ई-श्रम कार्ड चे फायदे E Shram Card Benefits in Marathi

e shram card benefits in marathi – e shram card information in marathi ई-श्रम कार्ड चे फायदे, अनेकांना माहित नाही कि ई श्रम कार्ड म्हणजे काय आहे आणि ते कश्यासाठी वापरले जाते आणि म्हणूनच आज आपण या लेखामध्ये ई श्रम कार्ड विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत, चला तर आता आपण खाली ई श्रम कार्ड विषयी माहिती घेवूया. भारतामध्ये असंघटीत क्षेत्रामध्ये अनेक कामगार काम करत असतात आणि भारत सरकारने असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या नोंदीसाठी एक पोर्टल सुरु केले आहे.

आणि या ई श्रम या पोर्टलवर ते त्यांच्या श्रमाची नोंदणी करू शकतात तसेच अर्जाची स्थिती तपासू शकता आणि त्या मार्फत तुम्ही श्रम कराड देखील डाऊनलोड करू शकता. जर यामध्ये असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी जर नोंदनी केली तर त्यांना नवीन योजना आणि योजनांचे लाभ मिळू शकतील त्या साठी त्यांच्याकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचे असते.

ई श्रम कार्डची हि एक चांगली योजना भारत सरकारने २०२१ पासून असंघटीत क्षेत्रातील लोकांच्यासाठी सुरु केली आहे आणि या ई श्रम कार्डला श्रमिक कार्ड म्हणून देखील ओळखले जाते. या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट होणारी क्षेत्रे म्हणजे पोल्ट्री, मासेमारी, उद्योग, कृषी, बांधकाम आणि भारतातील इतर असंघटीत क्षेत्रे.

e shram card benefits in marathi
e shram card benefits in marathi

ई-श्रम कार्ड चे फायदे – E Shram Card Benefits in Marathi

योजनेचे नावई श्रम कार्ड योजना
कोणी सुरु केलीभारत सरकारने
केंव्हा सुरु केली२०२१ मध्ये
उदिष्टअसंघटीत कामगारांना पेन्शन आणि विमा देणे.
पेन्शन१००० ते ३००० प्रतिमहिना

ई श्रम कार्ड योजना काय आहे – e shram card information in marathi

भारतामध्ये असंघटीत क्षेत्रामध्ये अनेक कामगार काम करत असतात आणि भारत सरकारने असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या नोंदीसाठी एक पोर्टल सुरु केले आहे आणि या ई श्रम या पोर्टलवर ते त्यांच्या श्रमाची नोंदणी करू शकतात आणि या योजनेमध्ये कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्या कामगाराला योजनेचे लाभ मिळू शकतात.

ई श्रम कार्ड या योजनेचे मुख्य उदिष्ट – objective

ई श्रम कार्ड या योजनेचे मुख्य उदिष्ट हे असंघटीत क्षेत्रातील कामगारांना पेन्शन देणे आणि विमा प्रदान करणे आहे आणि या प्रकारची नोंदणी करणाऱ्या असंघटीत कामगाराला वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन दिले जाते आणि या पेन्षणाची रक्कम हि १००० ते ३००० इतकी असू शकते.

ई श्रम कार्ड योजनेसाठी पात्र होण्यासाठी असणारे पात्रता निकष – eiligibility

कोणत्याही योजनेसाठी पात्र होण्यासाठी किंवा त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या योजनेच्या समितीने ठरवलेले काही पात्रता निकष असतात आणि त्यासाठी आपल्याला ते पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच ई श्रम कार्ड योजनेसाठी पात्र होण्यासाठी देखील काही पात्रता निकष पार पाडावे लागतात ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूया.

 • जर एकाद्या व्यक्तीला ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तो संबधित व्यक्ती हा असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारा असला पाहिजे.
 • त्याचबरोबर या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तो संबधित व्यक्ती भारताचा नागरिक देखील असला पाहिजे.
 • तसेच ई श्रम कार्डसाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीचे वय हे १८ वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे.
 • त्याचबरोबर तो संबधित व्यक्ती हा करदाता नसावा.

ई श्रम धारकांना मिळणारे फायदे – e shram card benefits in marathi

 • जर एकाद्या व्यक्तीने ई श्रम या योजनेमध्ये आपली नोंदणी केली तर त्या व्यक्तीला ६० वर्षानंतर ३००० रुपये पेन्शन मिळू शकते तसेच त्या व्यक्तीचा ६० वर्षाच्या दरम्यान कोणताही अपघात झाल तर त्या साठी विमा उतरवला जातो.
 • जर एकाद्या व्यक्तीकडे ई श्रम कार्ड असेल तर भारत सरकारने कामगारांच्यासाठी चालवलेल्या सर्व योजनांच्या लाभ त्या व्यक्तीला घेता येऊ शकेल.
 • तसेच कोणतीही दुर्घटना घडल्यास लाभार्थी कामगारांना ५० हजार रुपयांचा विमा मिळू शकतो.

ई श्रम नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा – how to apply online

खाली आपण ई श्रम योजनेच्या नोंदणीसाठी कसा अर्ज करायचा या बद्दल माहिती घेणार आहोत.

 • कोणत्याही योजनेसाठी अर्ज करताना आपल्याला माहिती आहे कि त्या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते आणि तसेच ई श्रम नोंदणीसाठी देखील आपल्याला eshram.gov.in चं अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
 • आता तुम्ही या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला होमपेजवर नेले जाईल आता स्क्रीनवरील रजिस्टर फॉर श्रम कार्ड वर क्लिक करा.
 • आता तुम्हाला २ पर्याय दिसतील सीएससी नोंदणी आणि दुसरी स्व नोंदणी या मधील स्व नोंदणीवर ( self registration ) क्लिक करा.
 • आता तुमचा मोबीईल नंबर घाला आणि तुमच्या मोबीईल नंबरवर आलेला ओटीपी स्क्रीनवर इंटर करा.
 • मग आता तुमचा आधार कार्ड नंबर आणि आधार कार्ड नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.
 • आता तुमचे वैयक्तिक तपशील भरा तसेच तुमची बँक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे देखील सबमिट करा आणि शेवटी तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि अर्ज सबमिट करा.
 • शेवटी तुमचे ई श्रम कार्ड डाऊनलोड करा.

ई श्रम नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे – documents

खाली आपण ई श्रम ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात ते पाहूया.

 • आधार कार्ड (आवश्यक).
 • बँक खाते क्रमांक आणि बँक पासबुक.
 • सुरु असणारे व्यवसाय प्रमाणपत्र.
 • मोबईल नंबर.

आम्ही दिलेल्या e shram card information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ई-श्रम कार्ड चे फायदे मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या e shram card benefits in marathi या e shram card benefits marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि e shram card marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!