गोगलगाय विषयी माहिती Gogalgai Information in Marathi

gogalgai information in marathi – snail meaning in marathi गोगलगाय विषयी माहिती, पृथ्वीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि त्यामधील काही प्राणी जंगली किंवा विषारी असतात तर काही प्राणी हे पाळण्यास एकदाक फ्री असतात म्हणजेच ते पाळीव प्राणी असतात. गोगलगायी हा देखील एक असा प्राणी आहे जो सर्वांना माहित आहे परंतु अनेकांना माहित नाही कि हा छोट्या आकाराचा प्राणी पाळला देखील जातो आणि आज आपण या लेखामध्ये गोगलगाईविषयी माहिती पाहणार आहोत.

गोगलगाई हि एक मोलास्क कुटुंबातील छोटासा प्राणी आहे आणि याला कठीण कवच असलेल्या समूहातील प्राणी म्हणून ओळखले जाते. शास्त्रज्ञांनी लाखो वर्षापूर्वी गोगलगायीचा शोध लावला आहे आणि ते वास्तविकपणे ते जगातील सर्वात जुन्या प्राणी प्रजातींपैकी एक आहेत.

गोगलगाई हा एक छोटासा प्राणी आहे आणि त्याला एक रिबनसारखी जीभ असते आणि हजारो लहान दात असतात तसेच पाय कवटीला जोडलेले असतात आणि डोक्यावर १५ मिमी तंबूच्या दोन जोड्या आहेत आणि गोगलगाईचे डोळे देठाच्या शेवटी असतात.

gogalgai information in marathi
gogalgai information in marathi

गोगलगाय विषयी माहिती – Gogalgai Information in Marathi

मराठी नावगोगलगाई
इंग्रजी नावस्नेल (snail)
कुटुंब मोलास्क
वर्णनआकार छोटा, रिबनसारखी जीभ, हजारो लहान दात, पाय कवटीला जोडलेले असतात आणि गोगलगाईचे डोळे देठाच्या शेवटी असतात.
राहण्याचे ठिकाणसपाट जमीन, पर्वत, डोंगर, जंगले, महासागर आणि वाळवंट इत्यादी

गोगलगाई प्राण्याचे वर्णन – snail meaning in marathi

गोगलगाई हे एक गॅस्ट्रोपॉड प्राणी आहे ज्याला एक बंद कवच असते ज्यामध्ये ते संरक्षणासाठी पूर्णपणे मागे घेण्यास सक्षम असतात. गोगलगाई हि एक मोलास्क कुटुंबातील छोटासा प्राणी आहे आणि याला कठीण कवच असलेल्या समूहातील प्राणी म्हणून ओळखले जाते.

तसेच त्याला एक रिबनसारखी जीभ असते आणि हजारो लहान दात असतात तसेच पाय कवटीला जोडलेले असतात आणि डोक्यावर १५ मिमी तंबूच्या दोन जोड्या आहेत आणि गोगलगाईचे डोळे देठाच्या शेवटी असतात.

हा प्राणी जगामध्ये सर्वव्यापी आहे म्हणजेच हे वाळवंट, पर्वत, महासागर, जंगल या सारख्या कोणत्याही प्रदेशमध्ये राहू शकतात. त्याचबरोबर हे हायड्रेशन आणि संरक्षणाच्या उद्देशाने बंद कवच असलेले थंड रक्ताचे अपृष्टवंशीय प्राणी आहेत.

गोगलगाय कुठे राहते?

गोगलगाई हा प्राणी शक्यतो कोणत्याही ठिकाणी राहू शकतो परंतु हा प्राणी जास्त उष्ण ठिकणी किंवा जास्त तापमान असणाऱ्या ठिकाणी राहू शकत नाही त्यावेळी ते तापमान वाढल्यानंतर जमिनीच्या आतमध्ये थंड ठिकाणी लपतात आणि मग वातवर थंड झाल्यानंतर परत बाहेर येतात.

गोगलगाय काय खाते?

गोगलगाई हे शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी आहेत आणि ते काही वेळा वनस्पती, एकपेशीय वनस्पती चुनखडी या सारखे शाकाहारी अन्न खातात तर काही वेळा ते त्यांच्यापेक्षा छोट्या गोगलगाई देखील सेवन करतात.

गोगलगाईची शारीरिक वैशिष्ठ्ये – features

 • गोगलगाईमध्ये सर्पिल शेळ असते म्हणजे एक कठोर रचना जी त्यांच्या अंतर्गत अवयवांचे संरक्षण करते, त्यांच्या पाठीवर भारीत असते.
 • गोगलगाई त्यांच्या शक्तीशाली स्नायूंच्या पायामुळे असमान भूभागावर जाऊ शकतात, जे त्यांचे मऊ शरीर सुकण्यापासून देखील प्रतिबंधित करतात.

गोगलगाईविषयी काही मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

 • गोगलगाई हे बहिरे असतात आणि ते अन्न शोधण्यासाठी त्याच्या वासाची जाणीव वापरतात.
 • गोगलगाई हा प्राणी नर आणि मादी या दोन्हीमध्ये विभागला आहे परंतु यामधील फरक करण्याचा कोणताही मार्ग नाही.
 • गोगलगाई हे निशाचर प्राणी आहेत म्हणजेच त्यांना रात्री किंवा पाहते चांगले दिसते.
 • गोगलगाई हा प्राणी १५ ते २० वर्ष जगू शकतात.
 • काही संशोधक असे म्हणतात कि पृथ्वीवर इतर कीटकांच्यापेक्षा गोगलगाईंचे प्रमाण जास्त आहे.
 • गोगलगाईचे एकूण ४३००० वेगवेगळे प्रकार आहे आणि रोमन लोकांनी वेगळ्या प्रकारच्या गोगलगाई त्यांचे अन्न म्हणून पाळल्या आहेत
 • गोगलगाई प्राण्याला एक कवच असते आणि हे कवच त्यांच्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी असते आणि धोक्याच्यावेळी ते पूर्णपणे शरीर शेलमध्ये मागे जाऊ शकते.
 • शास्त्रज्ञांनी लाखो वर्षापूर्वी गोगलगायीचा शोध लावला आहे आणि ते वास्तविकपणे ते जगातील सर्वात जुन्या प्राणी प्रजातींपैकी एक आहेत.
 • गोगलगाई या प्राण्याला पाठीचा कणा नसतो.
 • बहुतेकदा गोगलगाई हे प्राणी ५ ते ६ वर्ष जगू शकतात परंतु ते बंदिवासामध्ये किंवा त्यांना पाळले तर ते १० ते १५ वर्ष जगू शकतात.
 • उत्तर अमेरिकेमध्ये सुमारे ५०० स्थानिक गोगलगाई आहेत.
 • फ्रांसदेशामध्ये गोगलगाई पाळल्या जातात आणि या ठिकाणी अन्नासाठी गोगलगाई वापरल्या जातात आणि एस्कागोर्ट या गोगलगाईचा प्रकार हा फ्रान्समध्ये खाण्यायोग्य आहे.
 • काही ठिकाणी लोक गोगलगाईची अंडी खातात आणि त्यांना पांढरा कॅवीयर म्हणतात.
 • जमिनीवरील गोगलगाई ह्या त्यांच्या कवचाचे प्रवेशद्वार हे एपिफ्राम नावच्या कोरड्या श्लेश्माच्या स्त्रावाने झाकतात, परंतु काही जण असे करतात कि, जलचर गोगलगाईमध्ये ऑपरकुलमचे नाव असते.
 • गोगलगाई अनेक प्रकारचे परजीवी ठेवतात जे त्यांना मारत नसले तरी ते त्यांचे भक्षक असतात. जर एखाद्या व्यक्तीने खराब प्रकारे शिजलेल्या गोगलगाई खाल्ल्या तर तो व्यक्ती आजारी पडू शकतो.
 • जमिनीवरील गोगलगाईचा प्रकार हा फुफ्फुसामुळे श्वास घेतात आणि गोगलगाईच्या कवचाचा आकार हा त्यांचे वय दर्शवण्यास मदत करतो.
 • गोगलगाई मोठी झाल्यानंतर त्यांचे टरफल किंवा कवच बदलत नाही तर ते वाढत जाते.
 • गोगलगाईचा चालण्याचा वेग हा सुमारे ०.५ ते ०.७ प्रती सेकंद इतका असतो.

आम्ही दिलेल्या gogalgai information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गोगलगाय विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या snail meaning in marathi या snail information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about snail in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!