घरगुती हिंसाचार माहिती Domestic Violence Information in Marathi

domestic violence information in marathi घरगुती हिंसाचार माहिती, घरगुती हिंसा किंवा कौटुंबिक हिंसा हि घरगुती वातावरणामध्ये होते आणि हे एका कुटुंबातील व्यक्तीकडून कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीवर होतात आणि आज या लेखामध्ये खाली आपण घरगुती हिंसाचार म्हणजे काय आणि त्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. घरगुती हिंसेला कौटुंबिक हिंसा म्हणून देखील ओळखले जाते आणि हे कुटुंबातील एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर केली जाते. ज्यावेळी पिडीत आणि आणि गुन्हेगार या दोघांच्यामध्ये जवळचा संबध असतो.

त्यावेळी घरगुती हिंसा हा शब्द वापरला जातो आणि मोठ्या प्रमाणात एखाद्या घरामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीवर हिंसा होत असेल तर या साठी सरकारने कायदा देखील तयार केला आहे जेणेकरून त्या संबधित पिडीत व्यक्तीला न्याय मिळू शकेल. घरगुती हिंसाचार हा काही नवीन नाही तर हा खूप पूर्वीपासून कुटुंबामध्ये होत आलेला आहे.

आणि त्यावर आळा घालण्यासाठी फेडरल व्हायोलंस अगेस्ट वूमन अॅक्ट हा कायदा १९९४ मध्ये संमत करण्यात आला आणि हा कायदा कौटुंबिक हिंसाचार संपवण्यासाठी भरीव निधी पुरवतो. चला तर खाली आपण कौटुंबिक किंवा घरगुती हिंसाचाराविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

domestic violence information in marathi
domestic violence information in marathi

घरगुती हिंसाचार माहिती – Domestic Violence Information in Marathi

घरगुती हिंसा म्हणजे काय – domestic violence meaning in marathi

घरगुती हिंसा म्हणजे हि कुटुंबामध्ये कुटुंबातील व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला त्रास दिला किंवा त्या व्यक्तीवर अत्याचार केला तर त्याला घरगुती हिंसाचार म्हणतात आणि त्या संबधित व्यक्तीला पिडीत एकटी म्हणतात. घरगुती हिंसा करणारा हा व्यक्ती कुटुंबामधील सदस्य, कौटुंबिक मित्र किंवा इतर नातेवाईक असतात.

घरगुती हिंसेचे बळी – victims

आपल्या भारतील काही कुटुंबामध्ये आज देखील मोठ्या प्रमाणात कौटुंबिक हिंसाचार होतो आणि हा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर होऊ शकतो म्हणजेच तो महिलांच्यावर, वृध्द लोकांच्यावर, पुरुष, मुले, मुलगी आणि कुटुंबातील कोणताही व्यक्ती या साठी बळी पडू शकतो. कौटुंबिक हिंसाचार हा समाजातील सर्व स्तरांच्यामध्ये आणि लोकसंख्या गटामध्ये होतो.

  • कुटुंबातील महिला.
  • कुटुंबातील वृध्द लोक.
  • कुटुंबातील मुलगी.
  • पुरुष.

घरगुती हिंसाचाराचे प्रकार – types

घरगुती किंवा कौटुंबिक हिंसाचाराचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

  • जोडीदाराकडून सर्व प्रकारचे गैरवर्तन ज्यामध्ये मानसिक अत्याचार आणि पाठलाग याचा समावेश होतो.
  • बाल शोषण.
  • सन्मान आधारित हिंसा जसे कि जबरदस्ती विवाह, ऑनर किलिंग या सारख्या अत्याचारांचा समावेश यामध्ये होतो.
  • वरिष्ठ गैरवर्तन.
  • ऑनलाईन आणि डिजिटल गैरवर्तन.

घरगुती हिंसेविषयी विशेष तथ्ये – facts

  • घरगुती हिंसाचाराचा बळी ह्या ८५ टक्के महिलाच बनतात म्हणजे कौटुंबिक हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात महिलांच्यावर होतो.
  • कायदेशीर काम, कायद्याची अंमलबजावणी, मानसिक आरोग्य उपचार आणि वैद्यकीय आरोग्य उपचार यामध्ये घरगुती हिंसाचाराचा खर्च हा दरवर्षी ३७ अब्ज डॉलर्सहून अधिक येतो.
  • घरातील कौटुंबिक अत्याचाराचे किंवा हिंसेचे साक्षीदार असणारी मुले हि मोठी झाल्यानंतर त्यांच्या स्वताच्या भागीदार आणि मुलांच्यावर अत्याचार करण्याची शक्यता २ ते ३ पटीने जास्त असते.
  • कौटुंबिक हिंसाचार हे स्त्रियांच्या दुखापतीचे एक प्रमुख आहे आणि याचे प्रमाण हे कार अपघात, बलात्कार आणि अपघात या पेक्षा जास्त आहे.
  • कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या घरगुती अत्याचाराच्या अहवालामध्ये शारीरिक हिंसा, लैंगिक हिंस आणि पाठलाग याचा समावेश आहे.
  • अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात महिलेवर हल्ला किंवा मारहाण केली जाते.
  • घरगुती हिंसाचार नियंत्रित वर्तनाचा एक नमुना आहे जो एक भागीदार दुसऱ्यावर सत्ता मिळवण्यासाठी वापरला जातो.
  • जगातील १/४ महिलांना त्यांच्या आयुष्यामध्ये घरगुती हिंसाचाराचा अनुभव येतो आणि २० ते २४ या वयोगटातील महिलांना कौटुंबिक हिंसाचाराचा बळी होण्याचा सर्वाधिक धोका असतो.
  • कौटुंबिक हिंसाचार असलेल्या घरामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना स्वता पिडीत किंवा अत्याचारी होण्याचा धोका असतो.
  • घरगुती हिंसाचाराची व्याप्ती हि सार्वजनिक आरोग्याची प्रमुख चिंता दर्शवते.
  • ४ पैकी एक महिला आणि ७ पैकी एक पुरुष त्यांच्या आयुष्यामध्ये जिवलग जोडीदाराकडून गंभीर अश्या शारीरिक हिंसा होतात.
  • घरगुती हिंसाचार हे अनेकदा धमक्या, शाब्दिक हल्ल्यापासून हिंसेपर्यत वाढतात.
  • स्त्रियांच्यावरील बहुतेक हिंसा वर्तमान किंवा पूर्वीचे पती किंवा जिवलग भागीदारांच्याकडून केली जाते.
  • घरगुती हिंसेला इंटीमेट पार्टनर हिंसा देखील म्हटले जाते.

कौटुंबिक हिंसेमध्ये शोषणाचे प्रकार

  • आर्थिक शोषण हे त्यावेळी घडते ज्यावेळी गैरवर्तन करणाऱ्या पीडीतेला आर्थिकदृष्ट्या अत्याचार करणाऱ्यावर अवलंबून राहण्यासाठी प्रयत्न करतो. यामध्ये त्या संबधित पीडीतेच्या वित्तपुरवठ्यावर नियंत्रण आणले जाते त्याच बरोबर क्रेडीट कार्ड रोखले जाते तसेच अनेक मुलभूत गरजा रोखल्या जातात.
  • मानसिक शोषना मध्ये त्या संबधी पिडीतेला वेगवेगळ्या प्रकारच्या भयानक अश्या धमक्या देऊन पीडीतेला मानसिक त्रास दिला जातो.
  • सामान्य वर्तनामध्ये पिडीतेचे अनुसरण करणे, त्रास देणे, पिडीतेच्या घरी किंवा कामावर दिसणे, माहिती गोळा करणे , फोन कॉल करणे, हेरगिरी करणे या सारखे वर्तन समाविष्ट असते.
  • लैगिक शोषण हे त्यावेळी होते ज्यावेळी अत्याचारी पिडीतेला संमतीशिवाय लैंगिक संपर्क किंवा लैंगिक वर्तन करण्यास भाग पाडते.
  • शारीरिक शोषणामध्ये त्या संबधित पिडीतेला मारणे. धक्काबुक्की करणे, केस ओढणे, कापणे, मुक्का मारणे या सारख्या वर्तनाचा समावेश होतो. शारीरिक शोषण हे एखाद्याला वैद्यकीय उपचार नाकारणे, एकद्यावर अंमली पदार्थ वापरण्यास भाग पाडणे असे स्वरूप असू शकते.

आम्ही दिलेल्या domestic violence information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर घरगुती हिंसाचार माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या domestic violence meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about domestic violence in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये domestic violence act in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!