मुदत ठेव योजना Fixed Deposit Information in Marathi

fixed deposit information in marathi मुदत ठेव योजना, कोणतीही बँक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्याला पुरवते जसे कि लोकांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करते तसेच अनेक कारणांच्यासाठी जर त्यांना पैशाची गरज असेल तर त्यांना कर्ज देते अश्या प्रकारे बँक त्यांच्या ग्राहकांना मदत करत असते. जर एकाद्या व्यक्तीला बँकेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे खाते उघडून त्यामध्ये गुंतवणूक करू शकते जसे कि बचत खाते (saving account), चालू खाते (current account), आवर्ती ठेव खाते (recurring deposit account), व्यवसाय खाते (business account) आणि मुदत ठेव खाते (fixed deposit account) आणि आज आपण या लेखामध्ये फिक्स्ड डीपॉझीट म्हणजेच मुदत ठेव खात्याविषयी माहिती घेणार आहोत.

फिक्स्ड डीपॉझीट याला मराठीमध्ये मुदत ठेव खाते म्हणतात आणि भारतामधील सर्वात सामान्य उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायापैकी एक पर्याय म्हणजे मुदत ठेव आणि हा जर एखाद्या ग्राहकाने निवडला तर त्याला ठराविक काळासाठी गुंतवणूक करावी लागेल आणि तो ठराविक काल पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढून घेवू शकतो.

परंतु या गुंतवणुकीमध्ये इतर खात्यांच्यापेक्षा व्याजदर हा जास्त असतो त्यामुळे हि एक फायद्याची गोष्ट आहे. जर एखाद्या ग्राहकाला मुदत ठेव खात्यामध्ये गुंतवणूक करायची असल्यास तो व्यक्ती ७ दिवसापासून १० वर्षापर्यंत अल्प, मध्यम किंवा दीर्घकालीन आर्थिक मदत करू शकतो.

fixed deposit information in marathi
fixed deposit information in marathi

मुदत ठेव योजना – Fixed Deposit Information in Marathi

ठेवीचे नावमुदत ठेव
प्रकारगुंतवणूक प्रकार
ठेव रक्कमकमीत कमी १००० रुपये
ठेवीचा काळ७ दिवस ते १० वर्ष
व्याजदर१.८५ टक्के ते ६.९५ टक्के

मुदत ठेव म्हणजे काय – fixed deposit meaning in marathi

  • भारतामधील सर्वात सामान्य उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायापैकी एक पर्याय म्हणजे मुदत ठेव आणि हा जर एखाद्या ग्राहकाने निवडला तर त्याला ठराविक काळासाठी गुंतवणूक करावी लागेल आणि तो ठराविक काल पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढून घेवू शकतो.
  • आपण बँक खात्यामध्ये ठराविक काळासाठी आणि ठराविक व्याजदराने एकरकमी पैसे ठेवतो त्याला मुदत ठेव म्हणून ओळखले जाते.

ठेवीचे प्रामुख्याने किती प्रकार आहेत – deposit meaning in marathi

मुदत ठेव म्हणजे आपण बँकेमध्ये ठराविक काळासाठी आणि ठराविक व्याजदराने एकरकमी पैसे ठेवतो आणि या मुदत ठेवीचे काही वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते आता आपण पाहणार आहोत.

विशेष मुदत ठेव

विशेष मुदत ठेव ह्या विशेष असतात अरण ह्या सामन्यात विशिष्ट कालावधीसाठी ग्राहकांना ऑफर केल्या जातात. यामध्ये विशेष कालावधी हा २९० किंवा ३९० दिवसांच्या दरम्यान असू शकतो आणि यामध्ये व्याजदर देखील उच्च असतो.

मानक मुदत ठेव

यामध्ये एखाद्या व्यक्तीने त्यांचे पैसे निश्चित कालावधीसाठी पूर्वनिश्चित व्याजदराने गुंतवणे आवश्यक असते आणि या प्रकारामध्ये गुंतवणुकीचा कालावधी हा ७ दिवस ते १० वर्ष इतका असू शकतो.

फ्लोटिंग मुदत ठेव

फ्लोटिंग मुदत ठेवीमध्ये दर तिमाही किंवा वार्षिक बदलतात आणि लोक बदलत्या व्याज दराचा लाभ घेवू शकतात आणि व्याजदरातील बदल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निर्धारित केला जातो आणि हे लोकांना व्याजदराचे नियमित उत्पन्नाचे स्तोत्र आहे.

ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव

ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजना हि एक मुदत ठेवीचा भाग आहे आणि या योजनेमध्ये ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना खाते उघडण्याची परवानगी आहे.

नियमित उत्पन्न मुदत ठेवी

तुमचे उत्पन्न मर्यादित असल्यास आणि तुमच्या मासिक खर्चासाठी बँक ठेवीवरील व्याजदर अवलंबून असल्यास, या प्रकारची मुदत ठेव तुमच्यासाठी योग्य आहे.

मॅच्यूरिटी पेआऊट मुदत ठेव

या प्रकारासामध्ये ठेव कालावधीमध्ये मुदत ठेव खात्यामध्ये व्याज जमा होते म्हणजेच चक्रवाढ होते आणि मुदत ठेव खात्याच्या परिपक्वतानंतर तुम्हाला मुद्दल आणि व्याज घटक प्राप्त होतील.

मुदत ठेव खात्यामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे – benefits

  • आपण जर एखाद्या बँकेमध्ये मुदत ठेव खात्यामध्ये गुंतवणूक केली तर परताव्याची हमी त्या संबधित ग्राहकाला मिळू शकते.
  • यामध्ये लवचिक कार्यकाळ आहे म्हणजेच तुम्ही यामध्ये ७ दिवसापासून १० वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.
  • जर एखाद्या ग्राहकाने बँकेमध्ये मुदत ठेव खात्यामध्ये गुंतवणूक केली तर त्याला जास्त व्याजदर मिळू शकतो कारण इतर बँक खात्यांच्यापेक्षा जास्त व्याजदर हा मुदत ठेव खात्यामध्ये दिला जातो.
  • जर तुम्हाला निधीची तातडीची गरज असल्यास तुम्ही तुमच्या मुदत ठेवीवर कर्ज घेऊ शकता.
  • मुदत ठेव हा एक सुरक्षित ठेवीचा पर्याय आहे.
  • आपण मुदत ठेव खाते हे काही मिनिटामध्येच उघडू शकतो.
  • तुम्ही बँकेच्या शाखेमध्ये किंवा ऑनलाईन मुदत खात्यामध्ये सहज गुंतवणूक करू शकता.

मुदत ठेव खाते कसे उघडावे – account opening process

मुदत ठेव खाते उघडण्यासाठी आपण दोन पर्यायांचा वापर करू शकतो आणि ते म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन आणि खाली आपण दोन्हीहि प्रक्रिया पाहणार आहोत.

ऑफलाईन

  • जर एखाद्या व्यक्तीला ऑफलाईन खाते उघडायचे असल्यास बँकेच्या किंवा वित्तीय संस्थेच्या जवळच्या शाखेला भेट द्या.
  • आता मुदत ठेव अर्जासाठी विनंती करा आणि अर्ज मिळाल्यानंतर योग्य तपशिलांच्यासह अर्ज भरा.
  • मग अर्ज सबमिट करत असताना बँकेने मागितलेली कागदपत्रे जसे कि ओळख आणि पत्याचा पुरावा जोडावा लागतो आणि ते बँकेमध्ये सबमिट करा.
  • आता तुम्ही गुंतवणूक करत असणाऱ्या रक्कम रोख किंवा चेकने देऊ शकता.
  • मग तुमच्या अर्जावर प्रक्रिया केली जाईल आणि बँक वित्तीय संस्थेने निर्दिष्ट केलेल्या वेळेनुसार खाते उघडले जाईल.

ऑनलाईन

  • ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्ही निवडलेल्या बँकेच्या नेत बँकिंग खात्यामध्ये लॉग इन करा.
  • मग उपलब्ध वैशिष्ठ्यामध्ये मुदत ठेव खाते उघडा पर्याय शोधा आणि पर्यायावर क्लिक करा.
  • आता संबधित माहितीसह ऑनलाईन अर्ज भरा किंवा अर्जामधील सर्व तपशील भरा.
  • मग विनंती केलेल्या सर्व कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी अपलोड करा.
  • लागू असल्यास मॅच्यूरिटी रकमेसाठी नॉमिनीचा उल्लेख करा.
  • तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असलेली रक्कम हस्तांतरित करा आणि अर्ज पूर्ण करा. 

आम्ही दिलेल्या fixed deposit information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मुदत ठेव योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या fixed deposit meaning in marathi या fixed deposit information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about fixed deposit in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये deposit meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!