आयफेल टॉवर बद्दल माहिती Eiffel Tower Information in Marathi

eiffel tower information in marathi आयफेल टॉवर बद्दल माहिती, जगामध्ये अनेक अशी खूप प्रसिध्द, आकर्षक आणि सुंदर प्रेक्षणीय ठिकाणे आहेत आणि त्यामधील एक म्हणजे आयफेल टॉवर आणि आज आपण या लेखामध्ये आयफेल टॉवर विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आयफेल टॉवर हे पॅरीसमधील एक प्रसिध्द ठिकाणापैकी एक आहे आणि या टॉवरची निर्मिती १८८९ मध्ये करण्यात आली होती आणि सध्या हे ठिकाण जगातील सर्वात जास्त भेट दिलेले स्मारक म्हणून ओळखले आणि या ठिकाणावर दरवर्षी ७ दशलक्ष पेक्षा अधिक पर्यटक भेट देतात.

या प्रसिध्द आणि सुंदर ठिकाणाचे बांधकाम हे १८८७ मध्ये सुरु झाले होते आणि या टॉवरची रचना करण्यासाठी ५० अभियंते आणि डिझायनर नेमले होते तसेच या टॉवरच्या बांधकामासाठी १५० ते ३०० कामगार होते. आयफेल कंपनीतील २ मुख्य अभियंते एमिल नोगुएर आणि मॉरीस कोचलीन यांना १८८४ मध्ये उंच टॉवरची कल्पना सुचली होती आणि ती १८८९ मध्ये ती कल्पना प्रत्यक्षात उतरली.

eiffel tower information in marathi
eiffel tower information in marathi

आयफेल टॉवर बद्दल माहिती – Eiffel Tower Information in Marathi

आयफेल टॉवरचे बांधकाम

आयफेल टॉवरचे बांधकाम किंवा पहिले खोदकाम हे २६ जानेवारी १८८७ मध्ये सुरु केले होते आणि या टॉवरचे बांधकाम ३१ मार्च १८८९ मध्ये पूर्ण झाले म्हणजेच या टॉवरचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी २ वर्ष २ महिने आणि ५ दिवस लागले.

आयफेल टॉवर विषयी महत्वाची माहिती – information on eiffel tower in marathi

आयफेल टॉवर हे फ्रेंच भाषेतील ला टूर आयफेल हे पॅरीस प्रदर्शनाचे मुख्य प्रदर्शन किंवा प्रेक्षणीय स्थळ आहे आणि हे फ्रान्संच्या औद्योगिक पराक्रमाचे जगासमोर प्रदर्शन करण्यासाठी बांधण्यात आले आहे. हे प्रथम पॅरीसमधील कृप इमारत म्हणून जरी पहिले असले तरी सध्या ते फ्रांस देशातील पॅरीस या शहरातील मुख्य आकर्षण आणि जगप्रसिध्द ठिकाण आहे.

आयफेल टॉवर हि त्या काळातील एक अद्वितीय रचना होती आणि १९ व्या शतकामध्ये या रचनेसारखी कोणतीही रचना नव्हती. जर आपण आयफेलच्या बांधकामाविषयी पाहायचे म्हटले तर आयफेल टॉवर बांधताना १८ हजार तुकड्यांचा वापर केला होता.

आणि हे तुकडे आयफेलच्या कारखान्यात तयार केली होती आणि हा आयफेल टॉवर बांधण्यासाठी २.५ दशलक्ष थर्मली असेंबल रीव्हट्स आणि ७३०० टन लोखंडाची आवश्यकता होती. आयफेल टॉवर हा तयार केल्यापासून १८ वेळा रंगवण्यात आले आहेत.

आयफेल टॉवरविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • १८८९ च्या जागतिक मेळ्याचा केंद्रबिंदू म्हणून डिझाईन केलेले हे टॉवरफ्रेंच क्रांतीच्या शताब्दीच्या स्मरणार्थ आणि जागतिक मंचावर फ्रान्सच्या आधुनिक औद्योगिक पराक्रमाचे प्रदर्शन करण्यासाठी होते.
 • आयफेल टॉवर हा जागतिक मेळ्यादरम्यान फ्रान्सचे औद्योगिक पराक्रम दाखवण्याच्या उद्देशाने टॉवर बांधण्यात आला होता परंतु २० वर्षानंतर तो पाडण्याची योजना आखली होती.
 • आयफेल टॉवर हा आयफेल कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन अभियंत्यांनी बांधला आहे त्यामुळे त्याला आयफेल टॉवर असे नाव पडले आहे.
 • दुसऱ्या महायुध्दामध्ये आयफेल टॉवर हा नष्ट करण्याची योजना आखली होती परंतु त्यामधून देखील आयफेल टॉवर अखंडपणे वाचला.
 • या जगप्रसिध्द टॉवरमध्ये पोस्ट ऑफिस आणि थिएटर आहे.
 • या टॉवरची प्रचंड लोखंडी रचणा वारा प्रतिरोधक आहे आणि वादळाच्या वेळी जास्त वाऱ्यामुळे तो डोलतो असे म्हटले जाते.
 • आयफेल टॉवरचे रात्रीचे दृश्य हे विलक्षण असते आणि टॉवरच्या शीर्षस्थानी लंच किंवा डिनर देखील करता येतो कारण या ठिकाणी स्थानिक पाककृती देणारी बरीच रेस्टॉरंट आहेत.
 • आयफेल टॉवर हा चांगला आणि सुंदर दिसण्यासाठी दर सात वर्षांनी कामगार सुमारे ६० टन पेंट लावले जाते.
 • टॉवरचा पहिला शो म्हणजेच आधुनिक सजावटीचा शो हा १९२५ मध्ये झाला होता.
 • आयफेल टॉवर हा सुरुवातीला ३१२ मीटर उंचीचा होता आणि या टॉवरला एकूण ४ मजले आहेत परंतू सध्या या टॉवरची उंची ३२४ मीटर इतकी आहे.
 • आयफेल टॉवर हा अनेक कार्यक्रमांच्यासाठी प्रकाशित केला जातो.
 • या टॉवर १९६० पासून आंतरराष्ट्रीय पर्यटनाची मान्यता मिळाली होती.
 • या टॉवरच्या टोकाला पोहचल्या नंतर तो संबधित व्यक्ती जवळ जवळ पॅरीस हे शहर पूर्णपणे पाहू शकतो.
 • आयफेल टॉवरला आयर्न लेडी म्हणून देखील ओळखले जाते.
 • आयफेल टॉवर हा गुस्ताव्ह आयफेल याने बांधला नसून गुस्ताव्हा आयफेलच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन वरिष्ठ अभियंते मॉरिस कोचलीन आणि एमिल नोगुएर यांनी तयार केला आहे.
 • आयफेल टॉवरला ला डेम डे फेर किंवा आयर्न लेडी म्हणून ओळखले जाते कारण हे लोखंडापासून बनलेले आहे आणि याचे वजन ७००० टन पेक्षा जास्त आहे.
 • आयफेल टॉवरची ख्याती इतकी आहे कि हॉलीवूड आणि बॉलीवूड चित्रपटांच्यामध्ये देखील प्रदर्शित केले आहे.
 • आयफेल टॉवरला हा फ्रांसमधील देशातील सर्वात उंच इमारत असून हे पायऱ्यांच्या सहाय्याने चढावे लागते आणि हे चढण्यासाठी १६६५ पायऱ्या आहेत आणि पर्यटक दुसऱ्या मजल्या पर्यंत पायऱ्या चढून तेथून पुढे लिफ्टचा देखील वापर करू शकतात.

आयफेल टॉवर कुठे आहे ?

फ्रांस हा देश अनेक वेगवेगळ्या वास्तूकलांच्यासाठी तसेच अनेक स्मारकांच्यासाठी ओळखले जाते परंतु तेथील आयफेल टॉवरला एक वेगळीच ओळख आहे म्हणजेच हे जगप्रसिध्द स्मारकांच्यापैकी एक आहे आणि याला ला टूर डी म्हणून ओळखले जाते आणि हे पॅरीस शहराच्या मध्यभागी आणि सीन नदीच्या काठावर वसलेला आहे आणि त्यामुळे या टॉवरची सुंदरता आणखीन वाढते.

आम्ही दिलेल्या eiffel tower information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आयफेल टॉवर बद्दल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या eiffel tower paris information in marathi या eiffel tower paris information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about eiffel tower in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sajjangad satara information in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!