GST Information in Marathi जीएसटी ची माहिती जीएसटी (gst) म्हणजे वस्तू आणि सेवा कर (goods and service tax), हा एक अप्रत्यक्ष कर आहे जो एक्साईज ड्युटी, सर्व्हीसेस टॅक्स, व्हॅट यांचा पर्याय म्हणून सरकारने जीएसटी हा एक कर कायदा निर्माण केला आहे. जीएसटी हि एक देश एक कर अशी संकल्पना आहे. हा कर विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या वर विक्रेता खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या वर लागू करतो आणि विक्रेता तो कर सरकारमध्ये जमा करतो. इ. स. २००० मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी वस्तू आणि सेवा कर भारतामध्ये प्रथम लागू केला होता.
त्यानंतर तो अंमल करण्यासाठी खूप दिवस गेला. या कर कायद्याबद्दल अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आणि त्यावर अहवाल तयार करण्यात आला आणि मग तो केंद्र सभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सादर केल्यानंतर हा अहवाल २०१७ मध्ये मंजूर झाला आणि २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) सर्व भारत देशामध्ये लागू झाला.
जीएसटी ची माहिती मराठी – GST Information in Marathi
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) म्हणजे काय ? – what is gst in marathi
- वस्तू आणि सेवा कर हा बहुतेक घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वर आणि सेवांवर आकाराला जाणारा कर आहे. हा कर शक्यतो ग्राहक खरेदी करत असलेल्या वस्तुवर कर लावून तो ग्राहकाकडूनच घेतला जातो पण वस्तू आणि सेवांची विक्री करणाऱ्या व्यवसायांकडून तो सरकारला दिला जातो.
- हा कर अंतिम विक्रेता किंमतीत समाविष्ट करतो आणि तो ग्राहकांच्या कडून घेवून सरकारला पाठवला जातो.
- वस्तू आणि सेवा ( goods and service tax ) हा उपभोगासाठी देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांच्या वर आकाराला जाणारा कर आहे.
- नक्की वाचा: नेट बँकिंग बद्दल माहिती
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) याची वैशिष्ट्ये – goods and service tax features
- जीएसटी मूळ-आधारित कर आकारण्याच्या विद्यमान तत्त्वाच्या विरूद्ध गंतव्य-आधारित उपभोग कर आकारण्याच्या तत्त्वावर आधारित आहे.
- जीएसटी अल्कोहोल वगळता सर्व वस्तू आणि सेवांवर लागू होईल.
- तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जीएसटी आकाराला जातो आणि याव्यतिरिक्त या उत्पादनांवर सेंट्रल एक्साईज ड्यूटी लावण्याचे अधिकार केंद्राकडे असतात.
- वस्तूंच्या निर्मितीवर किंवा वस्तूंच्या विक्रीवर किंवा सेवांच्या तरतूदीनुसार सध्याच्या संकल्पनेच्या विरूद्ध वस्तू किंवा सेवांच्यावर जीएसटी लागू केलेला असतो.
- जीएसटी क्रूड, पेट्रोल, डिझेल, एटीएफ आणि नैसर्गिक गॅस या पाच पेट्रोलियम उत्पादनावर देखील लागू केला आहे.
महत्वाचे मुद्दे
- वस्तू आणि सेवा यावर सामान्यता देशभरामध्ये एकच दर म्हणून कर म्हणून आकाराला जातो.
- वस्तू व सेवा ( जीएसटी ) हा जगातील बहुतेक देशांद्वारे वापरला जाणारा सामान्य कर आहे.
- नक्की वाचा: बँकेची माहिती
भारत देशामधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) याची सुरुवात आणि प्रवास
वस्त आणि सेवा कर (goods and service tax) याची देशामधील अंमलबजावणी एक ऐतिहासिक चाल आहे. हा एक अप्रत्यक्ष कर आहे जो एक्साईज ड्युटी, सर्व्हीसेस टॅक्स, व्हॅट यांचा पर्याय म्हणून सरकारने जीएसटी हा एक कर कायदा निर्माण केला आहे. भारतामध्ये वस्तू आणि सेवा कर हा लागू करण्याचा प्रथम विचार अटल बिहारी वाजपेयी यांनी ज्यावेळी त्यांचे सरकार होते.
त्यावेळी त्यांनी इ. स. २००० मध्ये सुचवला होता आणि मग त्यानंतर राज्याच्या अर्थमंत्र्यांनी जीएसटीची रचना करण्यासाठी एक सशक्त समिती नेमण्यात आली होती. केंद्र आणि राज्यातील प्रतिनिधींनी विविध गोष्टींचे परीक्षण केले आणि आंतरराज्य पुरवठा कर आकारणी व सेवाकर आकारणी याबद्दल अहवाल तयार करण्याची विनंती केली. या समितीचे अध्यक्ष असीम दासगुप्ता हे होते जे पश्चिम बंगालचे अर्थमंत्री होते.
त्यानंतर २००६ मध्ये अर्थमंत्र्यांनी २०११ पासून जीएसटी कायदा लागू करावा असा प्रस्ताव मांडला. २०१२ मध्ये स्थायी समितीने जीएसटी संदर्भात चर्चा सुरु केली आणि त्यानंतर एक वर्षानंतर आपला अहवाल सादर केला. २०१४ मध्ये तत्कालीन नवीन झालेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत विधेयकाची नव्याने ओळख करून दिली आणि लगेच पुढच्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले.
परंतु हा कायदा राज्यसभेमध्ये संमत झाला नाही त्यामुळे या कायद्याची अंमल बजावणी करण्यासाठी वेळ झाला. २०१६ मध्ये हा कायदा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पास करण्यात आला आणि त्याचबरोबर भारताच्या राष्ट्रपतींनी देखील संमत्ती दिली. २०१७ मध्ये लोकसभेत पुरवणी जीएसटी बिले मंजूर झाली तसेच मंत्रीमंडळाने त्याला अनुमती दिली. त्यानंतर राज्यसभेने १ पूरक जीएसटी बिले आणि १ जुलै २०१७ मध्ये लागू केलेली नवीन कर प्रणाली मंजूर केली.
- नक्की वाचा: PPF बद्दल माहिती
जीएसटीचे घटक
या प्रणाली अंतर्गत तीन कर लागू आहेत आणि ते म्हणजे सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी.
- केंद्रीय वस्तू व सेवा कर (सी जीएसटी म्हणजे काय) : केंद्र सरकारकडून इंट्रा स्टेट विक्रीवर जमा केलेला कर (उदा. महाराष्ट्रात होणारा व्यवहार)
- राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) : राज्य सरकारकडून इंट्रा स्टेट विक्रीवर जमा केलेला कर (उदा. महाराष्ट्रात होणारा व्यवहार)
- एकात्मिक वस्तू व सेवा कर (आयजीएसटी) : हा केंद्र सरकारकडून आंतरराज्यीय विक्रीसाठी (उदा. महाराष्ट्र ते तामिळनाडू) विक्री कर गोळा केला जातो.
- केंद्रशासित प्रदेश वस्तू व सेवा कर (यूटीजीएसटी) : यूटीजीएसटी देशातील कोणत्याही केंद्र शासित प्रदेशात उत्पादने व सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जातो. अंदमान निकोबार बेटे, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप आणि चंदीगड. सीजीएसटी बरोबर यूटीजीएसटी आकारले जाते.
जीएसटी केंद्राद्वारे सध्या आकारण्यात आलेले आणि वसूल केलेले खालील कर
- अबकारी अतिरिक्त कर (विशेष महत्त्व असलेल्या वस्तूवर वस्तू आणि सेवा कर आकाराला जातो).
- कस्टमचे अतिरिक्त कर.
- कस्टमची विशेष अतिरिक्त शुल्क (एसएडी).
- केंद्रीय उत्पादन शुल्क.
- उत्पादन शुल्क (औषधी व शौचालय तयारी).
- उत्पादन शुल्क (वस्त्र व वस्त्र उत्पादने) चे अतिरिक्त कर.
जीएसटी मध्ये जमा होणारे राज्यास्थरीय कर
- खरेदी कर.
- लक्झरी कर.
- जाहिरातींवरील कर.
- राज्य व्हॅट.
- वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याशी संबंधित आतापर्यंत राज्य उपकर आणि अधिभार कर.
- प्रवेश कर (सर्व फॉर्म).
- करमणूक कर.
- लॉटरी आणि जुगार यावरील कर.
- नक्की वाचा: क्रेडीट कार्डची माहिती
जीएसटी नियम मराठी – gst law in marathi
- वस्तू आणि सेवांचा आंतरराज्य करपात्र पुरवठा करणार्या कोणत्याही व्यक्तीस जीएसटी लागू होतो.
- आर्थिक वर्षात २० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची वस्तू आणि सेवा पुरविणार्या प्रत्येक व्यक्तीस जीएसटी भरणे आवश्यक आहे कारण १० पर्यंत मर्यादा आहे.
- एकत्रीकरण करणारे जे त्यांच्या स्वत: च्या ब्रँड नावाने सेवा पुरवतात.
- नोंदणीकृत करपात्र व्यक्तीव्यतिरिक्त, भारताबाहेरील ठिकाणाहून ऑनलाइन माहिती व डेटाबेस प्रवेश किंवा पुनर्प्राप्ती सेवा पुरविणारी व्यक्ती.
- सामान्य करपात्र व्यक्तीला जीएसटी लागू होतो.
- इतर करपात्र व्यक्तीच्या वतीने वस्तू पुरवठा करणारी व्यक्ती ( उदाहरण – एजंट ).
- अनिवासी करपात्र व्यक्तीला जीएसटी लागू होतो.
- ई-कॉमर्स ऑपरेटरद्वारे ब्रांडेड सेवा व्यतिरिक्त वस्तू आणि सेवा पुरवणार्या प्रत्येक व्यक्तीस जीएसटी लागू होतो.
जीएसटीचा दर – rate of gst
जीएसटी अंतर्गत चार दराची रचना जी अत्यावश्यक वस्तूंवर कमी दरात ५% सूट देते किंवा लागू करते आणि करावरील उच्च दर २८% आहे. कराचे इतर स्लॅब १२% आणि १८% आहेत. जीएसटीपूर्व काळात, व्हॅट, एक्साईज, सीएसटी यामुळे ग्राहकांना ३१% कर द्यावा लागत होता.
वरील सर्व मजकूर पाहून आपणास थोडक्यात जीएसटी विषयी उपयुक्त अशी सर्व माहिती मिळाली असेलच. gst information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच gst return information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही gst in marathi जीएसटी विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या gst meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट