संत गुरुनानक यांची माहिती Guru Nanak Information in Marathi

Guru Nanak Information in Marathi – Guru Nanak Mahiti Marathi गुरुनानक यांची माहिती गुरूनानक यांच्यामध्ये अगदी त्यांच्या लहानपणापासूनच तीक्ष्ण बुद्धीमत्तेचे चिन्हे दिसत होती. लहानपणापासून ते सांसारिक गोष्टींकडे उदासीन नजरेने पाहायचे. या कारणामुळे, त्यांच्या वडिलांनी त्यांना पंडित हरदयाल यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी पाठवले, पण पंडितजी बालवयीन असलेल्या नानकांच्या अनेक प्रश्नांनी आश्चर्यचकीत व्हायचे. तरीदेखील, पंडितजी आवडीने त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत असत. गुरुनानक यांचे ज्ञान पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की देवाने जगाच्या कल्याणासाठी नानक यांना जगामध्ये पाठविले आहे.

गुरूला ज्ञात झालेल्या या महान शिष्याचा जन्म रावी नदीच्या काठी वसलेल्या तलवंडी नावाच्या गावात कार्तिकी पौर्णिमा मेवर खतरीकुल येथे झाला. तलवंडी हे ठिकाण सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर आहे. काही विद्वान लोक गुरुनानक यांची जन्मतारीख १५ एप्रिल १४६९ मानतात आणि यादिवशी खूप उत्साहाने गुरुनानक यांची जयंती साजरी करतात.

guru nanak information in marathi
guru nanak information in marathi

गुरुनानक यांची माहिती – Guru Nanak Information in Marathi

पूर्ण नाव गुरूनानक
जन्म१५ एप्रिल १४६९
जन्मगावपाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील तलवंडी हे ठिकाण
महानिर्वाण७ सप्टेंबर, १५३९

संत गुरु नानक माहिती मराठी

बालपण

प्रचलित तारीख कार्तिक पूर्णिमा यामध्ये म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यांमध्ये साधारणतः दिवाळीनंतर जवळजवळ पंधरा दिवसांनी येते. गुरुनानक यांच्या वडिलांचे नाव ‘मेहता काळू चंद खत्री’ असे होते, तर आईचे नाव ‘त्रिप्ता देवी’ असे होते. तसेच, त्यांच्या बहिणीचे नाव नानकी असे होते.

गुरुनानक यांचा जन्मदिवस संपुर्ण भारत देशात दरवर्षी ‘गुरुनानक जयंती’ म्हणून कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो. खरंतर मित्रहो, गुरुनानक देवजी हे एक तत्कालीन प्रसिध्द कवी होते. निसर्गाशी एकरूप व एकमग्न होऊन ते कवितेच्या ओळी स्वतःच्या मनामध्ये कोरत असतं.

निसर्गाशी एकरूप होऊन गुरुनानक  कविता रचत असल्यामुळे, त्यांच्या उत्कट आणि कोमल हृदयातून व्यक्त झालेली व्यक्ती भावना ही अनन्यसाधारण असायची. गुरुनानक कविता रचताना बहतानिर या भाषेचा उपयोग करत असतं. 

या भाषेमध्ये पर्शियन, मुलगानी, पंजाबी, सिंधी, खारी बोलली आणि अरबी भाषेचे काही शब्द आत्मसात केले गेले आहेत. गुरुनानक देवजी हे शिखांचे पहिले गुरू होते. खरंतर, गुरूनानक यांचे अनुयायी त्यांना नानक, नानक देवजी, बाबा नानक आणि नानक शहा अशा अनेक नावांनी ओळखत होते.

एकदा गुरुनानक यांना मौलवी कुतुबुद्दीन यांच्यासोबत अभ्यासासाठी एकत्रित पाठविण्यात आले होते, परंतु नंतर मौलवी देखील नानकांच्या आश्चर्यचकित करणाऱ्या प्रश्नांमुळे अनुत्तरीत राहिले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानक घराबाहेर पडले आणि दूरच्या देशात निघून गेले, ज्यामुळे सामान्य उपासना स्थिर करण्यात पुढे त्यांना खूप मदत झाली.

त्यानंतर मात्र त्यांनी आपला संपूर्ण  वेळ आध्यात्मिक चिंतन आणि सत्संगात खर्ची घातला. गुरुनानक यांच्या बालपणात गावातले लोक त्यांना एक दिव्य व्यक्तिमत्त्व मानत होते. गुरुनानक यांच्या  लहानपणापासूनच त्यांच्या गावातील लोक त्यांचा मनापासून आदर करत होते; गुरूनानक यांचा आदर करणाऱ्यांमध्ये त्यांची बहीण नानकी आणि गावचे शासक राय बल्लुर हे दोघे प्रमुख होते. 

जीवन

नानकदेवांच्या जीवनाशी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. त्यांच्या या आख्यायिकेमध्ये त्यांनी दाखवलेले अनेक चमत्कार देखील समाविष्ट आहेत. गुरुनानक यांना ज्यावेळी साक्षात्कार झाला, त्यानंतर त्यांनी इसवी सन १४९७ पासून आयुष्यातील चोवीस वर्षे दूरवरच्या चार यात्रा करण्यात व्यतीत केली.

या यात्रांमध्ये त्यांनी विभिन्न धर्मांच्या अधिकारी व्यक्तींशी, प्रमुखांशी, साधुसंतांशी, फकिरांशी, योग्यांशी तसेच, सूफींशी चर्चा, विचारविनिमय आणि संवाद केला. सगळ्यांसोबत भिन्न विषयांवर विचारविनिमय करून त्यांनी विविध चालीरीती, रूढी, परंपरा आणि श्रद्धांचा परिचय करून घेतला आणि समाजातील अंधश्रध्दा, दुष्ट रूढींविरुद्ध लोकांमध्ये प्रचार करून या क्रूर प्रथांच्या निर्मूलनासाठी प्रयत्‍न देखील चालू ठेवले. 

तळवंडी येथे निवास करणारा मर्दाना नावाचा एक मुसलमान गुरुनानक यांचा पहिला अनुयायी होता. गुरुनानक देवजी जेंव्हा अवघ्या सोळा वर्षांचे होते, तेंव्हा त्यांचा विवाह गुरुदासपूर जिल्ह्यातील लाखोकि नावाच्या एका गावात राहणाऱ्या सुलेखा नावाच्या कन्येशी झाले होते. लग्नानंतर गुरुनानक यांना वयाच्या ३२ व्या वर्षी  पहिला मुलगा झाला. पहिल्या मुलाचे नाव त्यांनी श्रीचंद असे ठेवले.

श्रीचंद यांच्या जन्मानंतर गुरुनानक यांना चार वर्षांनी दुसरा मुलगा झाला, त्याचे नाव त्यांनी लक्ष्मीदास असे ठेवले. आपल्या दोन मुलांच्या जन्मानंतर गुरुनानक यांनी इसवी सन १५०७ मध्ये आपल्या कुटुंबाचे ओझे सोडले आणि सांसारिक आयुष्याचा त्याग केला.

त्यानंतर, गुरूनानक मर्दाना, लान्हा, बाळा व रामदास या त्यांच्या चार सोबत्यांसोबत तीर्थयात्रेला निघून गेले. गुरुनानक यांच्या दोन पुत्रांपैकी श्रीचंद हे काही काळानंतर उदासी पंथाचे संस्थापक झाले. मित्रहो, गुरूनानकांनी समाजाला दिलेला सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे ‘ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे’ हा होता. 

त्यांनी समाजाला दिलेला हा अमूल्य संदेश आजदेखील अजरामर आहे. आपला कर्ता, धर्ता आणि पिता सारे काही परमेश्र्वरच आहे, त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांसोबत प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे, असा प्रेमळ अर्थ त्यांनी दिलेल्या शिकवणीचा  आहे.

शीख धर्माची शिकवण

गुरुनानक देवजी यांनी आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी तळ ठोकून मुक्काम केला. त्यावेळी, त्यांनी विविध भागांमध्ये  सामाजिक कुप्रथा यांना कडाडून विरोध केला. त्यांनी आपल्या जीवनाचा शेवटचा काळ पाकिस्तानच्या करतारपुरात घालविला. खरंतर, कर्ता पुरुष हे शिखांचे पवित्र धार्मिक स्थळ आहे.

दिनांक २२ सप्टेंबर १५३९  रोजी गुरुनानक यांचे निधन झाले, परंतु त्यांनी आपल्या मागे ‘जपो, किरत करो आणि वांडा चाखो’ या आपल्या जीवनातील तीन मूलभूत तत्वांना शीख धर्माच्या अनुयायांसाठी सोडून दिले. खरंतर, सर्वसामान्यांमध्ये देव आणि धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरूनानक यांचे चिंतन धर्माच्या शाश्वत आणि सत्य मुल्यांचे मूळ होते.

मानवतावादावर दृढ श्रद्धा असलेले, जात-धर्म यापलीकडे देखील जाऊन एकतेची शिकवण आणि ‘कलि महि राम नाम सारु’ चा उपदेश सर्व जगाला देणारे गुरू नानकदेव खरंच किती श्रेष्ठ होते! 

मित्रहो, कार्तिक पौर्णिमेला येणारी गुरू नानकदेव यांची जयंती ‘प्रकाश पर्व’ या दुसऱ्या नावानेही साजरी केली जाते. परमेश्वर हा एक आहे आणि त्याच्या दारात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. शिवाय, देवासाठी सगळे लोक समान असतात. त्याच्यासाठी कोणीही स्पृश्य अथवा अस्पृश्य नसतो, अशा प्रकारच्या अमूल्य तत्वांवर गुरुनानक यांचा ठाम विश्वास होता, म्हणूनच त्यांनी शीख धर्माची स्थापना केली

ते शिखांचे पहिले गुरू बनले. गुरूनानकांच्या जयंतिदिवशी सर्व  शीख भाविक एकत्र येऊन सर्वांसाठी जेवण बनवतात. यामध्ये, हजारो भाविक लंगरमध्ये पोटभर जेवतात. कारण, लंगरमध्ये गरीब, श्रीमंत, उच्च-निच्च असा कोणताही भेदभाव नसतो.

‘देवाच्या दारी सगळेच सारखे असतात’ या भावनेवर त्यांचा खूप विश्वास असतो. हिंदु-मुस्लिम हे भेद खरे नसून सर्वजण प्रथम मानव आहेत व ते सर्व त्या एकमेव परमेश्वराची लेकरे देखील आहेत, असे गुरुनानक लोकांना त्यांच्या शिकवणीच्या वेळेला नेहमी सांगत असतं. 

मृत्यू

मर्दाना हा नानकदेवांचा पहिला अनुयायी नानकदेवांच्या भजनात रबाब नावाचे वाद्य वाजवून त्यांना साथ देत असे. नानकदेवांचा आवाज हा खूप मधुर होता, शिवाय गुरुनानक यांना संगीताचेही चांगले ज्ञान होते. स्वराचित उत्स्फूर्त भजने ते रागदारीत आपल्या मधुर आवाजात आळवीत असतं.

त्यांची ईश्वरभक्तीने ओथंबलेली भजने ऐकण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणहून मोठ्या गर्दीने लोक जमतं असतं. गुरुनानक यांचा सकाळ-संध्याकाळचा वेळ कीर्तन, भजन, निरूपण व धर्मोपदेश यांत कधी व्यतीत व्हायचा हे त्यांनाही कळतं नसायचं. आयुष्याच्या शेवटच्या वाटेवर असताना, त्यांनी आपले उर्वरित आयुष्य आपल्या कुटुंबियांसमवेत व अनुयायांसमवेत व्यतीत केले. 

मृत्युसमय जवळ येताच त्यांनी त्यांचा पट्टशिष्य भाई लेहणा याचे अंगद असे नामकरण करून त्याला आपले वारस नेमले. मित्रहो, याठिकाणी ‘अंगद’ या शब्दाचा अर्थ स्वतःच्या शरीराचा भाग असा होतो.

इसवी सन १५३९ मध्ये आपली ज्योती अंगददेव यांच्या देहात ठेऊन गुरुनानक यांनी देहत्याग केला. त्यावेळी उपस्थित असलेल्या त्यांच्या हिंदू आणि मुसलमान अनुयायांनी त्यांच्या मृत देहावरील चादर अर्धी-अर्धी वाटून घेतली व आपापल्या धर्मांनुसार तिचा अंत्यसंस्कार केला. शेवटी, मध्यभागी एक आडवी भिंत उभारून दोन्ही समाजांनी गुरुनानक यांचे कर्तारपूर याठिकाणी स्मारक देखील उभारले.     

                   –  तेजल तानाजी पाटील

                        बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या guru nanak information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर संत गुरु नानक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about guru nanak in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि guru nanak dev information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये guru nanak jayanti information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!