गुलझारीलाल नंदा माहिती Gulzarilal Nanda Information in Marathi

Gulzarilal nanda information in marathi गुलझारीलाल नंदा माहिती मराठी, आज आपण या लेखामध्ये भारतातील एक प्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी म्हणून ओळखले जाणारे गुलझारीलाल नंदा यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. गुलझारीलाल नंदा यांचा जन्म हा ४ जुलै १८९८ मध्ये पंजाब प्रांतातील सियालकोट या ठिकाणावरील खत्री जातीच्या पंजाबी हिंदू कुटुंबामध्ये झाला आणि त्यांचा जन्म हा ब्रिटीश भारतीय राजवटीमधील आहे. गुलझारीलाल नंदा यांच्या वडिलांचे नाव बुलाकी राम नंदा आणि आईचे नाव ईश्वरी देवी नंदा असे होते.

गुलझारीलाल नंदा यांनी त्यांचे शिक्षण हे लाहोर, आग्रा, अमृतसर अश्या वेगवेगळ्या शहरातून केले. गुलझारीलाल नंदा यांनी भारतीय राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या उल्लेखनीय राजकीय नेत्यांच्यापैकी एके आहेत आणि विशेषता गुलझारीलाल नंदा याना अंतरिम पंतप्रधान म्हणून ओळखले जाते.

गुलझारीलाल नंदा यांना शिक्षक, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जात होते आणि त्यांनी त्याचे संपूर्ण जीवन हे देशासाठी समर्पित केले होते आणि त्यांनी भारत देशाचे पंतप्रधान म्हणून खूप कमी काळ कार्यभार पहिला असला तरी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमधील योगदान हे निर्विवाद आहे. चला तर खाली आपण गुलझारीलाल नंदा यांच्याविषयी सविस्तर माहिती घेवूया.

gulzarilal nanda information in marathi
gulzarilal nanda information in marathi

गुलझारीलाल नंदा माहिती मराठी – Gulzarilal Nanda Information in Marathi

नावगुलझारीलाल नंदा
जन्म४ जुलै १८९८
जन्म ठिकाणपंजाब प्रांतातील सियालकोट
वडिलांचे नावबुलाकी राम नंदा
आईचे नावईश्वरी देवी नंदा
ओळखशिक्षक, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक

प्रारंभिक जीवन आणि वैयक्तिक माहिती – information about gulzarilal nanda in marathi

गुलझारीलाल नंदा हे एक राजकारणी होते आणि यांचा जन्म पंजाब प्रांतातील सियालकोट या ठिकाणी ४ जुलै १८९८ मध्ये झाला आणि यांचा जन्म हा ब्रिटीश भारतीय राजवटीमधील असून त्यांचा जन्म हा खत्री जातीच्या पंजाबी हिंदू कुटुंबामध्ये झाला होता. गुलझारीलाल नंदा यांच्या वडिलांचे नाव बुलाकी राम नंदा आणि आईचे नाव ईश्वरी देवी नंदा असे होते आणि. गुलझारीलाल नंदा यांनी त्यांचे शिक्षण हे लाहोर, आग्रा, अमृतसर अश्या वेगवेगळ्या शहरातून केले.

गुलझारीलाल नंदा यांची करियरची वाटचाल – career

गुलझारीलाल नंदा यांनी त्यांचे औपचारिक शिक्षण हे लाहोर, आग्रा आणि अमृतसर अश्या वेगवेगळ्या शहरांच्यामध्ये केले आणि मग ते अलाहाबाद या ठिकाणी असणाऱ्या विद्यापीठामध्ये संशोधन विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. १९२०-१९२१ या काळामध्ये गुलझारीलाल नंदा यांनी मजुरांच्या समस्या या मुख्य विषय घेतला आणि त्यांनी त्यांचे संशोधन कार्य पूर्ण केले.

त्यानंतर त्यांनी नॅशनल कोलेज ऑफ बॉम्बे या ठिकाणाहून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरु केली. तसेच त्यांनी १९२२ ते १९४६ या काळामध्ये अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन चे सचिव म्हणून काम केले त्याचबरोबर त्यांनी १९३७ ते १९३९ या काळामध्ये त्यांनी कामगार आणि उत्पादन शुल्क विभागाचे सचिव म्हणून काम केले.

गुलझारीलाल नंदा यांची कारकीर्द

  • त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात हि अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुरुवात केली.
  • त्यांच्या काळामध्ये भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते आणि ब्रिटिशांना भारताच्या बाहेर घालवण्यासाठी भारतातील अनेक लोकांनी चळवळी चालू केल्या होत्या आणि गुलझारीलाल नंदा यांनी इंग्रजांच्या विरुध्द सुरु असलेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रीयपणे सहभाग घेतला आणि त्यावेळी त्यांच्या प्राध्यापक या पेशाला पूर्णविराम लागला आणि त्यांनी तेथूनपुढे त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभाग घेतला.
  • गुलझारीलाल नंदा हे महात्मा गांधी यांचे अनुयायी होते आणि त्यांनी महात्मा गांधी यांच्या सत्याग्रह चळवळीमध्ये देखील सक्रीयपणे सहभाग घेतला होता.
  • ते सतत स्वातंत्र्य चळवळी मध्ये भाग घेत होते आणि त्यामुळे १९३२ मध्ये त्यांनी तुरुंगवास भोगूनही पुन्हा एकदा त्यांनी स्वातंत्र्य चाळवलीमध्ये भाग घेतला आणि १९४२ मध्ये इंग्रज सरकारने दुसऱ्यांदा गुलझारीलाल नंदा यांना अटक केले आणि पुढे ते २ वर्ष म्हणजेच १९४४ पर्यंत तुरुंगात ठेवण्यात आले.
  • गुलझारीलाल नंदा हे काही दिवसांनी मुंबई विधानसभेचे सदस्य बनले आणि यांनी मुंबई शहराच्या प्रगती आणि विकासाला गती देण्याची महत्वाची भूमिका बजावली..
  • ते १९४६ ते १९५० या काळामध्ये ते मुंबई सरकारचे कामगार मंत्री बनले आणि त्यांनी राज्य विधानसभेमध्ये कामगार विवाद विधेयकाचे महत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कस्तुरबा मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्ट, बॉम्बे हाऊसिंग बोर्डाचे अध्यक्ष, हिंदुस्थान मजदूर सेवक संघाचे सचिव अश्याप्रकारे वेगवेगळ्या संस्थांच्यामध्ये त्यांनी आपली कामगिरी बजावली.
  • १९४७ मध्ये गुलझारीलाल नंदा यांनी जिनिव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेमध्ये भाग घेतला आणि त्या ठिकाणी भारताचे प्रतिनिधित्व केले.
  • १९५० नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुलझारीलाल नंदा यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला तसेच १९५१ मध्ये नंदा यांची नियोजन मंत्री म्हणून निवड केली. तसेच ते भारत सरकारचे सिंचन आणि उर्जा मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.
  • तसेच त्यांनी १९५९ मध्ये पुन्हा जिनिव्हा या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
  • ते १९६२ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा निवडून आले आणि १९६२ ते १९६३ या कामधे ते केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री आणि १९६३ ते १९६६ या काळामध्ये गृहमंत्री म्हणून राज्यकारभार सांभाळला.
  • १९६४ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यानंतर त्यावेळी भारताला नेतृत्वाची गरज होती आणि त्यावेळी गुलझारीलाल नंदा यांनी २७ मे १९६४ ते ९ जून १९६४ म्हणजेच १३ दिवस भारताचे अंतरिम पदभार स्वीकारला आणि मग नंतर लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाल्यानंतर गुलझारीलाल नंदा यांनी अंतरिम पदाचा राजीनामा दिला.

पुरस्कार – awards

गुलझारीलाल नंदा यांना त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीसाठी भारत सरकारने १९९७ मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते.

गुलझारीलाल नंदा यांचा मृत्यू – death

गुलझारीलाल नंदा यांचा मृत्यू वयाच्या ९९ व्या वर्षी म्हणजे १५ जानेवारी १९९८ मध्ये झाला.

आम्ही दिलेल्या gulzarilal nanda information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुलझारीलाल नंदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gulzarilal nanda mahiti in marathi या pm gulzarilal nanda information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about gulzarilal nanda in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nanda kumar gulzarilal information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!