मासे फ्राय रेसिपी मराठी Fish Fry Recipe in Marathi

Fish Fry Recipe in Marathi फिश फ्राई रेसिपी मराठी फिश फ्राय रेसिपी ही तोंडाला पाणी आणणारी आणि अतिशय मोहक तळलेली माशांची रेसिपी आहे जी गोड्या पाण्यातून शोधलेल्या ताज्या माशांच्या पासून बनवली जाते. हि रेसिपी बनवताना माशेंचे तुकडे वापरून बनवली जाते. ही सर्वोत्तम फिश फ्राय रेसिपी आहे ज्यामध्ये माशांच्या तुकड्यांना मसाला लावला जातो किंवा माशांचे तुकडे मॅरीनेट करून ते मऊ होईपर्यंत शॅलो फ्राय केले जातात. फिश फ्राय हि रेसिपी आपण स्टार्टर म्हणून खाऊ शकतो तसेच हि रेसिपी आपण जेवणामध्ये देखील खाऊ शकतो आणि हि रेसिपी नोन व्हेजिटेरियन लोकांच्या आवडत्या यादीतील एक लोकप्रिय दिश आहे.

चवदार, मसालेदार, तिखट आणि पूर्णपणे स्वादिष्ट अशी ही एक सोपी डिश आहे ज्यामध्ये फिश फिलेट्सला मसाले लावले जातात आणि नंतर कुरकुरीत होईपर्यंत तळलेले जातात. हि डिश एक आवडता पार्टी स्नॅक बनू शकते तसेच मसाला फिश फ्राय हे थंड पावसाळ्याच्या दिवसांसाठी एक उत्तम अन्न आहे.

फिश फ्राय हि रेसिपी खूप सोपी आणि कमी वेळेमध्ये बनणारी रेसिपी आहे म्हणून आज आपण या लेखामध्ये फिश फ्राय रेसिपी कशी बनवायची याविषयी पाहणार आहोत.

Fish Fry Recipe in Marathi
Fish Fry Recipe in Marathi

फिश फ्राई रेसिपी मराठी – Fish Fry Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ३० मिनिटे
तळण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ४५ मिनिटे
वाढणी३ ते ४ व्यक्ती

फिश फ्राय रेसिपी कशी बनवायची – How to Make Fish Fry Recipe in Marathi

फिश फ्राय हि रेसिपी नॉन व्हेजिटेरियन लोकांची यादीतील एक लोकप्रिय प्रकार आहे आणि फिश फ्राय हा अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे. हा पदार्थ समुद्र किनाऱ्याजवळपास असणाऱ्या गावांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जाणारा पदार्थ आहे आणि तेथील लोक हा पदार्थ आवर्जून खातात. फिश फ्राय हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा पदार्थ खूप कमी वेळेमध्ये बनतो. म्हणून आज या लेखामध्ये आपण फिश फ्राय रेसिपी कशी बनवतात आणि हे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत.

तयारीसाठी लागणारा वेळ३० मिनिटे
तळण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ४५ मिनिटे
वाढणी३ ते ४ व्यक्ती

फिश फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make fish fry recipe ) ( fish fry recipe in marathi 

फिश फ्राय हि स्वादिष्ट रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला ताजे फिश फिलेट्स लागतात तसेच फिश ला मसालेदार बनवण्यासाठी काही मसाल्यांची देखील गरज असते आणि हे सर्व साहित्य जरी घरामध्ये नसले तरी ते आपल्याला बाजारामधून अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकते. चला तर मग पाहूयात फिश फ्राय बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

मॅरीनेशनसाठी लागणारे साहित्य 

  • अर्धा किलो फिश फिलेट्स.
  • १ मोठा चमचा लाल तिखट.
  • १ मोठा चमचा आले लसून पेस्ट.
  • १/२ चमचा गरम मसाला पावडर.
  • १ चमचा हळद पावडर.
  • १/२ मोठा चमचा धने पावडर.
  • १ ते २ चमचा लिंबाचा रस.
  • ३ ते ४ चमचे पाणी.
  • मीठ ( चवीनुसार ).

कोटिंगसाठी लागणारे साहित्य

  • दीड मोठे चमचे तांदळाचे पीठ.
  • दीड मोठे चमचे बेसन.
  • १/२ चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा ओवा.
  • १/४ चमचा कसुरी मेथी.

गार्निशसाठी लागणारे साहित्य 

  • लिंबू
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

इतर साहित्य 

  • तळण्यासाठी तेल.

फिश फ्राय बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make fish fry recipe 

  • सर्वप्रथम फिश फिलेट्स चांगले स्वच्छ धुवून घ्या आणि ते मोठे मोठे कापा आणि थोड्या वेळेसाठी ते बाजूला ठेवा.
  • आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये १ मोठा चमचा लाल तिखट, १ मोठा चमचा आले लसून पेस्ट, १/२ चमचा गरम मसाला पावडर, १ चमचा हळद पावडर, १/२ मोठा चमचा धने पावडर, १ ते २ चमचा लिंबाचा रस, ३ ते ४ चमचे पाणी आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
  • मग त्यामध्ये फिश फिलेट्सचे तुकडे त्यामध्ये घाला आणि तो मसाला फिलेट्सला चांगला लावून घ्या आणि थोडा वेळ त्या मसाल्याने मसाज करा आणि ते १५ ते २० मिनिटे तसेच झाकून ठेवा.
  • आता एक मध्यम आकाराचा बाऊल घ्या आणि त्यामध्ये दीड मोठे चमचे तांदळाचे पीठ, दीड मोठे चमचे बेसन, १/२ चमचा लाल मिरची पावडर, १/२ चमचा ओवा, १/४ चमचा कसुरी मेथी आणि चिमुटभर मीठ टाकून ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून याचे बॅटर बनवून घ्या.
  • आता मॅरीनेट केलेले फिलेट्स पिठ्च्या बॅटर बुडवून ते चांगले कोट करा.
  • मग एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये मासे तळण्यासाठी आवश्यक तेवढे तेल घाला आणि ते गरम करा.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये पिठाच्या बॅटरमध्ये कोट केलेले फिश फिलेट्स घाला ( तेलामध्ये जितके फिश फिलेट्स मावतील तितके फिश फिलेट्स टाकून तळून घ्या तुम्ही बॅच मध्ये सर्व फिश फिलेट्स तळून घेवू शकता ).
  • अश्या प्रकारे सर्व फिलेट्स पिठामध्ये कोट करून ते तेलामध्ये चांगले कुरकुरीत आणि लालसर होईपर्यंत तळून घ्या.
  • आणि हे फ्राय केलेले फिश फिलेट्स लिंबू आणि कांद्यासोबत सर्व्ह करा.

फिश फ्राय आपण कश्या सोबत खाऊ शकतो – serving suggestions 

फिश फ्राय आपण भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करू शकतो आणि त्याचबरोबर आपण फिश फ्राय कांदा आणि लिंबू रस त्यावर स्प्रिंकल करून ते स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकतो.

अगदी उत्तम फिश फ्राय बनवण्यासाठी दिलेल्या टिप्स – tips to make perfect fish fry recipe 

  • फिश फ्रायला वरती कुरकुरीत टेस्ट यावी अशी वाटत असेल तर ते पिठाच्या बॅटरमध्ये बुडवल्यानंतर ते ब्रेड क्रम्ब्स मध्ये घोळून मग ते तळा.
  • फिश फ्राय बनवताना फिश मॅरीनेशन या प्रक्रियेमध्ये तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले घालू शकता.
  • मासे ओव्हनमध्ये देखील बेक केले जावू शकतात.

आम्ही दिलेल्या fish fry recipe in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मासे फ्राय रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या fish recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि fish recipe in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये simple fish fry recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!