हरनाज कौर संधू मराठी माहिती Harnaaz Sandhu Information in Marathi

Harnaaz Sandhu Information in Marathi हरनाज कौर संधू मराठी माहिती “मूर्ती लहान पण कीर्ती महान” मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे तो सोशल मीडियावरील सध्या चर्चेत असणारा एक हॉट टॉपिक आहे. सोशल मीडियावर सर्वत्र सध्या मिस यूनिवर्स २०२१ ची चर्चा चालू आहे आणि या वर्षीच इतकं मोठं टायटल जिच्या पदरात पडलं ती एक भारतीय महिला आहे. ग्रेट मॉडेल, फिटनेस क्वीन आणि एक उत्कृष्ट अभिनेत्री पंजाबी मुंडी हरनाज़ सिंधू यांनी मिस यूनिवर्स २०२१ चा ताज पटकावला आहे. २०२१ मध्ये आयोजित केलेल्या इजरायल येथील युनिव्हर्स पेजेंट मध्ये भारतीय महिला हरनाज़ संधू यांनी या वर्षीचं मिस युनिव्हर्स २०२१ टायटल जिंकलं आहे.

हे टायटल भारताला तब्बल २१ वर्षांनी मिळालं आहे. त्यामुळे ही बातमी भारतासाठी खूपच कौतुकास्पद आहे. आजच्या लेखामध्ये आपण हरनाज़ संधु यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

harnaaz sandhu information in marathi
harnaaz sandhu information in marathi

हरनाज कौर संधू मराठी माहिती – Harnaaz Sandhu Information in Marathi

पूर्ण नाव (Name)हरनाज़ संधु
जन्म (Birthday)३ मार्च २००२
जन्म गाव (Birth Place)पंजाब प्रांतातील चंदिगड
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)मिस यूनिवर्स २०२१

जन्म व वैयक्तिक जीवन

हरनाज़ संधु यांचा जन्म भारताच्या पंजाब प्रांतातील चंदिगड येथील आहे. ३ मार्च २००२ रोजी हरनाज़ संधु यांचा जन्म झाला. त्या चंदीगडच्या रहिवासी आहेत. चंदीगडच्या एका सिक कुटुंबा मध्ये त्यांचा जन्म झाला. त्या फक्त २१ वर्षाच्या आहेत. हरनाज़ कौर संधु हे त्यांचं संपूर्ण नाव आहे. हरनाज़ यांनी आपले प्राथमिक शिक्षण शिवालिक पब्लिक स्कूल चंदिगड येथून केलं.

पुढे ग्रॅज्युएशन साठी त्यांनी गव्हर्मेंट कॉलेज फॉर गर्ल्स चंदीगड येथून ग्रॅज्युएशन शिक्षण घेतलं. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांनी एम.ए ही पदवी घेतली. त्या एक उत्कृष्ट मॉडेल आणि ॲक्ट्रेस आहेत पंजाब मधील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

हरनाज़ संधु यांना एडवेंचर गेम्स खूप पसंद आहेत. त्याशिवाय त्यांना हॉर्स रायडिंग आणि स्विमिंग व ट्रॅव्हलिंग करन देखील आवडतं. हरनाज़ म्हणते की, मी मला आवडणारा प्रत्येक पदार्थ खाते परंतु मी वेळेमध्ये वर्कआउट देखील करते.

मिस यूनिवर्स २०२१

हरनाज़ सुद्धा आधी एका सामान्य स्त्रीचे जीवन जगत होत्या. परंतु या वर्षी त्यांनी आपल्या कौशल्यांनी मिस युनिव्हर्स २०२१ हा किताब जिंकला आहे. हरनाज़ यांना लहानपणापासूनच एक सुंदर मॉडेल होण्याची इच्छा होती. म्हणूनच त्या वेगवेगळ्या मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभागी व्हायच्या. त्या एक सुंदर अभिनेत्री देखील आहेत त्यांनी अनेक वेगवेगळ्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

हरनाज़ यांचं आत्ताच वय एकवीस वर्ष आहे परंतु जेव्हा त्या किशोरवयात होत्या तेव्हापासूनच त्यांनी फॅशन मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. त्या बऱ्याच जिल्हा स्तरावरील स्पर्धा जिंकल्या देखील आहेत त्यातून त्यांना आत्मविश्वास मिळाला. हरनाज़ संधु यांनी आपल्या मॉडलिंग करियर वर पाऊल ठेवत त्यांनी ॲक्टींग फिल्ड मध्ये देखील पदार्पण केलं.

‘यारा दियां पू बारा’ व ‘बाई जी कुटृॉंगे’ या दोन चित्रपटांमध्ये हरनाज़ संधु यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले आहेत. २०१७ साली टाइम्स फ्रेश बँक सह तिने सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. इतकच नाही तर तिने याच वर्षी मिस चंदीगड हा किताब देखील पटकावला. २०१८ मध्ये हरनाज़ सिंधू यांनी मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ हा किताब जिंकला. ही स्पर्धा मुंबईतील मालाडच्या इन्फिनिटी मॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती.

हरनाज़ संधु यांनी फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९ हा किताब जिंकला. ज्यामुळे त्यांना २०१९ मध्ये घडलेल्या मिस इंडिया स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली. हरनाज़ संधू यांनी या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशातून आलेल्या २९ प्रतिस्पर्धीं सोबत कॉम्पिटिशन देऊन टॉप ट्वेल मध्ये त्या पोहोचल्या. ही स्पर्धा मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आली होती.

हरनाज़ सिंधू या आपल्या करिअरवर फोकस करत त्यांनी शिक्षणावरही तितकंच लक्ष केंद्रित केलं. हरनाज़ सांगते की तिला आपल्या क्षेत्रात पुढे जायची प्रेरणा तिच्या आईपासून मिळाली आहे. तिची आई स्त्री रोग विशेषज्ञ आहे. तिची आई स्त्रियांना अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगांपासून‌ जागृत करायची. हरानाज़ जी देखील त्यांच्या आईचा वारसा पुढे चालवत आहेत.

जेव्हा त्या दिवा दौऱ्यावर होत्या तेव्हा त्यांनी इजरायल दुत्त वास आणि राजीव गांधी कॅन्सर संस्था अनु संसाधन केंद्र व खुशी या एनजीओ मधील महिलांना मुक्त आरोग्य शिबीर आयोजित करून दिली. मिस युनिव्हर्स या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन वेळा आपलं नाव नोंदवलं आहे परंतु २०२१ मध्ये हरनाज़ सिंधू हिने तब्बल २१ वर्षांनी पुन्हा एकदा मिस युनिव्हर्स हा किताब आपल्या घरी आणला.

हरनाज़ संधु यांना इतक्या मोठ्या स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करताना खूपच अभिमानास्पद वाटत होतं. आणि ज्यावेळी त्यांना “मिस युनिव्हर्स” हा किताब मिळाला त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक स्मित हास्य होतं. इसवी सन १९९४ मध्ये मिस यूनिवर्स ताज हा सुष्मिता सेन या भारतीय अभिनेत्रीने पटकावला होता. त्यानंतर सन २००० मध्ये लारा दत्ता या भारतीय अभिनेत्रीने मिस युनिव्हर्स हे टायटल जिंकलं.

आणि त्यानंतर २१ वर्षांनी २१ वर्षाच्या हरनाज़ संधु ने “मिस युनिव्हर्स २०२१” हा किताब जिंकला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जजेस ने तिला काही प्रश्न विचारले होते. त्यातीलच एक प्रश्न असा होता की, “बऱ्याच लोकांना हवामान बदल ही फसवणूक वाटते याच यावर तुमचं काय मत आहे?” या प्रश्नाचं उत्तर देताना हरनाज़ म्हणाली, “आज निसर्ग वेगवेगळ्या यातना भोगत आहे. वेगवेगळ्या परिस्थितीमधून जात आहे आणि हे सगळं पाहताना माझ्या मनाला देखील हळहळ भासते.

निसर्गाला होणारा त्रास हा आपल्याच वर्तणुकीतून होत आहे. आता आपण सगळ्यांनी फक्त बोलूनच नाही तर करून दाखवलं पाहिजे हीच वेळ आहे निसर्गाला वाचवण्याची कारण की आपली लहानातील लहान कृती निसर्गाला वाचवू शकते. नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आत्ताच आपल्या चुका दुरुस्त करणे हे उत्तम राहील.” हरनाजला विचारला जाणारा दुसरा प्रश्न असा होता की, “आजच्या काळामध्ये ज्या महिलांवर सामाजिक विचार लादले जात आहेत किंवा ज्या महिलांवर समाजिक दबाव येतोय अशा महिलांना तुमचा काय सल्ला असेल?’

या प्रश्नाचे उत्तर देताना हरनाज़ म्हणाली, “आजची युवा पिढी समाजापेक्षा स्वतः वरच विश्वास न दाखवून आपल्या समस्या अंगावर ओढून घेत आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात आणि त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा सुंदर आहात. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं बंद करा आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष द्या. बाहेर पडा, स्वतःसाठी लढा, कारण तुम्ही तुमच्या आयुष्याचे नेता आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात.

स्वतावर विश्वास ठेवा. आज माझा माझ्या वरती खूप विश्वास आहे म्हणूनच मी इथे उभी आहे.” २१ वर्षीय हरनाज़ चे इतके सुंदर विचार ऐकून जजेस थक्क झाले आणि हरनाज़ च्या नावी मिस युनिव्हर्स २०२१ हा किताब जाहीर केला. हरनाज़ ने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून भारताची शान वाढवली आहे. केवळ तिच्याच मुळे २१ वर्षांनी भारताला इतका मोठा मान मिळाला. हरनाज़ सारखं स्त्री रत्न आपल्या भारताला लाभलं हा एका प्रकारचा खजिनाच आहे.

आज हरनाज़ मुळे अनेक तरुणी प्रोत्साहित झाल्या आहेत. ती बऱ्याच तरुणींसाठी रोल मॉडेल म्हणजेच आदर्श ठरली आहे. प्रत्येक जण कठोर परिश्रम मधून जात असतो प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे प्रसंग येतात जिथे आपण आशा सोडून बसतो. असेच काही प्रसंग हरनाज़च्या आयुष्यात देखील आले होते. जेव्हा ती सतरा वर्षाची होती तेव्हा ती माणसांमध्ये कमी वावरायची, एकटीच राहायची शिवाय तब्येतीने देखील ती फारशी चांगली नव्हती ज्यामुळे तिच्या शाळेतील मुलं मुली तिला चिडवायचे.

हरनाज़ म्हणाली ‘मी शाळेत असताना माझ्या वर्गातील मुलं मुली मला मी बारीक होती म्हणून चिडवायचे ज्यामुळे मी बराच वेळ डिप्रेशनमध्ये गेली होती. परंतु माझ्या पालकांनी मला भरपूर सपोर्ट केला.’ आज आपल्या भारत देशामध्ये तरुणांची काही कमतरता नाही परंतु हरनाज़ सारख्या तरुणी व तरुण मुलं भारताला लाभणं अतिशय गरजेचे आहे.

जे प्रगत विचारांचे असतील व भारताचं नाव प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेतील. हरनाज़ संधु यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर करून दाखवलेल्या कार्यामुळे त्यांचे चाहते, मित्रपरिवार, फॅमिली, जिल्हा आणि देशाला त्यांचा फारच अभिमान आहे. ते म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान. हरनाज़ संधु ने देखील इतक्या लहान वयामध्ये मिस यूनिवर्स सारखं मोठं पद जिंकून भारताचे नाव यशाच्या शिखरावर सर्वात उंच स्थानी नेऊन ठेवलं आहे.

मिस युनिव्हर्स ताज डोक्यावर घलताना हरनाज़ च्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर ती म्हणाली माझ्या देशाला माझ्या या कामगिरीमुळे अभिमान वाटतो याचा मला आनंद आहे.

आम्ही दिलेल्या harnaaz sandhu information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हरनाज कौर संधू मराठी माहिती Harnaaz Sandhu in Marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Harnaaz Sandhu Biography in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि harnaaz sandhu information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये harnaaz sandhu information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!