कुत्र्याविषयी संपूर्ण माहिती Dog Information In Marathi

dog information in marathi कुत्रा हा एक लोकांना हवा हवा सा वाटणारा (लोकप्रिय) पाळीव प्राणी आहे, आणि तो विविध प्रकारे माणसांना मदत करतो व तो एक प्रामाणिक प्राणी आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. कुत्रा हा शिकार करण्यासाठी, बचावकार्य करण्यासाठी, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी किव्हा राखण करण्यासाठी अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात मदत करतो म्हणून तो माणसाचा चांगला मित्र आहे. कुत्रे हे त्यांच्या क्षेत्राबाबत खूप संवेदनशील व ज्या भागात ते माणसाळलेले असतात तिथे जर इतर कुत्र्यांचा प्रवेश किवा अनोळखी माणसांचा प्रवेश झाल्यास ते त्यांच्यावर भुंकतात, गुरगुरतात किवा अंगावर धावून जातात तसेच ते आपल्या घराची हि राखण करतात. या लेखाचा वापर आपण कुत्र्याविषयी (dog essay in marathi) निबंध लिहिण्यासाठी देखील करू शकता.

dog-information-in-marathi
कुत्र्याबद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये
अनुक्रमणिका hide

कुत्र्याची शारीरिक रचना व वैशिष्ठ्ये Dog Informtion In Marathi  (Dog’s Anatomy and Features)

कुत्र्याला चार पाय, दोन डोळे, दोन मोठे व तीक्ष्ण कान, एक तोंड व एक तीक्ष्ण नाक असते. तीक्ष्ण नाक आणि कान असल्यामुळेच कुत्र्याची वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता अतिशय उत्तम असते. त्याचबरोबर कुत्र्याला धार धार दात असतात आणि ते विषारी हि असतात तसेच कुत्र्यांना पुढील पायाला पाच तर मागील पायाला चार नखे असतात. पण काही कुत्र्यांना त्यापेक्षा जास्ती नखे असू शकतात. जास्त नखे असणारे कुत्रे जास्त चतुर असतात असे समजले जाते.

वैशिष्ठ्ये (Features)
कुत्रा हा असा प्राणी आहे जो २४ मीटर अंतरावरील आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो.
वास घेण्याची क्षमता हि उत्तम असते.
कुत्रा ताशी १९ मैल पळू शकतो.
त्याचबरोबर कुत्रा चांगले पोहू हि शकतो.

कुत्र्यासाठीचा आहार (Diet)

कुत्रा हा सर्व प्रकारचे आहार ग्रहण म्हणजेच मांस, मासे, दुध व इतर कोणतेही पदार्थ जे सर्वसामान्य लोक खातात. काही कुत्रे पूर्णपणे मांसाहारी अन्न ग्रहण करणारे असतात व ते जास्त आक्रमक पण असतात आणि काही कुत्रे शाकाहारी अन्न हि ग्रहण करतात.
पण आत्ताच्या आधुनिक जीवनशैलीच्या प्रभावामुळे कुत्र्यांचे मालक आपल्या कुत्र्यांना हि पोष्टीक आणि अनुकूल आहार मिळावा म्हणून बाजारातून विकत आणलेले प्रोटीन युक्त आहार आपल्या कुत्र्यांना खाऊ घालतात आणि तेथे बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या कुत्र्यांचे आहार उत्पादन करतात.

काही भारतीय कंपन्या ज्या कुत्र्यांचे आहार तयार करतात (Indian Companies who Produces Dog Feed) 

पेडिग्री (pedigree) , रॉयल कॅनीन (royal canin), आर्डेन ग्रेंज(arden grange), फार्मिना एन & डी (farmin N&D), वाग & लव (wag & love).

कुत्र्यांचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात केला जातो? (Area’s Where Dog Used)

कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र आहे व तो माणसांना वेगवेगळ्या क्षेत्रात मदत करत असतो. कुत्र्यांची वास घेण्याची, ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण असते तसेच तो चांगला धावू शकतो आणि याच चांगल्या गुणांचा वापर माणसे वेगवेगळ्या क्षेत्रात करून घेतात.

1. मार्गदर्शन करण्यासाठी (Guide Purpose)

काही कुत्रे आंधळ्या तसेच आजारी किवा जखमी व्यक्तींना मार्गदर्शन करतात तसे प्रशिक्षण दिलेले असते. जेव्हा पहिले महायुध्द झाले तेव्हा काही सैनिक जखमी व आंधळे झाले तेव्हा कुत्र्यांनी आपले कार्य केले होते. पहिल्या महायुद्ध नंतर कुत्र्यांना प्रशिक्षण देणारी शाळा पहिल्यांदा जर्मन मध्ये स्थापण झाली.

2. थेरपी करण्यासाठी (Therapy Purpose)

काही कुत्र्यांचा वापर थेरपी डॉग म्हणून केला जातो तसेच कुत्रा आपला मानसिक तणाव कमी करतो. रक्तदाब किवा हृदयरोग आदींनी पिडीत असणाऱ्या लोकांना कसे हाताळायचे याचे त्यांना प्रशिक्षण दिलेले असते व अशाच प्रशिक्षित कुत्र्यांना थेरपी डॉग म्हणतात.

3. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी (Investigation Of Crime)

पोलीस स्टेशन, देशाची सीमा आणि विमानतळा मध्ये गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग केला जातो. ड्रग्स, स्पोटके, काही विशिष्ट पदार्थ, पैसे किवा माणूस अगदी सहज पणे शोधून काढतात तसे त्यांना प्रशिक्षण दिलेले असते.

4. अभिनय क्षेत्रामधे (Acting Film Area)

काही कुत्र्यांचा वापर अभिनय करण्यासाठी हि करून घेतला जातो. आपण बघितलेच आहेत कुत्र्यान वरती किती तरी चित्रपट आहेत आणि कुत्रा चित्रपटा मध्ये अभिनय करून आपल्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. कुत्र्यांना अभिनयाचे प्रशिक्षण दिलेले असते.

5. युध्द क्षेत्रामधे (Battlefiled)

खूप प्राचीन काळापासून कृत्र्यांचा वापर युध्दामध्ये केला जातो. युध्दामध्ये बॉम्ब शोधण्यासाठी कुत्र्यांचा वापर केला जातो आणि त्यांना त्यांचे ९८ % यश मिळतेच.

6. बचाव कार्य करण्यासाठी (Rescue Field)

काही कुत्रे गंभीर आपत्तीच्या ठिकाणी जावून वासावर हरवलेल्या माणसांना शोधून काढतात किवा बचाव करतात. शिकारी करण्या साठी काही कुत्र्यांचा वापर शिकार करण्यासाठी हि होतो. हे कुत्रे खूप प्रभावी आणि अक्रमक असतात .

विदेशी कुत्र्यांच्या विविध जाती (Different Types Of Dog)

जगभरात ४०० हून अधिक जाती आहेत कुत्र्यांच्या आणि त्यामधील काही लोकप्रिय आहेत तर काही जाती नामशेष होत चालल्या आहेत. डॉबरमॅन, लॅब्रेडोर, जर्मन शेपर्ड, बुलडॉग, गोल्डन रिट्रीव्हर, पोमेरेनियन ह्या काही प्रसिध्द कुत्र्यांच्या जाती आहेत.
विदेशी कुत्र्यांच्या जाती 5 लोकप्रिय कुत्र्यांच्या जाती

1. लॅब्रेडोर (labrador dog information in Marathi)

लॅब्रेडोर हि एक कुत्र्यांमधील प्रसिध्द जात आहे. लॅब्रेडोर प्रेमळ, कार्यक्षम, शांत, बुध्दिमान, सभ्य एक चांगला सोबती आणि सगळ्यांना भुरळ पाडणारा असा असतो. हा कुत्रा आकाराने मोठा असतो व त्याचे आयुष्य १० ते १२ वर्ष इतके असते. काही ठिकाणी लॅब्रेडोर हे थेरपी डॉग म्हणून वापरले जातात तर काही ठिकाणी त्यांचा वापर खेळामध्ये किवा शिकार करण्यासाठी हि होतो.

2. डॉबरमॅन (dobarman dog information in Marathi)

डॉबरमॅन हि एक जर्मन कुत्र्याची जात आहे आणि हा कुत्रा आपल्या घराची राखण चांगल्या प्रकारे करू शकतो. हा कुत्रा निर्भय, आज्ञाधारक, हुशार, दक्ष, निष्टावंत, बुध्दिमान आणि अति सक्रीय कुत्रा आहे. त्यांची वाढ खूप कमी वेगाने होते व ते पहिले तीन चार वर्ष कुत्र्याच्या पिल्लासारखेच असतात. या कुत्र्यांना प्रशिक्षण देणे खूप सोपे असते कारण ते पटकन शिकतात. काही लोकांना डॉबरमॅन हा कुत्रा संरक्षनाच्या हवा असतो तर काहींना घराची राखण करण्यासाठी हवा असतो. ए कुत्र्यांचे आयुष्य १० ते १३ वर्ष इतके असते.

3. जर्मन शेपर्ड (german shepherd dog information in Marathi)

जर्मन शेपर्ड या कुत्र्याची उत्पत्ती जर्मन मध्ये झाली. जर्मन शेपर्ड ह्या जातीचे कुत्रे आकाराने मोठे ,सामर्थ्यवान आणि आक्रमक हि असतात. त्यांचे आक्रमक वर्तन टाळण्यासाठी त्यांना लहानपाणिपासूनच प्रशिक्षण दिले पाहिजे तसेच त्यांना आज्ञाधारक पनाचे हि प्रशिक्षण दिले पाहिजे. ह्या जातीचे कुत्रे खूप शूर, दक्ष, जिज्ञासू आणि हुशार असतात. त्यांना रोज व्यायामाची गरज असते नाही तर ते उच्चशक्ती बनू शकतात (त्यांची आक्रमक वृत्ती नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना रोज व्यायाम हा आवश्यक असतो). जर्मन शेपर्ड चे आयुष्य १० ते १३ वर्ष इतके असते.

4. गोल्डन रिट्रीव्हर ( golden retriever dog information in Marathi)

गोल्डन रिट्रीव्हर हि अमेरिकेतील एक लोकप्रिय जात आहे . हे कुत्रे हुशार, दयाळू, बुद्धिमान आणि सहनशील वृत्तीचे असतात आणि याच सहनशील वृत्तीमुळे लोक त्यांना आपला कौटुंबिक पाळीव प्राणी म्हणून पसंत करतात. त्यांची बुद्धिमत्ता चांगली असल्यामुळे ते अतिशय कार्यक्षम असतात. गोल्डन रिट्रीव्हर चा वापर पाठलाग करण्यासाठी , शिकार करण्यासाठी किवा थेरपी डॉग म्हणून करतात तसेच हा कुत्रा क्रीडापटू म्हणून हि आपले कार्य बजावतो.

5. बुलडॉग ( bulldog information in Marathi)

बुलडॉग हा एक कुत्र्याचा प्रकार आहे हा कुत्रा शक्तिशाली, विनम्र, दयाळू परंतु धैर्यवान, मैत्रीपूर्ण परंतु सन्माननीय असा असतो. बुलडॉग चा वापर बुलबाईटिंग नावाच्या रक्तरंजित खेळामध्ये भाग घेण्यासाठी केला जातो. बुलडॉग चे आयुष्य ८ ते १२ वर्ष असते.

इतर काही कुत्रांच्या जाती

1. पग (pug information in Marathi)

पग जात हि एक खूप जुनी चायनीज जात आहे पण हि कुत्र्यान ची जात अजून हि लोकप्रिय आहे . ह्या जातीचे कुत्रे खेळाडू वृत्तीचे आणि माणसांच्या मध्ये लगेच मिसळणारे असतात. हि कुत्री आकाराने लहान असतात पण त्यांच्या तोंडाचा आकार थोडा मोठा असतो. ते जास्त आक्रमक नसतात त्यामुळे ते चांगले गार्ड डॉग होवू शकत नाहीत पण ते चांगले फॅमिली डॉग असतो. त्यांना रोज चालायची आणि व्यायामाची गरज असते जर त्यांचा रोज व्यायाम नाही झाला तर त्यांचे वजन वाढते. त्यांचे आयुष्य ८ ते १५ वर्ष इतके असते.

2. कुकर स्पनिअल (cocker spaniel information in marathi)

कुकर स्पनिअल हा एक सुंदर, प्रेमळ, उत्साही आणि सक्रीय सहकारी कुत्रा आहे तसेच तो खेळाडू वृत्तीचा आणि आज्ञाधारक व एकनिष्ठ हि असतो.त्याचे कान मोठे व लोंबणारे असतात. ते उष्ण वातावरणामध्ये राहू शकतात आणि त्यांचे आयुष्य १२ ते १५ वर्ष असते.

3. सबेरीअन हस्की ( siberian husky information in marathi )

सबेरीअन हस्की हि रशियन जात आहे व त्या कुत्र्याचे आयुष्य १२ ते १४ इतके आहे. हा सभ्य , हुशार, दक्ष आणि मैत्रीपूर्ण असा कुत्रा आहे. तो काळा पांढरा, करडा पांढरा, लाल पांढरा किवा फक्त पांढऱ्या रंगामध्ये असतो. सबेरीअन हस्की या कुत्र्यांना रोज नियंत्रित व्यायामाची गरज असते.

4. रोटट्वेलर (Rottweiler information in marathi)

रोटट्वेलर हा हुशार, उत्साही, दक्ष, न घाबरणारा आणि एक चांगला संरक्षक असतो. रोटट्वेलर ह्या कुत्र्यांना रोटी (rottie) किवा रोट (rott) या नावांनीही बोलवले जाते. या कुत्र्यांचे आयुष्य ८ ते ११ इतके असते व ते आकाराने सुधा मोठे असतात.

5. बीगल (Beagle information in marathi)

बीगल हा कुत्रा मनमिळाऊ, जिज्ञासू , हुशार, सभ्य आणि निरोगी हाउंड डॉग आहे. हा एक शिकारी कुत्रा आहे आणि तो शिकारी असल्यामुळे हट्टी असतात. या कुत्र्यांना प्रशिक्षण देणे खूप सोपे असते कारण ते लगेच शिकतात. ह्या कुत्र्याचे आयुष्य १२ ते १४ वर्ष असते.

6. पिट बुल (pit bull information in marathi)

पिट बुल हा एक अमेरिकन कुत्र्याची जात आहे . हा कुत्रा चांगला साथीदार आणि फॅमिली डॉग आहे. ह्या कुत्र्यांचा वापर बचाव कार्यामध्ये केला जातो. हे कुत्रे फायटिंग डॉग म्हणून खूप चर्चेत आहेत. या कुत्र्याला पिटबुल टेरियर असे हि म्हटले जाते आणि हे कुत्रे लाल, काळा आणि करड्या रंगामध्ये असतात. त्यांचे आयुष्य ८ ते १५ वर्ष असते.

काही भारतीय कुत्र्यांच्या जाती (Types Of Dogs In India)

1. वाघ्या (waghya information in marathi)

वाघ्या हा कुत्रा मिश्र जातीचा कुत्रा आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराज्यांचा कुत्रा होता. जेव्हा शिवाजी महाराजांचे निधन झाले तेव्हा वाघ्या ने शिवाजी महाराज्यांच्या चिते मध्ये उडी घेवून आपले हि आयुष्य शिवाजी महाराज्यान सोबत संपवले म्हणून या वाघ्याला स्वामिनिष्ठ कुत्रा म्हणून ओळखले जाते तसेच रायगड किल्ल्यावर वाघ्या कुत्र्याची समाधी सुद्धा आहे. हा एकनिष्ठ ,प्रामाणिक आणि एक चांगला साथीदार होता. वाघ्या या कुत्र्याचे अस्तित्व आपल्याला कुठेही आढळत नाही.

2. राजापलयम (Rajapalayam information in marathi)

नावावरूनच समजते कि हि एक तमिळनाडू मधील जात आहे. या कुत्र्यांना पोलीगर शिकारी म्हणून हि ओळखले जाते. .ह्या कुत्र्यांची जाती भारतातल्या राजघराण्यात सहकारी आणि संरक्षक होते. या कुत्र्याला तमिळनाडूतील राजापलयम शहराचे नाव दिले आहे. हे कुत्रे आकाराने मोठे असतात तसेच त्यांना रोज व्यामाची हि गरज असते. या कुत्र्यांचे आयुष्य ९ ते १० वर्ष असते. हा कुत्रा पंधरा शुब्र, गुलाबी नाक, लांब पाय असे या कुत्र्याचे वर्णन आहे.

3. कॉम्बाई (kombai information in marathi)

कॉम्बाई हि सुद्धा एक तमिळनाडूतील प्रसिध्द आणि प्राचीन जात आहे त्याचबरोबर ते शिकारीसाठी प्रसिध्द आणि ते चांगले राखणदार(गार्ड डॉग) हि आहेत. हे कुत्रे जंगली बैल, डुक्कर व हरीण यांची शिकार उत्तम रित्या करतात.

4. मुधोळ हाउंड (mudhol hound information in marathi)

मुधोळ हाउंड या कुत्र्याला मराठा हाउंड किवा पश्मी हाउंड असे हि म्हटले जाते. हा कुत्रा उत्साही, आकर्षक, निरागस आणि निष्ठावंत असतो. हि एक कर्नाटक राज्यातील मुधोळ तालुक्यातील प्रजात आहे तसेच हा शिकारी कुत्रा असल्यामुळे त्याला मुधोळ हाउंड असे नाव देण्यात आले.

5. रामपूर ग्रेहाउंड (Rampur greyhound information in marathi)

रामपूर ग्रेहाउंड हि एक प्राचीन आणि दुर्मिळ कुत्र्याची जात आहे. रामपूर ग्रेहाउंड हे मध्यम आकाराचे असतात व त्यांचे सामर्थ्य आणि त्यांचा वेग या साठी ते प्रसिध्द आहेत त्याचबरोबर त्याची नजर हि खूप तीक्ष्ण असते. हे कुत्रे संरक्षनासाठी वापरले जातात. यांचे आयुष्य १४ ते १५ वर्ष इतके असते.

6. इंडिअन परिहा कुत्रा (indian pariah dog information in marathi)

आकाराने लहान असणारा इंडिअन परिहा हा चांगल्या प्रकारे घराची राखण करतो.हि एक जुनी कुत्र्याची प्रजात आहे आणि हि जात देश्याच्या प्रत्येक भागात आढळतात. ह्या जातीचे कुत्रे निष्टावंत, हुशार आणि संरक्षक असतात.

7. कन्नी ( kanni information in marathi)

कन्नी हि जात तमिळनाडू मधील एक प्रसिध्द जात आहे. ह्या जातीचे कुत्रे माणसाळलेले असतात व ते आपल्या मालकाशी हि खूप प्रामाणिक असतात. हा कुत्रा शक्यतो काळा रंगा मध्ये असतो.

कुत्र्यांना होणारे रोग (Common Diseases of Dogs)

1. रेबीज (Rabies)

रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे तो कुत्र्यांना होते आणि जर रेबीज झालेला कुत्रा जर माणसाला चावला तर रेबीज हा रोग माणसांना हि होतो. हा रोग मेंदूवर आणि पाठीच्या कना यावर प्रभाव करतो.

2. हार्टवर्म (heartworm)

हार्टवर्म हा कुत्र्यांना होणारा आजार आहे. हा एक परजीवी जंतू आहे जो संक्रमित प्राण्यांच्या हृदयात आणि फुफ्फुसांच्या धामाण्यामध्ये राहतो. एका कुत्र्यामध्ये पाच ते सहा वर्ष १०० किडे राहू शकतात.

3. पार्वोव्हारस (parvovirus)

पार्वोव्हारस हा एक अत्यंत विषारी जंतू आहे आणि हा संक्रामक विषाणूजन्य आजार आहे. हा एक भयानक विषाणू आहे जो जीव घेवू शकतो.

4. इयर माइट्स (ear mites)

जर कुत्रा आपले डोके किवा कान सारखे हलवत असेल किवा खानजळत असेल तर त्या कुत्र्याला इयर माइट्स हा रोग झालेला असतो आणि तो कमी सुद्धा करता येतो.

कुत्र्यांबद्दल काही तथ्य (Facts Of Dogs)

कुत्र्याचे चेहऱ्यावरील भाव व त्याच्या हालचाली आपल्याला की सांगतात,

 • जर कुत्रा भुंकत असेल तर तो आक्रमक असतो.
 • जर तो शेपूट हलवत असेल तर तो मैत्रीपूर्ण असतो.
 • कुत्रा जीभ बाहेर काढून ओठांवर फिरवत असेल तर तो एक तर दुखी असतो किवा आनंदी असतो.
 • कुत्र्याने जीभ बाहेर काढली असेल आणि त्याचे कान पाठीमागे असतील तर तो कुत्रा depression मध्ये असतो.
 • जर कुत्र्याने आपली शेपूट आपल्या पाठीमागच्या दोन पायांच्या मधी घेतली असेल आणि त्याची मान खाली असेल तर तो घाबरलेला असतो.
 • काही कुत्र्यांची शेपूट एकदम सरळ आणि कान पाठीमागे असतील आणि ते भुंकत असतील तर त्यांना दुसरी कुत्री किवा अनोळखी व्यक्ती त्यांच्या area मध्ये आलेली आवडत नाही.
 • जर आपला कुत्रा आपल्याशी eye contact करत असेल तर तो आपल्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
 • जर कुत्र्याने आपली शेपूट आणि कान सरळ केली असेल तर तो सतर्क असतो.
 • जर कुत्र्याने जीभ बाहेर लटकत ठेवली असेल तर तो खूप आनंदी असतो.
 • कुत्रा जर तोंडातून खेळण किवा काठी घेवून तुमच्या कडे येत असेल आणि ते तुम्हाला देत असेल तर ते तुम्हाला खुश करण्यासाठी.
 • कुत्रा तुम्हाला चाटत असेल तर तो आपले प्रेम व्यक्त करत असतो.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर dog information in marathi म्हणजेच कुत्रा या प्राण्याबद्दल अजून माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या dog information in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि dog information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “कुत्र्याविषयी संपूर्ण माहिती Dog Information In Marathi”

 1. माझ्या कडे पाळीव कुत्रा आहे दोन्ही मुलींचे लग्न
  झाले आहे आणि माझ्या वयाच्या कारणाने त्याची देख भाल होत नाही मला त्याला surendar करा वयाचा आहे कृपया मार्गदर्शन द्यावे
  जात पामेरियान
  वय 7 वर्ष
  खाणे वेज आणि नॉन वेज
  इंजेक्शन time to time

  उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!