electrician iti information in marathi इलेक्ट्रिशियन आयटीआय माहिती, सध्या विद्यार्थी आपले करिअर चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स करतात आणि काही विद्यार्थी असे देखील असतात कि कमी खर्चामध्ये आपला चांगला कोर्स कसा होईल या साठी प्रयत्न करत असतात आणि अश्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक चांगला कोर्स म्हणजे इलेक्ट्रिशियन आयटीआय कोर्स (electrician iti course). इलेक्ट्रिशियन आयटीआय या कोर्सला इलेक्ट्रिकल कोर्स किंवा आयटीआय कोर्स म्हणून देखील ओळखले जाते.
आणि या कोर्समध्ये इलेक्ट्रिकल उपकरणे आणि इलेक्ट्रिकल वायरिंग आणि त्याच्या सुरक्षेसंबधित प्रशिक्षण या मध्ये दिले जाते म्हणजेच यामध्ये इलेक्ट्रिकवर चालणारे पंखे, फ्रीज, इलेक्ट्रिक मोटर्स, वॉशिंग मशीन आणि इतर अश्या अनेक इलेक्ट्रिक उपकरणांच्या विषयी यामध्ये ज्ञान दिले जाते.
इलेक्ट्रिशियन आयटीआय हा कोर्स २ वर्षाचा असतो आणि यामध्ये ४ सेमिस्टर असतात आणि हा कोर्स करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला १० किंवा १२ वी परायान्ताचे शिक्षण हे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उतीर्ण झालेले असले पाहिजे. हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याला ३००० ते २५००० इतकी फी असू शकते आणि या फीची रचना हि त्या संस्थेनुसार बदलू शकते. जर एखाद्या विद्यार्थ्याने हा २ वर्षाचा कोर्स केला तर त्या विद्यार्थ्याला सुरुवातीच्या काळामध्ये १०००० ते १२००० रुपये पगार मिळू शकतो.
इलेक्ट्रिशियन आयटीआय माहिती – Electrician ITI Information in Marathi
कोर्सचे नाव | इलेक्ट्रिशियन आयटीआय |
कोर्सचा कालावधी | २ वर्ष |
कोर्सची फी | ३००० ते २५००० पर्यंत किंवा संस्थेवर आधारित |
पात्रता | १० वी किंवा १२ वी उतीर्ण असणे |
इलेक्ट्रिशियन आयटीआय म्हणजे काय ?
यामध्ये विद्युत प्रवाह हाताळणे त्याचबरोबर वायर स्थापित करणे आणि राखणे, अनेक इलेक्ट्रिक सर्किटमध्ये वायरिंग जोडणे, सुरक्षा उपाय घेणे आणि बरेच काही यामध्ये सामील आहे.
इलेक्ट्रिशियन आयटीआय कोर्स करण्यासाठी पात्रता निकष – eiligibility
कोणताही शैक्षणिक कोर्स करण्यासाठी त्या संबधित संस्थेचे काही ठरवलेले पात्रता निकष असतात आणि तसेच इलेक्ट्रिशियन आयटीआय हा कोर्स करण्यासाठी देखील इच्छुक व्यक्तींना काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते आपण आता खाली पाहूया.
- जर एखाद्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिशियन आयटीआय हा कोर्स करायचा असल्यास त्या विद्यार्थ्याने कमीत कमी १० किंवा १२ वी चे शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून केलेले असले पाहिजे.
- त्या इच्छुक विद्यार्थ्याला १० मध्ये किंवा १२ वी मध्ये ५० टक्के किंवा ५० टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले असले पाहिजेत.
- जर एखाद्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिशियन आयटीआय हा कोर्स करायचा असल्यास त्याचे वय कमीत कमी १६ आणि जास्तीत जास्त ४० पर्यंत असले पाहिजे.
- त्या संबधित विद्यार्थ्याला थोडे तरी इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
इलेक्ट्रिशियन आयटीआय कोर्स फी – fee
इलेक्ट्रिशियन आयटीआय हा एक चांगला कोर्स आहे जो कमी खर्चामध्ये होऊ शकतो आणि या कोर्सची फी हि वेगवेगळ्या संस्थेनुसार बदलू शकते. या कोर्सची फी ५००० ते २५००० पर्यंत असेते आणि हि त्या संस्थेनुसार कमी जास्ती होते. सरकारी संस्थेमध्ये या कोर्सची फी हि १००० ते ५०००. पर्यंत इतकी असू शकते तर खाजगी संस्थांच्या मध्ये या कोर्सची फी हि ३००० ते २५००० पर्यंत असू शकते.
कोर्सचा कालावधी – duration
इलेक्ट्रिशियन आयटीआय हा कोर्स २ वर्षाचा असतो आणि यामध्ये ४ सेमिस्टर असतात आणि हे परीक्षेचे स्वरूप संस्थेनुसार बदलू शकते. जर हा कोर्स ४ सेमिस्टरने विभागला असला तर एका वर्षामध्ये ६ महिन्यांच्या गॅपने परीक्षा घेतली जाते म्हणजेच वर्षातून वेळा परीक्षा घेतली जाते.
इलेक्ट्रिशियन आयटीआय कोर्सचा अभ्यासक्रम – syllabus
इलेक्ट्रिशियन आयटीआय हा कोर्स २ वर्षाचा आहे आणि त्यामध्ये ४ सेमिस्टर असतात आणि या चार सेमिस्टर मध्ये अनेक वेगवेगळे विषय असतात. खाली आपण इलेक्ट्रिशियन आयटीआय या कोर्ससाठी असणारा अभ्यासक्रम पाहणार आहोत.
- पहिली सेमिस्टर : व्यवसाय सुरक्षा आणि आरोग्य, इलेक्ट्रिकल उपकरणे, अर्थिंग आणि मुलभूत इलेक्ट्रॉनिक्स, कंडक्टर आणि सेमीकंडक्टर, इन्सुलेटर आणि इलेक्ट्रिक केबल्स, अभियांत्रिकी रेखाचित्र, रेषा, अक्षरे, क्रमांक आणि भूमितीय आकृत्यांचे रेखाचित्र, इंग्रजी साक्षरता, शक्ती आणि उर्जा, व्यापार सुरक्षा आणि प्रथमोपचार, अल्टरनेटिंग करंट सर्किट, आर्थिक आणि सेमीकंडक्टर डायोड इत्यादी.
- दुसरी सेमिस्टर : ट्रान्झीस्टर अॅम्प्लीफायर्स, डायरेक्ट करंट जनरेटर, डायरेक्ट करंट मोटार, डिजिटल इलेक्ट्रोनिक्स आणि इलेक्ट्रिकल वायरिंग, स्केलचे बांधकाम, आकारमान सराव, फ्रीहँड स्केच आणि मोजमाप साधने, प्रोजेक्शन आणि रेखाचित्र तपशील, उद्योजकता कौशल्य, कामगार कल्याण कायदा आणि गुणवत्ता साधने, मुलभूत वीज, लिव्हर आणि साधी मशीन, इलेक्ट्रिकल मापन यंत्रे इत्यादी.
- तिसरी सेमिस्टर : ३ फेज इंजक्शन मोटार, एसी मशीन वायडिंग, हाऊस वायरिंग लेआऊट, औद्योगिक वायरिंग, सिंक्रोनस मोटार, सिंगल फेज इंजक्शन मोटर्स, इलेक्ट्रिकल वायरिंग आणि अर्थिंग, डीसी मशीनचे फ्रीहँड स्केच, वायडिंग आणि रिवाडिंग, अल्टरनेटिंग करंट मोटार.
- चौथी सेमिस्टर : मशीन कंट्रोल पॅनल, स्पीड कंट्रोल आणि मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रिक मशीन्स, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन, थ्री फेज इंजक्शन मोटार, नियंत्रण पॅनल, संख्या प्रणाली, अंदाज आणि खर्च, इलेक्ट्रिकल कंट्रोलिंग घटक, वेग नियंत्रण आणि उपकरणांची देखभाल इत्यादी.
इलेक्ट्रिशियन आयटीआय कोर्सनंतर नोकरी – job
इलेक्ट्रिशियन आयटीआय हा कोर्स केल्यानंतर त्या संबधित व्यक्तीला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात आणि हि व्यक्ती इलेक्ट्रिशियन म्हणून काम करू शकते किंवा त्या व्यक्तीला कोणत्याही इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये नोकरी लागू शकते त्याबरोबर त्या व्यक्तीला सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरी लागू शकते आणि या क्षेत्रामध्ये निकारी लागल्यानंतर त्या व्यक्तीला सुरुवातीला ८००० ते १२००० पर्यंत पगार मिळू शकतो. इलेक्ट्रिशियन आयटीआय कोर्स केल्यानंतर त्या व्यक्तीला वायरमन, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ आणि लाईनमन म्हणून नोकरी लागू शकते.
इलेक्ट्रिशियनसाठी आवश्यक कौशल्ये – skills
- जर त्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये काम करायचे असल्यास त्याच्याकडे इलेक्ट्रिकल विषयी चांगल्या प्रकारे माहिती असणे आवश्यक असते.
- त्याचबरोबर उमेदवारांना मुलभूत साधनांची माहिती आणि ती कशी वापरायची या बद्दल देखील माहिती असणे खूप आवश्यक असते.
- तसेच त्या संबधी उमेदवाराला सुरक्षा खबरदारी माहिती असणे देखील खूप आवश्यक असते.
- उमेदवारांना एसी आणि डीसी करंट विषयी माहिती असणे आवश्यक असते.
आम्ही दिलेल्या electrician iti information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर इलेक्ट्रिशियन आयटीआय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या iti electrician information in marathi या iti electrician trade information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about electrician iti in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट