fish tank information in marathi फिश टॅंक माहिती, आज आपण या लेखामध्ये फिश टँक (fish tank) ज्याला मराठीमध्ये मत्स्यालय टाक्या म्हणून ओळखले जाते या विषयी माहिती पाहणार आहोत. मत्स्यालय टाक्या ह्या सर्वात लोकप्रिय मत्स्यालयाचा प्रकार आहे आणि या प्रकारच्या टाक्यांचा वापर हा गोड्या पाण्यातील किंवा खाऱ्या पाण्यातील जलीय जीव राखण्यासाठी वापरले जाते आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या आणि मध्यम आकाराचे जलीय जीव संग्रहित केले जातात.
मासा हा पाळीव प्राण्यांच्यामध्ये मोडतो कारण आपण अनेकांच्या घरामध्ये पहिले अशे कि एका काचेच्या पेटीमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे मासे इकडे तिकडे फिरत असताना दिसत असतात आणि या पेटीलाच फिश टँक किंवा छोटेसे मत्स्यालय म्हणून ओळखले जाते.
आपल्याला घरामध्ये अनेक गोष्टींनी घर सुशोभित करण्यासाठी आवडत असेल आणि तुम्हाला पाळीव प्राण्यांची देखील आवड असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये फिश टँक बसवण्याचा विचार हा नक्की करू शकता कारण फिश टँक मुळे आपले घर देखील सुशोभित दिसेल आणि आपल्या मासे पाळल्याचा आनंद देखील मिळेल.
ज्यावेळी तुम्ही घरामध ठेवण्यासाठी फिश फिश टँक निवडत असाल तर तुम्ही खूप लहान आकाराचा देखील फिश टँक निवडू नका आणि खूप मोठ्या आकाराचा देखील फिश टँक निवडू नका तर तुम्ही मध्यम आकाराचा फिश टँक निवडा जेणे करून माश्यांना फिरणे सोपे जाईल. अनेक माश्यांचे प्रकार हे उबदार पाण्यातून आलेले असतात.
त्यामुळे अश्या प्रकारच्या माश्यांना थोडा उबदारपणा मिळावा म्हणून टँक मध्ये खाली हिटर बसवलेला असतो त्यामुळे पाण्यातील तापमान हे योग्य ठेवण्यास मदत होते. तसेच त्या माश्यांना चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी त्यांना रोज खायला पुरवणे गरजेचे असते आणि खायला दिल्या नंतर टाकीमधील पाणी स्वच्छ केले पाहिजे आणि त्या टाकी मधील पाणी आठवड्याला बदलले पाहिजे.
फिश टॅंक माहिती – Fish Tank Information in Marathi
मत्स्यालय म्हणजे काय ?
मत्स्यालय टाकी किंवा फिश टँक हे माशांचे एक छोटेसे घर आहे ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाळलेले असतात. एका काचेच्या पेटीमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे मासे इकडे तिकडे फिरत असताना दिसत असतात आणि या पेटीलाच फिश टँक किंवा छोटेसे मत्स्यालय म्हणून ओळखले जाते.
घरात फिश टॅंक असावा का?
फिश टँक घरामध्ये ठेवण्याचे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात जसे कि फिश टँक मासे हे सतत इकडून तिकडे फिरत असतात आणि जर आपण त्यांना पाहत बसले तर आपले मनोरंजन होण्यास मदत होते तसेच माश्यांना पाहिल्यामुळे आपला मानसिक ताण देखील कमी होण्यास मदत होते आणि मनाला एक प्रकारची प्रसन्नता मिळते आणि महत्वाचे म्हणजे फिश टँकमुळे आपल्या घराची सुंदरता वाढते.
फिश टँकचा इतिहास – history
मत्स्यालय आणि त्याचे वेगवेगळे प्रकार हे सुमारे ४५०० वर्षापासून म्हणजेच प्राचीन सुमेरीयन लोकांच्या काळापासून अस्तित्वात आहेत. पूर्वीच्या काळी रोमन लोक अन्न आणि मनोरंजनासाठी मासे पाळत होते आणि त्याचबरोबर शोभेच्या माश्यांचे प्रजनन चीनपासून जपानपर्यंत पसरले होते.
आणि १८०० च्या दशकात जेंव्हा ऑक्सिजन, प्राणी आणि वनस्पती यांच्यातील संबध स्पष्ट झाले आणि त्यामुळे योग्य मत्स्यालय राखणे स्थापित झाले. प्रशिक्षित डॉल्फिनसह एक विशाल समुदाय मत्स्यालय फिश टँक १९३८ मध्ये सेंट ऑगस्टीन फ्ला जवळ मरीनलँडच्या मोठ्या समुद्री मत्स्यालयात प्रदर्शित करण्यात आला होता.
फिश टँक सेट करताना घ्यावयाची काळजी – precaustions
- बॉक्स मधून काचेचे मत्स्यालय काळजीपूर्वक काढा आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि मग ते स्टँड तयार करा. जर तुम्ही मत्स्यालय विकत आणले असेल तर ते प्लग इन करून चालू करून बघा.
- एकदा तुमचा स्टँड तयार झाला कि त्यावर तुमची टाकी सुरक्षितपणे आणि सावधगिरीने स्टँडवर ठेवा.
- आता टाकी आणि टाकीचे इतरी भाग पाण्याने स्वच्छ धुवा आणि मग टाकी पाण्याने भरा.
- आता टाकीशी संबधित असणारी सर्व उपकरणे चालू करा, दररोज फक्त आठ तासांच्यापर्यंत तुमचा प्रकाश चालू ठेवा आणि असे केल्यामुळे शेवाळ वाढीस चालना मिळेल.
- तुम्ही तुमच्या टाकीला योग्य डोस जोडत आहात याची खात्री करण्यासाठी तुमच्या उपचाऱ्यांच्या बाटल्यावर असणाऱ्या सुचना काळजी पूर्वक वाचा आहे सूचनांच्या प्रमाणे प्रक्रिया करा.
- आता फिश टँक प्रक्रिया सुरूच ठेवा.
फिश टँक विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – FACTS
- पाण्यामध्ये कंडीशनर किती प्रमाणात घालावे हे हे कंडीशनरवर अवलंबून असते, प्रत्येक कंडीशनरचे स्वताचे नियम असतात आणि बाटलीवर सुचना असतात.
- फिश टँक मधील माश्यांना दिवसातून दोनदा तरी खायला द्यावे.
- फिश टँक हे किती मोठे असावे हे माश्यांच्या आकारावर आणि प्रमाणावर आधारित असते, लहान माशांच्यासाठी १० गॅलन टाकी ठेवण्याची शिफारस केली जाते.
- फिश टँक मध्ये गोडे पाणी किंवा खारे पाणी देखील वापरले जाते.
- मत्स्यालय टाक्या ह्या सर्वात लोकप्रिय मत्स्यालयाचा प्रकार आहे आणि या प्रकारच्या टाक्यांचा वापर हा गोड्या पाण्यातील किंवा खाऱ्या पाण्यातील जलीय जीव राखण्यासाठी वापरले जाते.
- अनेक माश्यांचे प्रकार हे उबदार पाण्यातून आलेले असतात त्यामुळे अश्या प्रकारच्या माश्यांना थोडा उबदारपणा मिळावा म्हणून टँक मध्ये खाली हिटर बसवलेला असतो.
फिश टँक विषयी काही टिप्स – fish tank tips in marathi
- जर तुम्ही घरामध्ये फिश टँक ठेवण्याचा विचार कारत असाल तर तो एखाद्या सुरक्षित जागेमध्ये ठेवा.
- तुम्हाला फिश टँक ची टाकी निवड
- ताना देखील खूप विचार करून निवडावी लागते आणि फिश टँक ची टाकी निवडताना ती शक्यतो थोड्या मोठ्या आकाराची असेल तर त्यामध्ये माश्यांना फिरण्यासाठी अडचण होणार नाही.
- फिश टँक मोठा असल्यास पाण्याचे रसायनशास्त्र आणि तापमान स्थिर ठेवण्यासाठी मदत होते.
- तुम्ही तुमच्या फिश टँक मध्ये जास्त प्रमाणात मासे ठेवू नका ज्यामुळे माश्यांना फिरण्यास अडचण होईल. त्यामध्ये मोजकेच मासे ठेवा.
- तुम्ही तुमच्या फिश टँक मध्ये रोपे लावा जी फिश टँक मध्ये लावण्यासाठी खास बनवलेली असतात.
- फिश टँकला जे फिल्टर जोडलेले असते त्या फिल्टरची स्वच्छता करणे गरजेचे असते.
आम्ही दिलेल्या fish tank information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर फिश टॅंक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या fish tank vastu shastra in marathi या fish tank tips in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about fish tank in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट