डी पी क्रॉस कोंबडी माहिती DP Cross Hen Information in Marathi

dp cross hen information in marathi डी पी क्रॉस कोंबडी माहिती, सध्या आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या पाहतो आणि त्यामधी डीपी क्रॉस हेन देखील एक कोंबडीचा प्रकार आहे आणि आज आपण या लेखामध्ये डीपी क्रॉस हेन विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. डीपी क्रॉस हा एक कोंबडीचा प्रकार आहे आणि डीपी क्रॉसची पिल्ले एक बहुरंगी मध्यम वजनाचा एक कोंबडीचा प्रकार आहे. जो कौटुंबिक कुक्कुट उत्पादनासाठी गावातील परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकतो.

तसेच हे स्थानिक पातळीवर उपलब्ध खाद्य घटकांच्या किमान पूरकतेसह मुक्त श्रेणी संगोपनासाठी अनुकूल आहे. डीपी क्रॉस या प्रकारातील कोंबड्या ह्या अंडी उत्पादनासाठी देखील चांगल्या आहेत आणि मांसासाठी देखील उत्तम प्रकार आहे.

त्यामुळे या प्रकारच्या कोंबड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात पालन होते कारण ह्या मांसासाठी देखील उत्तम असल्यामुळे या कोंबडीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि या प्रकारच्या कोंबड्यांचे मांस हे बाजारामध्ये १२० ते १६० रुपये किलो आहे.

डीपी क्रॉस हा कोंबड्यांचा प्रकार एक सामान्य प्रकार आहे कारण जे लोक कुक्कुट चा व्यवसाय करू इच्छितात अश्या लोकांना डीपी क्रॉस हा एक चांगला पर्याय आहे. कारण त्यामुळे त्यांचा हा कुक्कुट पालनाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. चला तर खाली आपण डीपी क्रॉसया कोंबड्यांच्या प्रकाराविषयी अधिक सविस्तर माहिती घेवूया.

dp cross hen information in marathi
dp cross hen information in marathi

डी पी क्रॉस कोंबडी माहिती – DP Cross Hen Information in Marathi

डीपी क्रॉस कोंबडी म्हणजे काय ?

डीपी क्रॉस हा कोंबडीचा प्रकार बहुरंगीय आणि गोवाराण जातीमध्ये आढळते आणि या प्रकारच्या पाळीव कोंबड्यांचा वापर कुक्कुटपालनासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. अंडी किंवा मांस उत्पादनासाठी डीपी क्रॉस या प्रकारच्या कोंबड्या ह्या उत्तम आहेत.

डीपी क्रॉस कोंबड्यांचे वैशिष्ट्ये – features

 • डीपी क्रॉस कोंबड्या ह्या आपल्या इतर गावठी कोंबड्यांच्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगामध्ये पहायला मिळतात.
 • आपल्याला माहित आहे कि कोंबडीचे मांस हे खाण्यासाठी खूप लोकप्रिय आहे अनेकजन वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्यांचे मांस खातात आणि डीपी क्रॉस कोंबडीचे मांस देखील लोकांना खाण्यायोग्य असते आणि या कोंबडीचे मांस  हे ७५ टक्के मिळू शकते आणि २५ टक्के हे वेस्ट जाते.
 • गावठी कोंबडीच्या तुलनेने डीपी क्रॉस ह्या कोंबड्या वर्षभरामध्ये साधारणपणे १५० ते १७० अंडी घालतात.
 • डीपी क्रॉस या कोंबड्यांच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती हि चांगली असते.
 • डीपी क्रॉस या प्रकारच्या कोंबड्यांचा वयात येण्याचा कालावधी हा १६० ते १६६ इतका असतो.

डीपी क्रॉस कोंबड्यांचे अन्न – food

खाद्य घटकांचे वर्गीकरण प्रथिने, तेल, तृणधान्य, खनिजे आणि इतर खाद्य पदार्थ आणि विविध कच्चा माल जसे कि मुळे आणि कंदांमध्ये केले जाते. पोल्ट्रीसाठी आधुनिक फीडमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य आणि प्रथिने पूरक आहार जसे कि सोयाबीन तेल, खनिज पूरक आणि जीवनसत्व पूरक असतात.

डीपी क्रॉस कोंबडी विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • ३ महिने पूर्ण झालेल्या डीपी क्रॉस कोंबडीचे मांस हे बाजारामध्ये १८५ रुपये किलोने विकले जाते.
 • डीपी क्रॉसची पिल्ले एक बहुरंगी मध्यम वजनाचा एक कोंबडीचा प्रकार आहे जो कौटुंबिक कुक्कुट उत्पादनासाठी गावातील परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकतो.
 • डीपी क्रॉस या प्रकारच्या कोंबड्यांना प्रथिनेयुक्त आणि खनिजेयुक्त अहार घातला जातो.
 • कुक्कुट पालन व्यवसायासाठी गावामध्ये डीपी क्रॉस हेन ह्या प्रकारच्या कोंबड्या अगदी उत्तम पर्याय आहेत.
 • या कोंबड्या वर्षामध्ये सरासरी १७० अंडी देवू शकते त्यामुळे जर कुक्कुट पालन करणाऱ्या व्यक्तीने जर त्या कोंबड्याची अंडी विकून जरी व्यवसाय केला तरी ते खूप फायद्याचे ठरते.
 • कोंबड्यांना योग्य ती उष्णता आणि प्रकाश मिळाल्यास त्यांची वाढ चांगली होण्यास मदत होते आणि त्यामुळे कोंबड्यांचे मरण्याचे प्रमाण हे कमी होण्यास मदत होते.
 • डीपी क्रॉस या प्रकारची कोंबडी हि मांस उत्पादाकांच्यासाठी एक चांगला पर्याय आहे आणि ह्या कोंबडीचे पिल्लू हे २० ते २५ रुपये प्रमाणे विकत घेता येते.
 • १२ ते २० दिवसांच्यानंतर या कोंबड्यांची चोच कापली पाहिजे कारण जर त्यांची धारधार चोच असेल तर त्या कोंबड्या एकमेकांना चोची मारून हानी पोहचवू शकतात.
 • हा कोंबड्यांचा प्रकारस्थानिक पातळीवर उपलब्ध खाद्य घटकांच्या किमान पूरकतेसह मुक्त श्रेणी संगोपनासाठी अनुकूल आहे.
 • महाराष्ट्र राज्यामध्ये कुक्कुट पालनासाठी ज्या कोंबड्या वापरल्या जातात त्या जास्त करून डीपी क्रॉस प्रकारातील असतात.
 • या प्रकारच्या कोंबडीचे कुक्कुट पालन करण्याचे कारण म्हणजे या कोंबडीचे मांस हे गावरान कोंबडी सारखे असते.
 • या कोंबडीचे वजन हे ४० दिवसानंतर १ किलो इतके होऊ शकते.
 • या कोंबड्यांचे अन्न हे आपल्याला बाजारामध्ये मिळू शकते आणि जर तुम्हाला खाद्य खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही मक्याचा भुसा, सुक्टीचा भुसा आणि तांदूळ या सारखे अन्न त्यांना देवू शकता.
 • डीपी क्रॉस च्या कोंबडीच्या अंड्यांचे वजन हे ४८ ते ५० ग्रॅम इतके असते आणि यांचा आकार देखील गावरान कोंबड्यांच्या आकारा इतका असतो.
 • डीपी क्रॉस या कोंबड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेश गवत देखील अन्न म्हणून खायला दिले जाऊ शकते.
 • डीपी क्रॉस या कोंबड्या आकाराने खूप मोठ्या देखील नसतात आणि खूप लहान देखील नसतात तर त्या मध्यम आकाराच्या असतात.

आम्ही दिलेल्या dp cross hen information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डी पी क्रॉस कोंबडी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dp cross chicken या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about dp cross hen in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!