ऋता दुर्गुळे माहिती Hruta Durgule Biography in Marathi

Hruta Durgule Biography in Marathi – Hruta Durgule Information in Marathi ऋता दुर्गुळे माहिती आजच्या लेखामध्ये आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या मनमोहक सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी ऋता दुर्गुळे ही सध्या मन उडू उडू झालं या मराठी सिरीयल मध्ये काम करत आहे. तिची ही सीरियल सुद्धा अतिशय चर्चेत आहे या सिरीयल मध्ये तिचा मेन रोल असून दीपिका देशपांडे या भूमिकेत ती दिसून येते. चला तर जाणून घेऊया ऋता दुर्गुळे यांच्याबद्दल अधिक माहिती.‌

hruta durgule biography in marathi
hruta durgule biography in marathi

ऋता दुर्गुळे माहिती – Hruta Durgule Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)ऋता दुर्गुळे
जन्म (Birthday)१२ सप्टेंबर १९९०
जन्म गाव (Birth Place)मुंबईतील दादर
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)अभिनेत्री

जन्म

१२ सप्टेंबर १९९० रोजी ऋता दुर्गुळे यांचा जन्म मुंबईतील दादर येथे झाला. ऋताचा‌ स्वभाव थोडासा खोडकर पण अतिशय समंजस आहे. ऋता दुर्गुळे यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. ऋता‌ दुर्गुळे यांचे कुटुंब अतिशय सर्वसामान्य कुटुंबापैकी एक आहे. ऋता दुर्गुळे यांची कौटुंबिक परिस्थिती देखील सर्वसामान्यच आहे. ऋता यांना एक बहीण व भाऊ देखील आहे.‌

आयईएससीएन सुले गुरुजी इंग्लिश मीडियम हायस्कूल या‌ शाळेतून ऋता ने आपलं प्राथमिक शिक्षण घेतलं. ऋता दुर्गुळे यांनी त्यांचे शिक्षण मुंबईतल्या रामनारायण रुईया कॉलेजमधून पूर्ण केलं. मास मीडिया मध्ये ऋता दुर्गुळे हिने पदवीचे शिक्षण घेतले आहे आणि त्याच्या पुढे तिने ॲडव्हर्टायझिंगचा अभ्यास केला.

ऋताला ड्रायव्हिंगची आणि वाचन करण्याची फार आवड आहे. लहानपणी ऋताने कधीच अभिनयामध्ये रस दाखवला नाही. परंतु कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होताना तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. ऋता आता ३१ वर्षाची आहे आणि नुकतच सोशल मीडियावर तिच्या अकाऊंटच्या माध्यमातून तिने तिची प्रतीक शाह ह्यांच्यासोबत एंगेजमेंट झाल्याचे फोटो शेअर केले आहेत. ऋताला गाण्याची, फिरण्याची फार आवड आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळे‌ यांचे एक्टिंग करियर

ऋताला सुरुवातीला एक्टिंग मध्ये काहीच रस नव्हता परंतु कालांतराने तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. ऋता दुर्गुळे एक अतिशय सुंदर देखणी व उत्तम एक्ट्रेस आहे. २०१३ मध्ये ऋता दुर्गुळे यांची पहिली मालिका स्टार प्रवाह या मराठी वाहिनीच्या माध्यमातून दूर्वा नावाची सिरीयल प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मध्ये मुख्य नायिका म्हणून ऋता दुर्गुळे यांची निवड करण्यात आली व बघताच ऋताने सर्व प्रेक्षकांना तिच्या सौंदर्याने व उत्तम अभिनयाने आपलंसं केलं.

या मालिकेने जवळपास हजार एपिसोड्सचा टप्पा पार केला. नितीन वैद्य व निनाद वैद्य या दिग्दर्शकांनी ही मालिका दिग्दर्शित केली होती. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली त्यावेळी हृतला बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली परंतु तिने वेळ घेऊन योग्य तो चित्रपट निवडण्याचा निर्णय घेतला.

दूर्वा या मालिकेच्या माध्यमातून ऋताच्या एक्टिंग करिअरची तर सुरुवात झाली होती परंतु तिला प्रेक्षकांची मने जिंकायची खरी संधी फुलपाखरू या मालिकेतून मिळाली. ही मालिका ऋताच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. या मालिकेमुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. फुलपाखरू हि २०१७ मध्ये झी युवा या वाहिनीवर प्रसारित झालेली मराठी सिरीयल होती.

ज्यामध्ये ऋता ‘वैदही इमानदार’ म्हणून मुख्य भूमिकेत होती. आणि तिच्यासोबत तिचा को-अॕक्टर म्हणून यशोमन आपटे म्हणजेच मानस (भूमिकेचे नाव) अशी वैदही आणि मानसची जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडली आणि तेव्हापासूनच ऋताची नवी ओळख म्हणजेच वैदही अशी निर्माण झाली.

तिच्या या कॅरेक्टर मुळे प्रेक्षकांकडून तिला भरपूर प्रेम मिळालं आणि सोशल मीडियावर बरेच फॅन फॉलोविंग सुरू झालं आणि तिच्या याच रोल मुळे तिला प्रसिद्धी मिळाली. ऋता अगदी अठरा वर्षांची असल्यापासून वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करते आहे. ऋताच हे कॅरेक्टर तरुण युवांमध्ये फारच प्रसिद्ध आहे.

ऋताचे प्रचंड चाहते आहेत. ऋताचा अभिनयाशी काहीच संबंध नव्हता तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमी मधून देखील कोणी अभिनयाशी संबंधित नव्हतं. तरीही तिने आज तिच्या स्वतःच्या स्व कष्टावर इतकं मोठं यश मिळवलं आहे. दिग्दर्शक प्रताप फड यांनी ऋता दुर्गुळे यांच्यासोबत २०२० मध्ये अनन्या नावाचा चित्रपट केला हा चित्रपट देखील बराच गाजला.

मराठी इंडस्ट्रीमध्ये हृतचा डेब्यू या चित्रपटातून झाला. ऋताला बराच लोकप्रिय शोजमध्ये बोलावलं जातं शिवाय ती वेगवेगळे पब्लिक इव्हेंट अटेंड करते. ती मोठ्या मोठ्या प्रॉडक्ट्स ची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. ऋता एक फॅशन इन्फ्ल्यून्सर आहे. ऋताची फुलपाखरू ही मालिका इतकी गाजली की तिला युथफुल फेस ऑफ द इयर हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.

हा पुरस्कार तिला झी युवा सन्मान पुरस्कार तर्फे मिळाला होता. अगदी सामान्य घरातून परिस्थितीतून वर येत कित्येक अडचणींवर मात करत ऋताने आज भरपूर यश प्राप्त केलं आहे. ऋताने पुढे २०१८ मध्ये दादा एक गूड न्यूज आहे या नाटकामध्ये काम केलं. या नाटकाचे देखील बरेच प्रयोग झाले.

ऋताचे बरेच चाहते असल्यामुळे तिला, तिच्या प्रत्येक कामाला बराच सपोर्ट मिळतो. २०२० मध्ये सिंगिंग स्टार या मराठी रियालिटी शोमध्ये ऋताने आयोजन केले होते. याच वर्षी तिने स्ट्रॉबेरी शेक या नावाची एक छोटी शॉर्टफिल्म देखील केली होती. गायन तारा या मालिकेमध्ये देखील ऋता काम करत होती.

ऋता दुर्गुळे या साउथ इंडियन मूव्हीजच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत. त्यांना साउथ इंडियन मूव्हीज बघायला फार आवडतं आणि त्यांची इच्छा होती की त्यांना साउथ इंडियन मूव्हीजचा अनुभव खऱ्या आयुष्यात घ्यायचा होता. म्हणजे तिला तशाच कॉन्सेप्ट वरती काम करण्याची संधी हवी होती. आणि ही संधी त्यांच्याकडे मन उडू उडू झालं या मालिकेद्वारे चालून आली.

मन उडू उडू झालं ही मालिका सध्या झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाली आहे. या मालिकेमध्ये ऋता दुर्गुळे दीपिका देशपांडे या भूमिकेमध्ये दिसत आहे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे‌. या मालिकेची कॉन्सेप्ट देखील साउथ इंडियन मूव्हीजशी रिलेटेड आहे. दादा एक गूड न्यूज आहे या नाटकासाठी तिला झी नाट्य गौरव पुरस्कारा तर्फे मस्ट नॅचरल परफॉर्मन्सेस ऑफ दी इयर पुरस्कार देण्यात आला.

एका मिडल क्लास घरांमधून ऋताने जन्म घेतला आणि पुढे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन तिला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि आज ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या घरातून कोणीच या क्षेत्रांमध्ये काम करत नव्हतं अस असताना देखील तिने स्वतःच्या बळावर या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत कठोर परिश्रम करून,‌ सुरूवातीला तीने छोट्या पडद्यावर काम केलं आणि मग बराच खस्ता खात तिला एका टीव्ही सिरीयल मध्ये मेन लीडचा रोल मिळाला.

मोठ्या पडद्यावर येताच प्रेक्षकांना तिच्या मनमोहक सौंदर्य आणि उत्तम अभिनय आवडू लागला दूर्वा या सिरीयल मुळे ऋताने महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांच्या मनामध्ये घर केलं. आणि बघताच तिची दुसरी सिरीयल देखील प्रसारित झाली. म्हणजेच फुलपाखरू या सिरीयल मुळे वैदही हे कॅरेक्टर फार गाजले.

ऋताला असं नेहमी वाटतं की वैदही हे तिचं सिरीयल मधील कॅरेक्टर तिच्या खऱ्या आयुष्यातील स्वभावाशी फारस मिळतंजुळतं आहे. तिचा हे कॅरेक्टर प्रत्येक तरुणाच्या हृदयामध्ये घर करून बसलं. युवा तरुणांमध्ये तर सगळीकडे फक्त ऋताचीच चर्चा आहे. पुढे तिने स्वतःच्या करिअर वरच फोकस करण्याचा निर्णय घेतला आणि आज ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

ऋता एक उत्तम अभिनेत्री तर आहेच परंतु तिच्या अभिनयासोबतच जी गोष्ट प्रेक्षकांना जास्त आवडते ते म्हणजे तीच सौंदर्य. महाराष्ट्रामध्ये तिच्या सौंदर्याचे भरपूर चाहते आहेत आणि म्हणूनच २०१८ मध्ये ऋताला टीव्ही विश्वातील सर्वात आकर्षक महिला या यादीत तिला पहिले स्थान मिळालं.

या प्रसंगानंतर तिने तिचं मत देखील व्यक्त केलं होतं. ऋता सांगते की तिला या यादीमध्ये पहिले स्थान मिळालं ते म्हणजे तिच्या वैदही या कॅरेक्टरमुळे. म्हणजेच फुलपाखरू या सिरीयल मुळे ती घरा घरा मध्ये पोहोचली. ती म्हणते की या यादीत माझं पहिलं नाव आल्यामुळे मला काम करण्यासाठी आणखीन प्रेरणा मिळाली आहे.

या सिरीयल मुळे प्रेक्षकांनी तिच्यावर भरपूर प्रेम केलं आणि यापुढे ती आपल्या कामातून तिच्या चाहत्यांना कधीच नाराज होऊ देणार नाही नेहमीच हार्ड तर्क करेल असा विश्वास तिने तिच्या चाहत्यांना दिला. ऋताला भरतनाट्यम् ची आवड आहे परंतु काही कारणामुळे ती सरावाला वेळ देऊ शकत नाही आणि याचं तिला नेहमीच पचतावा होतो.

ऋताला गाणी गायीला फार आवडतं परंतु ते तिला जमत नाही असं तिने तिच्या इंटरव्यू मध्ये सांगितल आहे. ऋताच्या दोन जवळच्या मैत्रिणी म्हणजे ध्रुवी आणि पूर्वा यांच्या नावाचे टॅटू ऋताने तिच्या हातावर काढले आहेत. ऋता दुर्गुळे ही अतिशय प्रेरणादायी अभिनेत्री आहे तिने अतिशय खडतर प्रसंगांवर मात करत स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे अनेक एक्टिंग फिल्डमधील लोकांसाठी ऋता दुर्गुळे एक आदर्श ठरली आहे.

आम्ही दिलेल्या hruta durgule biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर योगासन चित्र सहित माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hruta durgule information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of hruta durgule in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये hruta durgule information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!