डोळ्याची माहिती Eye Information in Marathi

eye information in marathi – eye meaning in marathi डोळ्याची माहिती, आज आपण जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुंदरता आणि वेगवेगळ्या गोष्ठी पाहू शकतो हे फक्त डोळ्यांच्यामुळे पाहू शकतो आणि आज आपण या लेखामध्ये डोळ्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला माहित आहे हे डोळा हा एक पाच इंद्रियांपैकी असणारा एक शरीराचा अवयव आहे आणि डोळ्यांच्यामुळे आपण जगातील सर्व गोष्ठी पाहू शकतो तसेच असे देखील म्हणू शकतो कि डोळ्यांना प्रकाशाची जाणीव होते.

डोळा हा एक महत्वाचा संवेदी अवयवांच्यापैकी एक आहे आणि हा अवयव आपल्याला वस्तूचे दृश्यमान करण्यासाठी मदत करते तसेच रंग आणि खोली समजण्यास मदत करते आणि प्रकास समाज देण्यास देखील मदत करते त्यामुळे डोळे अवयव खूप मात्वाचा आहे.

हा अवयव कॅमेऱ्यासारखेच असतात म्हणजे ज्यावेळी बाहेरून प्रकाश येतो तेंव्हा ते आपल्याला वस्तू पाहण्यास मदत करतात. मानवी डोळा हा  २.३ सेमी व्यासाचा असतो आणि जवळजवळ काही द्रव्याने भरलेला गोलाकार गोळा असतो. खाली आपण डोळ्यांची रचना कशी असते आणि ते कसे कार्य करतात या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

eye information in marathi
eye information in marathi

डोळ्याची माहिती – Eye Information in Marathi

अवयवडोळे
कार्यरंग ओळखणे, खोली समजणे, वस्तूंचे दृश्यमान करणे
डोळ्यांचा व्यास२.३ सेमी
आकारगोलाकार

मानवी डोळ्यांची रचना कशी असते – structure

डोळा हा २.३ व्यासाचा गोलाकार आकाराचा असतो आणि त्याला वेगवेगळी आवरणे असतात जसे कि स्क्लेरा, कॉर्निया, बुबळ, बाहुली, लेन्स, ऑप्टिक नर्व्ह, शंकू, रॉड्स. खाली आपण या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

 • स्क्लेरा : स्क्लेरा हे डोळ्याचे बाह्य आवरण आहे आणि हे डोळ्याचे संरक्षक म्हणून काम करते आणि हे पांढऱ्या रंगाचे असते.
 • कॉर्निया : स्क्लेराच्या समोरच्या पारदर्शक भागाला कॉर्निया असे म्हणतात आणि बाहेरून प्रकाशाचा प्रवेश हा कॉर्निया द्वारे आतमध्ये होतो.
 • बुबळ : गडद स्नायू ऊतक आणि अंगठ्यासारखी असणारी रचनेला बुबळ म्हणून ओळखले जाते आणि हा कॉर्नियामागील एक भाग आहे. बुबळाचा रंग हा प्रत्यक्ष डोळ्याचा रंग दर्शवतो.
 • बाहुली : बुबळामध्ये एक लहान छिद्र असतेआणि त्याला बाहुली म्हणून ओळखले जाते आणि त्याचा आकार हा बुबळाच्या मदतीने नियंत्रित केला जातो. बाहुली हे डोळ्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करते.
 • डोळ्यातील पडदा : डोळ्यातील पडदा हा एक प्रकाश संवेदनशील ठार आहे ज्यामध्ये असंख्य चेतानापेशी असतात. आणि हे लेन्सद्वारे तयार केलेल्या प्रतिमांना विद्युत अवेगांमध्ये रुपांतरीत करते.
 • लेन्स : लेन्स हे बाहुलीच्या मागे असते आणि हि एक पारदर्शक रचना आहे. सिलीरी स्नायूच्या क्रियेद्वारे ते डोळ्यातील पडदा वर प्रकाश केंद्रित करण्यासाठी त्याचा आकार बदलतो.
 • ऑप्टिक नर्व्ह : ऑप्टिक नर्व्ह ह्या दोन प्रकारच्या असतात आणि यामध्ये शंकू आणि रॉड्सचा प्रकार असतो. शंकू हे मज्जातंतू पेशी असतात आणि जे तेजस्वी प्रकाशासाठी अधिक संवेदनशील असतात. तसेच रॉड्स ऑप्टिकल मज्जातंतू पेशी आहेत ज्या मंद दिव्याबद्दल अधिक संवेदनशील असतात आणि ते परीधीय दृष्टीस मदत करतात.

