gdp meaning in marathi – gdp definition in marathi जीडीपी म्हणजे काय ? आज आपण या लेखामध्ये जीडीपी म्हणजे काय आणि ते कसे काम करते या बद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट (gross domestic product) ज्याला मराठीमध्ये एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणतात. यामध्ये देशामध्ये उत्पादन केलेल्या सर्व अंतिम वस्तूंचे एकूण आर्थिक मूल्य काढले जाते. जर एखाद्या देशाचा जीडीपी वाढत असेल तर त्या देशाचा विकास देखील वाढत जातो आणि जर त्या संबधित देशाची जीडीपी घसरत असेल तर त्या देशाचा विकास देखील खुंटंण्याची शक्यता असते म्हणून जीडीपी मध्ये वाढ होणे हे कोणत्याही देशासाठी चांगलेच असते.
जीडीपी पप्रथम संकल्पना हि १८ व्या शतकामध्ये उदयास आली आणि याची आधुनिक संकल्पना इ.स १९३४ मध्ये अमेरिका या देशाचे अर्थशास्त्रज्ञ सायमन कुझनेट्स यांनी विकसित केली आणि इ.स १९४४ मध्ये हि एका परिषदेमध्ये अर्थव्यवस्थेत स्वीकारण्यात आली. जीडीपी मध्ये अंतिम वस्तू जी पैसे मिळण्यासाठी विकली जाते तसेच कोणत्याही अंतिम मालाची विक्री किंवा मालाची निर्मिती करण्यासाठी विकत घेतल्या जाणाऱ्या मालाची खरेदी हे या मध्ये समाविष्ट आहे. चला तर आता आपण सविस्तर पाने जीडीपी म्हणजे काय ते पाहूया.
जीडीपी म्हणजे काय – Gdp Meaning in Marathi
प्रकार | जीडीपी (GDP) |
पूर्ण स्वरूप | ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट (gross domestic product) |
मराठी नाव | एकूण देशांतर्गत उत्पादन |
केंव्हा उदयास आले | इ.स १९३४ |
कोणी विकसित केले | अमेरिका या देशाचे अर्थशास्त्रज्ञ सायमन कुझनेट्स |
जीडीपी म्हणजे काय – gdp definition in marathi
gdp full form in marathi
जीडीपी ( GDP ) म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ( gross domestic product ) ज्याला मराठीमध्ये एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणतात. यामध्ये देशामध्ये उत्पादन केलेल्या सर्व अंतिम वस्तूंचे एकूण आर्थिक मूल्य काढले जाते.
जीडीपी चा इतिहास – history of GDP
जीडीपी ( GDP ) पप्रथम संकल्पना हि १८ व्या शतकामध्ये उदयास आली आणि याची आधुनिक संकल्पना इ.स १९३४ मध्ये अमेरिका या देशाचे अर्थशास्त्रज्ञ सायमन कुझनेट्स यांनी विकसित केली आणि इ.स १९४४ मध्ये हि एका परिषदेमध्ये अर्थव्यवस्थेत स्वीकारण्यात आली.
जीडीपी मध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी
जीडीपी यामध्ये देशामध्ये उत्पादन केलेल्या सर्व अंतिम वस्तूंचे एकूण आर्थिक मूल्य काढले जाते परंतु या मध्ये काही गोष्टी समाविष्ट नसतात. चला तर आता आपण जीडीपी मध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी पाहूया.
- वापरलेल्या वस्तूंची परत विक्री करत असतील तर वस्तूंचा समावेश हा जीडीपी मध्ये होत नाही.
- देवान घेवाण केलेल्या वस्तूंचा समावेश देखील जीडीपी मध्ये समाविष्ट नाहीत.
- कुटुंबा मध्ये केलेले काम किंवा स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामाचे मूल्य देखील जीडीपी मध्ये धरले जात नाही.
- मध्यवर्ती वस्तू किंवा सेवा ज्याचा वापर इतर अंतिम वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी केला जातो अश्या वस्तूंचे किंवा सेवांचे मूल्य देखील या मध्ये समाविष्ट केले जात नाही.
- बाजारामध्ये विक्रीसाठी उत्पादन केलेला माल देखील या मध्ये समाविष्ट केला जात नाही.
- गैर आर्थिक भरपाईचे काम देखील या मध्ये समाविष्ट नाही.
जीडीपी चे प्रकार – types of GDP
यामध्ये देशामध्ये उत्पादन केलेल्या सर्व अंतिम वस्तूंचे एकूण आर्थिक मूल्य काढले जाते. जर एखाद्या देशाचा जीडीपी वाढत असेल तर त्या देशाचा विकास देखील वाढत जातो आणि जर त्या संबधित देशाची जीडीपी घसरत असेल तर त्या देशाचा विकास देखील खुंटंण्याची शक्यता असते. जीडीपीचा विकास हा खूप महत्वाचा असतो आणि जीडीपी चे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण आता खाली पाहणार आहोत.
वास्तविक जीडीपी (GDP)
या प्रकारच्या जीडीपी ची गणना किंवा मोजणी करण्यासाठी सरकार आधार वर्ष किंवा मागील वर्ष आधारित किंमती वापरल्या जातात आणि यामध्ये स्थिर किंमती वर उत्पादन केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्यावर यामध्ये एकूण मूल्य काढले जाते. या प्रकारच्या जीडीपी मध्ये आर्थिक वाढीचे एकदम बरोबर खाते प्रदान करते.
नाममात्र जीडीपी (GDP)
यामध्ये सध्याच्या बाजार भावावर याचे उत्पादित वस्तू आणि सेवांच्यावर एकूण आर्थिक मूल्य काढले जाते जर त्या संबधित वर्षामध्ये चलनवाढ मध्ये जर कोणताही फरक पडला तर त्याचा परिणाम या प्रकारच्या जीडीपी च्या मूल्यावर देखील होतो.
संभाव्य जीडीपी (GDP)
संभाव्य जीडीपी म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये शंभर टक्के रोजगार आणि सातत्यपूर्ण वाढ असलेली आर्थिक स्थिती.
जीडीपी च मोजणी कशी केली जाते
कोणत्याही गोष्टीची मोजणी करण्यासाठी जशी एक विशिष्ठ पध्दत वापरली जाते तशीच जीडीपी ( GDP ) मोजणीसाठी देखील एक विशिष्ट पद्धत वापरली जाते म्हणजे याचे मूल्य करण्यासाठी एक सूत्राचा वापर केला जातो ते सूत्र आपण खाली पाहणार आहोत.
सूत्र :
GDP = C + I + G + NX
किंवा
GDP = खाजगी वापर + एकूण गुंतवणूक + सरकारी खर्च + निव्वळ निर्यात
- C = घरगुती आणि ना नफा संस्थेद्वारे मिळालेला खाजगी उपभोग खर्चाचा संदर्भ.
- I = व्यावसायिक खर्च आणि आणि घराच्या खरेदीचा संदर्भ किंवा सरकारी खर्च.
- G = वस्तू आणि सेवांवरील सरकारी खर्च.
- NX = देशाची निर्यात वजा आयात संदर्भ.
जीडीपी विषयी तथ्ये – facts about GDP
- जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट (gross domestic product) ज्याला मराठीमध्ये एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणतात.
- जीडीपी पप्रथम संकल्पना हि १८ व्या शतकामध्ये उदयास आली आणि याची आधुनिक संकल्पना इ.स १९३४ मध्ये अमेरिका या देशाचे अर्थशास्त्रज्ञ सायमन कुझनेट्स यांनी विकसित केली
- जीडीपी मध्ये देशामध्ये उत्पादन केलेल्या सर्व अंतिम वस्तूंचे एकूण आर्थिक मूल्य काढले जाते.
- इ.स १९४४ मध्ये हि एका परिषदेमध्ये अर्थव्यवस्थेत स्वीकारण्यात आली.
- जीडीपी मध्ये अंतिम वस्तू जी पैसे मिळण्यासाठी विकली जाते तसेच कोणत्याही अंतिम मालाची विक्री किंवा मालाची निर्मिती करण्यासाठी विकत घेतल्या जाणाऱ्या मालाची खरेदी हे या मध्ये समाविष्ट आहे.
- वास्तविक जीडीपी ची गणना किंवा मोजणी करण्यासाठी सरकार आधार वर्ष किंवा मागील वर्ष आधारित किंमती वापरल्या जातात.
- जर एखाद्या देशाचा जीडीपी वाढत असेल तर त्या देशाचा विकास देखील वाढत जातो आणि जर त्या संबधित देशाची जीडीपी घसरत असेल तर त्या देशाचा विकास देखील खुंटंण्याची शक्यता असते.
आम्ही दिलेल्या gdp meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर जीडीपी म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gdp definition in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि gdp meaning in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट