human rights act 1993 in marathi pdf मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ pdf जगामध्ये भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि आपला देश मोठे लोकशाही देश असल्याने आपल्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांचे मुलभूत हक्काचे संरक्षण करणे हे खूप महत्वाचे आहे आणि म्हणूनच सरकारने मानवाधिकार संरक्षण कायदा १९९३ सुरु केला असावा ज्यामुळे लोकांचे मुलभूत हक्काचे संरक्षण होईल. मानवाधिकार संरक्षण कायदा १९९३ (human rights act 1993) २८ जानेवारी १९९३ मध्ये या कायद्याला मंजुरी मिळाली आणि हा कायदा ८ जानेवारी १९९४ संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला.
हा कायदा लागू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनापासून मानवी हक्काचे संरक्षण करणे आहे. मानवाधिकार संरक्षण कायदा १९९३ या कायद्याला मानवी हक्क संरक्षण कायदा म्हणून देखील ओळखले जाते.
कायद्याचे नाव | मानवाधिकार संरक्षण कायदा १९९३ (human rights act 1993) |
केंव्हा मंजुरी मिळाली | २८ जानेवारी १९९३ |
केंव्हा लागू झाला | ८ जानेवारी १९९४ |
इतर नाव | मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ |
कलम २ : जगण्याचा अधिकार
मानवी हक्क कायद्यामध्ये कलम २ नुसार मानवाच्या जगण्याच्या हक्कच संरक्षण केले जाते. म्हणजेच या कायद्यामुळे तुमचे जीवन कोणीही संपवण्याचा प्रयत्न करू शकत नाही म्हणजेच या कायद्यामध्ये कोणत्याही मानवाच्या जगण्याच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या तरतुदी आहेत. सार्वजनिक अधिकाऱ्यांनी तुम्हाला धोक्यात आणणारे किंवा तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारे निर्णय घेताना त्यामध्ये त्यांना तुमच्या जगण्याच्या अधिकाराचा देखील विचार केला पाहिजे. तसेच तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा जर अचानक मृत्यू झाला आणि तुम्हाला त्याचे कारण माहित नसेल तर तुम्ही त्याचा मृत्यू कश्यामुळे झाला याचा तपास घेण्यचा अधिकार हा त्या व्यक्तीला असतो.
कलमातील तरतुदी
- कायदेशीर अटक करणे.
- बेकायदेशीर हिंसाचार करणे थांबवणे.
- कायदेशीर अटकेतून एखाद्या व्यक्तीला पळून जाण्यापासून थांबवणे तसेच वेगवेगळ्या कारणांच्यामुळे होणाऱ्या दंगली थांबवणे.
कलम तीन हे प्रत्येक व्यक्तीचा मानसिक किंवा शरीराक छळ किंवा त्रास या पासून संरक्षण करते तसेच अपमानास्पद वागणून या पासून देखील मानवी हक्क कायदा उपयोगी ठरू शकतो. जर तुमच्याही कोणी अश्या प्रकारे वागत असेल तर त्यावेळी तुम्ही या कायद्याचा आधार घेवू शकता. जर एखाद्याने गंभीर शारीरिक हल्ला केला असेल किंवा कोणत्याही प्रकारची धमकी देवून तुमचा मानसिक छळ करत असेल तर तुम्ही मानवी हक्क कायदा १९९३ या कायद्याची मदत घेवू शकता आणि आपला त्रास कमी करू शकता.
कलम ४ : गुलामगिरी आणि सक्तीच्या श्रमापासून मुक्तता
अनेक लोक अनेक कारणांच्यासाठी गुलामगिरी करत असतात आणि या गुलामगिरी पासून प्रत्येक माणसाला संरक्षण मिळावे म्हणून मानवी हक्क कायदा किंवा मानवाधिकार संरक्षण कायदा मदत करतो. जर एखादा व्यक्ती तुमच्यावर गुलामगिरी करत असेल किंवा तुम्हाला धमकी देऊन तुमच्या कडून काम करून घेत असेल तर त्यावेळी या कायद्याचा वापर केला जावू शकतो. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला गुलामगिरीमध्ये ठेवता येत नाही तसेच कोणालाही सक्तीचे काम करणे आवश्यक नाही.
