डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi

dr babasaheb ambedkar information in marathi नमस्कार मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासरख्या झुंजार नेतृत्वाच जीवन हे निरनिराळ्या रोमांचक पैलूंनी भरलेल आहे. त्यांच्या जीवनाचे बऱ्याच टप्प्यातून आपल्याला बरीच काही शिकायला मिळते म्हणूनच त्यांना ज्ञानाचा अथांग महासागर असे म्हटले जाते. 14 एप्रिल हा दिवस दरवर्षी एक नव चैतन्य घेऊन संपुर्ण भारतात विराजमान होतो ,या दिवशी सारी सृष्टी तर तेच ओथंबून वाहत असतं, कारण याच दिवशी एका महामानवाने सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांच्या घरी 14 व्या रत्नाच्या स्वरूपात जन्म घेतला,आणि कोट्यावधी दलितांचा सुवर्णकाळ या पृथ्वीवर प्रकट झाला. हजार वर्षे अन्यायाचं जातिभेदाच्या शृंखलेत जखडलेल्या समाजाला हक्काचा आधार मिळाला. कारण हाच पूत्र तमाम दीनदलितांच्या उध्दारक ठरणार होता आणि गोरगरीब जनतेला स्वातंत्र्याचा हक्काचा मनमुराद श्वास घेता येणार होता.

dr babasaheb ambedkar information in marathi
dr babasaheb ambedkar information in marathi wikipedia

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती – dr babasaheb ambedkar information in marathi

नावडॉ. भिमराव रामजी आंबेडकर
जन्म14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) महू, इंदौर मध्यप्रदेश
साहित्यरचनारामचरितमानस, हनुमान चालीसा, दोहावली, इ.
आईभीमाबाई मुबारदकर
वडीलरामजी मालोजी सकपाळ
पत्नीपहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)

दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956)

मृत्यु6 डिसेंबर 1956 (Mahaparinirvan Diwas)

डॉ. आंबेडकरांचे शिक्षण

डॉक्टर बाबासाहेबांनीही जातीभेदाचे प्रखर चटके सहन करावे लागले होते. परंतु यातून मुक्ती म्हणायची तर आपण शिकले पाहिजे म्हणून डॉक्टर आंबेडकर यांनी शिक्षणाची कास धरली .सातारच्या प्राथमिक शाळेतच त्यांचे आंबेडकर हे नामकरण झाले होते. कधी व्हरांड्यात तर कधी खिडकीतून छोटा भिमराव शिकायचा वर्गात बसलेल्या सवर्ण मुलांच्या आधी वर्गाच्या बाहेर बसून भिमा गुरुजींच्या प्रश्नांना उत्तरे द्यायचा. तिथूनच त्यांच्या विद्वत्तेला चमकी येऊ लागली बाबासाहेब त्यावेळच्या जाती जाती या सारख्या प्रतिकूल परिस्थितीतही शिकले .अमेरिका ,इंग्लंड मध्ये देशात कोलंबिया केंब्रिज विद्यापीठांमध्ये प्रचंड ज्ञान प्राप्त करून मायदेशी परतले होते. आपल्या कोट्यवधि बांधवांच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्या जनतेला “शिका ,संघटित व्हा ,संघर्ष करा” असा मोलाचा सल्ला दिला. बाबासाहेबांनी घेतलेल्या शिक्षणात फार मोठी ताकद होती. ही ताकदच आपल्या समाजाला उकिरड्यातून वर काढेल असं बाबासाहेबांना वाटत होते.

डॉ आंबेडकर यांचे समाजकार्य – babasaheb ambedkar information in marathi

महान अर्थतज्ञ, ज्ञानाचा प्रकांडपंडित, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान दिलं आहे. 1890 ला महात्मा ज्योतिबा फुले यांचे दुर्दैवी निधन झालं आणि 1891 ला बाबासाहेबांचा जन्म झाला. महात्मा फुलेंनी पुण्यासारख्या सारस्वत ठिकाणी सवर्णांचा विरोध डावलून लोकांच्या दगडांचा मार खाऊन मुलींसाठी प्रथम शाळा सुरू केली मुलींना प्रथमच शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला परंतु पुढील शिक्षण घेऊन स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत याचं श्रेय डॉ. बाबासाहेबांना जात. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या प्रश्नाने स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडली. आज कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचे योगदान आहे त्याला सर्वस्वी बाबासाहेबच कारणीभूत ठरतात ही संपूर्ण भारतातील स्त्रियांना समजायला हवं किंबहुना त्यांनी याचा अभ्यास करायला हवा. डॉक्टर बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना गुरूस्थानी ठेवलं होतं म्हणूनच त्यांच्यानंतर त्यांचे उर्वरित कार्य डॉक्टर बाबांचे साहेबांकडे सोपवून ते गेले होते.

आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारखे मुखपत्र काढून आपल्या समाजाला प्रेरणा देण्याचं काम केलं होतं. उत्कृष्ट लेखन भाषेवर प्रभुत्व अतिशय मार्मिकपणे मांडलेले संपादकीय अग्रलेख यातूनच बाबासाहेबांची पत्रकारिता लक्षात घेतील डॉक्टर बाबासाहेब हे केवळ दलितांचेच नेते नव्हते तर ते सर्व हिंदुस्थानाची प्रेरणास्थान होते. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात केलेले कार्य फार महान होते की वर पाण्यासाठी संघर्ष करणारा सत्याग्रहाची पाठ धरणारा एकमेव पुरुष म्हणून डॉ. बाबासाहेबांच्या कडे पाहिले जात.

