द्राक्षाची माहिती Grapes Information In Marathi

Grapes Information In Marathi द्राक्षे वेगवेगळ्या रंगाचे असतात. उदाहरणातून हिरवा, लाल, जांभळा (पर्पल) इ. या रंगाचे आहेत. आपण द्राक्षापासून जाम, जूस, जेली तसेच ड्रायफ्रुट मणुका सुद्धा तयार केली जातात. तसेच दारू  द्राक्षापासून तयार केली जाते. द्राक्षामध्ये मिनरल्स, विटामिन्स आणि एन्टीऑक्सिडेंटस तसेच बरेच पोषकत्व असतात. याचा वापर डोळ्यांची समस्या, कॅन्सर तसेच ह्रदयविकार याच्याविरोधात लढण्यासाठी मदत मिळते. द्राक्षामध्ये रेसवेरट्रोल हे मुख्य पोषक तत्त्व असते जे आरोग्याला फायदे मिळून देण्याचे कार्य करते. द्राक्षामध्ये फायबर आणि पोटेशियम असल्यामुळे डायबीटीज असणाऱ्या लोकांना याचा खूप फायदा होतो. (draksha chi mahiti Marathi)

grapes-information-in-marathi
द्राक्षांची माहिती

द्राक्षे विषयी माहिती  (Grapes Information In Marathi)

चला तर आपण एका स्वादिष्ट फलाबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात.

द्राक्षे खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Grapes)

१. कायम लोक विचार करतात कि द्राक्षामध्ये खूप शुगर असते, त्यामुळे डायबीटीज असणाऱ्या लोकांना खूप नुकसान होते. पण असे नाही आहे तर डायबीटीज असनाऱ्या लोकांना द्राक्षे खूप उपयोगी ठरतात कारण द्राक्षे आपल्या शरीरातील ब्लड शुगर चे लेवल कमी करण्यास उपयुक्त ठरते. यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतात.

२. ज्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर असतो त्या महिलांना द्राक्षे खाणे खूप फायद्याचे ठरते. ब्रेस्ट कॅन्सर थांबवण्यासाठी द्राक्षांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. याच्याबरोबर आपल्या ह्रदयाला सुद्धा द्राक्षचे सेवन खूप फायद्याचे ठरते.

३. जर आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमी दूर करणार असाल तर द्राक्षांचा जूस म्हणजे रस दररोज दैनदिन दोन चमचे मधासोबत प्यायले तर आपल्या शरीरामधील रक्ताची कमी नष्ट होते. द्राक्षामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन मात्रा वाढवायला मदत मिळते.

४. मायग्रेन म्हणजे त्रीव्र डोकेदुखी. जर तुम्हाला मायग्रेन झाला असेल तर द्राक्षांच्या रस पिणे खुप फायद्याचे ठरते. जर तुम्ही दररोज दैनदिन द्राक्षांचा रस पीत असाल तर तुम्हाला मायग्रेन पासून सुटका मिळू शकते.

द्राक्षे खाण्याचे नुकसान (Disadvantage Of Eating Grapes)

पण द्राक्षांचा अधिक सेवन आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. साईड इफेक्ट मध्ये पोट खराब होणे, वजन वाढणे इ. रोग होऊ शकतात. द्राक्षे लहान असतात त्यामुळे आपण जास्तच खात असतो. द्राक्षांचा एका पूर्ण कपामध्ये एकूण ६० कॅलरी असतात. द्राक्षांचा लहान आकार असल्यामुळे आपण जास्त खाण्याची शक्यता असते. आपण जर दररोज दैनदिन द्राक्षे खात राहिलो तर आपल वजन वाढण्याची शक्यता असते. द्राक्षामध्ये फायबर असल्यामुळे जास्त सेवनाने कब्ज होण्याची शक्यता असते. द्राक्षामध्ये सलिसीक्लिक एसिड असल्यामुळे पचन समस्या निर्माण होऊ शकते.

द्राक्ष पिक रोग नियंत्रण Vascular disease control

द्राक्षामध्ये तीन प्रकारचे रोग आहेत. ते खालीलप्रमाणे

1. ग्रेपवाइन फॅन लीफ (Grapevine Fan Leaf)

या विषाणूचे खूप वेगवेगळी लक्षणे आहेत. या विषाणूमुळे संक्रमित झालेल्या पानांचे रंग हिरवा किवा पिवळसर असतो. झाडांची पानेही एकदम चपटी होतात. ग्रेपवाइन फैनलीफ (Grape Vine Fan Leaf) विषाणू एक नेपो विषाणू आहे.

2. द्राक्षेचा पीयर्स रोग (Pierce’s Disease Of Grapes)

या विषाणूमुळे संक्रमित झालेली हिरवी पाने अचानक सुकून जातात. परंतु झाडांची देठ हिरवेच असतात. त्यानंतर पाने तपकिरी रंगाची होतात.

3. द्राक्षांना पावडरी बुरशी (Powdery Mildew of Grapes)

द्राक्षांच्या पानाला आणि मुळाना हा रोग होतो. लहान पानांच्या दोनी बाजूला थोडाफार पांढरा रंग येतो. त्यामुळे पाने बेरंग होतात.

द्राक्ष लागवड सल्ला Grape Planting aAdvice द्राक्ष बाग माहिती पुस्तक 

१. दोन रोपांमध्ये अंतर हे ५ फूट आणि दोन ओळीमध्ये अंतर १० फुट असे ठेवावेत.

२. आणि बागेसाठी Y (वाय) ही तारेची रचना ठेवावी. कारण ते बाग पसरण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे आपण ट्रक्टर किवा मशीनद्वारे फवारणी करू शकतो. आणि तसेच या आकारामुळे पूर्ण बागेमध्ये सूर्यप्रकाश मिळतो आणि रोगराई नष्ट होण्यास मदत मिळते.

३. Y (वाय) या तारेजवळ वेल आल्यास त्याचे कलम करावे (Drapery pen). आणि त्याच्या दोन काड्या तयार करावेत व दोनी बाजूला पसरुन घ्याव्यात. यामुळे झाडाला योग्य आकार मिळतो.

४. अशा प्रकारे आपण झाडांची योग्य प्रकारे रचना करून घ्यावी. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची लागवड घ्यायला अडचण येणार नाही.

द्राक्ष फवारणी वेळापत्रक (Grape spray schedule)

१. फवारणी साठी एकरी 300 लीटर पाणी फेल काढेपर्यंत व 400 लीटर त्यानंतर वापरणे.

२. पानाच्या रसचा ब्रिक्स प्रत्येक आठवड्याला तपासणी करून नोंद करावी ब्रिक्स १२ च्या आत असल्यास त्यानुसार योग्य फवारणी घेणे गरजेचे आहे.

३. बागेतील तापमान म्हणजे (Temperature),  अद्रता म्हणजे (Humidity) व पाणे सकाळची  पाऊस आणि दव यामुळे किती वेळ (मिनिट/ तास ) ओली राहतात ह्याची प्रती दिवस नोंद करून घ्यावी.

४. रोगाचा प्राधूरभाव कमी करण्यासाठी व वेलीची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि द्राक्षांचे फायदे तोटे आणि त्याची लागवड कशी करावी त्याचबरोबर रोग नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना करावी हे सर्व या लेखातून आपल्याला भेटले आहे. grapes information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about grapes in Marathi हा लेख कसा वाटला व अजून द्राक्षांबद्दल काही राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!