माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी Essay On Cat in Marathi

Essay On Cat in Marathi – My Favourite Animal Cat Essay in Marathi माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी मित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांच्या आवडत्या पाळीव प्राण्याबद्दल अर्थात मांजराबद्दल माहिती करून घेणार आहोत. खरंतर, मांजर हा मार्जार  प्रजातीतील एक मांसाहारी, भूचर आणि सस्तन जातीचा प्राणी आहे. याखेरीज, जगामधील बहुसंख्य  प्रदेशांमध्ये मांजराला पाळीव प्राणी म्हणून ओळखले  जाते. शिवाय, आपणा सर्वांना अगदी लहानपणापासून  माहीत आहे की मांजरीला वाघाची मावशी असेदेखील म्हटले जाते. विशेष म्हणजे अगदी सगळ्यांच्याच घरी खासकरून मांजर हा पाळीव प्राणी आपल्याला दिसून येतो.

मित्रहो, मांजरीचे अनेक प्रकार असतात. शिवाय, या प्राण्याचे विविधरंग देखील असतात. खरंतर, अनेक ठिकाणी बहुसंख्य मांजरांच्या सर्वांगावर जन्मतःच रेखाटलेले वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे पट्टे सुद्धा आपल्याला पहायला मिळतात. याशिवाय मित्रहो, मांजरीचे मुख्य भक्ष्य “उंदीर” हा प्राणी असून विविध पक्षी, इतर छोटे प्राणी, कीटक आणि दूध इत्यादी त्याचे आवडते खाद्य आहे.

essay on cat in marathi
essay on cat in marathi

माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी – Essay On Cat in Marathi

My Favourite Animal Essay in Marathi

याखेरीज, काही क्वचित मांजरे गवत अथवा रान देखील खाताना आपल्याला आढळून येतात. परंतू, मांजरांचे अशा प्रकारचे आचरण हे क्षुधापूर्तीसाठी नसते. कारण, मांजरांकडे पालेभाज्या, रान अथवा लहान रोपट्यांची पाने इत्यादी पचवण्याची अजिबात क्षमता नसते. त्यामुळे, जेंव्हा मांजर गवत खाते, तेंव्हा त्याच्या शरीरामध्ये वमन क्रिया सुरू होते आणि त्याच्या पोटातून गवतासोबत शरीराला अनावश्यक तसेच,  अपायकारक असणारे पदार्थ उलटीद्वारे बाहेर काढले जातात.

मित्रहो, मांजर हा असा एक पाळीव प्राणी आहे जो चारी दिशा लक्षात ठेवून, स्वतःच्या घरी बरोबर परत जातो. तसं पहायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की मानवी शरीरामध्ये साधारणतः एकूण २०६ इतकी हाडे असतात, पण दुसरीकडे मात्र मांजराच्या शरीरामध्ये जवळजवळ २८० इतकी हाडे असतात. मित्रहो, मांजर स्वतःच्या उंचीच्या जवळपास तीन पट एवढ्या उंचीवर उडी मारू शकतो आणि परत अगदी  सुरक्षित अवस्थेत जमिनीवर देखील येऊ शकतो.   

शिवाय, त्यांच्या स्वभाव गुणधर्मावर बोलायचं झालं तर मांजर हे प्राणी त्यांच्या जन्मापासूनच रागीट स्वभावाचे आणि भांडखोर वृत्तीचे असतात. याखेरीज, मांजराच्या स्त्रीलिंग जातीला मांजरीण असे म्हटले जाते आणि ती एकावेळी जास्तीत जास्त तीन ते पाच पिल्लांना जन्म देतं असते. खरंतर, मांजरींची शरीररचना ही इतर प्रजातींप्रमाणेच आढळून येते.

खासकरून, एक मजबूत तसेच लवचिक शरीर, द्रुत प्रतिक्षेप, तीक्ष्ण अथवा काटेरी दात आणि मागे घेतलेले लहान पंजे इत्यादी शरीररचना मांजराला लहान जीवांची शिकार करण्यासाठी खूप अनुकूल आहेत. तसेच, जन्मतःच त्यांच्यामध्ये रात्रीची तीक्ष्ण दृष्टी आणि गंध घेण्याची तीव्र क्षमता खूप चांगल्या पद्धतीने विकसित झालेली असते, त्यामुळे शिकार करण्यामध्ये त्यांना या गोष्टींची देखील खूप मदत होते.

मित्रहो, आपणा सर्वांनाच माहित आहे की मांजरीच्या बोलण्याच्या अथवा संवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये म्याव म्याव करणे, कंपयुक्त आवाज करणे, गुरगुरणे, फुसफुसणे, मोठ्याने कल्लोळ करणे इत्यादी प्रकार दिसून येतात. त्याचबरोबर, मांजरीच्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये विशिष्ट स्वरूपाच्या शारीरिक भाषेचा सुद्धा समावेश असतो. मित्रहो, मांजर जरी एक सामाजिक प्रजाती असली, तरी शिकार मात्र ती नेहमी एकटीच करते.

विशेषतः मांजर हा प्राणी मानवी कानांच्या तुलनेत अगदी अस्पष्ट, अत्यंत कमी अथवा खूपच जास्त अशा स्वरूपाचा आवाज ऐकू शकतो. त्यामुळे, उंदीर किंवा अन्य लहान आकाराच्या सस्तन प्राण्यांनी केलेले आवाज मांजर हा प्राणी अगदी सहजपणे ऐकू शकतो. याखेरीज, मांजर हा एक असा शिकारी पाळीव प्राणी आहे, जो साधारणतः पहाटेच्या वेळी आणि सायंकाळी सर्वात जास्त सक्रिय असतो.

याशिवाय, मादी पाळीव मांजरी या वसंत ऋतुच्या सुरुवातीपासून ते शरद ऋतूच्या शेवटीपर्यंत आपल्या पिल्लांना जन्म देत असतात. तसेच, वरील माहितीमध्ये आपण पाहिले की एकाच वेळी या मादी साधारणतः दोन ते पाच पिल्लांना जन्म देतात. ग्रामीण भागांमध्ये प्रत्येक घरी आपल्याला मांजर हा प्राणी आढळून येतो.

याचे मुख्य कारण म्हणजे गावांकडील भागांत धान्याची साठवणूक केली जाते, त्यामुळे तिथे कालांतराने उंदरांची पैदास तयार होते आणि ही पैदास कमी करण्यासाठी तिथे मांजर हा पाळीव प्राणी पाळला जातो.

शिवाय, घरगुती मांजरी विशेषतः “प्रजनन आणि नोंदणीकृत वंशावळ” यांसाठी दर्शविल्या जातात. पूर्वीपासून भारतासोबत अनेक देशांमध्ये मांजरी पाळणे हा छंद बनला होता, त्यामुळे खूप वर्षांपासून मांजरींच्या पैदासीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतू, यांमध्ये आलेल्या अपयशामुळे आज संपूर्ण जगभरातील मांजरींचे प्रमाण खूप मोठ्या संख्येने वाढू लागले आहे आणि याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या अस्तित्वावर होत आहे.

कारण, अनेक पक्षी मांजरांचे भक्ष्य असल्याने संपूर्ण जगातील कित्येक पक्षी नष्ट होण्यामागे पाळीव मांजरांचा चांगलाच हातभार लागत आहे. खरंतर, सुरुवातीच्या काळात अनेक वर्षे असा विचार केला जात होता की मांजरींचे पालनपोषण हे सुरुवातीला इजिप्त या देशामध्ये केले जात होते. कारण, प्राचीन इजिप्तमध्ये सापडलेल्या पुराव्यांनुसार मांजरींचे पूजन साधारणतः इसवी सन पूर्व ३१०० पासूनच केले जात होते हे समोर आले आहे.

तथापि, आफ्रिकन जंगली मांजर म्हणजेच एफ. लाइबिका याच्या शिकवणीचा प्रारंभिक पुरावा हा सायप्रस येथे मिळाला होता, जिथे एका मांजरीचा सांगाडा जवळपास इ. स. पु. ७५०० वर्षी नियोलिथिक कबर याला खोदकामातून सापडला होता. त्यामुळे, आफ्रिकन जंगली मांजरी या बहुतेक पूर्वेकडील भागांत सर्वप्रथम पाळल्या गेल्या असाव्यात असे मत मांडले गेले.

इसवी सन २०१७ पर्यंत घरांमध्ये पाळल्या जाणाऱ्या मांजरी या अमेरिका देशातील मालकीच्या पाळीव प्राण्यामध्ये, ताज्या पाण्यात पाळले जाणारे मासे यांच्यानंतर अगदी दुसऱ्या क्रमांकाच्या सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलेल्या पाळीव प्राणी होत्या.

कारण, जवळजवळ ९५ दशलक्ष इतक्या पाळीव मांजरींची मालकी ही अमेरिका देशातील लोकांकडे होती. इसवी सन २०१९ पर्यंत युनायटेड किंगडममध्ये सुमारे ७.३ दशलक्ष इतक्या संख्येच्या मांजरी या ४.८ दशलक्षाहून जास्त असलेल्या घरांमध्ये वास्तव्यास होत्या.

मित्रहो खरंतर, आपणा सर्वांना केवळ पाळीव मांजराबद्दल अधिक माहिती आहे. पण वास्तविकरीत्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये मांजराच्या अनेक प्रजाती आढळून येतात. यामध्ये, वाळवंटी मांजर हा प्राणी असून तो मार्जारकुळातील मानला जातो. मित्रहो, वाळवंटी मांजर हे पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी सहवास करते.

साधारणतः हे मांजर दिवसाच्या वेळी सावलीच्या ठिकाणी अथवा छोट्या गुहांमध्ये वास्तव्यास असते आणि फक्त रात्रीच्या वेळी आपले भक्ष्य मिळवण्यासाठी शिकारीला बाहेर पडते. सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी ऑलिगोसीन काळाच्या अखेरच्या टप्प्यात मांजराच्या कुळातील केवळ काही प्राणी अस्तित्वात होते आणि याचा पुरावा म्हणजे त्या काळात सापडलेले जीवाश्म अर्थात तेथील  शिळारूप अवशेष होय.

याखेरीज, मांजराच्या कुळातील सध्याचे प्राणी आणि जीवाश्म यांच्यामध्ये असलेले कमालीचे साम्य आपल्याला दिसून येते. मित्रहो, मांजर या प्राण्याला आपण कितीही प्रेमाने अथवा लाडाने वागवले, तरी मांजर हा प्राणी कधीही कुत्र्यासारखा इमानदार किंवा प्रामाणिक बनू शकत नाही. कारण, मुळातच त्याचा तो स्वभावधर्म नाही. परंतू, मांजर हे जन्मतःच अतिशय रागीट, बुद्धिमान आणि स्वातंत्र्यप्रिय अशा व्यक्तिमत्वाचे असते.

                        तेजल तानाजी पाटील

                           बागिलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या essay on cat in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite animal cat essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my favourite animal cat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on my favourite animal cat in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!