gram sevak information in Marathi ग्रामसेवक माहिती, ग्रामपंचायत ही भारतातील पंचायती राज पद्धतीची स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गाव किंवा लहान शहर पातळीवर आहे आणि पंचायती राजच्या पायाभूत पातळीवर आहे. पंचायती राज ही भारतीय उपखंडातील स्थानिक सरकारची सर्वात जुनी व्यवस्था आहे आणि पंचायती राज संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकक म्हणून भारतामध्ये बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहेत आणि या गरम पंचायत हि गाव पातळीवर काम करणारी असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक पदांच्यावर वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते.
ज्यामुळे गावपातळीवरील सर्व कामकाज हे सुरळीत होईल आणि त्या पदांच्यामधील एक म्हणजे “ग्राम सेवक” पद आणि आज आपण या लेखामध्ये ग्रामसेवक म्हणजे काय, ते कसे बनता येते आणि त्याची या पदालेखी काय जबाबदारी असते या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
ग्राम सेवक हे गाव पातळीवर काम करणाऱ्या ग्राम पंचायत मधील एक पद आहे जे गावामधील विकास करण्यासाठी तसेच गावातील लोकांना मदत करण्यासाठी काम करते आणि हे पद गावातील लोकांच्यामधील आणि सरकारमधील दुव्याचे काम करते तसेच सरकारच्या काही सुविधा तसेच सरकारी लाभ आल्या तर त्या गावातील लोकांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करते.
ग्राम सेवक हे सरकारी अधिकारी पद आहे जे पंचायतमध्ये नियुक्त केले जाते. कोणत्याही ग्रामपंचायत मधील ग्राम सेवक निवडायचा असेल तर त्या संबधित इच्छुकाला एक लेखी परीक्षा द्यावी लागते जी शंभर गुणांची असते आणि या परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या गुणांनी उतीर्ण झाल्यानंतर तुमच्या या पदासाठी नियुक्ती केली जाऊ शकते.
परंतु त्यांच्या नियुक्तीच्या अगोदर त्यांना त्या प्रत्यक्ष कामाविषयी तसेच कार्यालयीन कामाविषयी त्या व्यक्तीला प्रशिक्षण दिली जाते. जर एखादा व्यक्ती ग्राम सेवक या पदावर नियुक्त झाला तर त्या व्यक्तीला ५००० ते २०००० पर्यंत पगार मिळू शकतो त्याचबरोबर त्या व्यक्तीला शासनाकडून मिळणाऱ्या काही सुविधांचा लाभ देखील घेता येतो.
ग्रामसेवक माहिती – Gram Sevak Information in Marathi
पदाचे नाव | ग्राम सेवक |
पातळी | ग्राम पंचायत (गाव पातळी) |
नियुक्ती | लेखी परीक्षेमार्फत |
गुण | १०० गुण |
पगार | ५००० ते २०००० पर्यंत मिळू शकतो |
ग्राम पंचायत म्हणजे काय ?
ग्रामपंचायत ही भारतातील पंचायती राज पद्धतीची स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गाव किंवा लहान शहर पातळीवर आहे आणि पंचायती राजच्या पायाभूत पातळीवर आहे.
ग्राम सेवक म्हणजे काय ?
ग्राम सेवक हा गरम पंचायतीने नियुक्त केलेला अधिकारी असतो जो गावाच्या विकासकामाची पाहणी करतो तसेच गावातील लोकांना मदत करतो आणि ग्रामपंचायतीची गावपातळीवर असणारी सर्व कामे तो पाहतो आणि त्याचबरोबर हा सरकार आणि गावातील लोकांच्यामधील दुव्याचे काम करतो.
ग्रामसेवक पदासाठी पात्रता – gramsevak qualification
कोणत्याही पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी त्या संबधित संस्थेने किंवा समितीने ठरवलेले काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच ग्राम सेवक बनण्यासाठी देखील काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि आता खाली आपण गरम सेवक बनण्यासाठी असणारे पात्रता निकष काय आहेत ते पाहूया.
- जर एखाद्या व्यक्तीला ग्राम सेवक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर ती व्यक्ती त्या भागातील रहिवासी असली पाहिजे तरच त्या व्यक्तीला ग्राम सेवक पदासाठी अर्ज करता येतो.
- जर एखाद्या व्यक्तीला ग्राम सेवक पदासाठी अर्ज करायचा असल्यास त्या व्यक्तीला वयाची आट देखील घातली आहे म्हणजेच ती संबधित व्यक्ती १८ ते ३५ या वयोगटातील असली पाहिजे आणि आरक्षित श्रेणीसाठी या अटीमध्ये थोडा फरक असेल.
- ग्राम सेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी त्या इच्छुक व्यक्तीने १२ वी पर्यंतचे शिक्षण तर चांगल्या गुणांनी पूर्ण केलेले असले पाहिजेच परंतु त्याने कोणत्याही पदवीचे शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून उतीर्ण झालेले असले पाहिजे.
- त्या व्यक्तीने पदवीच्या शिक्षणामध्ये कमीत कमी ५० टक्के गुण मिळवलेले असले पाहिजेत.
ग्रामसेवक कामे – functions
- ग्राम सेवकाची मुख्य जबाबदारी म्हणजे तो गावाच्या विकासासाठी जबाबदार असतो.
- त्याचबरोबर सरकारकडून आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तसेच लाभ हे गावातील लोकांच्या पर्यंत पोहचवणे तसेच त्यांना या योजनांच्या आणि लाभांच्या विषयी माहिती पुरवणे.
- तसेच गावामध्ये काही विकास कामे झाली असतील तर त्या विकास कामांचा खर्च हिशोब हा ग्राम सेवकांच्या मार्फत ठेवले जाते आणि त्याचबरोबर त्या खर्चाचा अहवाल बनवून तो सरकारला देण्याचे काम ग्राम सेवक करतो.
- ग्रामपंचायतीची गावपातळीवर असणारी सर्व कामे तो पाहतो.
- त्याचबरोबर हा सरकार आणि गावातील लोकांच्यामधील दुव्याचे काम करतो.
- पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आणि पाणी पुरवठा आणि पाणी साठवण्याचे स्त्रोत निर्जंतुक करणे हे देखील ग्राम सेवकाचे मुख्य काम असते.
- गावातील रस्ता, रुग्णालये आणि स्वच्छता, पाणी या विषयी असणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे हे देखील ग्राम सेवकाचे मुख्य कार्य आहे.
- त्या संबधित गावामधील सार्वजनिक मालमत्तेची स्वच्छता, निचरा आणि देखभाल करणे.
ग्रामसेवक बनण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे आणि ती संबधित व्यक्ती या पदासाठी ऑनलाईनप्रकारे अर्ज करू शकते आणि त्या संबधित व्यक्तीने या पदासाठी अर्ज केल्यानंतर त्या व्यक्तीला त्या संस्थेने आयोजित केलेली १०० गुणांची एक लेखी परीक्षा द्यावी लागते जी चांगल्या गुणांनी उतीर्ण झाल्यानंतर या पदावर नियुक्त केले जाऊ शकते.
आम्ही दिलेल्या gram sevak information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर ग्रामसेवक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gramsevak qualification या eligibility for gramsevak in maharashtra article मध्ये update करू, मित्रांनो हि gramsevak information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट