इन्कम टॅक्स माहिती Income Tax Information in Marathi

income tax information in marathi – income tax meaning in marathi इन्कम टॅक्स माहिती, आज आपण या लेखामध्ये आयकर किंवा प्राप्तीकर या विषयी माहिती घेणार आहोत म्हणजेच आयकर काय आहे, तो कशावर आकाराला जातो आणि तो केंव्हा आकाराला जातो या बद्दल आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. आयकर किंवा प्राप्तीकर ज्याला इंग्रजीमध्ये इन्कम टॅक्स म्हणून ओळखले जाते आणि हा एक कर प्रकार आहे जो कोणत्याही व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या उत्पन्नावर आकाराला जातो.

कर आकारण्याची हि संकल्पना इ.स १८६० मध्ये म्हणजेच ब्रिटीशांच्या काळामध्ये सर्वप्रथम सुरु झाली आणि त्यानंतर आज पर्यंत व्यक्तीच्या किंवा कोणत्याही संस्थेच्या उत्पन्नावर कर आकाराला जातो परंतु तो कर आकारण्यासाठी देखील काही अटी व नियम लागू केले आहेत.

आपल्यामधील अनेक जणांना माहित आहे कि कर हे दोन प्रकारचे असतात ते म्हणजे प्रत्यक्ष कर (direct tax) आणि अप्रत्यक्ष कर (indirect tax). कर हा अनेक प्रकारच्या गोष्टींच्यावर आकाराला जातो जसे कि पगार, व्यवसायातील उत्पन्न, संपत्ती मधून मिळालेल्या उत्पन्नातून किंवा काही इतर उत्पन्नातून देखील केले जाते. चला तर खाली आपण आयकर किंवा प्राप्तीकर विषयी सविस्तर माहिती घेऊया.

income tax information in marathi
income tax information in marathi

इन्कम टॅक्स माहिती – Income Tax Information in Marathi

कराचे नावआयकर किंवा प्राप्तीकर (income tax)
सुरुवातइ.स १८६० मध्ये ब्रिटीश काळामध्ये
सुरुवात कोणी केलीजेम्स विल्सन
प्रकारकर
कराचे प्रकारेप्रत्यक्ष कर (direct tax) आणि अप्रत्यक्ष कर (indirect tax)

आयकर म्हणजे काय – income tax meaning in marathi

भारतामध्ये कर हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अश्या दोन प्रकारे भरून घेतला जातो. प्रत्यक्ष कर हा असा एक कर आहे जो आपण आपल्या उत्पन्नावर थेट सरकारला भरू शकतो आणि अप्रत्यक्ष कर हा एक असा कर आहे जो इतर कोणीतरी तुमच्या वतीने गोळा करतो आणि सरकारला देतो.

कराची सुरुवात केंव्हा व कोणी केली ?

आयकर किंवा प्राप्तीकर आकारणीची सुरुवात हि इ.स १८६० मध्ये ब्रिटीश काळामध्ये जेम्स विल्सन यांनी केली आणि तेंव्हापासून कर आकारणीस सुरुवात झाली.

प्राप्तीकराचे प्रकार – types

कर हा व्यक्तीच्या उत्पन्नावर किंवा संस्थेच्या उत्पन्नावर आकाराला जातो आणि या कराचे एकूण दोन प्रकार आहेत ते म्हणजे प्रत्यक्ष कर (direct tax आणि अप्रत्यक्ष कर ( indirect tax) आणि हे दोन प्रकार आयकर कायद्यानुसार पडले आहेत. चला तर खाली आपण या प्रकारांच्याविषयी सविस्तर माहिती घेवूया. 

प्रत्यक्ष कर (direct tax):

प्रत्यक्ष कर हा असा कर आहे जो प्राप्तीकर, भेट कर, संपती कर या वर लादला जातो आणि त्या संबधित व्यक्तीद्वारे तो भरला जातो आणि थेट किंवा प्रत्यक्ष भरला जातो म्हणजेच या मध्ये जो व्यक्ती करदाता म्हणून आपला कर भारत असतो तो व्यक्ती सरकारला कर मध्यस्थ्याला मधे न घेता भरतो त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात.

अप्रत्यक्ष कर (Indirect tax) :

अप्रत्यक्ष कर म्हणजे यामध्ये जर करदाता मध्यस्थ्याच्याद्वारे कर भरत असेल तर किंवा कर दात्याने दुसऱ्या व्यक्तीला कर दिला तर त्या प्रकाराला अप्रत्यक्ष कर म्हणतात. यामध्ये विक्रीकर हा प्रकार येतो कारण यामध्ये अप्रत्यक्षपणे कर भरला जातो.

कर भरण्यास कोण पात्र आहे – who are tax payers

कोणताही भारतीय ज्याचे वय ६० वर्षाच्या आतील आहे आणि त्याचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे अश्या व्यक्ती किंवा नागरिकांना आयकर भाराव लागतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचे वय हे ६० वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त असेल तर तो व्यक्ती देखील कर भरण्यास पात्र असतो. तसेच जर काही संस्था उत्पन्न निर्माण करत असतील तर त्या संस्था देखील थेट कर भरण्यास पात्र असतात.

संस्था ज्या थेट कर भरण्यास पात्र असतात

 • हिंदू अविभक्त कुटुंब.
 • स्थानिक अधिकारी.
 • असोसिएशन ऑफ पर्सन.
 • कंपन्या आणि कॉर्पोरेट कंपन्या.

करपात्र उत्पन्नाचे स्तोत्र कोणकोणते आहेत

कर हा खालील उत्पन्नाच्या स्तोत्रावर आकाराला जातो आणि खाली आपण ती करपात्र स्तोत्र कोणकोणती आहेत ते पाहणार आहोत.

 • भांडवली मालमत्तेतील उत्पन्न : आयकर हा भांडवली मालमत्तेमधून जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नावर हा कर आकाराला जातो. भांडवली मालमत्तेमध्ये दागिने, रोखी, इक्विटी, जमीन, इमारत, डिबेंचर्स वर लागू होतो. ज्यावेळी अश्या प्रकारच्या मालमत्ता विकल्या जातात त्यावेळी त्यांच्या उत्पन्नावर कर आकाराला जातो.
 • पगारातील मिळकत : पगारातील मिळकतीवर देखील कर आकाराला जातो म्हणजेच त्या व्यक्तीचे पगारातून मिळणारे उत्पन्न हे कर नियमामध्ये बसत असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या पगाराच्या उत्पन्नावर कर भरावा लागतो.
 • व्यवसायातून उत्पन्न : आयकर कायद्याच्या कलम ३० ते ४३डी नुसार व्यवसायातून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळालेले असेल तर ते उत्पन्न कर भरण्यास लागू होते.
 • घराच्या मालमत्तेतून मिळालेले उत्पन्न : काही व्यक्ती त्यांचे घर हे भाड्याने देतात आणि त्यांना महिन्याला भाडे स्वरूपामध्ये काही उत्पन्न मिळते आणि अश्या उत्पन्नावर देखील कार आकारला जातो.
 • इतर स्तोत्रांच्याकडून मिळकत : वर सांगितलेल्या स्तोत्रांच्याकडून तर कर आकारला जातोच परंतु काही इतर स्तोत्र देखील आहेत जी कर भरण्यास पात्र ठरू शकतात जसे कि लॉटरी किंवा घोडा शर्यत जिंकणे, पेन्शन धारकांच्या मृत्यूनंतर मिळालेली पेन्शन, भेटवस्तू, सरकारी सिक्युरिटी आणि डिबेंचर्स आणि लाभांश पासून मिळालेले उत्पन्न.

आयकर कायद्याविषयी माहिती – information about income tax act in marathi

 • आयकर कायद्याने संपती कर कायदा १९५७ याची जागा घेतली आणि सध्या या कायद्याला आयकर कायदा १९६१ (income tax act 1961) म्हणून ओळखले जाते.
 • आयकर कायदा हा लागू करण्याचा मुख्य उद्देश हा देशामध्ये होणाऱ्या कर आकारणीला नियमांच्या चौकटीमध्ये बसवणे हा होता.
 • या कायद्यामध्ये देशातील अंतर्गत आकारनीशी संबधित नियम आहेत आणि अंतर्गत आकारणी म्हणजे आयकर आकारणी, प्रशासन, संकलन आणि वसुली या प्रकारच्या गोष्टींचा समावेश आहे.
 • आपल्या देशामध्ये दोन प्रकारे कर आकारणी केली जाते ती म्हणजे प्रत्यक्ष कर आकारणी आणि अप्रत्यक्ष कर आकारणी.

आम्ही दिलेल्या income tax information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इन्कम टॅक्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या income tax meaning in marathi या itr meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about income tax act in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये income tax return information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!