हेलन केलर जीवन परिचय Helen Keller Information in Marathi

Helen Keller Information in Marathi हेलन केलर जीवन परिचय आजचा लेखामध्ये आपण हेलन केलर ह्या अमेरिकन सुप्रसिद्ध लेखिकेबदल माहिती जाणून घेणार आहोत. हेलन केलर ह्या पहिल्या एक मूखबधिर व्यक्ती आहेत. ज्यांनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. हेलन केलर यांनी लेखक, प्राध्यापक, समाजसुधारक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अव्वल कामगिरी बजावली. शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या मुलांसाठी हेलन केलर यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. त्यांचा आवाज, लेखन संपूर्ण विश्वामध्ये पोहोचलं. हेलन केलर हे एक महान व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या कामातून त्यांनी समाजातील शारीरिक दृष्ट्या हतबल लोकांना प्रेरणा दिली.

helen keller information in marathi
helen keller information in marathi

हेन केलर जीवन परिचय – Helen Keller Information in Marathi

पूर्ण नाव (Name)हेलन केलर
जन्म (Birthday)२७ जून १८८०
जन्म गाव (Birth Place)टस्कंबिया अलाबामा
राष्ट्रीयत्व (Citizenship)अमेरिकन
ओळख (Identity)सुप्रसिद्ध लेखिका
मृत्यू१ जून १९६८

जन्म

हेलन केलर या अमेरिकन असून त्यांचा जन्म टस्कंबिया अलाबामा येथे झाला. २७ जून १८८० रोजी एव्हि ग्रीन या घरात हेलन केलर यांचा जन्म झाला. त्या लहानाच्या मोठ्या त्यांच्या आजोबांनी बांधलेल्या घरांमध्ये झाल्या. हेलनचे वडील ओथर केलर हे बारा वर्ष टस्कंबिया नॉर्थ अलबमियनचे संपादन करत होते. आणि पुढील काही वर्षे त्यांनी सांघिक राज्य सेनेचे कप्तानपद निभावलं.

हेलन यांची आई कॅट ॲडम्स रोबोट इ ली यांच्या बहिण होत्या. हेलन या एक मूकबधिर व्यक्ती होत्या. त्या जन्मता तशा नव्हत्या स्कार्लेट फीवर आणि मेनिंजायटीस या रोगामुळे त्या बधिर व अंध झाल्या. हेलन यांचा जन्म झाल्यावर १९ महिन्यानंतर त्यांना शारीरिक दृष्ट्या अपंगत्व आले. हेलन या जन्मताच नव्हे परंतु लहान वयातच त्या अंध व बधीर झाल्या परंतु हतबल न होता त्यांनी आपली आवड पुढे नेण्याचा प्रयत्न केला हेलन यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

शिक्षण

हेलन केलर या पहिल्या मूकबधिर व्यक्ती आहेत ज्या महाविद्यालयातून पदवीधर झाल्या. हेलन केलर यांनी आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा मे १८८८ मध्ये केला. पर्किनस या अंधांसाठी असलेल्या संस्थे मध्ये हेलन केलर यांनी प्रवेश घेतला आणि मन लावून शिकण्यास सुरुवात केली.

इसवीसन १८९४ मध्ये हेलन केलर यांनी न्यू यॉर्क मधील राईट यूमन या मंदिरांच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला तिकडे सारा फुलर यांच्या मार्गदर्शनाखाली हेलन केलर यांनी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत त्यांनी प्रवेश घेतला.

लेखिका हेलन केलर

हेलन केलर या एक लेखिका होत्या मूकबधिर असल्यामुळे लेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपली मतं मांडली आणि समाजामध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. इसवी सन १८८१ मध्ये हेलन केलर यांनी आपल्या आयुष्यातील पहिलं पुस्तक लिहिलं ते म्हणजे “द फ्रॉस्ट किंग” ज्यावेळी त्यांनी या पुस्तकाचे लेखन केलं तेव्हा त्या फक्त अकरा वर्षांच्या होत्या.

वयाच्या बाविसाव्या वर्षी हेलन केलर यांनी “द स्टोरी ऑफ माय लाईफ” हे दुसरं पुस्तक लिहिलेलं या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःची आत्मकथा रेखाटली. त्यांच्या आयुष्यातील महाविद्यालय पर्यंतच्या काळा मध्ये घडलेल्या गोष्टींवर त्यांनी ही आत्मकथा लिहिलेली. इसवी सन १९०८ मध्ये हेलन केलर यांनी “द वर्ल्ड आय लिव्ह इन” हे पुस्तक लिहिलं या पुस्तकांमध्ये त्यांनी जगाबद्दल त्यांचा असलेला दृष्टिकोण आणि भोवताली घडणाऱ्या गोष्टींचे वर्णन केलं आहे.

हेलन केलर यांनी एकूण १२ पुस्तके लिहली आहेत. इसवी सन १९१३ मध्ये “आऊट ऑफ द डार्क” हि‌ हेलन केलर यांची सामाजिक विषयावरील निबंध मालिका प्रकाशित झाली. हेलन केलर यांचे लेखन नेहमी सोप्या शब्दात असायचं कारण त्यांच्या लेखनामध्ये त्यांनी जीवनामध्ये सहन केलेला त्रास, आजूबाजूला बघितलेल्या गोष्टी अनुभवलेले वेगवेगळे प्रसंग त्यांना कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागलं लोकं त्यांना कसा प्रतिसाद द्यायची या सगळ्या गोष्टींचे वर्णन त्या आपल्या पुस्तकांमध्ये करायच्या.

द स्टोरी ऑफ माय लाईफ” हे त्यांच खूपच गाजलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक ५० पेक्षा अधिक भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आलं या पुस्तकाला वेगवेगळ्या देशांमधून भरपूर प्रतिसाद मिळाला.

हेलन केलर यांचे सामाजिक कार्य

हेलन केलर यांना त्यांच्या आजाराने लहानपणीच सामान्य मुलांच्या यादी मधुन बाहेर काढले. हेलन या लहानपणी अंध व बधिर झाल्या. हेलन स्पेशल चाईल्ड म्हणून त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं त्यांच्या पालकांना हेलनच्या पुढील आयुष्याची फारच चिंता लागली होती कारण त्या आता सर्वसामान्य मुलांप्रमाणे बसून खेळणं, अभ्यास करणं या सगळ्या गोष्टी करू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी हेलन यांना विशेषता अंध आणि बधिर संस्था असणाऱ्या शाळांमध्ये प्रवेश करून दिला.

हेलन यांनी मन लावून अभ्यास करून महाविद्यालयांमधून पदवी देखील प्राप्त केली. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन करण्यास सुरुवात केली. हेलन यांच्या अडचणी सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळ्या होतात आणि आज हेलन यांच्यासारखे अनेक लोक जगात आहेत.

याचं भान ठेवून हेलन यांनी आपल्या भाषणातून, लेखनातून मूकबधिर यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. गोष्टी आत्मसात करण्यासाठी त्याच शिक्षण घेणे गरजेचे आहे हे त्यांनी समाजाला पटवून दिलं. आपण ज्या दुःखातून गेलोय तेच समान दुःख समोरच्याला ही असू शकतं आणि अशा लोकांसाठी त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. हेलन केलर यांनी मूकबधिर मुलांसाठी मिल्टन ब्लाइंड सोसायटी स्थापन केली.

अशा अनेक शारीरिक दृष्ट्या अपंग मुलांसाठी हेलन यांनी मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतला एक करोड पेक्षा अधिक पैसे गोळा करून अनेक संस्था अनाथालय बांधली. शारीरिक दृष्ट्या अपंग असणाऱ्या मुलांचं दुःख हेलन केलर यांनी स्वतः भोगल होतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात आशेचा किरण दाखवण्यासाठी हेलन केलर सुसज्ज झाल्या आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वतःला या कार्यामध्ये झोकून दिलं आपले वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून.

हेलन केलर यांचा हा प्रवास फक्त अमेरिकेपर्यंतचा मर्यादित राहिला नाही तर त्यांनी संपूर्ण विश्वामध्ये शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला त्यांची ही वाटचाल पुढे युरोप, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अनेक देश विदेशात चालू राहिली. संस्थांच्या माध्यमातून मिळणारी रक्कम त्यांनी कधीच स्वतःच्या खर्चासाठी वापरली नाही.

हेलन केलर यांनी आपली कथा पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त करत लोकांपर्यंत आपला आवाज पोचवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांच्यासारख्या अनेक लोकांना या समाजात वावरण्यासाठी बळ मिळेल अशा मिळेल. इथवरच न थांबता हेलन केलर महिलांच्या हक्कासाठी कामगारांच्या हक्कासाठी लढल्या. हेलन केलर यांची कथा अनेक शारीरिक दृष्ट्या हतबल असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये आशेचा किरण देणारी ठरली. अनेक तरुणांना प्रोत्साहित केले.

हेलन केलर यांची हीच कथा आजच्या समाजातील शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांपर्यंत पोहोचवण्याचं दुसरं काम हिंदी चित्रपटाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केले त्यांनी हेलन केलर यांच्या पुस्तकांवरील आधारित ब्लॅक नावाचा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन हे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसून येतात. हेलन केलर यांना “रेसिडेन्शिअल ऑफ फ्रीडम” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता या पुरस्काराचे मानकरी ठरणाऱ्या त्या पहिल्या मुखबधिर व्यक्ती होत्या.

मृत्यू

स्वतः शारीरिक दृष्ट्या मूकबधिर असून हेलन केलर यांनी आपली दुःख समाजातील इतर शारीरिक दृष्ट्या व्यक्तींसोबत वाटून घेत त्यांना आपल्या कथेतून प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये खूप मोठी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला सामाजिक दृष्ट्या त्यांचे समाज सेवेतील योगदान बहुमूल्य आहे.

हेलन केलर या जन्मतः आंधळ्या नव्हत्या त्यांच्या रोगामुळे त्यांना आंधळ पण आलं शिवाय हेलन केलर यांचा मृत्यू देखील रक्तस्त्रावामुळे झाला. १ जून १९६८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं शरीर सोबत नसलं तरी त्यांनी करून ठेवलेली अवल्लनीय कामगिरी आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे व पुढेही कायम राहील.

त्या अमेरिकन रहिवासी होत्या परंतु त्यांच्या कामाची घोडदौड संपूर्ण विश्वात चालू राहिली. हेलन केलर यांचे विचार अतिशय आधुनिक आणि प्रगत होते. त्यांच्या मते जगातील सर्वात सुंदर गोष्टी पाहिल्या किंवा स्पर्श केल्या जाऊ शकत नाहीत तर त्या फक्त हृदयालाच जाणवतात. हेलन केलर यांच्या मते आपल्याला जर एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर ती गोष्ट आपण करू शकतो.

परंतु मेहनत देखील तितकीच घेतली पाहिजे. हेलन केलर यांच्या मते आपण अधिक भाग्यवान लोकांशी आपली तुलना न करता आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची आपली तुलना केली पाहिजे तेव्हा आपल्याला समजेल की आपण किती भाग्यवान आहोत.

हेलन कॅलर यांचे हे विचार खरच खूप प्रेरणादायी आहेत.

आम्ही दिलेल्या helen keller information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हेलेन केलर जीवन परिचय माहिती helen keller biography in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या helen keller in marathi information या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about helen keller in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information of helen keller in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!