फॅशन डिझाईन कोर्स माहिती Fashion Designer Course Information in Marathi

fashion designer course information in marathi – fashion designing course information in marathi फॅशन डिझाईन कोर्स माहिती, सध्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स हे शिक्षण क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करियरसाठी वेगवेगळे पर्याय देखील मिळाले आहेत पण त्यामधील असे काही कोर्स आहेत ज्यांना खूप महत्व आहे आणि त्यामधील एक कोर्स म्हणजे फॅशन डिझायनर कोर्स कारण या कोर्सला सध्या खूप महत्व आहे कारण आपण पाहतो कि सद्य लोकांना वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालणे खूप आवडत आहे आणि हे वेगवेगळ्या फॅशनचे कपडे हे फॅशन डिझायनर डिझाईन करत असतात.

फॅशन डिझाईन हा कोर्स इच्छित विद्यार्थी हा कोर्स बारावी नंतर करू शकतात ज्यामध्ये कपडे, पॅटर्ण डिझाईन, ट्रेंड आणि मॅन्युफॅक्चारिंग या वर लक्ष केंद्रित केले जाते म्हणजेच या कोर्समध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. बारावीनंतरच्या या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना फॅशन डिझाईनिंग सेमिनार, क्षेत्रीय अभ्यास, स्टुडीओ आधारित प्रकल्प तसेच प्रॅक्टीकल आणि कार्यशाळेमध्ये सहभागी होतात.

फॅशन डिझायनर या कोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशलायझेशन देखील असतात जसे कि कपड्यांचे डिझाईन, ज्वेलरी डिझाईन टेक्सटाइल डिझाईन, निटवेअर डिझाईन आणि फॅशन इलेक्ट्रेशन इत्यादी. काही जन या कोर्सचा डिप्लोमा करतात जो ३ वर्षाचा असतो तर काही या कोर्सची डिग्री करतात जी तीन ते चार वर्ष करावी लागते.

fashion designer course information in marathi

fashion designer course information in marathi

फॅशन डिझाईन कोर्स माहिती – Fashion Designer Course Information in Marathi

कोर्सचे नावफॅशन डिझायनर कोर्स
पातळीयुजी, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र
कालावधीडिप्लोमा १ ते ३ वर्ष आणि युजी ३ ते ४ वर्ष
अभ्यास क्रमकपड्यांचे डिझाईन, ज्वेलरी डिझाईन टेक्सटाइल डिझाईन, निटवेअर डिझाईन आणि फॅशन इलेक्ट्रेशन इत्यादी
कोर्सची फी४०००० हजार ते १ लाख पर्यंत

फॅशन डिझायनिंग म्हणजे काय ?

फॅशन डिझायनिंग म्हणजे कपड्यांचे वेगवेगळे नवीन, सर्वांच्यापेक्षा वेगळे आणि अनोखे डिझाईन तयार करणे. यामध्ये कच्चा माल व्यवस्थापन, आकार मापन, कपड्यांचे कोठार आणि साधने हे विषय फॅशन डिझायनिंगमधील अभ्यासाची साकळी आहे. फॅशन डिझाईन हा कोर्स इच्छित विद्यार्थी हा कोर्स बारावी नंतर करू शकतात ज्यामध्ये कपडे, पॅटर्ण डिझाईन, ट्रेंड आणि मॅन्युफॅक्चारिंग या वर लक्ष केंद्रित केले जाते.

फॅशन डिझायनिंग प्रवेश परीक्षा – entrance exam 

ज्या इच्छुक विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे अश्या विद्यार्थ्यांना सर्व प्रथम प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात आणि भारतातील टॉप फॅशन डिझायनिंग प्रवेश परीक्षा म्हणजे एनआयएफटी ( NIFT ), युइइडी (UEED) आणि एसइइसीडी (SEED) या महत्वाच्या प्रवेश परीक्षा आहेत तसेच काही इतर परीक्षा देखील आहेत. तसेच बीडीइएस (BDES) आणि बीएससी (BSC) आणि फॅशन डिझायनिंग डिप्लोमा प्रोग्राममध्ये प्रवेश देण्यासाठी या प्रवेश परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जातात.

बारावी नंतर फॅशन डिझायनिंग कोर्स का निवडावा ?

फॅशन डिझायनिंग हा कोर्स तुमच्या कल्पनेने जग अधिक सुंदर आणि मोहक दिसण्यासाठी तुमची कौशल्ये आणि ज्ञान सुधारण्याचा एक मार्ग आहे. ज्या इच्छुक विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंग हा कोर्स करायचा आहे अश्या विद्यार्थ्यांनी १२ वी नंतर या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणे गरजेचे असते.

  • या क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी हि खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या नोकरीची देखील चांगली संधी आहे आणि म्हणून हा कोर्स करीयरच्या दृष्टीने खूप चांगला कोर्स आहे.
  • फॅशन डिझायनिंग हा कोर्स कधीही टिकणारा करियर प्रकार आहे कारण फॅशनची मागणी कधीही कमी होत नाही म्हणून या कोर्समध्ये सुरक्षतेची भावना आहे.
  • एखाद्या नवीन व्यक्तीला त्याच्या कारीयाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मिळू शकणारे सरासरी वेतन सुमारे २ लाख ते ५ लाख पर्यंत असू शकते आणि हे आपल्या अनुभव आणि कौशल्यावर अवलंबून असते.

भारतामधील फॅशन डिझायनिंगचे प्रकार

फॅशन डिझायनिंग हा कोर्स स्तरावर केला जातो आणि युजी, पीजी आणि डिप्लोमा या स्तरांच्याआधारे हा विविध प्रकारे करता येतो आणि आता आपण खाली पदवी मध्ये कोणकोणते फॅशन डिझायनिंगचे प्रकार आहेत ते पाहणार आहोत.

प्रकार स्पेशलायझेशन
डिप्लोमा कोर्सफॅशन डिझाईन, फॅशन अॅक्सेसरीज, फॅशन इलेक्ट्रेशन, फॅशन मार्केटिंग, फॅशन कम्युनिकेशन, फॅशन व्यवस्थापन, फॅशन स्टाइलिंग आणि इमेज डिझायनिंग
पद्युत्तर पदवीसंप्रेषण डिझाईन, कापड व्यवस्थापन, रिटेल मॅनेजमेंट
बॅचलर पदवीफॅशन डिझायनिंग आणि व्यवसाय व्यवस्थापन, संप्रेषण डिझाईन, फॅशन डिझाईन, लेदर डिझाईन आणि ज्वेलरी डिझाईन.

फॅशन डिझायनिंगचे कोर्स ऑनलाईन कसा करायचा – fashion designing course information in marathi

ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकाचे इन्कम मिळवायचे असे किंवा फॅशन उद्योगाशी संबधित कौशल्ये शिकायची असतील तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी भारतातील प्रमाणपत्रासह फॅशन डिझायनिंग कोर्स हा फायदेशीर ठरू शकतो. ऑनलाईन कोर्स शिकण्यासाठी विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही.

  • या कोर्सचा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व प्रथम ऑनलाईन पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते.
  • विद्यार्थी एकतर विनामूल्य कोर्स निवडू शकतात किंवा त्यांच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस च्या ऑनलाईन शेवटी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी फी भरू शकतात.
  • मग त्यानंतर विद्यार्थ्याने योग्य अभ्यासक्रमाची नोंदणी खर्च भरणे आवश्यक असते आणि मग पुढे वर्ग वेळापत्रक आणि कालावधीसह पुढे जाणे आवश्यक आहे.
  • फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोडद्वारे सशुल्क तसेच विनामूल्य दोन्हीसाठी उपलब्ध आहेत.

फॅशन डिझायनिंगमधील करियर आणि नोकऱ्या

भारतामधील फॅशन उद्योग हा अब्जावधी लोकांच्या कपड्यांच्या गरजा पूर्ण करतात. भारत हा जगतील लोकसंखेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असणारा देश असल्याने भारतामध्ये कपडे आणि फॅशन परीधनांना चांगली मागणी आहे. जर तुमच्याकडे फॅशन डिझायनिंगच्या अनेक चांगली कौशल्य असतील तर या क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी अगणित नोकऱ्या आहेत. खाली आपण फॅशन डिझायनिंग केल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करियर करू शकतो ते पाहणार आहोत.

  • फॅशन डिझायनर.
  • फॅशन संकल्पना व्यवस्थापक.
  • फुटवेअर डिझायनर.
  • फॅशन शो आयोजक.
  • कॉस्च्युम डिझायनर.
  • फॅशन मार्केटर.
  • फॅशन सल्लागार.
  • तांत्रिक डिझायनर.

फॅशन डिझायनिंग कोर्स – course 

  • बॅचलर इन फॅशन डिझाईन ( BDes ).
  • डिप्लोमा इन फॅशन डिझाईन.
  • मास्टर इन फॅशन डिझाईन ( MDes ).
  • मास्टर इन फॅशन टेक्नोलॉजी ( MFM ).
  • मास्टर इन फॅशन मॅनेजमेंट ( MFTech ).

आम्ही दिलेल्या fashion designer course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर फॅशन डिझाईन कोर्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या fashion designing course information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “फॅशन डिझाईन कोर्स माहिती Fashion Designer Course Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!