राज्य कामगार विमा योजना ESIC Information in Marathi

ESIC Information in Marathi – ESIC Meaning in Marathi राज्य कामगार विमा योजना ईएसआयसी म्हणजे काय ? पार्श्वभूमी कामगार वर्गाला सामाजिक व आर्थिक सुरक्षितता पुरविण्यासाठी तयार केलेली बहुमुखी सामाजिक सुरक्षितता प्रणाली म्हणजेच भारतीय राज्य कामगार विमा योजना होय. राज्य कामगार विमा योजनेचे वैशिष्ट्य असे की, सामाजिक सुरक्षिततेचा लाभ हा प्रत्येकाच्या गरजेनुसार विमाधारकाना कोणताही भेदभाव न करता दिला जातो.

esic information in marathi
esic information in marathi

ईएसआयसी म्हणजे काय – ESIC Information in Marathi

ईएसआयसीचा अर्थ – ESIC full form in Marathi

ESIC Meaning in Marathi ईएसआयसी Employees State Insurance Schame चा इंग्रजी अर्थ हा “एम्प्लॉईस स्टेट्स इन्शुरन्स कॉर्पोशन” असा होतो, तर ईएसआयसीला मराठी मध्ये “राज्य कामगार विमा योजना” असे म्हणतात.

आजच्या काळात भारतामध्ये असे काही लोक आहेत, जे अजूनही गरीब जीवनशैलीमध्ये आपले जीवन जगत आहेत. या परिस्थितीमध्ये राज्य कामगार विमा योजनेचे गरीब लोकांसाठी काय योगदान आहे. जे लोक गरीब असल्याकारणाने योग्य उपचार पद्धती घेऊ शकत नाही अशा लोकांना ईएसआयसीच्या योजनेअंतर्गत मुक्त उपचार देण्यामध्ये साह्यय करते. ईएसआयसी या योजनेअंतर्गत लोकांना आरोग्य सुविधांसह इतर अनेक फायदे दिले जातात.

ईएसआयसी म्हणजे काय – ESIC Meaning in Marathi

ईएसआयसी ही एक सरकारची योजना आहे, जे ‘केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या‘ अंतर्गत चालविली जाते. यामध्ये सरकारी किंवा गैरसरकारी कंपनी आणि विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारीना आरोग्य विमा योजना दिली जाते. ज्या संस्थेमध्ये १० ते २० कर्मचारी किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणारा राज्य विमा योजना अधिनियमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे.

राज्य कामगार विमा योजना अधिनियम

राज्य कामगार विमा योजना अधिनियम १९४८ मध्ये मातृत्व, आजारपण, कायम स्वरूपाचे अपंगत्व किंवा तात्पुरता स्वरूपाचा याशिवाय सरकारी अथवा गैरसरकारी सेवेत कार्यरत असतांना होणाऱ्या इजेमुळे गंभीर दुखापत अथवा मृत्यू झाल्यास, त्यामुळे वेतनाच्या किंवा कमविण्याच्या क्षमतेत होणारी घट यातून कामगारांचे हितरक्षण करण्यासाठी तसेच त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सर्वसमावेशक अशी एक योजना असावी जी कर्मचाऱ्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सुरक्षितेची योजना असेल ती म्हणजे राज्य कामगार विमा योजना होय.

राज्य कामगार विमा योजना अधिनियमामध्ये कामगारांना वैद्यकीय देखभालीची हमी देण्यात येते. राज्य कामगार विमा योजना अधिनियम १९४८ चा आधार घेऊन केंद्र सरकारने राज्य कामगार विमा महामंडळाची स्थापना केली. कालांतराने ही योजना २४ फेब्रुवारी १९५२ रोजी प्रथम दिल्ली व कानपूर येथे त्यांची अंमलबजावणी करण्यात आली.

कामगार नुकसानभरपाई अधिनियम १९२३ मधील बंधनातून कामगारांना मुक्त केले. अधिनियमाने देण्यात आलेले लाभ हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी सुसंगत आहेत. याशिवाय मालकांना मातृत्व लाभ अधिनियम १९६१ इत्यादी.

राज्य कामगार विमा अधिनियम १९४८ अंतर्गत लागू करण्यात आलेली योजना ही आरोग्य विमा योजना आहे. सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम महाराष्ट्रात लागू करण्यात आली. सध्या राज्य कामगार विमा योजना ही १८ जिल्ह्यांमध्ये लागू आहे. एकत्र कुटुंब पद्धती ही नष्ट होत चालल्यामुळे तसेच औद्योगिकीकरण, व नागरीकरणामुळे आधुनिक काळात सुरक्षिततेची भावना मनुष्यात निर्माण झाली.

राज्य कामगार विमा योजना ही योजनांची मातृयोजना आहे. राज्य कामगार विमा योजनेची अंमलबजावणी केलेल्या क्षेत्रांमध्ये कामगारांना दोन पद्धतीने लाभ दिला जातो. एक वैद्यकीय आणि दुसरा रोख स्वरूपात. याशिवाय राज्य कामगार विमा योजनेमध्ये कर्मचारी तसेच कंपनी या दोघांच्या रक्कमेचं अंशदान असते याशिवाय ती रक्कम वेळोवेळी बदलत असते.

सध्या ईएसआयसीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ०.७५ टक्के अंशदान दिले जाते त्याचप्रमाणे कंपनीकडूनही ३.२५ टक्के अंशदान असते. दररोजचं वेतन १३७ रुपये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनातील योगदान द्यावं लागत नाही. म्हणजेच राज्य कामगार विमा योजनेच खर्च, राज्य विमा योजना आणि राज्य सरकार ७:१ ह्या प्रमाणात अंशदान करतात.

या योजने मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मर्यादा ठरवली जाते. यापूर्वी दि ०१ मे २०१० पासून वेतनाची मर्यादा रु १५०००/- इतकी होती. मात्र २०१६ मध्ये मासिक वेतन २१ हजार रुपये करण्यात आली. २१ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन असणाऱ्या कर्मचारीचा या योजनेंतर्गत समावेश होतो व ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ईएसआयसीचे कोणते फायदे आहेत – Esic Benefits in Marathi

​ईएसआयसी योजनेंतर्गत कर्मचारी व त्यांच्या परिवाराना वैद्यकिय सुविधेचा लाभ दिला जातो. तब्येत बिघडल्यास मोफत उपचारीची सुविधा मिळते. गंभीर आजार असल्यास तात्काळ खासगी रुग्णालयात पाठवले जाते आणि खासगी रुग्णालयात उपचार केला जातो व त्यांचा संपूर्ण खर्च राज्य कामगार विमा योजनेद्वारा केला जातो.

 • ​गंभीर आजाराने एखाद्या कर्मचारी नोकरी करण्यास सक्षम नसेल तर अशा कर्मचारीस ईएसआयसी कडून कर्मचाऱ्याला वेतनाच्या ७० टक्के रक्कम दिले जाईल.
 • ​काही कारणामुळे जर कर्मचारी हा अपंग झाल्यास त्याला वेतनाच्या ९० टक्के रक्कम दिली जाईल.
 • ​तसेच कायमस्वरुपी अपंगत्वावर आजीवन वेतनाच्या ९० टक्के दिली जाईल.
 • ​योजने अंतर्गत सर्दी, खोकला, ताप या सर्व आजारांवर मुक्त उपचार केला जातो. मात्र ईएसआयसीद्वारे सर्व प्रकारच्या आजारांवर हॉस्पिटल मध्ये उपचार केला जातो.एवढेच नसून राहण्याची तसेच जेवणाची देखील सोय केली जाते.
 • ​औद्योगिक किंवा व्यावसायिक जोखीमीमुळे मृत्यू पावणाऱ्या विमाधारक व्यक्तीवर अवलंबून असलेल्या परिवाराना अवलंबित्व लाभ या नावाने दर महिन्याला निवृत्ती वेतन दिले जाते.

महिलांसाठी तरतूद

विमाधारक महिला विविध प्रकारचे रोख लाभ मिळण्यास पात्र असते. या योजनेअंतर्गत महिलांना प्रसूती रजा दिली जाते. तसेच प्रसूती रजेसह ६ महिन्यांचं पगारही दिले जाते. त्याचप्रमाणे ६ महिन्यांचं वेतन राज्य कर्मचारी विमा योजनेकडून देण्यात येतं. जर काही कारणास्तव गर्भपात झाल्यास ६ आठवड्यांची सुट्टीही देण्यात येते.

उपचाराची प्रणाली

 • वैद्यकीय लाभाचे मोजमाप
 • ​विशेषज्ञांकडून तपासणी
 • ​निवृत्त व्यक्तींना लाभ
 • ​अधिवासी उपचार
 • ​एक्सरे सेवा
 • ​कृत्रिम पाय
 • ​विशेष तरतुदी इत्यादी

कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही राज्य कामगार विमा योजनेचा फायदा

जर एखाद्या कर्मचाराच्या मृत्यूनंतर त्यांचा परिवारातील सदस्यांना पेन्शन ही सुविधा लागू होते. तसेच ही सुविधा तीन भागामध्ये विभागले जाते.

 • पहिले कर्मचाऱ्याच्या पत्नीला
 • ​दुसरं मुलांना आणि
 • ​तिसरं कर्मचाऱ्याच्या आई-वडिलांना दिलं जाते.

नोंदणी कसे करावे – esic claim process in marathi

कंपनीकडून राज्य कामगार विमा योजनेसाठी रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी केली जाते. यासाठी नोंदणी करणाऱ्या कर्मचारीस परिवारातील सदस्यांची माहिती द्यावी लागते. त्याचप्रमाणे कंपनीला नॉमिनीचंही नाव देण्यात येते. राज्य कामगार विमा योजनेची सुविधा ही नोंदणीच्या ९ महिन्यांनंतर मिळण्यास प्रारंभ होते.

अंमलबजावणी

महाराष्ट्रात ही योजना नागपूर येथे ११.७.१९५४ रोजी, मुंबई व उपनगरात ३.१०.१९५४ ला व पुणे येथे १५.८.१९६५ अशी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात आली. सध्या आज

१८ जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच ही योजना ४४ केंद्रांमध्ये राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर १४ इस्पितळे आणि ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना अधिनियमाद्वारे कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहेत.

उपयोगिता

 • कलम २(१२) नुसार हे अधिनियम १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या क्षेत्रातील कंपन्यांना ही योजना लागू होते.
 • ​कलम १(५) नुसार ही योजना जेथे २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या क्षेत्रांमध्ये सर्व कामगारांना ही योजना लागू करण्यात आली आहे. उदाहरण चित्रपगृहे, दुकाने, उपाहारग्रह, हॉटेल, रस्ते मोटार परिवहन मंडळे तसेच वर्तमानपत्रांच्या आस्थापन इत्यादी. महाराष्ट्र शासनाने सुद्धा राज्य कामगार विमा योजना या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात लागू केली आहे.
 • ​कलम १(५) नुसार, ही योजना २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या खासगी वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रांना सुद्धा लागू करण्यात आलेली आहे आणि काही राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा राबविण्यात आली आहे.

आम्ही दिलेल्या esic information in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राज्य कामगार विमा योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या esic basic information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि esic meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये esic full form in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “राज्य कामगार विमा योजना ESIC Information in Marathi”

 1. ही योजना महाराष्ट्र मध्ये सप्टेंबर 1954 मध्ये का जुलै 1954 मध्ये लागू करण्यात आली,,,,,,एक जागी सप्टेंबर मध्ये आणि एक जागी जुलै मध्ये असे दिलेलं आहे इथे.

  उत्तर
 2. In uran taluka of navi mumbai, there are Gade,Palavi, Dake hospital and More, Giri Hospital for Children of these.Dake only takes 24 if he wants to be admitted.
  and why dont the rest say that ESIC dose not work in any Hospital. Runs ina Hospital(Private) in Panvel.
  Why not in Uran? Are the rules diffrent for Uran.
  Expect an answer as soon as possible

  Thank You
  Amit H Patil

  उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!