रोगांवरही उपचार करतात. रक्त चाचण्या एलेक्ट्रोफिजीयोलोजी चा अभ्यास तसेच कार्डीयाक इमेजिंग, इकोकार्डीओग्राम, ईसीजी या प्रकाच्या चाचण्या हे डॉक्टर करतात.
गायनकोलॉजिस्ट – gynecology
गायनकोलॉजिस्ट म्हणजे स्त्री रोग तज्ञ. हे डॉक्टर महिलांची आरोग्यावर (गर्भधारणा आणि मुलांचा जन्म) यावर उपचार करतात तसेच गर्भधारणा तपसणी, पेल्विक परीक्षा, डीसमोनोरिया, स्त्रीरोग विषयक कर्करोग आणि वंधत्व या रोगावर उपचार करतात.
ऑन्कोलॉजिस्ट – oncologist
ऑन्कोलॉजिस्ट या प्रकारच्या डॉक्टरांना मराठीमध्ये कर्क रोग तज्ञ म्हणतात. हे डॉक्टर कर्करोगावर उपचार करतात. त्याचबरोबर हे डॉक्टर किमोथेरपी ट्रिटमेंट, रेडीयेशन ऑन्कोलॉजिस्ट चाचण्या करतात आणि सर्जन्स सोबत काम करतात.
सायक्याट्रिस्ट – psychiatrist
सायक्याट्रिस्ट म्हणजे मनोचीकीस्तक जे आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेतात तसेच वैयक्तिक समुपदेशन करतात. यामध्ये भावनिक आणि वागणूक समस्यांचे उपचार केले जातात.
भारतातील पहिली महिला डॉक्टर माहिती – first doctor in india information in marathi
नाव | आनंदीबाई गोपाळराव जोशी |
जन्म | ३१ मार्च १८६५ |
जन्म ठिकाण | पुणे, महाराष्ट्र |
शिक्षण | एम.डी (doctor of medicine) |
प्रसिध्दी | भारतीय पहिली महिला डॉक्टर |
मूत्यू | २६ फेब्रुवारी १८८७ |
आनंदीबाई जोशी यांचे बालपण
आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ मध्ये पुण्यामध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव अमृतेश्वर जोशी होते. आनंदीबाई जोशी हि त्यांची जेष्ठ कन्या होती आणि त्यांनी तिचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. त्यांना वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना एक मुल झाले पण त्या बाळाला चांगले उपचार न मिळाल्यामुळे ते मुल जास्त दिवस जगू शकले नाही आणि त्यामुळेच आनंदीबाईंनी डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला.
आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षण कसे घेतले?
१८८३ मध्ये आनंदीबाईंनी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिलव्हानिया या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. आनंदीबाईंना डॉक्टर होण्यासाठी सर्व भारतीयांचा विरोध होता परंतु त्यांनी कोलकत्ता शहरामध्ये भाषण करून आपले विषय मांडले आणि लोकांचे मन वळवले त्यानंतर भारतीय लोक्कानी त्यांना आर्थिक मदतही केली. वेगवेगळ्या अडचणी पार करत कष्ठाने आणि जिद्दीने १८८६ मध्ये त्यांनी एम.डी ची पदवी मिळवली व त्या भारतामध्ये परत आल्या आणि कोल्हापूर मधील एडवर्ड दवाखान्यात स्त्री कक्षा सांभाळू लागल्या.
आम्ही दिलेल्या information on doctor in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर डॉक्टरांविषयी अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या doctor information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि doctor in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर essay on doctor in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट