भारतीय परिषद कायदा 1892 Indian Council Act 1892 in Marathi

indian council act 1892 in marathi भारतीय परिषद कायदा १८९२ माहिती, भारतामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे कायदे हे वेगवेगळ्या कारणांच्यासाठी सुरु केले जातात आणि भारतीय परिषद कायदा १८९२ (indian council act 1892) हा देखील एक कायदा आहे आणि हा एक ब्रिटीश संसदेचा कायदा आहे ज्या कायद्यामुळे आपल्या भारतीय विधान परिषदेचे स्वरूप वाढले किंवा विधान परिषदेचा आकार वाढण्यास मदत झाली. ज्यावेळी भारतामध्ये ब्रिटीश राजवट होती म्हणजेच भारतामध्ये ब्रिटीशांचे राज्य होते त्या काळामध्ये प्रथम या कायद्याचा परिचय हा रिचर्ड अॅशेटन आणि पहिला व्हीस्काउंट यांनी करुन दिला आणि या कायद्याला ब्रिटीश सरकार द्वारे २० जून १८९२ संमती मिळाली आणि तो कायदा १८९३ पासून लागू करण्यात आला.

या कायद्यामुळे विधान परिषदेचा आकार तर वाढण्यास मदत झालीच परंतु यामुळे जे विधान परिषदेचे सदस्य बनले त्यांना विधान परिषदेमध्ये अर्थसंकल्पावर आपल्या शंका आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील मिळाला. या कायद्याचे मुख्य हेतू असे होते कि लष्करामध्ये होणारे खर्च हे कमी करणे किंवा त्यावर नियंत्रण तसेच विधान परिषदेतील सुधारणा हा देखील या कायद्याचा एक मुख्य हेतू होता.

इ.स १८९२ च्या कायद्यानुसार स्वीकारलेल्या निवडणुकीच्या तत्वाचे गैर अधिकारींना सरकारच्या अर्धिक धोरणावर चर्चा किंवा वर सांगितल्याप्रमाणे प्रश्न किंवा शंका विचारण्याचा अधिकार मिळाला किंवा परवानगी मिळाली. चला तर आता आपण खाली या कायद्याविषयी आणखीन माहिती जाणून घेवूया.

indian council act 1892 in marathi
indian council act 1892 in marathi
अनुक्रमणिका hide

भारतीय परिषद कायदा 1892 – Indian Council Act 1892 in Marathi

कायद्याचे नाव भारतीय परिषद कायदा १८९२ (Indian council act 1892)
कायद्याला संमती कधी मिळाली या कायद्याला ब्रिटीश सरकार द्वारे २० जून १८९२ संमती मिळाली
केंव्हा पासून लागू करण्यात आला इ.स १८९३ पासून
प्रथम परिचय कोणी केला रिचर्ड अॅशेटन आणि पहिला व्हीस्काउंट
मुख्य उद्देश विधान परिषदेची सुधारणा आणि वाढ

भारतीय परिषद कायदा १८९२ म्हणजे काय ?

indian council act 1892 कायदा ज्याला मराठीमध्ये भारतीय परिषद कायदा १८९२ या नावाने ओळखले जाते. हा कायदा ब्रिटीश संसदेचा कायदा आहे आणि या कायद्याचा मुख्य हेतू हा विधान परिषदेचे स्वरूप वाढवणे आणि या कायद्यामध्ये अशी देखील तरदूत होती कि जे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांना अर्थसंकल्पावर प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील होता.

भारतीय परिषद कायदा १८९२ चा मुख्य उद्देश

कोणताही कायदा अमलात आणणे आणि तो लागू करणे  या पाठीमागे काही ना काही हेतू असतो आणि भारतीय परिषद कायदा १८९२ ( indian council act 1892 ) लागू करण्यापाठीमागे देखील काही उद्देश होते ते आपण आता खाली पाहणार आहोत.

  • भारतीय परिषद कायदा १८९२ हा लागू करण्याचा मुख्य उद्देश हा विधान परिषदेची विकास करणे तसेच त्याचा आकार वाढवण्याच्या हेतून हा कायदा लागू केला.
  • आयसीएस ( ICS ) ची जी चाचणी होते ती इंग्लंड आणि भारतामध्ये एकाच वेळी व्हावी म्हणून हा कायदा लागू केला.
  • लष्करा मध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील या कायद्याचा जन्म झाला.
  • विधानपरिषदेची सुधारणा करण्यासाठी हा कायदा सुरु केला.

भारतीय परिषद कायदा १८९२ वैशिष्ठ्ये – features of indian council act 1892 

  • भारतीय परिषद कायदा १८९२ या कायद्यामुळे केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदे मध्ये अधिक सदस्यांची संख्या वाढवली परंतु त्यामध्ये अधिकृत बहुमत हे कायम ठेवले.
  • केंद्रीय विधान परिषदेचे अशासकीय सदस्यांचे नामांकन हे व्हाइसरॉयद्वारे आणि प्रांतीय विधान परिषदेच्या नगरपालिका, विद्यापीठे, जमीनदार, व्यापारी संघटना, जिल्हा मंडळे आणि चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या मदतीने राज्यपालांनी केले.
  • यामुळे विधान परिषदेचे कार्य वाढले आणि अर्थसंकल्पावर प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला.

भारतीय परिषद कायदा १८९२ या मधील तरतुदी

  • भारतीय परिषद कायदा १८९२ या कायद्यानुसार भारतामध्ये केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदेमधील सदस्यांची सख्या ठरलेली होती. जसे कि मद्रास मध्ये सदस्यांची संख्या २०, उत्तर पश्चिम प्रांतामध्ये १५, केंद्रीय विधान परिषदेमध्ये कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त १६, बंगाल मध्ये सदस्यांची सख्या २० होती तर मुंबई विधान परिषदेसाठी सदस्यांची संख्या हि ८ इतकी होती.
  • या कायद्यानुसार विधान परिषदेमधील सदस्यांची निवड करण्यासाठी अप्रत्येक निवडणूक प्रणालीचा वापर करण्यात आला आणि यामध्ये प्रांतीय परिषदेमधील सदस्यांची निवड करण्यासाठी नगरपालिका, विद्यापीठे, जमीनदार, जिल्हा मंडळे आणि चेंबर ऑफ कॉमर्स यांची मदत घेतली जाऊ लागली.
  • तसेच या कायद्याने मध्यवर्ती कायदेमंडळामध्ये राज्यपालांना जागा भरण्याचे सर्व अधिकार देण्यात आले. तसेच पप्रांतीय विधिमंडळा मध्ये देखील राज्यपालांना अधिकार देण्यात आले.
  • भारतीय राज्य सचिवांना गव्हर्नर जनरल इन कौन्सिलसाठी नामांकन देण्याचा अधिकार देखील या कायद्यानुसार देण्यात आला.
  • जे विधान परिषदेचे सदस्य बनले त्यांना विधान परिषदेमध्ये अर्थसंकल्पावर आपल्या शंका आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील मिळाला.
  • १८९२ मध्ये विधान परिषदेच्या २४ सदस्यांच्या पैकी फक्त ५ सदस्य हे भारतीय होते.

भारतीय परिषद कायदा १८९२ चे फायदे – advantages 

  • भारतीय परिषद कायदा १८९२ या कायद्यानुसार जे विधान परिषदेचे सदस्य बनले त्यांना विधान परिषदेमध्ये अर्थसंकल्पावर आपल्या शंका आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील मिळाला.
  • कायद्याने हे परिषदेचे सदस्य आहेत त्यांना सार्वजनिक समस्यांच्या विषयांवर स्पष्टीकरण देण्याचा अधिकार मिळाला.
  • भारतीयांना बहुसंख्य व्हेटो करण्याचा अधिकार नसतानाही त्यांची मते किंवा म्हणणे ऐकून घेण्यात आली.

भारतीय परिषद कायदा १८९२ चे तोटे – disadvantages 

  • या कायद्याने भारतामध्ये असंख्य क्रांतिकारी शक्तीच्या विकासाचा टप्पा निर्माण केला कारण इंग्रजांनी फक्त किरकोळ सवलत दिली.
  • भारतातील प्रातिनिधिक सरकारच्या दिशेने जरी पहिले पाऊल असले तर या कायद्यानुसार सर्वसामान्य लोकांना कोणताच फायदा झाला नाही.

भारतीय परिषद कायदा १८९२ ह्या कायद्याविषयी विचारले जाणारे प्रश्न – questions 

  • भारतीय परिषद कायदा १८९२ म्हणजे काय ?

भारतीय परिषद कायदा १८९२ हा एक असा कायदा आहे जो ब्रिटीश राजवटी मध्ये भारतात सुरु झाला आणि म्हणून या कायद्याला ब्रिटीश संसदेचा कायदा म्हणून ओळखले जाते. ह्या कायद्याचा मुख्य हेतू हा विधान परिषदेची सुधारणा करणे आणि विधान परीषद वाढवणे हा होता.

  • या कायद्यानुसार कोणता मुख्य अधिकार सदस्यांना मिळाला ?

भारतीय परिषद कायदा १८९२ या कायद्यानुसार विधान परिषदेच्या सदस्यांना विधान परिषदेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा तसेच शंका किंवा प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळला.

  • भारतीय परिषद कायदा १८९२ हा कायदा केंव्हा लागू केला ?

भारतीय परिषद कायदा १८९२ हा कायदा ब्रिटीश सरकारने भारतामध्ये २० जून १८९२ पास केला किंवा ह्या कायद्याला संमती दिली आणि इ.स १८९३ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला.

  • या कायद्याचा प्रथम परिचय कोणी करून दिला ?

भारतीय परिषद कायदा १८९२ ह्या कायद्याचा प्रथम परिचय हा रिचर्ड अॅशेटन आणि पहिला व्हीस्काउंट यांनी करून दिला.

आम्ही दिलेल्या indian council act 1892 in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारतीय परिषद कायदा 1892 माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bharat parishad adhiniyam 1892 या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!