कलम ५ : स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेच्या अधिकाराचे संरक्षण करणे
वैयक्तिक सुरक्षेचे रक्षण करण्याऐवजी ते अवास्तव अटकेपासून व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करते म्हणजेच या कायद्यानुसार वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार ह्या कायद्यामार्फत दिला आहे.
कलम ६ : निष्पक्ष चाचणीचा अधिकार
नागरी हक्क आणि दयीत्वे किंवा त्याच्यावरील कोणत्याही फौजदारी आरोपाच्या निर्धारामध्ये कायद्याने स्थापन केलेल्या स्वातंत्र्य आणि निपक्षपाती न्यायाधिकरनाद्वारे वाजवी वेळेमध्ये प्रत्येकाला सर्वाजानील सुनावणी घेण्याचा अधिकार आहे आणि निर्णय सार्वजनिकरित्या घोषणा केली जायील परंतु लोकशाही समाजातील नैतिकता, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी जेथे किशोरवयीन मुलांचे हित किंवा खाजगी जीवनाचे संरक्षण असेल अशा सर्व खटल्यातून पत्रकार आणि जनतेला वगळले जावू शकते.
कलम ७ : कायद्याशिवाय शिक्षा नाही
कलम ७ नुसार तुम्ही केलेल्या कृतीसाठी तुमच्यावर फौजदारी गुन्ह्याचा आरोप लावला जावू शकत नाही म्हणजेच सार्वजनिक प्राधिकनांनी स्पष्टपणे असे सांगितले पाहिजे कि फौजदारी गुन्हा म्हणून काय कृती असते ज्यामुळे तुम्हाला कायदा मोडत असताना तुम्ही काय करत आहात ते समजेल.
कलम ८ : तुमचे खाजगी आणि कौटुंबिक जीवनाचा आदर
या कायद्यातील कलम ८ तुमचे खाजगी आणि कौटुंबिक जीवन, तुमचे घर आणि तुमचा पत्रव्यवहार यांचा आदर करण्याच्या तुमच्या हक्काचे संरक्षण करतो. या कलमानुसार सार्वजनिक सुरक्षेचे रक्षण करते तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करते, अर्थव्यवस्थेचे रक्षण करते, आरोग्य आणि नैतिकतेचे रक्षण केले जाते या सारख्या अनेक गोष्टींच्या विषयी या कायद्यातील कलम आठ मार्फत रक्षण केले जाते.
कलम ९ : विचार, श्रध्दा आणि धर्म स्वातंत्र्य
तुम्हाला तुमचे विचार आणि श्रध्दा कृतीत आणण्याचा अधिकार आहे. यामध्ये तुमचा धार्मिक कपडे घालण्याचा अधिकार आहे, धार्मिक बोलण्याचा अधिकार आहे, धार्मिक उपासना करण्याचा अधिकार आहे. तसेच तुमचे विचार मांडण्याचा अधिकार आहे आहे अश्या अनेक गोष्टींच्या विषयी अधिकार या कलमामध्ये आहेत.
कलम १० : अभिव्यक्ती स्वातंत्र्य
मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या कलम १० नुसार प्रत्येक व्यक्तीला स्वताची मते ठेवण्याचा आणि सरकारी हस्तक्षेपाशिवाय ते मुक्तपणे व्यक्त करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करते.
कलम ११ : इतर लोकांच्यासोबत सभा आणि निदर्शने करून निषेध करण्याचा अधिकार
हि अशी काही परिस्थिती आहे ज्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरण आपले संमेलन आणि संघटना स्वातंत्र्याचे अधिकार प्रतिबंध करू शकते. या कलमामार्फत राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुरक्षा संरक्षित केली जाते, अव्यवस्था किंवा गुन्हेगारी प्रतिबंध करता येते.
आम्ही दिलेल्या human rights act 1993 in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ pdf माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या protection of human rights act 1993 in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट