डीटीएल कोर्सची माहिती DTL Course Information in Marathi

dtl course information in marathi डीटीएल कोर्सची माहिती, सध्या भारतामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे आणि विद्यार्थी वेगवेगळे कोर्स करून आपले करिअर चांगले बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि अश्याच करियर चांगले बनवण्यासाठी धडपडत असणाऱ्या लोकांच्यासाठी डीटीएल (DTL) हा एक चांगला कोर्स आहे आणि डीटीएल या कोर्सचे पूर्ण स्वरूप डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ (diploma in taxation law) असे आहे आणि याला मराठीमध्ये कर आकारणी कायद्यातील डिप्लोमा म्हणून ओळखले जाते.

डीटीएल हा कोर्स ६ महिने ते एक वर्षापर्यंत आहे आणि हा एक प्रमाणपत्रावरील अभ्यासक्रम आहे. हा कोर्स करण्यासाठी तुम्ही पदवीधर असणे गरजेचे आहे आणि तुम्ही तुमची पदवी झाल्यानंतर डीटीएल हा कोर्स केला तर तुम्हाला नोकरी शोधताना नक्कीच या कोर्सचा वापर होईल.

या प्रकारचा कोणताही कोर्स करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची प्रवेश परीक्षा ध्यावी लागत नाही परंतु त्या संबधित विद्यार्थ्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करावे लागते किंवा मग त्याने कमीत कमी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ पर्यंतचे शिक्षण तरी चांगल्या मार्काने उतीर्ण केले असले पाहिजे.

या विभागामध्ये अनेक भिन्न प्रकारचे अभ्यासक्रम आहेत परंतु ते तीचेकेच महत्वाचे नाहीत पण डीटीएल कोर्सला करियरच्या लेखी खूप महत्व आहे. चला तर खाली आपण डीटीएल या कोर्स विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

dtl-course-information-in-marathi
dtl course information in marathi

डीटीएल कोर्सची माहिती – DTL Course Information in Marathi

कोर्सचे नावडीटीएल (DTL)
मराठी नावकर आकारणी कायद्यातील डिप्लोमा
पूर्ण स्वरूपडिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ (diploma in taxation law)
कोर्सचा कालावधी६ महिने ते १ वर्ष
पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे.

कर आकारणी कायदा डिप्लोमा करण्याचे फायदे

या कोर्समध्ये संपूर्ण कर आकारणी कायद्याविषयी माहिती दिलेली असते आणि जात पदवी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला तर त्यांना अनेक फायदे होऊ शकतात. चला तर आपण खाली या कायद्याचे काय काय फायदे आहेत ते पाहूया.

  • कर आकारणी कायदा, कार्यपद्धती आणि धोरणांचे ज्ञान वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
  • कर आकारणी कायदा डिप्लोमा हा कोर्स कायद्यामधील नवीन संकल्पना आणि नवीनतम बदलांच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतो.
  • हा कोर्स केल्यामुळे त्या संबधित विद्यार्थ्याची रोजगार क्षमता वाढते आणि त्यांना कोर्पोरेट मध्ये नोकऱ्या मिळण्यास मदत होते तसेच ते स्वता कर सल्ला व्यवसाय म्हणून सुरु करू शकतात.
  • हा कोर्स केल्यानंतर तुम्ही सल्लागार, आयकर सल्लागार किंवा विक्रीकर सल्लागार म्हणून देखील काम करू शकता.
  • हे विद्यार्थ्यांना कर सल्लागार म्हणून काम करण्यासाठी, कर योजना सादर करण्यासाठी आणि विविध कर रिटर्न भरण्यासाठी तयार करते.

डीटीएल कोर्स करण्यासाठी असलेले पात्रता निकष – dtl course eligibility

कोणतेही शिक्षण घेण्यासाठी किंवा कोर्स करण्यासाठी त्या संबधित संस्थेने काही पात्रता निकष ठरवलेले असतात आणि ते पात्रता निकष त्या संबधित विद्यार्थ्याला पार पाडावे लागतात आणि तसेच डीटीएल हा कोर्से करण्यासाठी देखील काही पात्रता निकष पार पाडावे लागतात ते काय आहेत ते आपण खाली पाहूया.

  • त्या संबधित विद्यार्थ्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करावे लागते किंवा मग त्याने कमीत कमी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ पर्यंतचे शिक्षण तरी चांगल्या मार्काने उतीर्ण केले असले पाहिजे.
  • त्या संबधित विद्यार्थ्याने पदवी शिक्षणामध्ये किंवा १२ वी मध्ये कमीत कमी ५० ते ५४ टक्के गुण तरी मिळावले पाहिजेत.
  • त्यस संबधित विद्यार्थ्याचे वय हे १८ ते २३ पर्यंत असावे त्या पेक्षा कमी असू नये.

डीटीएलसाठी अर्ज कसा करावा ?

डीटीएल कोर्स कॉलेजमधील प्रवेशासाठी अर्ज विद्यापीठाच्या वेबसाईटवरून किंवा त्यांच्या प्रवेश कार्यालयाला भेट देऊन मिळू शकतो. कर प्रणाली कायद्यातील डिप्लोमासाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोर्ससाठी पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करणे आवश्यक आहे. मग त्यानंतर आवश्यक तो तपशील देऊन नोंदणी फोरम भरावा लागतो.

डीटीएल कोर्ससाठी अभ्यासक्रम – dtl course syllabus pdf

करा आकारणी कायद्याचा अभ्यासक्रम हा संस्थेनुसार बदलत असतो तरी देखील प्रत्येक संस्थेमध्ये काही कॉमन विषय असतात जे सारखेच असतात. चला तर खाली आपण डीटीएल कोर्सचा अभ्यासक्रम पाहूया.

अ.क्रअभ्यासक्रम किंवा विषय – dtl course subjects
 १केंद्रीय विक्रीकर कायद्याची ओळख
 २भांडवल नफा आणि दुय्यम स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना
 ३शेतीचे उत्पन्न
 ४रिअल इस्टेट मधील उत्पन्नाची गणना
 ५व्यवसाय आणि व्यवसायातील उत्पन्नाची गणना
 ६सेवा कराचे दायित्व
 ७केंद्रीय विक्रीकराची जबाबदारी
 ८विविध करपात्र सेवान्च्यासाठी सारांश
 ९सेवा कर कायद्याची ओळख

डीटीएल कोर्सेनंतर नोकरीच्या संधी – dtl course scope

  • टॅक्स प्रोफेशनल : क्लायंट टॅक्स स्टेटमेंट, टॅक्स रिटर्न, कर भरणा समायोजित करणे इत्यादी तयार करण्यास मदत होते.
  • वरिष्ठ कर सल्लागार : वरिष्ठ कर सल्लागार म्हणून काम करत असताना त्या संबधित व्यक्तीला क्लायंटला मदत करावी लागते तसेच क्लायंटच्या प्लॅनला सल्ला द्यावा लागतो आणि कर रिटर्न संकलित करावे लागतात.
  • कर विश्लेषक : मालमत्ता आणि व्यवसाय करांसाठी फोरम भरण्यासाठी कॉर्पोरेट आणि व्यक्तीशी संवाद साधावा लागतो.
  • प्राध्यापक : विद्यार्थ्यांना कर कायद्याचे विषय आणि विषयांचे ज्ञान देणे.
  • कर सल्ला : कॉर्पोरेट, व्यक्ती आणि इतरांच्या कर समस्यांचे निराकरण करणे हि या नोकरीची भूमिका असते.

FAQ

Q1. डीटीएल कोर्स काय आहे?

डीटीएल (DTL) हा एक चांगला कोर्स आहे आणि डीटीएल या कोर्सचे पूर्ण स्वरूप डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ (diploma in taxation law) असे आहे आणि याला मराठीमध्ये कर आकारणी कायद्यातील डिप्लोमा म्हणून ओळखले जाते.

Q2. DTL नंतर आपण काय करू शकतो?

टॅक्स प्रोफेशनल, वरिष्ठ कर सल्लागार, कर विश्लेषक, प्राध्यापक तसेच कर सल्लागार होऊ शकतो.

आम्ही दिलेल्या dtl course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डीटीएल कोर्सची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dtl course eligibility या dtl course syllabus pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about dtl course in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dtl course subject Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!