हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती मराठी Hotel Management Courses Information in Marathi

hotel management courses information in marathi हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती मराठी, हॉटेल उद्योग हा आदरातिथ्य उद्योगाचा एक महत्वाचा भाग आहे आणि आज आपण या लेखामध्ये हॉटेल उद्योग आणि त्याचे व्यवस्थापन या विषयी माहिती घेणार आहोत. भारतामध्ये हॉटेल व्यवसाय हा मोठ्या झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे हॉटेल व्यवस्थापन व्यावसायिकांची (हॉटेल मॅनेजमेंट) मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापक हा पर्याय एक चांगले करियर म्हणून विद्यार्थ्यांनी निवडले तर काही हरकत नाही कारण भारतातील हॉटेल उद्योगातील स्वरूपाच बदलत चालले आहे आणि त्यामुळे जर यामध्ये करियर केल तर आपल्या करियरला एक चांगली दिशा मिळेल.

हॉटेल मॅनेजमेंट म्हणजेच ज्याला मराठी मध्ये हॉटेल व्यवस्थापन म्हणतात हा एक प्रकारच कोर्स आहे आणि हॉटेल मॅनेजमेंटचे विषय हॉस्पिटॅलिटी आणि ट्युरिझम मॅनेजमेंटच्या  विस्तृत स्पेक्ट्रमचा शोध घेण्यावर आणि विद्यार्थ्यांना व्यासाहिकतेसह विविध प्रकारची परिस्थिती हाताळण्याचे ज्ञान आणि कौशल्य प्रधान करण्यावर लक्ष केंद्रित करतात.

हॉटेल व्यवस्थापनामध्ये अनेक कौशल्ये असतात जी हॉटेल उद्योगाशी संबधित असतात आणि ती हॉटेल उद्योगातील कामकाज सुरळीत आणि सुलभपणे पार पाडण्यासाठी मदत करतात. चला तर आता आपण खाली हॉटेल मॅनेजमेंट विषयी संपूर्ण माहिती खाली घेवूया.

hotel management courses information in marathi
hotel management courses information in marathi

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती मराठी – Hotel Management Courses Information in Marathi

hotel management information in marathi

 

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स काय आहे ?

हॉटेल मॅनेजमेंट हा एक प्रकारचा कोर्स आहे आणि यामध्ये हॉटेल उद्योग विषयक वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये आणि ज्ञान प्रधान केले जाते. हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स ३ ते ४ वर्षाचा कोर्स आहे.

हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील विषय – hotel management subjects 

हॉटेल मॅनेजमेंट हा एक बॅचलर पदवीचा भाग आहे आणि हा अभ्यासक्रम ३ ते ४ वर्षाचा असू शकतो. हॉटेल व्यवस्थापन या अभ्यासक्रमामध्ये हॉटेल विषयी अनेक कौशल्ये शिकवली जातात तसेच या अभ्यासक्रमामध्ये अनेक विषय असतात ते कोणकोणते असतात ते खाली आपण पाहूया.

हॉटेल मॅनेजमेंटमधील विषय

हॉटेल ऑपरेशन्स.अन्न आणि पेय व्यवस्थापन
हॉटेल अभियांत्रिकी.निवास ऑपरेशन.
स्वच्छता आणि अन्न सुरक्षा.आदरातिथ्य संप्रेषण.
संगणकाची मुलभूत तत्वेअन्न आणि पेय उत्पादन
हॉटेल आर्थिक लेखाविकास आणि व्यवस्थापनाचे गुणधर्म
स्टार हॉटेल्सच्या परीचलनात्मक बाबींच्यावर प्रकल्प अहवालअन्न आणि पेय सेवा व्यवस्थापन
प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापनहॉटेल्समधील आर्थिक व्यवस्थापन
आतिथ्य सेवांचे विपणनआदरातिथ्य कायदा
मानव संसाधन व्यवस्थापनव्यवस्थापन आणि संस्थात्मक वर्तन

हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी पात्रता निकष – hotel management eligibility 

कोणताही कोर्स करण्यासाठी आपल्या संस्थेने घालून दिलेले पात्रता निकष पार पडावे लागतात तसेच हॉटेल मॅनेजमेंट करताना देखील आपल्याला काही पात्रता निकष पार पडावे लागतात ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

  • भारतामध्ये हा कोर्स करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याने १२ वी किंवा कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्यूयेशन पूर्ण केलेले असावे आणि त्या संबधित विद्यार्थ्यांनी १२ वी मध्ये किंवा ग्रॅज्यूयेशनमध्ये ५० टक्केहून अधिक गुण मिळवलेले असावे.
  • भारतातील काही कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि हि परीक्षा उतीर्ण होणे गरजेचे असते. हि परीक्षा उतीर्ण झाल्यानंतरच त्या संबधित कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो.
  • शासन मान्यताप्राप्त महाविद्यालये आणि संस्थासाठी निवड दरवर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या कॉमन परीक्षेद्वारे केली जाते. परीक्षेमध्ये इंग्रजी, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान आणि तर्क शास्त्र या विषयांच्यामधील अनेक वेगवेगळे बहु पर्यायी प्रश्न असतात. काही परीक्षेमध्ये नेगेटीव्ह मार्किंग असते परंतु या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे नेगेटीव्ह मार्किंग नसते.
  • त्याच बरोबर प इंग्रजी, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान आणि तर्क शास्त्र या विषयांच्या बहु पर्यायी परीक्षेमध्ये तो संबधित विद्यार्थी पात्र झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याची हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी निवड करण्यासाठी त्याचे व्यक्तिमत्व आणि योग्यतेची मुल्यांकन करण्यासाठी त्याची व्यक्तिगत मुलाखत घेतली जाते किंवा गट चर्चा देखील घेतली जाते.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्सनंतर नोकरीच्या संधी देणारी क्षेत्रे आणि पगार

हॉटेल उद्योगामध्ये हॉटेल व्यवस्थापकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे कारण हॉटेल उद्योग झपाट्याने वाढत चालला आहे आणि त्यामुळे आणि आपले करियर या मध्ये करण्यास काहीच हरकत नाही. हॉटेल उद्योगाच्या वाढत्या स्पर्धेमध्ये हॉटेल व्यवस्थापन पाद्विधाराकांच्यासाठी अनेक चांगल्या आणि रोमांचक नोकरीच्या संधी आहेत.

या क्षेत्रामध्ये फूड अँड बेव्हरेजीस, ऑपरेशन, अकाऊंट, मार्केटिंग, सेल्स यासारखे अनेक विभाग असतात त्यामुळे या क्षेत्रामध्ये हॉटेल व्यवस्थापन पदवीधर आपल्या आवडीचे कोणतेही क्षेत्र निवडू शकतात. हॉटेल मॅनेजमेंट कोर्सनंतर पदवीधारकाला कोणकोणत्या प्रकारच्या नोकरीच्या संधी मिळू शकतात ते आपण पाहूया

नोकरीच्या संधी देणारी क्षेत्रे

  • अतिथी गृहे ( रिसॉर्ट ).
  • किचन मॅनेजमेंट ( हॉटेल, शाळा, कॉलेज, कारखाने आणि कंपनी गेस्ट हाऊस या ठिकाणी कँणटीन चालवणे ).
  • हॉटेल आणि खानपान संस्था.
  • हॉटेल आणि पर्यटन संघटना.
  • क्रुझ शिप हॉटेल व्यवस्थापन.
  • एअरलाइन केटरिंग आणि केबिन सेवा.
  • रुग्णालय प्रशासन आणि खानपान.
  • क्लब व्यवस्थापन आणि फॉरेस्ट लॉज.

हॉटेल मॅनेजमेंट पगार

हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉटेल व्यवस्थापन डिप्लोमा किंवा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या संबधित विद्यार्थ्याला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते किंवा ते स्वताचा उद्योग देखील सुरु करू शकतात. जर त्यांना नोकरीच करायची असेल तर ते चांगल्या हुद्द्यावर नोकरी करण्यासाठी पात्र असतात आणि त्यांना नोकरीच्या सुरुवातीच्या काळामध्ये ८००० ते १०००० इतका पगार असू शकतो किंवा त्या सामाभित विद्यार्थ्याच्या कौशल्यावर देखील पगार ठरवला जावू शकतो त्यानंतर त्यांचा जसा अनुभव वाढेल तसे त्यांना पगार वाढत जातो.

आम्ही दिलेल्या hotel management courses information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hotel management information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about hotel management in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!