डोळ्यांच्या विषयी काही मनोरंजक तथ्ये – facts

 • आपले डोळे हे प्रत्येक सेकेंदाला ५० वेगवेगळ्या वस्तूंच्यावर लक्ष केंद्रित करू शकतात.
 • शार्क या माश्याच्या डोळ्याचा कॉर्निया हा जवळजवळ मानवी कॉर्नियासारखाच असतो आणि असे देखील आहे कि मानवी शस्त्रक्रियेमध्ये देखील वापरला गेला आहे.
 • मानवांचे कान आणि नाक या सारख्या शरीरातील इतर अवयवांची वाढ कधीच थांबत नसली तरी डोळ्यांचा आकार आयुष्यभर सारखाच राहतो.
 • आपले डोळे हे अंदाजे १० दशलक्ष वेगवेगळ्या रंगामध्ये फरक करू शकतात.
 • आपण पाहतो कि मनसे खूप डोळे मिचकतात आणि प्रत्येक वेळी डोळे मीचकण्याचा काळ हा एका सेकंदापेक्षा कमी काळ टिकतो आणि शास्त्रज्ञांनी असे सांगितले आहे कि सरासरी मनुष्य एका मिनिटाला १५ ते २० वेळा डोळे मिचकतो आणि ज्यावेळी तुमचे डोळे उघडे असतात त्यावेळी प्रत्येक तासामध्ये १००० वेळा डोळे मिचकले जातात.
 • मानवी डोळा सुमारे १० दशलक्ष रंगामधील सूक्ष्म फरक ओळखू शकतो. डोळ्यामध्ये रॉड नावाचे छोटे भाग आहेत जे आपल्याला हे रंग शोधण्यास मदत करतात आणि प्रत्येक डोळ्यामध्ये एकूण ६ दशलक्ष असतात.
 • मानवाचे ८० टक्के शिक्षण हे त्यांच्या डोळ्यांच्याद्वारे येते.
 • डोळ्याचे वजन हे २७ ग्रॅम इतके आहे आणि हे मानवी शरीरातील इतका हलका अवयव असला तरी देखील हा मानवी शरीरातील सर्वात दुसरे सर्वात जटील अवयव आहे.
 • सरसरू व्यक्ती एका मिनिटाला १२ वेळा डोळे मिचकते.
 • काही लोक हे रंगांधळे असतात म्हणजेच ते सरासरी माणसांच्याप्रमाणे रंगावर प्रक्रिया करू शकत नाहीत म्हणजेच त्यांना रंगामध्ये फरक जाणवत नाहीत.
 • ऑप्टिक नर्व्ह मध्ये १० लाख पेक्षा अधिक चेतापेशी असतात.
 • शास्त्रज्ञांच्या मते डोळे हे पहिल्यांदा ५०० दशलक्ष वर्षापूर्वी विकसित झाले होते.

दृष्टी कशी कार्य करते

प्रकाश हा आपल्याला पाहण्याची परवानगी देतो. हे कण एखाद्या वस्तूवर खाली चमकतात आणि त्यातून परावर्तीत होतात जेंव्हा ते परावर्तीत होतात तेंव्हा तुमच्या डोळ्याच्या कॉर्नियामध्ये प्रवेश करते आणि मग ते बाहुलीतून जाते आणि मग नंतर रेटीनावर प्रकाश केंद्रित करण्यासाठी लेन्स आकुंचन पावते किंवा आराम करते. बहिर्वक्र भिगामधून जाताना प्रकाश हा अपवार्तीत होतो आणि यामुळे रेटीनाला आदळणारी प्रतिमा हि आकाराने कमी होते आणि उलटे होते.

आम्ही दिलेल्या eye information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डोळ्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या eye meaning in marathi या human eye information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about eyes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!