dudhsagar information in marathi दूधसागर धबधबा मराठी माहिती, भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आणि मोठे धबधबे आहेत आणि त्यामधील भारतामधील ५ व्या क्रमांकावर असणारा धबधबा म्हणजे दुधसागर धबधबा आणि आज आपण या लेखामध्ये दुधसागर धबधब्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. दुधसागर धबधबा हा एक भारतातील पाचव्या क्रमांकावर असणारा आणि भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांच्यापैकी एक असणारा धबधबा म्हणजे दुधसागर धबधबा आणि हा धबधबा गोवा या राज्यामध्ये आहे.
आणि राज्याची राजधानीचे शहर असलेल्या पणजी या शहरापासून हे लोकप्रिय पर्यटन स्थळ ६० किलो मीटर अंतरावर आहे आणि हे गोव्यातील आश्चर्यकारक ठीकानापैकी एक असून या धबधब्याचे पाणी हे १००० फुट पेक्षा जास्त उंचीवरून खाली पडते. हा चार स्तरीय धबधबा आहे आहे आणि सुमारे १०१५ फुट उंच आणि १०० फुट रुंद आहे.
दूधसागर धबधबा मराठी माहिती – Dudhsagar Information in Marathi
दुधसागर धबधब्याचा इतिहास – dudhsagar waterfall information in marathi
त्या ठिकाणी असणारे स्थानिक लोक हे या धबधब्याला वज्र सकला धबधबा म्हणतात परंतु बहुतेक लोक तांबडी सुर्ला महादेव मंदिरापासून सुरु होणाऱ्या पौराणिक कथेवरून या धबधब्याला तांबडी सुर्ला असे म्हणतात. या धबधब्याच्या विषयी असे म्हटले जाते कि हा धबधबा एक सुंदर राजकुमारीचे निवासस्थान होते.
आणि हि राजकन्या अंघोळ केल्यानंतर सोन्याच्या पिशवीतून दुध पीत होती आणि हे दुध पीत असताना तिला एक राजकुमार पाहत होता आणि म्हणून तिने पडदा तयार करण्यासाठी दुध ओतले आणि मग त्या ठिकाणी धबधबा निर्माण झाला आणि अश्या कथेवरून या धबधब्याचे नाव दुधसागर धबधबा असे पडले होते.
दुधसागर धबधब्याचे ठिकाण – place
दुधसागर धबधबा हा भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याचा एक भाग आहे आणि गोव्याच्या संगुएम तालुक्यामध्ये वसलेला आहे.
दुधसागर धबधब्याला कसे पोहचायचे – how to reach
दुधसागर धबधबा हा गोव्यातील भगवान महावीर वन्यजीव अभ्याराण्याजवळ पश्चिम घाटामध्ये वसलेला आहे. आणि आपण हा धबधबा पाहण्यासाठी अने वेगवेगळ्या मार्गांनी जावू शकतो आणि ते मार्ग कोणकोणते आहेत ते पाहूया.
रस्त्याने
दुधसागर धबधबा हा गोवा आणि कर्नाटक किनारपट्टी वर वसलेला आहे आणि आणि या धबधब्याला रस्ता मार्गाने जाऊन देखील भेट देता येते. जर तुम्ही पणजी-गोवा किंवा गोव्यातील इतर कोणत्याही ठिकाणाहून प्रवास करत असाल तर तुम्हाला हा धबधबा पाहण्यासाठी रस्त्याने जावे लागेल. गोवा-कर्नाटक सीमेवरील मोलेम या गावाजवळील भगवान महावीर अभयारण्याच्या प्रवेशापर्यंत आपल्याला गाडीने जाता येते.
रेल्वेने
जर आपल्याला दुधसागर धबधबा पाहण्यासाठी रेल्वेने जायचे असल्यास दररोज दोन गाड्या उपलब्ध आहेत. कुलेम आणि कॅसल रॉक हि धबधब्याजवळची रेल्वे स्थानके आहे आहेत आणि या रेल्वे स्थानकावर येवून तेथून भाड्याने टॅक्सी पकडून गोवा-कर्नाटक सीमेवरील मोलेम या गावाजवळील भगवान महावीर अभयारण्याच्या प्रवेशापर्यंत आपल्याला गाडीने जाता येते.
