ब्राह्मी औषधी वनस्पती मराठी माहिती Gotu Kola Plant Information in Marathi

gotu kola plant information in marathi – brahmi information in marathi ब्राह्मी औषधी वनस्पती मराठी माहिती, गोटू कोला हि एक प्रकारची वनस्पती आहे जी अजमोदा म्हणजेच ओवा कुटुंबातील सदस्य आहे आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि हि वनस्पती औषधी वनस्पतीपैकी एक आहे आणि त्याचबरोबर या औषधी वनस्पतीचा वापर हा पारंपारिकपणे चीन आणि इंडोनेशियामध्ये देखील वापरली जाते.

हि एक प्रकारची औषधी वनस्पती असल्यामुळे काही संशोधकांच्यामते हि वनस्पती मेंदूचा विकास करण्यासाठी, यकृत आणि मृत्रापिंडाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी अश्या अनेक वेगवेगळ्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी या प्रकारच्या वनस्पतीचा वापर केला जातो.

गोटू कोला या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव सेन्टेला अशीयाटिक (centella asiatica) असे आहे आणि याला मराठी मध्ये ब्राह्मी या नावाने ओळखले जाते तसेच या प्रकारची  वनस्पती हि आशियामधील उष्णकटीबंधीय आणि उपोष्णकटीबंधीय भागामध्ये वाढते.

gotu kola plant information in marathi
gotu kola plant information in marathi

ब्राह्मी औषधी वनस्पती मराठी माहिती – Gotu Kola Plant Information in Marathi

वनस्पतीचे नावगोटू कोला वनस्पती
मराठी नावब्राह्मी
कुटुंबअजमोदा (ओवा)
वैज्ञानिक नावसेन्टेला अशीयाटिक (centella asiatica)
ओळखऔषधी वनस्पती
प्रदेशभारत, चीन, जपान , इंडोनेशिया आणि इतर काही देश.

गोटू कोला वनस्पती काय आहे ?

गोटू कोला हि ओवा कुटुंबातील वनस्पती असून हि १२ महिने उपलब्ध असते आणि हि औषधी वनस्पती मूळ आशियामधील आहे. हि औषधी वनस्पती लोक अनेक वर्षापासून पारंपारिकपणे वापरत आहेत आणि याचा वापर अनेक आरोग्य समस्यांच्यासाठी वापरले जाते.

गोटू कोला वनस्पती कोठे आढळते ?

गोटू कोला वनस्पती हि आशिया खंडामध्ये आढळते म्हणजेच हि वनस्पती भारत, चीन, जपान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, दक्षिण पॅसिफिक आणि इंडोनेशिया या देशामध्ये आढळते आणि हि बारमाही म्हणजेच वर्षभर उपलब्ध असणारी वनस्पती आहे.

गोटू कोला वनस्पतीचे फायदे – brahmi uses in marathi

गोटू कोला हि एक प्रकारची औषधी वनस्पती असून याचा वापर हा पारंपारिकपणे खूप पूर्वीच्या काळापासून केला आहे आणि याचा वापर हा प्राचीन काळापासून करण्याचा फायदा म्हणजे हे अनेक उपचारांच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

 • गोटू कोला म्हणजेच ब्राम्हीमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात आणि या अँटी ऑक्सिडंटच्या गुणधर्मामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आणि तसेच गोटू कोला या वनस्पतीच्या रोजच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आपल्याला अनेक रोगांच्यापासून दूर ठेवले जाते.
 • काहींच्यामध्ये रक्तामध्ये साखरेचे प्रमाण हे जास्त प्रमाणत असते आणि जर हे त्यांना नियंत्रित ठेवायचे असल्यास त्या संबधित व्यक्तीने ब्राह्मी या औषधी वनस्पतीचे सेवन केले तर यामुळे राकातीत साखरेचे प्रमाण हे नियंत्रित राहण्यास मदत होते.
 • अनेकांना पचनाच्या समस्येला सामोरे जावे लागते आणि जर अश्या लोकांनी ब्राह्मी वनस्पतीचे सेवन केल्याने पचनशक्ती सुधारण्यास आणि मजबूत होण्यास मदत होते कारण ब्राम्ही मध्ये असणारे फायबर हे आतड्यामाधिक हानिकारक पदार्थ काढून पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात.
 • अनेकजण बुध्दी तल्लक आणि चलाख बनवण्यासाठी बदाम आणि इतर पौष्टिक पदार्थ खातात परंतु अनेकांना हे माहित नाही कि ब्राह्मीच्या सेवनाने देखील मेदुंची ताकद वाढते तसेच एकाग्राहता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील याची मदत होते.
 • सध्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे लोकांना कामाचा तणाव किंवा इतर गोष्टीचा तणाव असतो आणि या तणावामुळे बहुतेक कामे हि चांगल्या प्रकारे होऊ शकत नाहीत आणि म्हणून जर अश्या लोकांनी ब्राह्मीचे सेवन केले तर तणाव कमी होण्यासाठी मदत होते.
 • अनेकांना अल्सरच्या समस्येला सामोरे जावे लागते आणि अनेक औषधोपचार करून देखील हि समस्या दूर होत नाही परंतु जर ब्रह्मीचे सेवन रोज केले तर यामुळे अल्सरची समस्या दूर होऊ शकते.
 • गोटू कोला या वनस्पतीच्या वापरणे जखमा देखील कमी होण्यास किंवा बऱ्या होण्यासमदत होते.

गोटू कोला वनस्पतीविषयी काही मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

 • गोटू कोला हि वनस्पती ओलसर ठिकाणी आढळते आणि या प्रकारची  वनस्पती हि आशियामधील उष्णकटीबंधीय आणि उपोष्णकटीबंधीय भागामध्ये वाढते.
 • गोटू कोला या वनस्पतीला ब्राह्मी बुटी किंवा मांडुकपर्णी देखील म्हणतात.
 • गोटू कोला हा काढीइ थेट वापरता येत नाही परंतु आपण त्याचा अर्क वापरू शकतो किंवा आपल्याला त्यापासून बनवलेली औषधे आणि क्रीम अगदी सहजपणे बाजारामध्ये मिळू शकतात.
 • गोटू कोला हि एक प्रकारची वनस्पती आहे जी अजमोदा म्हणजेच ओवा कुटुंबातील सदस्य आहे आणि या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव सेन्टेला अशीयाटिक (centella asiatica) असे आहे.
 • गोटू कोला या आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये खनिजे, प्रथिने आणि जीवनसत्व बी आणि सी या सारखे पौष्टिक घटक असतात.
 • गोटू कोला या औषधी वनस्पतीला मेघालय राज्यामध्ये का दवाई बह या नावाने ओळखले जाते.
 • गोटू या वनस्पतीला मराठीमध्ये ब्राह्मी, संस्कृतमध्ये जलब्राह्मी आणि हिंदी मध्ये मांडूकापर्णी म्हणून ओळखले जाते.
 • काही लोकांना अनेक औषधी वनस्पतींची देखील अलर्जी होते आणि अश्याच प्रकारे जर गोटू कोला या वनस्पतीची देखील पानांना हात लावल्यानंतर अलर्जी होऊ शकते.
 • गोटू कोला हा एक पारंपारिक औषध उपचार आहे आणि याचा वापर खूप पूर्वीपासून अनेक आरोग्य समस्यांच्यावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.
 • या वनस्पतीच्या वापरामुळे मेंदूचा विकास होण्यासाठी मदत होते, तसेच रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते तसेच तणाव दूर करण्यासाठी मदत होते अश्या प्रकारे अनेक समस्या सोडवण्यासाठी मदत होते.

आम्ही दिलेल्या gotu kola plant information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ब्राह्मी औषधी वनस्पती मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या brahmi meaning in marathi या brahmi uses in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information of gotu kola in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!