आज आपण देशातल्या अनेक संकटं कडे पाहिलं तर किवळ डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारांची पायमल्ली केलेली दिसते. डॉक्टर आंबेडकरांनी शेती व शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या होत्या देशावरचं दुष्काळाचे संकट ,शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सार रोखण्याचे ते उपाय होते. परंतु त्या वेळच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाने त्याची दखल घेतली नाही, त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले. डॉ. बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प ,सामुदायिक शेती सारखे उपक्रम सुचवले होते ,परंतु बाबासाहेबांसारख्या अस्पृश्य विचारांना डावलले होते . आज मात्र त्याचा प्रत्यय येतो, देशातले आणि उपक्रम हे बाबासाहेबांचे योगदान आहेत.

देशात धावणारी रेल्वे गाडी,विभिन्न जनतेतील दुरावा कमी व्हावा ,जातीभेद नष्ट व्हावा ,याच उद्देशांनी बाबासाहेबांनी भारतीय रेल्वेला प्रोत्साहन दिलं. म्हणूनच देशातील हजारो रेल्वे स्थानकात बाबासाहेबांच्या प्रतिमा तेजाने प्रकाशमय होताना दिसतात.

राज्यघटना आणि भारतीय रिझर्व्ह बँक

अनेक देशांचा अभ्यास करून स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य डॉ. आंबेडकरांनीच केलं. रात्रंदिवस सतत देशाचा आनंद देशातील जनतेचा विचार करुन दोन वर्ष अकरा महीने 18 दिवसात आपली राज्यघटना तयार झाली.आज देशातील सारे व्यवहार या राज्यघटनेवर चालतात याचा समस्त भारतीयांना अभिमान वाटला पाहिजे .विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप ,स्त्रियांसाठी बाळंतपणाची रजा ,कामाची आठ तास ,अशा अनेक विचारांची अंमलबजावणी बाबासाहेबांनी आपल्या घटनेत केली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या “प्रॉब्लेम ऑफ रुपी” या पुस्तकाच्या आधारे 1 अप्रील 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा फार मोठी आहे. हजारो पुस्तकं लिहून बाबासाहेबांनी ग्रंथ चळवळ भक्कम करण्याचे महान कार्य केलं.

डॉ आंबेडकर यांचे धर्मांतर

बाबासाहेबांनी उपभोगलेल्या जातीय चटक यातूनच आणि हिंदू धर्मातील अन्यायकारक प्रकारातून हिंदू धर्मात न करण्याचं ठरवलं होतं. नाशिकच्या येवला येथील सभेत डॉक्टर बाबा साहेबांनी “मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मरणार” नाही अशी गगनभेदी घोषणा केली. जवळ जवळ वीस वर्षे त्यांनी सर्व धर्मांचा मनःपूर्वक अभ्यास केला. जगभरातल्या तमाम घटनांचा मागोवा घेतला, अन 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर च्या पवित्र भूमीत आपल्या लाखो बांधवांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. भगवान गौतम बुद्धांच्या विचाराने बाबासाहेबांना भुरळ पाडली होती आणि संपूर्ण देश हा बौद्धमय करण्याचे स्वप्न बाळगूनच समाजसेवेचे व्रत त्यांनी हाती घेतलं होतं. परंतु त्यांचं ते स्वप्न अर्धवटच राहिलं.

अस्पृश्यांना सार्वजनिक मंदिरात प्रवेश नव्हता, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिता येत नव्हते म्हणूनच हजारो बांधवांसह महाडचे चवदार तळे अस्पृश्याना खुले केले. नाशिकचे काळाराम मंदिर ही सत्याग्रहाची प्रहार घेऊन खुले करण्यात आले, या सत्याग्रहात तून डॉ. आंबेडकर यांना आपल्या अनुयायांसह परिणामी लाठीमारही खावा लागला परंतु आपलं ध्येय त्यांनी पूर्ण केलेच.

बाबासाहेब आंबेडकर विचार

 

बाबासाहेब आंबेडकर पुस्तके

 

डॉ. भिमराव आंबेडकरांचा महानिर्वाण 

अशा प्रकारे सामाजिक आर्थिक राजकीय स्तरांवर समाज हितासाठी महत्वपूर्ण योगदान करत आपले आयुष्य वेचणाऱ्या महामानवाने 6 डिसेंबर 1956 रोजी या जगाचा निरोप घेतला.  तरीही जातीभेदाची मुळं अजूनही देशात पाहायला मिळतात डॉक्टर आंबेडकरांची ग्रंथसंपदा अंगी करून त्यांच्या विचारांचा ध्यास मनी बाळगून प्रत्येक भारतीयांनी दैनंदिन कार्य केलं तरच आपला देश महासत्ता होऊ शकतो हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरीखुरी आदरांजली ठरेल.

आम्ही दिलेल्या Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dr babasaheb ambedkar information in marathi in short या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर information about babasaheb ambedkar in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!