दुधसागर धबधब्याविषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts
- मांडोवा नदी हि पश्चिम घाटातून पणजीच्या दिशेने वाहते आणि अरबी समुद्राला मिळते आणि मांडवी नदीच्या या प्रवासासाठी दुधसागर धबधबा हा एक छोटासा थांबा आहे.
- दुधसागर धबधबा हा भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि हा भारतातील पाचव्या क्रमांकावरील मोठा धबधबा आहे आणि या धबधब्याची उंची १००० फुटापेक्षा जास्त आहे.
- हे गोव्यातील आश्चर्यकारक ठीकानापैकी एक असून या धबधब्याचे पाणी हे १००० फुट पेक्षा जास्त उंचीवरून खाली पडते.
- दुधसागर धबधबा हा ३ प्रवाही धबधबा आहे. सुंदर जंगलांनी वेढलेले जलतरण तलाव असलेल्या दुधाळ पाण्यामुळे या धबधब्याला दुधसागर असे नाव देण्यात आले आहे. जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल तर या ठिकाणाला भेट नक्की द्या.
- आपल्याला हा धबधबा ट्रेक करून पाहण्यासाठी जावा लागतो आणि त्यामुळे आपल्याला घनदाट जंगलातून जावे लागते आणि त्यामुळे जंगलामध्ये बरेच वन्यजीव पक्षी आणि प्राणी आहेत परंतु घाबरण्यासारखे काही नाही कारण या जंगलामध्ये कोणतेही धोकादायक प्राणी नाहीत.
- दुधसागर धबधब्याचा जागल प्रवास हा १२ किलो मीटर इतका आहे.
- दुधसागर धबधबा हा गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सिमेवार आहे.
- या धबधब्याच्या खाली निसर्ग तलाव तयार झाले आहेत. सामान्य दिवसात हा पूल ८ ते १५ फुट असतो आणि धबधब्याच्या पातळीच्या जोरावर ते हळू हळू वाढते.
- या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक तलावामध्ये पोहण्याची परवानगी आहे आणि या ठिकाणी पोहण्यासाठी काहीही वयाचे बंधन नाही.
- पूलमध्ये १०० टक्के शुध्द पाणी आणि पिण्यायोग्य पाणी आहे.
- या ठिकाणी या खोल तलावामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला या ठिकाणी पहायला मिळतात.
दुधसागर धबधबा या ठिकाणी करण्यासारख्या गोष्टी – what to do
- दुधसागर धबधबा ट्रेक : अनेकांना ट्रेकिंगची खूप आवड असते आणि ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणांच्यापैकी एक म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजे दुधसागर धबधबा आणि हे ठिकाण साहस प्रेमींना वाळवंट आणि नैसर्गिक सौंदर्य जवळून अनुभवण्याची संधी देतो कारण दुधसागर धबधब्याचा ट्रेक हा घनदाट आणि हिरव्यागार जंगलातून जातो.
- पोहणे : धबधब्यामुळे त्या ठिकाणी एक नैसर्गिक तलाव तयार झाला आहे आणि या ठिकाणी अनेक पर्यटक येतात आणि या तलावामध्ये पोहण्याचा आनंद घेतात आणि त्या ठिकाणी पोहणे हा एक सुखदायी आनंद आहे. शरद ऋतूच्या आसपासचे नैसर्गिक आकर्षण हे पर्यटकांच्यासाठी एक परिपूर्ण पिकनिक स्पॉट आहे.
- कॅम्पिंग : या ठिकाणी अनेक पर्यटक येतात आणि ते या ठिकाणी कॅम्पिंगचा देखील आनंद घेतात.
आम्ही दिलेल्या dudhsagar information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर दूधसागर धबधबा मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dudhsagar waterfall information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about dudhsagar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट