Hindu Marriage Act in Marathi – Hindu Marriage Act pdf in Marathi हिंदू विवाह कायदा विषयी माहिती आज आपण या लेखामध्ये हिंदू विवाह कायदा या विषयावर माहिती लिहिणार आहोत. विवाह हा एक समारंभ आहे ज्याच्या द्वारे जोडपे अधिकृतपणे कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये एकत्र येतात किंवा विवाह बंधनामध्ये अडकतात. भारतामध्ये विवाह हे मोठ्या थाटामाटात केले जाणारा समारंभ आहे आणि हे समारंभ प्रत्येकाच्या संस्कृती प्रमाणे आणि त्यांच्या रिती भाती प्रमाणे केले जातात. हिंदू समाजातील लोकांचे देखील विवाह समारंभ हे खूप मोठे असतात आणि हा एक घरातील खूप आनंदाचा समारंभ असला तरी त्याला देखील काही कायद्याच्या बाजू असतात.
हिंदू विवाह कायदा हा हिंदू कोड बिल मार्फत इ.स १९५५ मध्ये अंमलात आणला गेला. हिंदू विवाह कायदा सुरु करण्याचा उद्देश हा समाजातील लग्न व्यवस्था, हिंदू लोकांच्या वैयक्तिक आयुष्य, अवैद्याता अटी आणि कायदेशीर वैधता या सारख्या विवाहाबद्दलच्या अनेक गोष्टींना नियमांच्या चौकटीत बसवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता.
हिंदू विवाह कायदा – Hindu Marriage Act in Marathi
कायद्याचे नाव | हिंदू विवाह कायदा |
प्रकार | कायदा |
केंव्हा सुरु झाला | इ.स १९५५ |
उद्देश | समाजातील लग्न व्यवस्था, हिंदू लोकांच्या वैयक्तिक आयुष्य, अवैद्याता अटी आणि कायदेशीर वैधता या गोष्टींना नियमांच्या चौकटीत बसवणे. |
हिंदू विवाह कायदा काय आहे ?
हिंदू विवाह कायदा सुरु करण्याचा उद्देश हा समाजातील लग्न व्यवस्था, हिंदू लोकांच्या वैयक्तिक आयुष्य, अवैद्याता अटी आणि कायदेशीर वैधता या सारख्या विवाहाबद्दलच्या अनेक गोष्टींना नियमांच्या चौकटीत बसवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता.
हिंदू विवाह कायदा केंव्हा सुरु झाला ?
हिंदू विवाह कायदा हा हिंदू कोड बिल मार्फत इ.स १९५५ मध्ये अंमलात आणला गेला.
हिंदू विवाह कायदा कोणाला लागू होतो
हिंदू विवाह कायदा हा संबधित गटाला लागू होतो आणि हे काही गट आता आपण खाली पाहूया.
- एक व्यक्ती जो बौद्ध, जैन किंवा शीख आहे.
- वीरशैव, लिंगायत किंवा ब्राह्मो, प्रार्थना किंवा आर्य समाजाच्या अनुयायांसह हिंदू असलेली व्यक्ती.
- एक मूल ज्याचे आईवडील हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख आहेत कायदेशीर किंवा अवैध दोन्ही परिस्थितीमध्ये हा कायदा लागू होतो.
- हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख धर्मात धर्मांतरित किंवा पुनर्परिवर्तन करणारी कोणतीही व्यक्ती
- ज्या मुलाचे आईवडील हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख आहेत आणि त्यांचे पालक ज्या जमातीचे, समुदायाचे, गटाचे किंवा कुटुंबाचे सदस्य म्हणून वाढले आहेत.
वर दिलेल्या सर्व गटासाठी हिंदू विवाह कायदा लागू होतो.
हिंदू विवाह नोंदणी
हिंदू विवाह नोंदणी का करावी तर हिंदू विवाहांसाठी पुरावा म्हणून, राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत. जे त्यांच्या विवाहाशी संबंधित तपशील आणि हिंदू विवाह नोंदणीमध्ये विहित केलेल्या अटी प्रदान करतात. राज्य सरकार प्रदान करते की उप-कलम (१) डब्लूपीआय नुसार तपशील प्रविष्ट करणे राज्यामध्ये जारी केलेल्या निर्देशानुसार काही प्रकरणांसाठी अनिवार्य असेल.
त्याचबरोबर याचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला …रुपये दंड भरावा लागेल. हिंदू विवाह रजिस्टर वाजवी वेळी तपासणीसाठी उघडले जाईल आणि ते विधानांचा पुरावा म्हणून मानले जाईल आणि हे निबंधकांनी विहित शुल्क भरल्यानंतर दिले जाते. प्रवेश वगळल्यामुळे हिंदू विवाहाच्या वैधतेवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही.
हिंदू विवाहासाठी अटी
खालील अटींची पूर्तता केल्यास दोन हिंदूंमधील विवाह समारंभपूर्वक केला जाईल.
- ज्या वेळी विवाह होत असतो त्यावेळी विवाहादरम्यान जोडप्याला जोडीदार नसावा म्हणजेच त्याचे पूर्वी लग्न झालेले नसावे आणि झालेले असेल तर तो घटस्पोटीत असावा मगच त्या संबधित व्यक्तीला लग्न करता येते नाही तर त्याचे अगोदर लग्न झाले असेल आणि त्याचा अजूनही घटस्पोट झाला नसेल आणि तो पुन्हा लग्न करत असेल तर तो व्यक्ती दोषी ठरू शकतो आणि त्याच्यावर कायद्याचा वापर करून कारवाई केली जाऊ शकते.
- दोघांपैकी कोणीही मनाच्या अस्वस्थतेमुळे लग्नाला संमती देण्यास असमर्थ आहे किंवा दोघांच्या मधील एखादी व्यक्ती लग्नासाठी नकार देत असेल तर हा कायदा लागू होतो किंवा जी व्यक्ती लग्नासाठी नकार देत आहे ती व्यक्ती लग्न न करण्यासाठी या कायद्याचा वापर करू शकते.
- कोणत्याही जोडप्याला कोणत्याही मानसिक विकाराने ग्रासलेले नसावे ज्यामुळे तो / तिला विवाह आणि मुले जन्माला येण्यास अयोग्य ठरते.
- जोपर्यंत त्यांची प्रथा त्यांना लग्न करण्यास परवानगी देत नाही तोपर्यंत जोडपे सपिंड (चुलत भाऊ) नसावेत.
- जोडप्यांपैकी दोघांनाही वेडेपणा किंवा अपस्माराचा झटका येऊ नये तसेच जोडप्यामधील एकाद्याला काही आजार किंवा वेढा असेल तर ते लपवून न ठेवता सांगितले पाहिजे आणि जर या प्रकारच्या गोष्टी समोरील व्यक्तीला न सांगता त्याच्याशी फसवून लग्न केले तर येथे देखील कायद्याचा उपयोग होतो म्हणजेच यामध्ये हा कायदा असे सांगत आहे कि दोन्ही पक्ष्यांनी हि एकमेकाची फसवणूक करू नये.
- लग्नाच्या वेळी वराने वय २१ वर्षे आणि वधूने १८ वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे आणि जर लग्नाच्या वेळी वधूचे वय १८ पेक्षा कमी असेल तर त्या वधूच्या घरातील लोकांच्यावर आर्थिक कारवाई होऊ शकते. जोपर्यंत त्यांची प्रथा त्यांना लग्न करण्यास परवानगी देत नाही तोपर्यंत जोडप्याने निषिद्ध नातेसंबंधात असू नये.
विवाह आणि काही घटस्पोट रद्द करणे
- कलम ११ नुसार निरर्थक विवाह रद्द करता येतो किंवा त्या जोडप्यांचा घटस्पोट होऊ शकतो आणि निरर्थक विवाह रद्द करता येतो किंवा त्या जोडप्यांचा घटस्पोट होण्यासाठी कलम ११ चा वापर करू शकतात.
- कलम १३ च्या सहाय्याने ज्या व्यक्तीला घटस्पोट घ्यायचा आहे असे जोडपे घटस्पोट घेवू शकतात.
- कलम १३ बी मध्ये परस्पर संमतीने घटस्पोट घेता येतो.
- कलम १४ नुसार घटस्पोटा साठी एका वर्षाच्या आत कोणतीही याचिका सदर केली जाणार नाही.
- कलम १५ मध्ये घटस्पोट झालेली व्यक्ती पुन्हा लग्न करू शकते याबद्दल संमती दिली आहे.
- कलम १८ नुसार हिंदू विवाह कायद्यातील काही इतर तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा मिळू शकते.
रद्द करण्यायोग्य विवाह
हा कायदा लागू होण्यापूर्वी किंवा नंतर होणारे कोणतेही विवाह रद्द केले जातील आणि पुढील प्रकरणांमध्ये अवैध घोषित केले जातील.
- जेव्हा प्रतिवादीच्या नपुंसकतेमुळे विवाह संपन्न होत नाहीत .
- जेव्हा कलम ५ च्या क्लॉज (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अटींनुसार विवाहाचे उल्लंघन केले जाते.
- जर प्रतिवादी याचिकाकर्ता नसलेल्या व्यक्तीकडून गर्भवती असेल.
- बालविवाह प्रतिबंध कायदा १९४८ सुरू होण्यापूर्वी कलम ५ अन्वये याचिकाकर्त्याच्या विवाहात याचिकाकर्त्याची किंवा पालकाची संमती आवश्यक असते तेव्हा, पालकाची संमती जबरदस्तीने किंवा फसवणूक करून किंवा कोणत्याही भौतिक वस्तुस्थितीद्वारे किंवा परिस्थितीद्वारे मिळवली गेली असेल तर तो विवाह अवैध घोषित केला जावू शकतो.
काही इतर अटींच्या उल्लंघनासाठी शिक्षा
हिंदू विवाहाच्या उल्लंघनासाठी काही शिक्षा सुनावल्या जातात आणि त्यामधील काही शिक्षा खाली दिल्या आहेत.
- कलम ५ च्या खंड ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट उल्लंघन केले असल्यास, गुन्हा केलेल्या व्यक्तीस पंधरा दिवसांपर्यंत तुरुंगवास किंवा १००० रु. पर्यंत दंड आकारला जाईल.
- कलम ५ च्या कलम ( ४ ) किंवा खंड ( ५ ) मध्ये विनिर्दिष्ट उल्लंघन केले असल्यास, गुन्हा केलेल्या व्यक्तीला एक महिन्यासाठी तुरुंगवास किंवा १००० रु. पर्यंत दंड आकारला जाईल किंवा काही प्रकरणांमध्ये, व्यक्तीवर दोन्ही शुल्क आकारले जाईल.
आम्ही दिलेल्या hindu marriage act in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर हिंदू विवाह कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hindu marriage act pdf in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 498a act hindu marriage in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये hindu marriage act 1955 in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट